नामजपाचे उपाय करण्याविषयीच्या सूचना

विकार-निर्मूलनासाठीचा नामजप प्रतिदिन किती वेळ करावा ?

विकाराची तीव्रता प्रतिदिन नामजप करण्याचा सर्वसाधारण अवधी (घंटे)
१. मंद १ ते २
२. मध्यम ३ ते ४
३. तीव्र ५ ते ६
 
ग्रंथात ३०० हून अधिक विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप सांगितले आहेत, तसेच काही देवतांचे नामजप कोणकोणत्या विकारांत उपयुक्त आहेत, हेही दिले आहे. यासाठी ग्रंथाचा अवश्य लाभ घ्या !
 

ग्रंथात सांगितलेली मुद्रा-उपायपद्धत
ही हिंदु धर्मातील ज्ञानावर आधारित !

मानवाच्या हाताची पाच बोटे ही पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक बोट आणि त्याच्याशी संबंधित महाभूत याविषयी आम्ही सांगितलेली माहिती शारदातिलक (अध्याय २३, श्‍लोक १०६ वरील टीका) आणि स्वरविज्ञान या ग्रंथांत दिलेल्या माहितीप्रमाणेच आहे. मुद्रा करून तिचा शरिराच्या कुंडलिनीचक्रांच्या ठिकाणी किंवा विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करणे, हा आम्ही सांगितलेल्या उपायपद्धतीचा एक भाग आहे. प्राचीन काळापासून मंत्रयोगात मातृकान्यास करण्यास सांगितले आहे. त्यातही पाच बोटे आणि तळवा यांनी शरिराच्या विविध अवयवांच्या ठिकाणी न्यास करण्यास सांगितले आहे.  (संदर्भग्रंथ : भारतीय संस्कृतिकोश, खंड ४ आणि ७) अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. त्यामध्ये प्रयोगशीलता आणि सृजनशीलता आहे. हिंदु धर्मातील ज्ञानाचा उपयोग करतांनाच आम्ही जिज्ञासु वृत्तीने अभ्यास केला. विविध मुद्रा, न्यास आणि नामजप यांच्या संदर्भात स्वतः प्रयोग केले आणि अनुभव घेतला. अनेक साधकांनीही या उपायपद्धतीने प्रयोग केले. या उपायपद्धतीचे लाभ लक्षात आल्याने आता ग्रंथाच्या माध्यमातून सर्वांसमोर ही उपायपद्धत प्रस्तुत केली आहे.

संदर्भ : विकार-निर्मूलनासाठी नामजप भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !