पंजाबमधील होशियारपूर येथील भृगुसंहितावाचक पं. लालदेव शास्त्री यांच्या माध्यमातून फलादेशाद्वारे महर्षि भृगु यांनी सनातन संस्था आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे

१. संहितावाचनाचा दिनांक : २५.११.२०१५

२. स्थळ : होशियारपूर, पंजाब

३. संहितावाचक : पं. लालदेव शास्त्री

४. महर्षि भृगु यांनी सांगितलेली सूत्रे

(या ठिकाणी महर्षि भृगु आणि शुक्र यांचा संवाद आहे.)

शुक्र : हे पिताजी, सनातन संस्थेचे वर्तमान गुरु जयंत बालाजी जे परम पूजनीय आहेत. त्यांच्याविषयी आणि सनातन संस्थेविषयी कृपा करून सविस्तर सांगा.

 

४ अ. वयाच्या ७३ व्या वर्षापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा
त्रासाचा काळ चालू झाला आहे, वयाच्या ७५ व्या वर्षी
त्यांना मृत्यूयोग असून त्यातून ते वाचतील; पण ८३ व्या वर्षी ते देहत्याग करतील !

महर्षि भृगु : हे शुक्र, परम पूज्य गुरूंचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) हा त्रासाचा अतिशय कठीण काळ आहे. त्यांचे आयुष्य ८३ वर्ष ३ मास (महिने) आहे. हे शुक्र, ७३ व्या वर्षापासून त्यांच्या त्रासांचा कठीण काळ चालू झाला आहे. त्यांच्या वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांना मृत्यूयोग आहे. या वेळी ते वाचतील; पण ८३ व्या वर्षी ते देहत्याग करतील.

 

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना होणार्‍या त्रासाचे निवारण व्हावे
आणि सनातन संस्थेचे रक्षण व्हावे, यासाठी महर्षि भृगु यांनी सांगितलेले उपाय

शुक्र : हे महर्षि भृगु, तुमच्यावर भगवान विष्णूची अपार कृपा आहे; म्हणून तुम्ही तुमच्या दिव्य दृष्टीनेे परम पूज्यांना वाचवण्यासाठी काही उपाय सांगण्याची कृपा करावी.

४ आ १. माझ्या ग्रंथवाचकाकडून माझ्या आश्रमामध्ये
मृत्यूसंजीवनीचा मंत्रजप प्रतिदिन २ सहस्र वेळा करावा !

महर्षि भृगु : हे शुक्र, मी परम पूज्य गुरूंच्या प्रकृती स्वास्थ्यावर उपाय सांगतो. तू लक्षपूर्वक श्रवण कर. या ग्रंथाचा फलादेश ऐकताच माझ्या ग्रंथवाचकाकडून मृत्यूसंजीवनीचा मंत्रजप आरंभ कर. माझ्या आश्रमामध्ये हा मंत्रजप प्रतिदिन २ सहस्र वेळा करावा. केवळ २ सहस्रच करावा. अधिक नको. हे शुक्र, या मंत्रजपाच्या वेळी या आश्रमात माझे आणि परम पूज्य गुरुदेवांचे छायाचित्र अवश्य असावे. माझ्याकडून पुढचा आदेश मिळेपर्यंत हा मंत्रजप चालू ठेवावा. (‘हा मंत्रजप चालू आहे.’ – संकलक)

४ आ २. सनातन संस्थेचे रक्षण करण्यासाठी बगलामुखी मंत्राचा जप
प्रतिदिन ३ सहस्र वेळा करावा आणि तो हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत चालू ठेवावा !

हे शुक्राचार्य, सनातन संस्थेचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीविष्णूच्या प्रेरणेने मी उपाय सांगतो. तू लक्षपूर्वक श्रवण कर. माझ्या वाचकाद्वारे निर्मित आश्रमामध्ये बगलामुखी मंत्राचा जप अतीशीघ्र आरंभ करावा. हा मंत्रजप प्रतिदिन ३ सहस्र वेळा करावा. हा मंत्रजप माझ्या वाचकाद्वारे निवडलेल्या विद्वान ब्राह्मणाकडून व्हावा. हा मंत्रजप भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत चालू ठेवावा. (‘हा मंत्रजप चालू आहे.’ – संकलक)

४ आ ३. ही सर्व व्यवस्था परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा परम भक्त गौरव याच्याकडून व्हावी !

हे शुक्र, ही सर्व व्यवस्था परम पूज्यांच्या परम भक्ताद्वारे व्हावी, त्याचे नाव गौरव (श्री. गौरव सेठी) आहे. वेळोवेळी येणार्‍या काळाचे संकेत माझ्या ग्रंथाद्वारे कथन करत राहीन. त्याचे श्रद्धाभावाने आणि विश्‍वासाने पालन करत रहा.’

– श्री. गौरव सेठी, पंचकुला, हरियाणा. (२५.११.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
Facebooktwittergoogle_plusmail