सनातन संस्थेने समाजात आध्यात्मिक चेतना जागृत केली आहे ! – श्री मल्लय्या स्वामी, सिद्धारूढ मठ, राणेबेन्नूरु, कर्नाटक

Sri-Mallayya-Swamiji
श्री मल्लय्या स्वामी यांना कन्नड साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक भेट देतांना सनातनच्या १. सौ. विदुला हळदीपूर आणि साधक तसेच पतंजलीचे कार्यकर्ते

राणेबेन्नूरु (कर्नाटक) : सनातन संस्थेचा परिचय आम्हाला अनेक वर्षांपासून आहे. माझा त्यांच्याशी अतिशय जवळचा संपर्क आहे. ही संस्था समाज, राष्ट्र आणि सनातन भारतीय संस्कृती यांसाठी मोठे कार्य करत आहे. लहान मुलांसाठी बालसंस्कारवर्ग घेऊन त्यांच्यात उत्तम संस्कार बिंबवण्यात संस्थेची प्रमुख भूमिका आहे. यासह संस्थेने समाजात आध्यात्मिक चेतना जागृत केली आहे. निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे समाजाची सेवा करणार्‍या सनातन संस्थेचे कार्य अत्युत्तम असून त्यामुळे आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे. या संस्थेचे कार्य असेच निरंतर पुढे चालत राहो, ही शुभेच्छा, असे आशीर्वचन कर्नाटकच्या राणेबेन्नूरु येथील सिद्धारूढ मठाचे श्री मल्लय्या स्वामी यांनी सनातन संस्थेला दिले आहेत. काही हिंदु विरोधकांकडून सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर संस्थेचे साधक आणि पतंजली योग समितीचे कार्यकर्ते यांनी स्वामीजींची भेट घेतली होती. त्या वेळी स्वामीजी बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात