जीवविविधतेला बाधा आणणार्‍या परदेशी वनस्पती !

१. वाढ

‘जीवविविधतेला बाधा आणणार्‍या वनस्पतींची वाढ नव्या प्रदेशांमध्ये अतिशय जोमाने होते.

२. दुष्परिणाम

२ अ. स्वदेशी वनस्पतींना भूमीतून मिळणारा अन्नाचा आधार परदेशी वनस्पती खाऊन घेतात. त्यामुळे स्वदेशी वनस्पतींची वाढ खुंटते आणि काही काळानंतर त्या नष्टप्राय होतात.

२ आ. वनस्पतींचे आक्रमण झाले की, या वनस्पती आहारासाठी उपयोग करून घेणारे प्राणी, तसेच पक्षी यांची संख्याही अल्प होते.

३. उदाहरण

एकट्या अमेरिकेत परदेशी वनस्पतींच्या आक्रमणामुळे ४९ स्वदेशी वनस्पती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत.

४. अडचणी

स्वदेशी आणि परदेशी अशा वनस्पतींची ओळख पटवणे कठीण आहे; मात्र परदेशी वनस्पतींची वाढ इतक्या झपाट्याने होते की, स्वदेशी जातींचा नाश होतोच होतो.’

‘दैनिक तरुण भारत’, ३.९.२००२

Leave a Comment