सनातन धर्मानुसार सांगितलेल्या कृतींचा परिणाम किती खोलवर होतो, याचा प्रत्यक्ष अनुभव घेणारे श्री. गौरव सेठी !

gourav_sethi_col
श्री. गौरव सेठी

जानेवारी २०१६ मध्ये चंडीगड येथील श्री. गौरव सेठी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्या वेळी प.पू. डॉक्टर यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी श्री. गौरव सेठी यांच्या पत्नी सौ. अनन्या सेठी यांनी एक प्रसंग सांगितला. तो त्यांच्याच शब्दांत देत आहे.

१. दोन्ही हातांनी पावलांना स्पर्श न करता अर्धवट वाकून वडिलांच्या गुडघ्याला स्पर्श करून नमस्कार करत असल्याची चूक मुलाने लक्षात आणून देणे : आम्ही एकत्र कुटुंबात रहातो. श्री. गौरव आणि त्यांचे वडील यांच्यातील संबंध तणावपूर्वक आहेत, तरीही श्री. गौरव प्रतिदिन सकाळी आणि रात्री अर्धवट वाकून वडिलांच्या गुडघ्याला स्पर्श करून नमस्कार करत असत. आमची मुले जेव्हा त्यांना (श्री. गौरव यांना) नमस्कार करत असत, तेव्हा ते त्यांना दोन्ही हातांनी पावलांना स्पर्श करून नमस्कार करायला सांगत. एके दिवशी मुलाने म्हटले, तुम्ही आम्हाला दोन्ही हातांनी पावलांना स्पर्श करून नमस्कार करायला शिकवता; पण स्वतः मात्र आजोबांच्या पायाला एका हाताने स्पर्श करून नमस्कार करता.

२. पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार केल्यावर वडिलांचे आशीर्वाद मिळत असल्याचे, तसेच त्यांच्या दृष्टीकोनात पालट झाल्याचे जाणवणे : श्री. गौरव त्या दिवसापासून त्यांच्या वडिलांच्या पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रत्येक दिवशी ते अधिक प्रमाणात झुकत गेले. वडिलांच्या पावलांना दोन्ही हातांनी स्पर्श करून नमस्कार करायला आरंभ केल्यापासून गौरव यांना वडिलांचे आशीर्वाद मिळत आहेत, असे जाणवू लागले. त्यांच्या वडिलांचा आमच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटला आहे, असेही आम्हाला जाणवले. या प्रसंगावरून प.पू. डॉक्टर शिकवत असलेल्या आणि सनातन धर्मानुसार सांगितलेल्या कृतींचा परिणाम किती खोलवर होतो, हे आमच्या लक्षात आले.

प.पू. डॉक्टरांनी सांगितलेले किंवा त्यासंदर्भात लिहिलेले प्रत्येक सूत्र पुष्कळ अर्थपूर्ण असून त्याचा आपल्या जीवनावर किती अंगांनी परिणाम होतो, याची कल्पना करायला आपले मन आणि बुद्धी असमर्थ आहे.

श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता !

– सौ. अनन्या गौरव सेठी, चंडीगड (मार्च २०१६)