संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरींविषयी मिळालेले ज्ञान !

Ram_honap
श्री. राम होनप

१ अ. शत्रूशी लढण्याचा प्रकार

शरीर, बुद्धी (डावपेचांद्वारे शत्रूला पराभूत करणे), शस्त्र आणि नाद म्हणजेच संगीत

१ आ. अणूपेक्षाही सूक्ष्म असलेल्या संगीतातून उत्पन्न
होणार्‍या नादलहरींचा वातावरण आणि मनुष्य यांवर परिणाम होणे

ज्याप्रमाणे अणूबॉम्ब आकाराने लहान असला, तरी तो सहस्रो पटींनी सजीव आणि निर्जीव अशी दोंन्हींची हानी करतो; कारण अणू अधिकाधिक सूक्ष्म आहे. तो जेव्हा प्रगट होतो, तेव्हा तो अनेक पटींनी सृष्टीवर परिणाम करतो. अणूपेक्षाही संगीतातून उत्पन्न होणार्‍या नादलहरी अधिक सूक्ष्म असतात. त्यांचा वातावरण आणि मनुष्य यांवर सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम होतो.

१ आ १. सात्त्विक संगीताने उत्पन्न नादलहरींनी होणारा लाभ : सात्त्विक संगीताने मनःशांती लाभते, ताण न्यून होतो, तसेच मनाची एकाग्रता वाढते.

१ आ २. आसुरी संगीताचा प्रतिकूल परिणाम मनुष्य आणि निसर्ग यांवर होत असणे : हल्लीचे संगीत रज-तमप्रधान आणि पाश्‍चात्त्य संगीताच्या धर्तीवर आधारित आहे आणि सात्त्विक संगीत लोप पावत आहे. त्याचा पृथ्वीवर भयंकर परिणाम होत आहे. ज्याप्रमाणे असुर लोहितांगच्या संगीतातून प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींचा परिणाम पृथ्वीवर झाला, त्याप्रमाणे आताही या आसुरी संगीताचा प्रतिकूल परिणाम मनुष्य आणि निसर्ग यांवर होत आहे

१ आ २ अ. मनुष्य : रज-तम प्रधान संगीताने मन चंचल होऊन मनोबल घटते. त्यामुळे शरिरात अशांतता निर्माण होऊन त्याचा मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होतो.

१ आ २ आ. निसर्ग : पिकांच्या उत्पन्नात घट होणे, निसर्गचक्रात पालट होऊन अतीवृष्टी किंवा अनावृष्टी होणे इत्यादी.

 

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०१६)