रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात भृगु संहितावाचक डॉ. विशाल शर्मा यांच्याद्वारे भृगु फलादेशवाचन

डॉ. विशाल शर्मा यांच्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सिंधी पगडी भेट

आश्रमात आगमन झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याकडे भृगु आणि शिव संहिता देतांना डॉ. विशाल शर्मा. त्यांच्या बाजूला साधक श्री. गौरव सेठी आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या हातातील भृगु आणि शिव संहितांचे औक्षण करतांना वेदमूर्ती केतन शहाणे, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या उजवीकडे सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि डावीकडे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, तसेच पाठीमागे डमरू वाजवतांना डॉ. विशाल शर्मा.
भृगुसंहिता हातात घेतलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, त्यांच्या मागे शिवसंहिता हातात घेतलेल्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सिंधी पगडी घेतलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

डॉ. विशाल शर्मा यांच्या हातातील भृगुसंहितेच्या पृष्ठाला अत्यंत भावपूर्ण नमस्कार करतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 

भृगु फलादेशवाचनानंतर सांगतेच्या वेळी संहितेला नमस्कार करतांना १. परात्पर गुरु डॉ. आठवले २. डॉ. विशाल शर्मा आणि डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, शंखनाद करतांना वेदमूर्ती अमर जोशी आणि सर्वांत उजवीकडे श्री. गौरव सेठी

रामनाथी : पंजाबमधील होशियारपूर येथील भृगु संहिता आणि शिव संहिता यांचे वाचक डॉ. विशाल शर्मा यांचे ८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी साडेतीन वाजता रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भृगु संहिता आणि शिव संहिता यांसह शुभागमन झाले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी भृगु संहिता आणि शिव संहिता यांचे स्वागत केले. त्या वेळी डॉ. विशाल शर्मा यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना एक हिरवी सिंधी पगडी भेट दिली. त्यानंतर डॉ. विशाल शर्मा यांनी भृगु संहिता आणि शिव संहिता परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या हातात दिली. या वेळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सनातनच्या साधक-पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणे यांनी भृगु संहिता आणि शिव संहिता यांना पुष्पहार अर्पण करून औक्षण केले. या वेळी सनातनचे साधक श्री. गौरव सेठी आणि त्यांच्या पत्नी सौ. अनन्या सेठी, आश्रमातील साधक, तसेच एस्.एस्.आर्.एफ्.चे विदेशातील साधकही उपस्थित होते. सायंकाळी भृगु संहिता आणि शिव संहिता यांच्या वाचनाद्वारे फलादेश झाला.

(गेली काही वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले खोलीबाहेरही पडू शकत नाहीत. आज भृगु महर्षींच्या आगमनाच्या सोहळ्याच्या वेळी प्राणशक्ती अल्प असूनही त्यांना या सोहळ्यात सहभागी होता आले, यासाठी महर्षींच्या चरणी कृतज्ञता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Facebooktwittergoogle_plusmail