मृत्यूसारख्या दुःखदायक प्रसंगांतही स्थिर राहून साधना आणि अध्यात्मप्रसार यांसाठी तळमळीने प्रयत्न करणारे सनातनचे साधक !

पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘साधना केल्याने साधकांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडतात. घरात मृत्यूसारखी वाईट घटना घडूनही साधक त्याप्रसंगी स्थिर राहून साधना आणि अध्यात्मप्रसार यांसाठी तळमळीने प्रयत्न करतात.

 

१. सासूबाईंच्या आजारपणात ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करणार्‍या आणि त्यांचे निधन झाल्यावर शांतीपाठाच्या (तेराव्या) दिवशी उपस्थितांना सनातनेचे लघुग्रंथ देणार्‍या देहली येथील सौ. मंजुला कपूर !

‘२५.१.२०१७ या दिवशी देहली येथील सौ. मंजुला कपूर यांच्या सासूबाई आणि गुडगाव येथील कु. स्वाती जग्गी यांच्या आजी श्रीमती मोतियारानी कपूर यांचे देहावसान झाले. सासूबाईंच्या आजारपणात सौ. मंजुला कपूर सतत ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप आणि प्रार्थना करत. सासूबाईंचे निधन झाल्यानंतर त्यांच्या शांतीपाठाच्या दिवशी उपस्थित नातेवाईक आणि हितचिंतक यांना साधनेचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी सौ. मंजुला कपूर यांनी सनातन संस्थेने प्रकाशित केलेले लघुग्रंथ दिले. मृत व्यक्तीच्या आत्म्याला चांगली गती मिळावी आणि उपस्थितांनाही दत्ताच्या उपासनेचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी त्यांनी शांतीपाठाच्या दिवशी दत्तगुरूंचे चित्रही ठेवले होते. सौ. मंजुला कपूर यांना त्यांचे पती श्री. हरीश कपूर आणि जग्गी कुटुंबीय यांनीही साहाय्य केले.

 

२. पतीच्या आजारपणात प्रत्येक कृती साधना म्हणून करणार्‍या आणि त्यांच्या निधनानंतर उपस्थितांना सनातनचे लघुग्रंथ देणार्‍या फरीदाबाद येथील श्रीमती आशा गुप्ता !

२६.१.२०१७ या दिवशी फरीदाबाद येथील साधिका श्रीमती आशा गुप्ता यांचे पती श्री. राजेश गुप्ता यांचे देहावसान झाले. त्यांनी शांतीपाठाच्या दिवशी नातेवाइक आणि हितचिंतक यांना सनातन संस्थेने प्रकाशित केलेले लघुग्रंथ दिले. श्रीमती आशा गुप्ता याही पतीच्या आजारपणात प्रत्येक कृती साधना म्हणून करत होत्या.

साधनेमुळेच व्यक्तीला प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाण्याचे आणि आध्यात्मिक स्तरावर योग्य असा विचार अन् कृती करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्यामुळे ‘प्रत्येक जिवाने साधना करणे अपरिहार्य आहे’, हे लक्षात येते.’

– (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, उत्तर भारत प्रसारसेवक (९.२.२०१७)

Leave a Comment