पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट !

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

डावीकडून गाजियाबाद, उत्तरप्रदेश येथील वैदिक उपासना पीठाच्या संस्थापिका पू. तनुजा ठाकुर, नवी देहली येथील वैदिक उपासना पीठाच्या श्रीमती अन्तिमा गोयल आणि श्री. रवि गोयल यांना दैनिक सनातन प्रभातविषयी माहिती सांगतांना सनातनच्या सौ. मंगला मराठे.
डावीकडून ठाणे, महाराष्ट्र येथील हिंदी भाषिक जनता परिषदेचे उपाध्यक्ष श्री. हरिशंकर पांडे, ठाणे, महाराष्ट्र येथील स्वराज्य हिंदूसेनेचे अध्यक्ष श्री. सुशील चंद्रभान तिवारी, मंगळुरू, कर्नाटक येथील अ‍ॅड् उमेश मेगुडी यांना ग्रंथांविषयी माहिती सांगतांना सनातनच्या कु. सायली वाघुळदे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात