महर्षि भृगु यांनी भृगुसंहितावाचक भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात झालेल्या फलादेशाद्वारे कथन केलेली परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्था यांविषयीची सूत्रे

फलादेश वाचनाच्या वेळी डावीकडून बसलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, फलादेश वाचन करतांना डॉ. विशाल शर्मा (उभे) आणि श्री. गौरव सेठी

१. संहितावाचनाचा दिनांक : ८.२.२०१७

२. वेळ : दुपारी ४.१५ ते सायं. ६

३. स्थळ : सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. प्रकार : भृगुसंहिता (अंकविद्या – १ ते १०८)

५. संहितावाचक : भृगुशास्त्री डॉ. विशाल शर्मा

 

६. ‘योग’ या शब्दाचा अर्थ

‘महर्षि भृगु यांनी ‘भृगुसंहिता’ या ग्रंथात दिव्य योगांद्वारे जीवात्म्यांच्या कर्मांची माहिती दिली आहे. फलादेशाच्या वेळी फलादेश ऐकणार्‍याने प्रश्‍न विचारल्यावर जी परिस्थिती असते, ती त्या योगात सांगितलेली असते.

 

७. या फलादेशाच्या वेळी असलेले योग

आजच्या भृगुसंहितेच्या फलादेशामध्ये दोन योग आले आहेत. ‘एक गुरु जैसा नाही कोई देव’ आणि दुसरा ‘प्रभु मेरे इन साधकोंके/भक्तोंके बंधन काटे’ असे दोन योग प्रथमच आले आहेत. हा योग ही वाणी ऐकणारा आणि ऐकवणारा दोघांसाठी कल्याणकारक आहे.

 

८. महर्षि भृगु यांनी सांगितलेली सूत्रे

८ अ. सनातनच्या कार्यात मोठ्या प्रमाणात वृद्धी होईल आणि विश्‍वामध्ये सनातन संस्था विख्यात होईल !

‘सनातन संस्थेच्या कार्यात मोठ्या प्रमाणात वृद्धी होईल. ‘महर्षि टिव्ही न्यूज चॅनल’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ यांचे कार्य उत्तरोत्तर वाढत जाईल. फलादेशात सांगितलेले धर्म-कर्म केल्याने साधू-संत आणि देवलोकातून दिव्य आत्मे सनातन संस्थेला विशेष आशीर्वाद देत आहेत. त्यामुळे संस्थेला महान अवस्था प्राप्त होणार आहे. विश्‍वामध्ये सनातन संस्था विख्यात होईल.

८ आ. मी केलेल्या मार्गदर्शनामुळे साधकांचे कल्याण होईल !

वेळोवेळी संहितेच्या माध्यमातून मी मार्गदर्शन करत राहीन. या मार्गदर्शनामुळे साधकांचे कल्याण होत जाईल. जीवनातील अंधःकाराचे प्रकाशामध्ये रूपांतर होईल.

८ इ. सनातन संस्थेच्या प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचा काळ जवळ आला आहे !

सनातनच्या सर्व आश्रमांमध्येही सुख-समृद्धी होईल. हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; मात्र सनातन संस्थेच्या प्रयत्नांमुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचा काळ आणखी जवळ आला आहे.

८ ई. नर्मदामातेप्रमाणे शंकराच्या पुत्रीस्वरूप असलेल्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, या देवी म्हणजे कलियुगामध्ये सनातन संस्थेला मिळालेला आशीर्वाद !

एकदा भगवान शंकर आणि पार्वतीमाता नर्मदेच्या तटावर खेळत होते. भगवान शंकरांचे डोळे पार्वतीमातेने बंद केले होते. त्या वेळी त्यांच्या कंठातून एक थेंब पडला होता. हा थेंब म्हणजे माता नर्मदादेवी होती. त्याप्रमाणे बिंदा (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि अंजली (सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ) नावाच्या दैवी पुत्री या नर्मदामातेप्रमाणे भगवान शंकराच्या पुत्रीस्वरूप आहेत. जगाचे कल्याण करण्यासाठी आणि सनातन संस्थेची कीर्ती वाढवण्यासाठी त्यांचा जन्म आहे. या देवी म्हणजे कलियुगामध्ये सनातन संस्थेला मिळालेला आशीर्वाद आहे. आम्हा सर्व महर्षींचा यांना आशीर्वाद आहे.

८ उ. सनातन संस्थेला माझे आशार्वाद युगायुगांपासून आहेत !

माझे अनेक आशीर्वाद जन्मजन्मांतरांपासून आणि युगयुगांपासून महान परम परमेष्टी डॉ. जयंत आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, श्री. गौरव सेठी आणि सर्व साधक यांना आहेत.

८ ऊ. सनातन संस्थेचे साधक भाग्यवान आहेत !

माझे शरीर जन्मजन्मांतरापासून युगयुगांपर्यंत सनातन संस्थेमध्ये आहे. सत्य, त्रेता, द्वापर आणि पहिल्या काही युगांपासून, तसेच आजही डॉ. विशाल शर्मा या संहितेच्या माध्यमातून माझे शरीर घेऊन उपस्थित झाले आहेत. असे भाग्य माझ्या दुर्लभ भृगु भक्तांनाच लाभते, अन्यथा कुणालाही नाही.

८ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दिव्य आशीर्वादाच्या प्रभावामुळेच माघ मासामध्ये हा फलादेश होत आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या दिव्य आशीर्वादाच्या प्रभावामुळेच माघ मासामध्ये हा फलादेश होत आहे आणि डॉ. विशाल शर्मा माझे हे शरीर (संहिता) घेऊन येथे येऊ शकले आहेत. ‘हिंदु राष्ट्र शीघ्रच येईल’, या प्रकारचे विचार त्या तिघांच्या मनात आहेत.

८ ऐ. भृगुसंहितेच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार केल्यास
सर्व विघ्नांचा नाश होऊन सर्व मनोरथ अल्पावधीतच पूर्ण होतील !

माझ्या दिव्य कृपेच्या प्रभावामुळे तुमची संहिता मी डॉ. विशाल यांना दिली आहे. भगवान शंकराचा याला विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. भृगुसंहितेच्या माध्यमातून पावलापावलावर तुम्हाला केलेल्या मार्गदर्शनानुसार करत गेल्यास सर्व विघ्नांचा नाश होणार आहे. ‘सर्व मनोरथ थोड्याच कालावधीमध्ये पूर्ण होणार आहेत’, असे प्रथमपासूनच निश्‍चित आहे.

८ ओ. प्रत्येक पौर्णिमेला सनातन संस्थेच्या वतीने साधू-संतांना करण्यात
येणारे अन्नदान आणि गंगास्नान यांचे फळ परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले,
सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना अवश्य प्राप्त होणार आहे !

श्री. गौरव सेठी या बालकाच्या माध्यमातून प्रत्येक पौर्णिमेला सनातन संस्थेच्या वतीने साधू-संत, फकीर, कुष्ठरोगी यांना अन्नदान, द्रव्य आदींचे दान आणि गंगास्नान केले जात आहे. त्याचे फळ महान परम परमेष्टी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना अवश्य प्राप्त होणार आहे. पुण्यकर्मांच्या प्रभावाने ते याचे महाधिकारी बनले आहेत. आपल्या पूर्वजन्मीचे पुण्यकर्म फळाला आले आहे. त्यामुळे महर्षि भृगु यांच्या दरबारातून आलेले डॉ. विशाल शर्मा येथे येऊन तुम्हाला फलादेश ऐकवून मार्गदर्शन करत आहेत.’

– श्री. गौरव सेठी, पंचकुला, हरियाणा. (९.२.२०१७)

 

भृगु महर्षींनी संहितावाचन ४२ मिनिटे थांबवणे आणि त्या कालावधीत भगवान
शिवाने साक्षात् येऊन परात्पर गुरु डॉ. आठवले अन् साधक यांना आशीर्वाद दिल्याचे सांगणे

‘महर्षि भृगु यांनी संहितावाचन काही कालावधीसाठी थांबवले; कारण ‘पुढील फलादेशाचे वाचन ४२ मिनिटांनंतर करा’, असे संहितेत लिहिले होते. त्याप्रमाणे डॉ. विशाल शर्मा यांनी पुढील फलादेश ४२ मिनिटांनी चालू केल्यानंतर महर्षि भृगु यांनी सांगितले, ‘मी फलादेशाच्या वेळी ४२ मिनिटांची विश्रांती सांगितली. त्या कालावधीत भगवान शिव उपस्थित झाले. भगवान शंकराचा आशीर्वाद या महान परम परमेष्टींना, तसेच सनातन संस्थेच्या सर्व साधकांना प्राप्त झाला आहे.’

– श्री. गौरव सेठी, पंचकुला, हरियाणा. (९.२.२०१७)

Facebooktwittergoogle_plusmail