परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मशिक्षण देणार्‍या आणि साधनेविषयी मार्गदर्शन करणार्‍या ध्वनी-चकत्या (ऑडिओ सीडी) आणि ध्वनीचित्र-चकत्या (व्हीसीडी), तसेच प्रबोधनपर लघुपट यांची निर्मिती करणे

अ. ध्वनी-चकत्या

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना, अध्यात्माविषयीचे शंकानिरसन, देवतांच्या नामजपाची योग्य पद्धत आणि उपासनाशास्त्र (३ भाग), आरती, क्षात्रगीते आदी विषयांवरील ध्वनी-चकत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.

आ. ध्वनीचित्र-चकत्या

आ १. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मसत्संग मालिकांच्या ध्वनीचित्र-चकत्या

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वराप्तीके लिए अध्यात्मशास्त्र (१६४ भाग) आणिधार्मिक कृत्योंका शास्त्र (२०६ भाग) या दूरचित्रवाहिन्यांवरील धर्मसत्संगांच्या मालिका बनवण्यात आल्या. या
मालिकांचे सारण ३ राष्ट्रीय दूरचित्रवाहिन्यांवरून करण्यात आले, तर यातील काही धर्मसत्संगांचे सारण विविध राज्यांतील १०० हून अधिक स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवरून(केबलवरून) करण्यात आले.

आ २. विविध संतांच्या मुलाखती, तीर्थक्षेत्रांचे महत्त्व,
आध्यात्मिक संशोधन इत्यादी विषयांवरील ध्वनीचित्र-चकत्या

सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या संतांच्या, तसेच अन्य संताच्या मुलाखती; हिंदु धर्म आणि संस्कृती यांतील आचार-विचारांचे महत्त्व; भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे आदींचे माहात्म्य, तसेच त्यांविषयीचे आध्यात्मिक संशोधन; वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय आदींविषयी शेकडो ध्वनीचित्र-चकत्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बनवल्या जात आहेत.

इ. समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या जागृतीसाठी बोधनपर लघुपटांची निर्मिती

परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रध्वजका सम्मान करें !, पटाखोंके दुष्परिणाम, गणेशोत्सव: काय असावे, काय नसावे? आदी लघुपटांची निर्मिती करण्यात आली आहे. हे लघुपट पुढील मार्गिकांवर (लिंकवर) उपलब्ध आहेत.

१. https://YouTube.com/deshbhakta
२. https://YouTube.com/dharmashiksha

Leave a Comment