अग्निहोत्राचे महत्त्व आणि लाभ

त्रिकालज्ञानी संतांनी सांगितलेलेच आहे की, आता पुढे भीषण आपत्काळ आहे आणि त्यामध्ये जगभरातील बरीच लोकसंख्या नष्ट होणार आहे. पुढे आपत्काळ आहे, असे म्हणण्यापेक्षा आता आपत्काळाला आरंभ झालाच आहे. आपत्काळात तिसरे महायुद्ध भडकेल. दुसर्‍या महायुद्धापेक्षा आता जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांकडे महासंहारक अशी अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे ती एकमेकांविरुद्ध डागली जातील. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय हवा. तसेच त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा. त्याकरिता स्थुलातील उपाय उपयोगी नाहीत; कारण अणुबॉम्ब हा नेहमीच्या बॉम्बपेक्षा सूक्ष्म आहे. स्थूल (उदा. बाण मारून शत्रूचा नाश करणे), स्थूल अधिक सूक्ष्म (उदा. मंत्र म्हणून बाण मारणे), सूक्ष्मतर (उदा. नुसते मंत्र म्हणणे) आणि सूक्ष्मतम (उदा. संतांचा संकल्प) असे अधिकाधिक प्रभावशाली टप्पे असतात. स्थुलापेक्षा सूक्ष्म हे कित्येक पटीने प्रभावी असते. त्यामुळे अणुबॉम्बसारख्या प्रभावी संहारकाचा किरणोत्सर्ग थोपवण्यासाठी सूक्ष्मातील काहीतरी करावे लागेल. त्यासाठी ऋषिमुनींनी यज्ञाचा प्रथमावतार असलेले अग्निहोत्र करणे हा उपाय सांगितला आहे. तो करण्यास अतिशय सोपा आणि अतिशय अल्प वेळेत होणारा; पण प्रभावी असा सूक्ष्मातील परिणाम साधून देणारा उपाय आहे. त्यामुळे वातावरण चैतन्यमय बनते आणि आपल्याभोवती संरक्षककवचही बनते.

प्रतिदिन अग्निहोत्र करणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्निहोत्राची ओळख होईल. अग्निहोत्राविषयीचे सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. हा ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा.

 

१. अग्निहोत्र म्हणजे काय ?

अग्निहोत्र म्हणजे अग्न्यन्तर्यामी (अग्नीमध्ये) आहुती अर्पण करून केली जाणारी ईश्‍वरी उपासना.

सूर्योदयाच्या, तसेच सूर्यास्ताच्या वेळी केली जाणारी सूर्याची उपासना म्हणजे अग्निहोत्र ! अग्निहोत्र म्हणजे कामधेनूच आहे. अग्निहोत्र करण्यासाठी वेळ सोडली, तर अन्य कशाचेच बंधन नाही. अग्निहोत्रासाठी पिरॅमिडच्या आकाराच्या पात्रात गायीच्या शेणाच्या गोवर्‍या, २ चिमूट अखंड तांदूळ आणि देशी गायीचे तूप यांच्या साहाय्याने प्रज्वलित केल्या जातात. त्यानंतर २ मंत्र म्हणून आहुती दिली जाते.

(आज मनुष्याचे जीवन अतिशय धावपळीचे आणि तणावग्रस्त झाले आहे. अशा परिस्थितीत मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषिमुनींनीच अग्निहोत्राचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आपण श्रद्धापूर्वक तो अवलंबल्यास निश्‍चितच लाभ होईल ! – संपादक)

 

२. अग्निहोत्राचे महत्त्व

 

१. अग्निहोत्रातून निर्माण होणारा अग्नी हा रज-तम कणांना विघटित करणारा आणि वायूमंडलात दीर्घकाळ रेंगाळणारा असल्याने सातत्याने ही प्रक्रिया राबवली असता, तो मानवाच्या भोवती १० फूट अंतरापर्यंत संरक्षककवच बनवतो. हे कवच तेजविषयक गोष्टींच्या स्पर्शाला अत्यंत संवेदनशील असते. सूक्ष्मातून हे कवच तांबूस रंगाचे दिसते.

२. ज्या वेळी चांगल्या गोष्टीशी संबंधित तेज या कवचाच्या सान्निध्यात येते, त्या वेळी कवचातील तांबूस रंगाच्या तेजातील कण या तेजाला स्वतःत सामावून घेऊन आपल्या कवचाला बळकटी आणतात.

३. रज-तमात्मक तेजकण हे कर्कश स्वरूपात आघात निर्माण करणारे असतात. त्यामुळे ते जवळ येऊ लागले की, मानवाच्या भोवती निर्माण झालेल्या या संरक्षककवचाला त्याची आधीच जाणीव होते आणि ते आपल्यातून प्रतिक्षिप्त क्रियेच्या रूपात अनेक तेजलहरी वेगाने ऊत्सर्जित करून त्या कर्कश नादालाच नष्ट करते. त्याचप्रमाणे त्या नाद उत्पन्न करणार्‍या तेजकणांनाही नष्ट करते. यामुळे त्या रज-तमात्मक लहरींतील तेज हे आघात करण्यास सामर्थ्यहीन बनते. म्हणजेच बॉम्बमधील आघातात्मक विघातक स्वरूपात ऊत्सर्जित होणारी ऊर्जेची वलये आधीच मारली गेल्याने बॉम्ब किरणोत्सर्ग होण्याच्या दृष्टीने निष्क्रीय बनतो. त्यामुळे तो फेकला, तरी त्याच्या स्फोटामुळे पुढे होणारी मनुष्यहानी काही प्रमाणात टळते. बॉम्बचा स्फोट झाला, तरी त्यातून वेगाने जाणार्‍या तेजरूपी रज-तमात्मक लहरी वायूमंडलातील सूक्ष्मतररूपी या अग्नीकवचाला धडकून त्यातच विघटित होतात आणि त्याचा सूक्ष्म-परिणामही तेथेच संपुष्ट झाल्याने वायूमंडल पुढील प्रदूषणाच्या धोक्यापासून मुक्त रहाते.

– एक विद्वान (सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे लिखाण एक विद्वान, गुरुतत्त्व आदी नावांनी प्रसिद्ध आहे.), १८.२.२००८, सायं. ६.५५

 

३. अग्निहोत्राचे लाभ

३ अ. चैतन्यप्रदायी आणि औषधी वातावरण निर्माण होते.

३ आ. अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य पिकणे

अग्निहोत्रामुळे वनस्पतींना वातावरणातून पोषणद्रव्ये मिळतात आणि त्या सुखावतात. अग्निहोत्राच्या भस्माचाही शेती आणि वनस्पती यांच्या वाढीवर उत्तम परिणाम होतो. परिणामतः अधिक सकस आणि स्वादिष्ट अन्नधान्य, फळे, फुले अन् भाजीपाला पिकतो. – होमा थेरपी नावाचे हस्तपत्रक, फाईव्हफोल्ड पाथ मिशन, ४०, अशोकनगर, धुळे.

३ इ. अग्निहोत्राच्या वातावरणाचा बालकांवर सुपरिणाम होणे

१. मुलांच्या मनावर उत्तम परिणाम होऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होतात.

२. चिडचिडी, हट्टी मुले शांत आणि समंजस होतात.

३. मुलांना अभ्यासात एकाग्रता सहज साधता येते.

४. मतिमंद मुले त्यांच्यावर चालू असलेल्या उपचारांना अधिक उत्तम प्रतिसाद देतात.

३ ई. अग्निहोत्राने दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होऊन
मनोविकार बरे होणे आणि मानसिक बल प्राप्त होणे

नियमाने अग्निहोत्र करणार्‍या विविध स्तरांतील स्त्री-पुरुष, बाल-वृद्ध यांमध्ये एकमुखाने अधिक समाधान, जीवनाकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, मनःशांती, आत्मविश्‍वास आणि अधिक कार्यप्रवणता हे गुण निर्माण होऊन वाढीस लागल्याचे अनुभवास आले. दारू आणि इतर घातक मादक पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्ती अग्निहोत्राच्या वातावरणात त्या व्यसनांपासून मुक्त होऊ शकतात; कारण त्यांच्यामध्ये दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण होते, असे आढळून आले आहे. – डॉ. श्रीकांत श्रीगजाननमहाराज राजीमवाले, शिवपुरी, अक्कलकोट.

३ उ. मज्जासंस्थेवर परिणाम

ज्वलनातून निघणार्‍या धुराचा मेंदू आणि मज्जासंस्था यांवर प्रभावी परिणाम होतो. – होमा थेरपी नावाचे हस्तपत्रक, फाईव्हफोल्ड पाथ मिशन, ४०, अशोकनगर, धुळे.

३ ऊ. रोगजंतूंचे निरोधन

अग्निहोत्राच्या औषधीयुक्त वातावरणामुळे रोगकारक जंतूंच्या वाढीस प्रतिबंध होतो, असे काही संशोधकांना आढळून आले.

३ ए. संरक्षककवच निर्माण होणे

एक प्रकारचे संरक्षककवच सभोवती असल्याची जाणीव होते.

३ एे. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध होऊन त्या वातावरणातील व्यक्तींचे
मन त्वरित प्रसन्न आणि आनंदी होणे अन् त्या वातावरणात ध्यानधारणा सहज साध्य होणे

प्राण आणि आपले मन एकमेकांशी घट्टपणे निगडित असून जणूकाही ती एकाच नाण्याची दोन अंगे आहेत, असेही म्हणता येईल. अग्निहोत्रामुळे प्राणशक्ती शुद्ध झाल्याचा इष्ट परिणाम त्या वातावरणात असलेल्या व्यक्तीच्या मनावर त्वरित होऊन तिला तणाव विनासायास नष्ट होऊन मन प्रसन्न आणि आनंदी झाल्याचा अनुभव येतो. त्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते.

– डॉ. श्रीकांत श्रीगजाननमहाराज राजीमवाले, शिवपुरी, अक्कलकोट.

 

४. अग्निहोत्र साधना म्हणून
प्रतिदिन नित्यनियमाने करणे आवश्यक असणे

अग्निहोत्र करणे ही नित्योपासना आहे. ते एक व्रत आहे. ईश्‍वराने आपल्याला हे जीवन दिले आहे. त्यासाठी तो आपल्याला प्रतिदिन पोषक असे सर्वकाही देत असतो. या प्रीत्यर्थ प्रतिदिन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रतिदिन अग्निहोत्र करणे, हे आपले कर्तव्य आहे. तसेच ते साधना म्हणूनही प्रतिदिन करणे आवश्यक आहे.

 

५. अग्निहोत्रानंतर करावयाच्या कृती

५ अ. ध्यान

प्रत्येक अग्निहोत्रानंतर शक्य तेवढी अधिक मिनिटे ध्यानासाठी राखून ठेवावीत. निदान अग्नी शांत होईपर्यंत तरी बसावे.

५ अ. विभूती (भस्म) काढून ठेवणे

पुढील अग्निहोत्राच्या थोडे अगोदर हवनपात्रातील विभूती (भस्म) काढून ती काचेच्या अथवा मातीच्या भांड्यात साठवून ठेवावी. तिचा वनस्पतीसाठी खत म्हणून आणि औषधे बनवण्यासाठी उपयोग करता येतो.

– होमा थेरपी नावाचे हस्तपत्रक, फाईव्हफोल्ड पाथ मिशन, ४०, अशोकनगर, धुळे.

 

६. अग्निहोत्र हे कर्म उपासना
म्हणून केल्याने त्या त्या देवतांच्या स्तरावर होणारे लाभ

अ. अग्निहोत्र करणे हे आकाशमंडलातील सूक्ष्म देवतांच्या तत्त्वांना जागृत करून त्यांच्या लहरी भूमीमंडलावर खेचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.

आ. अग्निहोत्ररूपी कर्मात प्रजापतीरूपी उत्पत्तीशक्‍तीचे जागृतीकरण होत असल्याने भूमीमंडलाशी संबंधित सात्त्विक इच्छाजन्य जननधारणाक्षम बीजे योग्य काळात प्रसव पावून त्यातून सत्त्वगुणात्मक घटकाची निर्मिती करण्यास हातभार लावतात. म्हणजेच यातून प्रजापतीच्या आशीर्वादात्मक लहरींचे वायूमंडलात प्रसारण झाल्याने त्या त्या परिसरात प्रसवणारी प्रत्येक गोष्ट सात्त्विक बीजधारणेशी संबंधित घटकाची निर्मिती करते.

इ. या तेजोमंडलाच्या साहाय्याने अनेक देवता भूमीमंडलाशी संलग्न राहून अनेक भक्‍तजनांसाठी कार्य करत रहातात. या देवतांच्या निकट सान्निध्याने त्या त्या भूमीमंडलातील जिवांचा, तसेच इतर प्राणिमात्रांचा उद्धार होण्यास साहाय्यक होते.

ई. अग्निहोत्रामुळे वायूमंडलात सिद्ध (तयार) होणारे दिव्य तेजोमंडल हे पारदर्शक काचेच्या तेजोगोलासारखे असून अणूबाँबमधील अतिशय सूक्ष्म अशा संहारक किरणांनाही हे वायूमंडल भेदणे अशक्य होते. यामुळे संहारक घटकांपासूनही जिवाचे आणि त्या त्या वायूमंडलाचे रक्षण होऊ शकते.

उ. म्हणून कलियुगातील अनिष्ट शक्‍तींचा प्रकोप वाढलेल्या आपत्कालात आतंकवादी यंत्रणेपासून संपूर्ण देशाला, परिणामी समाजाला, परिणामी स्वतःला वाचवायचे असेल, तर अग्नीच्या साहाय्याने ब्रह्मांडमंडलातील त्या त्या देवतांच्या लहरी भूमीमंडलाकडे आकृष्ट करणार्‍या अग्निहोत्र-साधनेचा पुरस्कार केला पाहिजे.

– सूक्ष्म-जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

 

भावी महायुद्धकाळात कुटुंब आणि समाज
यांच्या रक्षणासाठी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ !

संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या समस्या आणि विकार यांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. दिनांक २०.११.२०१६ पर्यंत या मालिकेतील १२ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. याच मालिकेतील अग्निहोत्र या ग्रंथाचा परिचय या लेखाद्वारे करून देत आहोत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अग्निहोत्र’