भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य

कावेबाज इंग्रजी विद्वानांकडून (?) हिंदु धर्मावर वर्णभेदाचा सदैव आरोेप करत चिखलफेक केली जाते. १९ व्या शतकातील मॅक्समूलर ते हल्लीचे शेल्डन पोलॉक यांच्यासारखे कावेबाज तथाकथित विद्वान हिंदूंचा बुद्धीभेद करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर हिंदु धर्माचे सत्य स्वरूप आणि त्याची शिकवण येथे प्रसिद्ध करत आहोत.

 

१. सर्व प्रकारची अनुकूलता असूनही गोर्‍यांच्या संस्कृतीत लोक झपाट्याने र्‍हास पावत असणे

‘जेथे गोर्‍यांच्या संस्कृतीची चलती चालू झाली, तेथील लोक कत्तली न होता किंवा खावयास असूनही झपाट्याने र्‍हास पावून नष्ट होतात. ‘रक्षिण्यासारखे स्वतंत्र असे आपले काही तरी आहे, अशी मनोभावना जिवंत असल्याविना कोणताही मानववंश स्वतंत्र अस्तित्वात राहू शकणार नाही’, असा मानसशास्त्रीय सिद्धांत या प्रकरणी मानववंशशास्त्रवेत्ते आज मांडतांना दिसत आहेत.

 

२. आर्यांनी स्वत:ची उच्च संस्कृती वन्य मानववंशावर न लादल्यानेच ते उच्चांच्या निकट राहूनही टिकले असणे

वरील अद्याप सर्वत्र प्रचारांत न आलेला हा महत्त्वाचा सिद्धांत आत्मौपम्याच्या विचारामुळे जणू उपजत भारतियांत संचारला होता; म्हणूनच आर्यांनी आपली उच्च संस्कृतीही, कातकरी, गोंड, भिल्ल इत्यादी वन्य मानववंशावर लादली नाही आणि यास्तव ते वंश उच्चांच्या निकट राहूनही जिवंत टिकले आहेत.

 

३. आर्यांनी सर्वांनाच स्वतःचे वांशिक जीवन उपभोगण्याचे स्वातंत्र्य देणे

इतरांस स्वतःचे स्वतंत्र वांशिक जीवन राखण्यास आर्यांनी जी मोकळीक दिली, त्याचा धूर्त स्वार्थी लोक आज विपरीत अर्थ लावत आहेत आणि ‘यांना मुद्दामच खितपत खाली ठेवण्यात आले’, अशी ओरड करण्यात येत आहे. सर्वांना सारखे करणे यांत शास्त्रीयताही नाही कि भूतदयाही नाही, हे या शहाण्यांस कळेल तो सुदिन !’

– त्र्यंबक शंकर शेजवलकर
संदर्भ : ‘विजयनगरचे ऋण’ पृ. ४, ‘प्रज्ञालोक’, एप्रिल १९८१

Leave a Comment