गुरुमाऊलीने असा दिला आनंद साधकांना !

 

ईश्‍वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित होऊन साधना करणार्‍या साधकाच्या जीवनात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त होणे, हा अद्वितीय क्षण असतो. जीवनातील अनमोल आनंदाचा क्षण साधकाला सदैव स्मरणात रहावा आणि प्रगतीच्या निखळ आनंदाची लयलूट करता यावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्यासह सनातनच्या सर्वच संतांनी नानाविध क्लृप्त्या योजल्या. त्या क्षणीचे साधकांच्या मुखावरील भाव पाहून इतरांचीही भावजागृती होते.

 

गुरुमाऊलीने असा दिला आनंद साधकांना !

साधकांच्या अनुभूतींतून !

प्रारंभी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये सर्वांच्या लक्षात यावी, यासाठी उन्नती झालेल्या साधकाला इतर साधकांसमवेत नामजपाला बसण्यास सांगण्यात येत असे. त्या वेळी साधकांना येणार्‍या अनुभूतींतूनच साधकाची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के गुपित झाल्याचे उघड होत असे. अशाच एका क्षणी पू. संदीप आळशी !

साधकांना आलेल्या अनुभूतींतून श्री. संदीप आळशी (आताचे पू. संदीप आळशी) यांची पातळी घोषित झाली. (वर्ष २००८)

 

दैनिक सनातन प्रभात

दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्यांसह आध्यात्मिक पातळी घोषित करून साधकाला दिलेला अवचित आनंद अविस्मरणीय !

सनातन प्रभातमध्ये पातळी घोषित झाल्यानंतरची कु. अश्‍विनी साळुंके (आताच्या सौ. अश्‍विनी पवार) यांची भावमुद्रा, समवेत सद्गुरु कु. अनुराधा वाडेकर (डावीकडे)(वर्ष २००९)

 

गुरुपौर्णिमा महोत्सव, कार्यनियोजन सत्संग, व्यष्टी आढावे, भावसत्संग, सत्संगसोहळे आदींत मार्गदर्शन करत असतांना कौशल्याने विषय साधकाच्या गुणवैशिष्ट्यांकडे वळवून त्याला दिलेला आनंद !

गुरुपौर्णिमा सोहळा

गुरुपौर्णिमा महोत्सवात सौ. लता ढवळीकर यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. (वर्ष २०१६)

 

सत्संगसोहळा

सत्संगसोहळ्यात कोल्हापूर येथील व्यावसायिक श्री. आनंद पाटील यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाली. (वर्ष २०१५)

 

श्रीगुरूंचे मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कु. स्मित कांबळे याची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित केली. (वर्ष २०१४)

 

फलकाच्या माध्यमातून

एखाद्या अभ्यासवर्गात अचानकच एखादा फलक येऊन साधकांना आश्‍चर्याचा आणि आनंदाचा धक्का देत असे !

वृक्षांची प्रेमाने निगा राखणारे श्री. रघुनाथ राणे (आताचे पू. रघुनाथ राणे) यांना वृक्षानेच प्रगतीची वार्ता दिली ! (फलक पहातांना भावावस्थेतील राणेआजोबा) (वर्ष २०११)

 

विवाहसोहळा

श्री. विनायक शानभाग यांच्या विवाहसोहळ्यातच जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून ते मुक्त झाल्याप्रीत्यर्थ सत्कार झाला. (वर्ष २०१५)

 

सनातनच्या साधकांना क्षणोक्षणी घडवून त्यांना अलौकिक अशा हिंदु राष्ट्र
स्थापनेच्या समष्टी कार्याचे शिलेदार बनवणारे धर्मसंस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले !

Leave a Comment