अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा असेल तेथे अनिष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील वाईट स्पंदने दूर करण्यासाठी स्वतः स्वच्छता करणे

१. प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता आणि
अव्यस्थितपणा दूर करवून घेतल्याने वास्तूतील त्रास उणावणे

१. फोंडा आश्रमात असलेली अस्वच्छता, अव्यस्थितपणा यांमुळे तेथे अनिष्ट शक्तींचा पुष्कळ त्रास असणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता आणि अव्यस्थितपणा दूर करवून घेतल्याने वास्तूतील त्रास उणावणे : वर्ष २००० मध्ये दैनिक सनातन प्रभातचे मुख्य कार्यालय फोंडा, गोवा येथील आश्रमात (सुखसागर) स्थलांतरित झाले. फोंडा आश्रमात प.पू. डॉक्टर रहायला आले त्या वेळी त्या वास्तूत पुष्कळ त्रास होता. तेथे संगणकांत वारंवार बिघाड होणे, विद्युत पुरवठा करणारी यंत्रे (UPS) बिघडणे, अशा बर्‍याच अडचणी येत होत्या. त्या वेळी एका साधकाने आश्रमात होणार्‍या त्रासांविषयी प.पू. डॉक्टरांना विचारले. तेव्हा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, वास्तूतील अनिष्ट शक्तींचा प्रभाव साधकांच्या साधनेच्या प्रभावापेक्षा अधिक आहे. त्यामुळे साधकांनी साधना वाढवायला हवी. त्यानंतर १ – २ दिवसांतच प.पू. डॉक्टर आश्रमातील प्रत्येक खोलीत गेले. त्यांना प्रत्येक ठिकाणी पुष्कळ अस्वच्छता, अडगळ, अव्यवस्थितपणा दिसला. ते सर्व प.पू. डॉक्टरांनी नीट करवून घेतले. आश्रमाच्या संपूर्ण परिसरातच असलेला अव्यवस्थितपणा आणि अस्वच्छता प.पू. डॉक्टरांनी स्वतः साधकांसमवेत दूर केला. त्यानंतर वास्तूतील त्रास उणावला.

२. रामनाथी आश्रमाच्या बांधकामावेळी पुष्कळ अस्वच्छता असणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमात सर्वत्र फिरून अस्वच्छता स्वतः दूर करणे : सुमारे १५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टर सनातनच्या रामनाथी आश्रमात स्थलांतरित झाल्यावर प्रतिदिन सकाळी आश्रमात चालू असलेल्या बांधकामाचा आढावा विचारुन घेत. त्यातील चुका दर्शवून त्यात सुधारणा करून घेत. साधकांची साधना नीट होत नाही, असे ते वारंवार सांगत होते, तरी साधकांमध्ये सुधारणा आढळून येत नव्हती. बांधकामात पुष्कळ अडचणी येत होत्या. एके दिवशी प.पू. डॉक्टर आश्रम परिसराचे निरीक्षण करत असतांना त्यांना बराच कचरा आणि अस्ताव्यस्त पडलेले सामान दिसले. याविषयीची जाणीव याआधी त्यांनी करून दिली होती; मात्र त्यात विशेष सुधारणा झाली नव्हती. त्या दिवशी प.पू. डॉक्टरांनी स्वतः आश्रमाच्या संपूर्ण परिसरात फिरून ९ पोती कचरा गोळा केला आणि सामान व्यवस्थित करून घेतले. त्यानंतर अडचणींचे प्रमाण उणावले.

अव्यवस्थितपणा आणि अस्वच्छतेचा परिणाम थेट साधकांच्या साधनेवर, तसेच वाईट शक्तींचा त्रास वाढण्यात होत असल्याचे प.पू. डॉक्टरांनी साधकांच्या निदर्शनास आणून दिले आणि साधक दुर्लक्ष करत असलेला भाग स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवला. तोच भाग बाजूच्या लिखाणातील साधकांच्या उदाहरणावरून लक्षात येतो.

– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०१६)

२. सेवाकेंद्रातील स्वयंपाकघरात शिकायला मिळालेल्या लहान लहान गोष्टी

२ अ. दूध घेतांना त्यावरील साय तोंडाने फुंकून अथवा
बोटाने बाजूला न करता लहान चमच्याने बाजूला करावी ! 

‘दुधाची साय तोंडाने फुंकून अथवा बोटाने बाजूला करून दूध घ्यायचे नाही, तर लहान चमचा घेऊनच ती बाजूला करायची’, हे सूत्र माझ्या मनावर इतके ठसले आहे की, त्यानंतर आतापर्यंत मी कधीही फुंकून किंवा बोटाने दुधाची साय बाजूला केली नाही किंवा कुणाला तसे करतांना पाहिले, तर त्यांना त्वरित योग्य कृतीची जाणीव करून देते.

२ आ. जेवणाच्या अथवा पाण्याच्या पातेल्यावरील झाकणास वाफ धरलेल्या आतील बाजूने
कचरा लागून तो पातेल्यात जाऊ नये, यासाठी झाकण बाजूला ठेवतांना ते उलट बाजूने ठेवावे !

जेवणाच्या अथवा पाण्याच्या पातेल्यावरचे झाकण बाजूला काढून ठेवतांना ते उलट बाजूने ठेवायचे, जेणेकरून त्याच्या वाफ धरलेल्या बाजूला कचरा लागणार नाही आणि ते झाकण पुन्हा पातेल्यावर ठेवल्यावर त्याला लागलेला कचरा पातेल्यात पडण्याची शक्यता रहाणार नाही. ही कृती मी त्या वेळी गुरुमाऊलीकडून शिकल्याप्रमाणे आताही करते.

 

३. लोक आपल्याकडे ‘सनातनवाले’ म्हणून पहात असल्याने
आपण समाजात जातांना नीटनेटकेच जायला हवे !

एकदा मी सेवाकेंद्रातून जिल्हा स्तरावरील सत्संगासाठी जात होते. तेव्हा माझ्या समवेत त्या वेळेचे एक साधक होते. ते गुरुमाऊलीकडे ‘सत्संगाला जातो’, असे सांगण्याकरता गेले आणि १० – १५ मिनिटांनंतर आले. तेव्हा ‘त्यांना ‘केवळ निघतो’, असे सांगून येण्यास एवढा विलंब का झाला ?’, असा विचार माझ्या मनात आला आणि तत्क्षणी ते गुरुमाऊलीला भेटून आले. त्या वेळी त्यांनी मला सांगितले की, ते गुरुमाऊलीला सांगायला जातांना त्यांचा शर्ट चुरगळलेला होता. त्यामुळे गुरुमाऊलीने त्यांना ‘शर्टला इस्त्री करून जा’, असे सांगितले. त्या मागील कारण सांगतांना त्यांना गुरुमाऊली म्हणाली, ‘‘आपण समाजात जातो, तेव्हा आपण स्वत:ची ओळख घेऊन जात नाही, तर संस्थेची ओळख म्हणून जातो. लोक आपल्याकडे ‘सनातनवाले’ म्हणून पहातात, तर आपण बाहेर जातांना नीटनेटकेच जायला हवे.’’ त्यामुळे त्या साधकाला ‘शर्ट’ला इस्त्री करून येण्यास वेळ लागला होता.’

– कु. नलिनी राऊत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात