चैत्र मासात महर्षि भृगु यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील नामजप करा !

‘महर्षि भृगु यांनी सनातनच्या साधकांना चैत्र मासात (२८ मार्च ते २६ एप्रिल २०१७ या कालावधीत) पुढे दिल्याप्रमाणे नामजप करावयास सांगितला आहे. हा नामजप प्रतिदिन येता-जाता करावा.

‘हरे राम राम राम राम हरे राम ।

हरे कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरे कृष्ण ॥’

दिवसभर साधक जितका वेळ नामजप करणार असतील, त्याच्या ८० टक्के वेळ वरील नामजप करावा आणि २० टक्के वेळ सप्तर्षींनी सांगितलेला ‘ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।’ हा नामजप करावा.

बसून उपाय करणार्‍या साधकांनी उपाय करतांना ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’नुसार शोधलेला नामजप करावा आणि इतर वेळी वर दिल्याप्रमाणे नामजप करावा.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

भृगु महर्षींनी सांगितलेला नामजप करण्याची पद्धत

हा नामजप महर्षींनी हा नामजप २८ मार्च ते २६ एप्रिल या काळात करण्यास सांगितले आहे. पुढे दिलेल्या तीन उदाहरणांत स्वल्पविरामाच्या ठिकाणी थोडे थांबून तो सुलभतेने करता येतो. ज्याला ज्या प्रकारे नामजप केल्यावर तो करणे सुलभ जाते, त्याने त्या प्रकारे नामजप करावा.

१. हरे राम, राम राम, राम हरे राम । हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, कृष्ण हरे कृष्ण ।

Download 

 

२. हरे राम, राम राम राम, हरे राम । हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे कृष्ण ।

– कु. मोक्षदा कोनेकर (वय ५ वर्षे, दैवी बालक), घाटकोपर

Download

 

३. हरे राम राम, राम राम हरे राम । हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण ।

– कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे, दैवी बालक), मिरज

Download

ज्याला आणखीन एखाद्या निराळ्या पद्धतीने नामजप सुलभतेने करणे शक्य होत असेल, त्याने त्या पद्धतीने नामजप करावा.

दोन बालसाधिकांना सुचलेली चाल ऐकून ती त्यांच्या
प्रकृतीनुसार आणि साधनामार्गानुसार असल्याचे जाणवणे

भृगु महर्षि यांनी चैत्र मासात साधकांना करायला सांगितलेल्या नामजपाला महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या दोन बालसाधिकांना सुचलेली चाल ऐकून ती त्यांच्या प्रकृतीनुसार आणि साधनामार्गानुसार असल्याचे जाणवले.

भृगु महर्षि यांनी चैत्र मासात सर्व साधकांना हरे राम राम राम राम हरे राम । हरे कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण हरे कृष्ण ॥ हा नामजप जाता-येता करायला सांगितला आहे. ३१.३.२०१७ या दिवशी सायंकाळी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ध्वनीवर्धकावरून महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या दोन बालसाधिकांनी म्हटलेले हे नामजप ऐकवले. त्या वेळी मनात आलेले विचार पुढे देत आहे.

१. कु. मोक्षदा कोनेकर (वय ५ वर्षे), घाटकोपर, मुंबई हिने म्हटलेला नामजप

हरे राम, राम राम राम, हरे राम ।
हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण कृष्ण, हरे कृष्ण ॥

हा नामजप ऐकतांना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी मनात भाव निर्माण झाला. एकूणच नामजप ऐकल्यावर भक्तीभाव वाढण्यास साहाय्य झाले. त्यामुळे मोक्षदा भक्तीमार्गी आहे, असे वाटले.

२. कु. ऐश्‍वर्या जोशी (वय १३ वर्षे), सनातन आश्रम, मिरज हिने म्हटलेला नामजप

हरे राम राम, राम राम हरे राम ।
हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण ॥

हा नामजप ऐकतांना शब्द मनात आतमध्ये जात होते. प्रत्येक शब्दाबरोबर त्या त्या शब्दाचा गुण मनात ठसत होता. त्या गुणानुसार माझे आचरण व्हायला हवे, असे वाटत होते. त्यामुळे ऐश्‍वर्या ज्ञानमार्गी आहे, असे वाटले.

महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या या दोन दैवी बालिकांना सुचलेले हे नामजप त्यांच्या प्रकृतीनुसार आणि साधनामार्गानुसार असावेत, असे वाटले.

– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.३.२०१७)

Facebooktwittergoogle_plusmail