सनातनच्या संत पू. सखदेवआजी यांची UTS उपकरणाद्वारे केलेली वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक चाचणी !

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी देहत्याग केल्यानंतर  यू.टी.एस्.
(Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

Pu_Sakhadevaaji_goa_May2013_col
कै. पू. (सौ.) आशालता सखदेवआजी

सामान्यतः जो जीव जन्माला येतो, त्याचा मृत्यू निश्‍चितच असतो. हा नियम सर्वांनाच लागू आहे. जीवनात व्यक्तीने साधना केल्यास त्याचा मृत्यूनंतरचा प्रवासही चांगला होतो. जीव साधना करणारा असेल, तर जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही त्याच्या साधनेचा त्याला अन् इतरांना लाभ होतो. त्याच्या माध्यमातून वातावरणात सकारात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण होते. सामान्य व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेहाभोवतालचे वातावरण त्रासदायक होते; मात्र संतांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या देहातून चैतन्य दूरवर प्रक्षेपित होते.

कठोर साधना करत संतपद प्राप्त केलेल्या सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांनी १७.८.२०१६ या दिवशी देहत्याग केला. देहत्यागानंतर त्यांच्या देहातून कोणत्या ऊर्जेचे प्रक्षेपण होते ? देहाच्या ठिकाणी आणि देहातून वातावरणात किती अंतरापर्यंत हे प्रक्षेपण होते आणि त्यांचा परिणाम, याविषयी वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

IMG_1712_Clr
यूटीएस् उपकरणाद्वारे ऊर्जेचे मापन करतांना आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी

 

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक व्यक्ती आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

 

२. चाचणीचे स्वरूप

या वेळी पू. (सौ.) आशालता सखदेवआजींनी देहत्याग केल्यानंतर वातावरणातील परिणाम वैज्ञानिक दृष्टीने अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीतील परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

 

३. यू.टी.एस्. (Universal Thermal Scanner) उपकरण

३ अ. उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांची) ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील माजी परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करू शकतो, असे ते सांगतात.

३ आ. उपकरणाद्वारे करायच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

३ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील दोन प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

३ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

३ आ ३. घटकाची प्रभावळ : ही मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात त्याची लाळ किंवा छायाचित्र आणि वनस्पतींच्या संदर्भात त्यांची पाने.

 

४. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली काळजी

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. त्या व्यक्तीच्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

table_1

टीप : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा कमी अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

 

५ अ. निरीक्षणांचे विवेचन

५ अ १. नकारात्मक ऊर्जा न आढळणे

सर्वसाधारण वास्तू किंवा व्यक्ती यांच्या चाचणीमध्ये नकारात्मक ऊर्जा असू शकते; पण अंत्यसंस्कारासारखा विधी असूनही नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. संतांच्या देहातून सात्त्विक ऊर्जा प्रक्षेपित झाल्यामुळे नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

५ अ २. देहत्यागानंतर संतांच्या स्थूलदेहाची
आणि भोवताली असणार्‍या वातावरणातील प्रभावळ
या दोन्ही चाचण्यांच्या वेळी सकारात्मक ऊर्जा आढळणे

सर्वच व्यक्ती, वस्तू अथवा वास्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून येतेच, असे नाही; परंतु देहत्यागानंतर पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या स्थूलदेहाची प्रभावळ आणि त्यांच्या देहाभोवताली असणार्‍या वातावरणातील प्रभावळ या दोन्ही चाचण्यांच्या वेळी स्कॅनरच्या भुजा १८० अंशाच्या कोनात उघडल्या अन् त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आढळली.

५ अ ३. देहत्याग केलेल्या दिवसाची आणि दुसर्‍या दिवशीची स्थूलदेहाची प्रभावळ

देहत्याग केल्यानंतर त्याच दिवशी स्थूलदेहाची प्रभावळ अधिक असून ती ७.२३ मीटर होती, तर दुसर्‍या दिवशी स्थूलदेहाची प्रभावळ ५.५४ मीटर, म्हणजे पहिल्या दिवशीच्या तुलनेत १.६९ मीटरने न्यून झाली.

५ अ ४. देहत्याग केलेल्या दिवसापेक्षा दुसर्‍या दिवशी
स्थूलदेहाभोवती असणार्‍या वातावरणातील प्रभावळ वाढणे

देहत्याग केल्यानंतर त्याच दिवशी पू. आजींच्या स्थूलदेहाभोवती असणार्‍या वातावरणातील प्रभावळ ५.९३ मीटर होती, तर दुसर्‍या दिवशी देहाभोवती असणार्‍या वातावरणातील प्रभावळ ७.३८ मीटर, म्हणजे १.७५ मीटरने वाढली.

 

६. निष्कर्ष

संतांच्या स्थूलदेहापेक्षा, म्हणजे सगुणापेक्षा
त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वाचा परिणाम देहत्यागानंतर अधिक असणे

पू. (सौ.) सखदेवआजींच्या घेतलेल्या वरील चाचणीवरून देहत्याग केल्यानंतर त्याच दिवशी स्थूलदेहाची प्रभावळ दुसर्‍या दिवशीच्या तुलनेत अधिक होती, तर पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसर्‍या दिवशी त्यांच्या देहाभोवतीच्या वातावरणातील प्रभावळ अधिक होती. या चाचणीवरून आपल्या लक्षात येते की, स्थुलापेक्षा सूक्ष्म अधिक श्रेष्ठ असते. संतांच्या स्थूलदेहापेक्षा, म्हणजे सगुणापेक्षा त्यांच्या सूक्ष्म अस्तित्वाचा परिणाम देहत्यागानंतर अधिक असतो. आवश्यकतेनुसार त्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावर होत असते.

– आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (२२.८.२०१६)


सनातनच्या पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागाच्या संदर्भात देश-विदेशांतील साधकांना आलेल्या अनुभूती !

गेल्या १० वर्षांत सनातनच्या ९ संतांनी देहत्याग केला. पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या देहत्यागाच्या संदर्भात देश-विदेशांतील साधकांना जशा अनुभूती आल्या, तशा आतापर्यंत एकाही संतांच्या संदर्भात आलेल्या नाहीत. यावरून हे सिद्ध झाले की, गेल्या १० वर्षांत सनातनच्या अनेक साधकांनी चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे त्यांना सूक्ष्मातील अनेक अनुभूती आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर त्या अनुभूती स्थळ-काळाची मर्यादा ओलांडूनही आल्या आहेत. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

पू. (सौ.) सखदेवआजी यांची देहत्यागानंतर जाणवलेली वैशिष्ट्ये

१. प्राण आज्ञाचक्रातून गेल्याचे जाणवणे, आज्ञाचक्र तेजस्वी दिसणे आणि कपाळावरील कुंकवामध्ये ॐ उमटलेला दिसणे

पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या खोलीत गेल्यानंतर जाणवले, त्यांचा प्राण आज्ञाचक्रातून गेला आहे. त्यांचे आज्ञाचक्र तेजस्वी दिसत होते. तसेच त्यांच्या कपाळावरील कुंकवामध्ये ॐ उमटल्याचेही आढळले.

२. पू. (सौ.) सखदेवआजींची स्पंदने हाताला जेथपर्यंत जाणवली, तेथपर्यंतच ती
यु. टी. स्कॅनर मापकाने दर्शवणे आणि ती पू. आजींपासून २.८८ मीटर येथपर्यंत असणे

पू. आजींची चैतन्यमय स्पंदने त्यांच्यापासून किती अंतरापर्यंत जाणवतात ?, हे मी माझ्या हाताने पाहिले. मला ती स्पंदने जेथपर्यंत जाणवत होती, तेथपर्यंतच युनिव्हर्सल थर्मल स्कॅनर (यु. टी. स्कॅनर) मापकाने ती दर्शवली आणि ती पू. आजींपासून २.८८ मीटर एवढ्या दूरपर्यंत होती.

३. पू. (सौ.) सखदेवआजींच्या खोलीतील वातावरणात सूक्ष्मातून ॐ दिसणे
आणि यु. टी. स्कॅनर मापकाने ॐची स्पंदने पू. आजींपासून ५.८८ मीटर अंतरापर्यंत दर्शवणे

पू. आजींच्या खोलीतील वातावरणात मला सर्वत्र सूक्ष्मातून ॐ दिसत होते. तेव्हा यु. टी. स्कॅनर मापकाने ॐची स्पंदने आहेत का ?, हे पाहिले, तर ती चाचणी सकारात्मक आली आणि ॐची स्पंदने पू. आजींपासून ५.८८ मीटर एवढ्या दूरपर्यंत मापकाने दर्शवली.

४. पू. आजींपासून प्रक्षेपित होणारी शक्तीची स्पंदने त्यांच्या देहत्यागानंतर पुढे सव्वादोन घंटे जाणवली.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात