फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी वर्तमानपत्रे वापरणे आरोग्यासाठी धोकादायक

Article also available in :

दिवाळीला करण्यात येणार्‍या फराळाचे पदार्थ ठेवण्यासाठी, त्यातील तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रे वापरतात; मात्र त्यामुळे गंभीर आजाराचा धोका अधिक आहे. फराळाचे अनेक पदार्थ तळलेले असतात, त्यामुळे ते ठेवण्यासाठी आणि तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रांवर पसरले जातात. वर्तमानपत्रांसाठी जी शाई वापरली जाते, ती आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कर्करोगाचाही धोका वाढतो.

१. मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कर्करोग होण्याचा धोकाही असतो.

२. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात; परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि फुफ्फुस यांवर होतो.

३. वर्तमानपत्रांमधील शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये संतुलन बिघडवते. परिणामी कर्करोगाचा धोका वाढतो.

४. वर्तमानपत्रांपेक्षा मासिकाचा कागद वापरणेही धोकादायक आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी, तसेच शाई पसरू नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात.

५. पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.

६. टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत; मात्र कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरू शकतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात