सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी म्हणजे संपूर्ण हिंदु समाजावर संकट ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

दिघी (पुणे) येथील मेळावा

सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी म्हणजे संपूर्ण हिंदु समाजावर संकट ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड
ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

पुणे – सध्या देशात भगव्या आतंकवादाच्या खोट्या नावाखाली हिंदूंची छळवणूक केली जात आहे. देशात जर भगवा आतंकवाद असता, तर देशात फक्त भगवेच राहिले असते. आज देशात हिंदुत्ववादी सरकार असूनही हिंदु संघटनांवर बंदीची भाषा वापरली जाते; पण शिखांच्या दंगलीप्रकरणी काँग्रेसवर बंदीची भाषा केली जात नाही. सनातन संस्थेवरील प्रस्तावित बंदी हे सनातनवरील संकट नसून संपूर्ण हिंदु समाजावरील संकट आहे. हिंदु समाज विखुरण्यासाठी हे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून ते फार काळ टिकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्र्रीय युवा क्रांतिकारी प्रखर हिंदू प्रवक्ता हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांनी केले. दिघी येथील राघव मंगल कार्यालयात ३१ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदूसंघटन मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी समितीचे श्री. पराग गोखले आणि रणरागिणी शाखेच्या कु. अश्‍विनी कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

        मेळाव्याच्या प्रारंभी श्री. विष्णू साळुंखे यांनी शंखनाद केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हिंदूभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. हिंदूभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांचा सन्मान समितीचे श्री. राजू गायकवाड यांनी, श्री. पराग गोखले यांचा सत्कार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गणेश लांडगे यांनी, तर कु. अश्‍विनी कुलकर्णी यांचा सत्कार सनातन संस्थेच्या सौ. कविता मल्लगौडर यांनी केला. कार्यक्रमामध्ये येथील धर्माभिमानी श्री. रवीभाऊ गायकवाड यांचा सत्कार हिंदूभूषण ह.भ.प. राठोड महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि महर्षी यांच्या संदेशाचे वाचन ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती वंदना करचे यांनी केले.

उपस्थित मान्यवर – आळंदी येथील ह.भ.प. नवनाथ महाराज शिंदे, ह.भ.प. सुधन्वा महाराज केणेकर, धर्मवीर संभाजी महाराज वारकरी गुरुकुलाचे अध्यापक ह.भ.प. भगवान महाराज कदम, ह.भ.प. मोकाशी महाराज, शिवसेनेचे इंद्रायणीनगर विभागप्रमुख श्री. कैलास नेवासकर, विभागप्रमुख श्री. कृष्णाजी वाळके, उपविभागप्रमुख श्री. विश्‍वनाथ टेमगिरे, भारतमातानगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शाखाप्रमुख श्री. कैलास भुजबळ, वढू येथील छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीचे श्री. सोमनाथ भंडारी, हिंदुत्ववादी श्री. संतोष वाळके, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री दत्ता गव्हाणे, शिवाई नागरी पतसंस्थेचे संचालक प्रवीण पाटील यांसह ३०० हून अधिक धर्माभिमानी

 

क्षणचित्र

 सनातनवरील प्रस्तावित बंदीसंबंधीची ध्वनीचित्रफीत दाखवली जात असतांना एका धर्माभिमान्याने एम्आयएम्वर बंदी घाला, असे म्हटले.

मेळाव्यासाठी बहुमोल सहकार्य केलेले धर्माभिमानी

        सर्वश्री संतोष वाळके, कृष्णा वाळके, दत्ता गव्हाणे, कल्याण पांचाळ, विश्‍वनाथ टेमगिरे (धर्मकार्यात सहभागी होणार्‍या सर्व धर्माभिमान्यांचे आभार ! – संपादक)

भोर येथील मेळावा

परधर्माचा स्वीकार नरकासमान ! – ह.भ.प. शरद महाराज वाघ

ह.भ.प. शरद महाराज वाघ
ह.भ.प. शरद महाराज वाघ

 भोर – सर्वश्रेष्ठ अशा हिंदु धर्माने आपल्याला भगवद्गीता, रामायण, शिवचरित्र या माध्यमांतून अमूल्य ज्ञान दिले आहे. संतांनी केवळ साधना शिकवली नाही, तर समाजात धर्माप्रती जनजागृतीही केली. हिंदु संतांनी आम्हाला कसे जगावे हे शिकवले, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला धर्मासाठी लढण्याचा आदर्श घालून दिला. महान हिंदु धर्मात जन्म मिळालेला असतांनाही हिंदूंनी अमिषापोटी धर्मांतर करणे अयोग्य आहे. परधर्माचा स्वीकार केला, तर नरकात स्थान मिळेल, असे प्रतिपादन ह.भ.प. शरद महाराज वाघ यांनी केले. ३१ जुलै या दिवशी हिंदूसंघटन मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या कु. मोनिका गावडे यांनीही महिलांची सद्यस्थिती सांगून महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले. मेळाव्याच्या समारोपप्रसंगी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके सादर केली.

        मेळाव्याचा प्रारंभ श्री. इंद्रजित वाडकर यांनी केलेल्या शंखनादाने झाला. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि महर्षी यांच्या संदेशाचे वाचन ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रवीण कर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. शरद वाघ महाराज यांचा सत्कार समितीचे श्री. श्रीकांत बोराटे यांनी, ह.भ.प. वाघ महाराज यांच्या पत्नी सौ. संगीता वाघ यांचा सत्कार धर्माभिमानी सौ. राजश्री शेटे यांनी श्री.प्रवीण नाईक यांचा सत्कार धर्माभिमानी श्री. दीपक बागुल यांनी, तर कु. मोनिका गावडे यांचा सत्कार धर्माभिमानी सौ. गीता शिंदे यांनी केला. हिंदुत्वाचे धडाडीने कार्य करणारे श्री. विनायककाका सणस यांचाही श्री. प्रवीण नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. प्रवीण नाईक यांनीही त्यांचे विचार मांडले.

उपस्थित मान्यवर

        प्रतापगड उत्सव समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. विनायककाका सणस, युवा सेनेचे भोर शहरप्रमुख श्री. किरण पवार, वनवासी कल्याण आश्रमाचे श्री. रवींद्र रिसबूड यांच्यासह रोहिडा शिवजयंती समिती, ओम् दत्त सोहम् संप्रदाय, शिवप्रतिष्ठान, भोर, शिवप्रतिष्ठान, खंडाळा, योग वेदांत सेवा समिती, पिसाळवाडी येथील जय हनुमान तरुण मित्रमंडळ आदी संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि २५० हून अधिक धर्माभिमानी

सहकार्य – मेळाव्यासाठी सरस्वती मंगल कार्यालयाचे सर्वश्री विठ्ठलराव यादव, धर्माभिमानी किरण अंबिके, विठ्ठल तात्या टिळेकर, सुनील सावंत यांनी सभागृहासाठी आवश्यक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. सदगुरु सेवा ट्रस्टने शहरात कार्यक्रमाचे प्रसिद्धीफलक लावले. गं.प. वाचनालय यांनी बैठकीसाठी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमानी विद्यार्थ्यांचा मेळाव्याच्या सेवांमध्ये सक्रिय सहभाग होता. धर्माभिमानी श्री. राजेश महांगरे यांनी आपल्या वाहनातून साहित्याची विनामूल्य ने-आण केली. (धर्मकार्यात सहभागी होणार्‍या सर्व धर्माभिमान्यांचे आभार ! – संपादक) 

समस्त वारकरी संप्रदाय खंबीरपणे सनातनच्या पाठीशी ! – ह.भ.प. शरद वाघ महाराज

        राष्ट्र-धर्मासाठी नातनचे साधक रात्रंदिवस तळमळीने कार्य करत आहेत. त्यांच्यामुळेच लोकांना धर्मशिक्षण मिळते. असे असतांना सनातनच्या साधकांना पोलीस आणि सरकार नाहक त्रास देत आहे. निःस्वार्थपणे कार्य करणार्‍या सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र समस्त वारकरी संप्रदाय खंबीरपणे सनातनच्या पाठीशी आहे.

क्षणचित्रे

१. मेळाव्यानंतर वक्त्यांशी अनौपचारिक चर्चा करतांना ५० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी ५ ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याची, ३ ठिकाणी धर्मजागृती सभा घेण्याची मागणी केली.

२. सनातन संस्थेविषयी विश्‍वास दर्शवतांना अनेक तरुणांनी सनातन संस्थेमुळे धर्मशिक्षण मिळत असल्याचे सांगितले. सनातन संस्थेवर बंदी घातली, तर धर्माचे मूळ संपून जाईल. प्रत्येक संघटनेने ठामपणे सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहावे, असे एका धर्माभिमान्याने सांगितले.

        भोर येथील संपूर्ण मेळाव्याचे पोलिसांकडून ध्वनीचित्रीकरण करण्यात आले. (राष्ट्र-धर्म यांच्या संदर्भात जागृती करणार्‍या सनदशीर कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यापेक्षा पोलिसांनी हीच शक्ती आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी वापरली असती, तर एव्हाना देश आतंकवादमुक्त झाला असता ! – संपादक)

राष्ट्र आणि धर्म कार्यात कृतीशील होऊ इच्छिणार्‍यांसाठी आढावा बैठक
वार आणि दिनांक : बुधवार, ३ ऑगस्ट
वेळ : सायंकाळी ७
स्थळ : गं.पं. वाचनालयासमोरील पंचमुखी मारुति मंदिर, भोर