भगवंताला १८ व्या अध्यायापर्यंत गीता का सांगावी लागली ?

१. अर्जुनाची संभ्रमावस्था दूर करण्यासाठी श्रीकृष्णाला गीता सांगावी लागणे

pp_pandye_maharaj
प.पू. पांडे महाराज

‘भगवत्गीतेत ११ व्या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले विराट रूपाचे दर्शन देऊन सांगितले, ‘मी अगोदरच कौरवांचा पराभव केला आहे. आता तुला केवळ तुझी साधना व्हावी, यासाठी क्षत्रिय धर्माचे पालन म्हणून युद्धास उभे रहायचे आहे. तेव्हा तू उठ आणि युद्धाला सिद्ध हो !’ असे असूनही अर्जुनाचा भ्रम गेला नाही; म्हणून श्रीकृष्णाला १८ अध्यायापर्यंत गीता सांगावी लागली; कारण अर्जुनाने १८ व्या अध्यायात (श्‍लोक ७३ मध्ये) म्हटले आहे, ‘‘आपल्या कृपेने आता माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती झाली आहे. आता मी संशयरहित झालो आहे; म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन.’’

२. रज-तमाच्या प्रभावामुळे अर्जुनाप्रमाणे साधक अजूनही भ्रमात असल्याचे जाणवणे

वास्तविक गीतेतील ११ व्या अध्यायाप्रमाणे सद्य:स्थितीत १०.५.२०१५ ला प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व प्रगटीकरणामुळे पूर्ण झाले आहे. आज कलियुगात रज-तमाचा प्रभाव इतका वाढला की, मानवाची बुद्धी विकृत होऊन तो अमानवी कृती करत आहे. त्यासाठी सप्तर्षींनी जीवनाडीपट्टीद्वारे प.पू. डॉक्टर आठवले हे विष्णूचे अवतार असून त्यांचेद्वारे सनातन धर्म राज्य स्थापन होऊन सध्याची धर्मावरची ग्लानी दूर होणार आहे; परंतु एवढे असूनही अर्जुनाप्रमाणे आम्ही साधक अजूनही भ्रमात असल्यामुळे आमच्याकडून साधना त्या दृष्टीने होत नाही. हे कळण्यासाठी जसे अर्जुनाला ११ व्या अध्यायानंतर १८ व्या अध्यायापर्यंत भगवत्गीता सांगावी लागली होती, त्याप्रमाणे आम्हालाही २०२३ पर्यंत वाटचाल करावी लागेल कि काय ? असे वाटते.

३. सनातन धर्म राज्य आल्यावरच साधक सर्व दृष्टीने सज्ज होतील, असे वाटणे

११ व्या अध्यायानंतर ७ अध्याय झाल्यावर १८ वा अध्याय येतो. म्हणजेच आता साधकांसाठी २०१६ नंतर अजून ७ वर्षांनंतर, म्हणजेच २०२३ मध्ये सनातन धर्म राज्य येणार आहे. त्यामुळे त्या वेळी सर्व साधक सर्व दृष्टीने सज्ज रहाणार, असे दिसते.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.११.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात