आळंदी

Article also available in :

१. आळंदीचे बोलणारे वृक्ष !

वनस्पती बोलतात, हे ज्ञानेश्‍वरांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. आधुनिक विज्ञानामध्ये हेही घडू शकते की, वनस्पती बोलतात, माणसांना ते कळते आणि त्याप्रमाणे माणसे वागतात. ज्ञानेश्‍वरांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाण्यासाठी ज्या क्षणी उचलली जाते, त्या क्षणी आळंदीतील ज्ञानेश्‍वरांच्या समाधी मंदिराचा कळस हलतो आणि त्याच वेळी अजानवृक्षाची शाखा त्यांच्याकडे झेपावलेली असते. हे मी बर्‍याच वेळा पाहिलेले आहे. अशा रितीने वास्तू आणि वनस्पती एकमेकांशी किती संलग्न असतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आळंदी !

 

२. विशिष्ट उपकरणांनी आळंदीतील चैतन्य मोजणे शक्य !

आळंदीत जर विशिष्ट उपकरणे (मीटर्स) घेऊन गेलो, तर ठराविक दिवशी, ठराविक वेळी, ठराविक काळी आणि ठराविक प्रहरामध्ये तेथील चैतन्य आपल्याला त्याने मोजता येते.

लेखक : डॉ. रघुनाथ शुक्ल

संदर्भ : विश्‍वचैतन्यातील गूढ, भाग १