स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जाज्ज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

 

स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्माचे सांगितलेले महत्त्व

हिंदु धर्म जर नष्ट झाला, तर सत्य, न्याय, मानवता आणि शांती सर्वकाही संपून जाईल ! – स्वामी विवेकानंद

 

देवतांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी चीड असणारे स्वामी विवेकानंद !

स्वामीजी त्यांच्या शिष्यांसह काश्मीरला गेले होते. तेथे क्षीर भवानीच्या मंदिराचे भग्न अवशेष त्यांनी पाहिले. अत्यंत विषण्ण होऊन स्वामीजींनी स्वत:च्या मनाला विचारले, जेव्हा हे मंदिर भ्रष्ट आणि भग्न केले जात होते, तेव्हा लोकांनी प्राणपणाने प्रतिकार कसा केला नाही ? जर मी तेथे असतो, तर मी अशी निंद्य घटना होऊ दिली नसती. देवीमातेच्या रक्षणार्थ मी माझ्या प्राणाची आहुती दिली असती ! या प्रसंगातून स्वामीजींचे देवी भगवतीवरचे प्रेम दिसून येते !!

देवळे ही ईश्‍वरी चैतन्याचा पुरवठा करणारी स्थाने आहेत. त्यांचे पावित्र्य राखा, तसेच ती भ्रष्ट होऊ देऊ नका !

 

असा जाज्ज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

वर्ष १८९६ मध्ये स्वामी विवेकानंद आगनावेतून (जहाजातून) नॅप्ल्सहून कोलंबोकडे येत होते. त्यांच्या सहप्रवाशांमध्ये दोन ख्रिस्ती धर्मगुरु होते. काही कारण नसतांना ते हिंदु धर्म आणि ख्रिश्‍चन पंथ यांच्यातील भेद या विषयावर वाद घालू लागले. स्वामीजींनी त्यांच्या प्रत्येक सूत्राला (मुद्याला) तर्कशुद्ध उत्तर देऊन त्याचे खंडण केले; परंतु हार न स्वीकारता ते ख्रिस्ती धर्मगुरु हिंदु धर्माविषयी अवमानास्पद बोलू लागले. हिंदु धर्माचा हा अवमान सहन न झाल्याने स्वामीजींनी त्यांपैकी एका व्यक्तीची गळापट्टी (कॉलर) पकडली आणि ते गरजले, यापुढे जास्त वटवट करशील, तर उचलून बाहेर समुद्रात फेकून देईन !

त्यानंतर तो स्वामीजींच्या वाटेला गेला तर नाहीच, उलट संपूर्ण प्रवासात जमेल तेव्हा स्वामीजींना प्रसन्न (खुश) कसे करता येईल, याचाच प्रयत्न करू लागला !

अधिक माहितीसाठी वाचा सनातनचा ग्रंथ बोधकथा

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात