हिंदु धर्म आणि हिंदु धर्मातील विविध संप्रदाय

आज हिंदु धर्मीय समाज विविध संप्रदायांत विभागला आहे. तो हिंदु धर्मानुसार नव्हे, तर सांप्रदायिक शिकवणीनुसार धर्माचरण करतो. अनादी आणि व्यापक हिंदु धर्माच्या तुलनेत संप्रदायांची शिकवण किती मर्यादित आहे, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल.

हिंदु समाजाने सांप्रदायिक आचरण करण्यापेक्षा व्यापक शिकवण देणार्‍या हिंदु धर्मातील तत्त्वांनुसार आचरण केल्यास त्यांची शीघ्रतेने प्रगती होईल. एवढेच नाही तर हिंदूंचे राष्ट्रव्यापी ऐक्य साध्य होण्यास साहाय्य होईल.

हिंदु धर्म हिंदु धर्मातील विविध संप्रदाय
१. स्थापना
अ. कधी ? अनादी धर्मानंतर
आ. आधी कोण – मानव कि पंथ ? मानवाआधी धर्म पंथाआधी मानव
इ. संस्थापक ईश्‍वर संत
ई. स्थापनेचे कारण धर्म पहिल्यापासूनच असल्याने कशाला तरी विरोध म्हणून स्थापन झालेला नाही, तर परमेश्‍वराची प्राप्ती कशी करायची ? सृष्टी आनंदी कशी करायची ?, अशा विचारांतून उगम झाला आहे. साधनेचा विशिष्ट मार्ग सांगणे
२. परिपूर्णता ईश्‍वर पूर्ण असल्याने परिपूर्ण एकांगी
३. तत्त्वज्ञान
अ. धर्मग्रंथ अनेक. धर्मग्रंथ एकच नसल्यामुळे त्यांत वैचारिक वा तात्त्विक सारखेपणा नाही. धर्मचिंतनास पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेक दर्शने वैचारिक गोंधळ दाखवत नाहीत, तर साक्षात्कार-सोपान तयार करतात. एक. एकाच धर्मग्रंथात अनंताचे परिपूर्ण ज्ञान असणे कधीही संभवत नाही. त्यामुळे फक्त सांप्रदायिक माहिती
आ. विषयांची व्याप्ती आहे. १४ विद्या आणि ६४ कला, उदा. विज्ञान, गणित, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र, विश्‍वाची रचना, संगीत, नृत्य इत्यादी मर्यादित
इ. द्वैत / अद्वैत अद्वैत. विश्‍वाच्या बाहेर विश्‍वंभराला शोधण्याचा खटाटोप नाही. अखेरचा सिद्धान्त भक्त आणि भगवान एकच आहेत (तत् त्वम् असि । सर्वं खल्विदं ब्रह्म ।) बहुधा द्वैत.
ई. शास्त्रप्रमाण आणि शब्दप्रमाण शास्त्र आणि शब्द प्रमाण शास्त्रज्ञानाची भीती वाटत नाही. शास्त्रीय ज्ञान मानायला आणि आपली धर्ममते शास्त्रीय कसोटीवर पारखायला धर्म सिद्ध असतो. सांप्रदायिक सांगणे शब्दप्रमाण
उ. मोक्षासंबंधी कल्पना आहे मर्यादित
ऊ. देवाचे स्थान सर्वत्र बहुधा मर्यादित
ए. प्रकृतीसंदर्भातील दृष्टीकोन – प्रकृती नष्ट करणे किंवा चांगली करणे प्रकृती नष्ट करण्याला महत्त्व बहुधा प्रकृती चांगली करण्याला महत्त्व
ऐ. प्रधान गुण सत्त्व आणि पुढे त्रिगुणातीत होणे सत्त्व
ओ. विचार कोणाचा – केवळ मानवाचा कि चराचराचा ? मानवासह चराचराचा बहुधा मानवासह चराचराचा
औ. पाप-पुण्याची बेरीज आणि वजाबाकी नाही नाही
अं. वर्णभेद कर्माकरिता बहुधा नाही.
४. धर्मगुरु
अ. निवडणूक नाही नाही
आ. विधिपूर्वक स्थापना नाही (संतांची स्थापना नाही.) आहे
इ. मान पात्रतेनुसार हुद्यानुसार
ई. अधिकार आत्मानुभूतीनुसार काही संप्रदायांत हुद्यानुसार
उ. आत्मानुभूती असते असते / नसते
५. संत गुरु किंवा संत एखाद्याला जिवंतपणीच संत म्हणून घोषित करतात किंवा समाजातील व्यक्तींना तिच्यातील संतत्वाची जाणीव होते. गुरु किंवा संत एखाद्याला जिवंतपणीच संत म्हणून घोषित करतात किंवा समाजातील व्यक्तींना तिच्यातील संतत्वाची जाणीव होते.
६. शिकवण
अ. मुख्य शिकवण सर्वांगीण. आरंभी अहिंसेऐवजी विश्‍वातील प्राणिमात्रांवर प्रीती (निरपेक्ष प्रेम) आणि शेवटी दुसरा असा कोणीच नाही, म्हणजे अद्वैत बहुधा एकांगी
आ. शिकवण प्रामुख्याने कोणाला समजते ? मन, बुद्धी, जीवात्मा आणि शिवात्मा मन आणि बुद्धी
७. साधना
अ. महत्त्व कशाला ? गुरु-शिष्य नाते प्रार्थना
आ. व्यक्तीगत, संघटित कि सामाजिक ? व्यक्तीगत. व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग संघटित, सामाजिक
इ. एक व्यक्ती किंवा देवता केंद्रबिंदू नाही (केंद्रविहीन) आहे
ई. महत्त्व आचाराला कि चारित्र्याला ? आचाराला आणि चारित्र्याला आचाराला आणि चारित्र्याला
उ. वैराग्य आहे कमी
ऊ. देशकालानुसार साधना, उदा. स्थळ, तसेच दिवस, मास, युगे, आपत्काळ इत्यादी. असणे. सत्पुरुषांच्या प्रेरणेनेही पालट नसणे
८. जास्तीतजास्त अपेक्षित उन्नती (टक्के) (मोक्ष = १०० टक्के) १०० बहुधा ७०
९. अनुभूती अद्वैतामुळे प्रत्यक्ष ईश्‍वराशी एकरूप होता येते. बहुधा द्वैतामुळे अद्वैताची अनुभूती न येणे
१०. कार्य करण्याचा स्तर – इच्छा, क्रिया किंवा ज्ञान शक्ती ज्ञानशक्ती ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती
११. इतर पंथांसंदर्भात दृष्टीकोन
अ. इतर पंथांना सहज मानणे इतर पंथांना न मानणे
आ. दुसर्‍यांना समजून घेण्याची वृत्ती; म्हणून इतर पंथांविषयी आदर बहुधा आपलेच खरे, इतरांचे खोटे; म्हणून इतरांना कनिष्ठ समजणे
१२. प्रचार
अ. विषय ईश्‍वरप्राप्तीच्या विविध मार्गांचा आपल्याच विचारसरणीचा
आ. आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न विचारही नाही. ज्ञानामुळे इतर पंथीय आपोआप आकृष्ट होणे. होणे कारण आपलाच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे, असे वाटणे
इ. इतरांना विरोध सर्वेषाम् अविरोधेण ।, म्हणजे कोणालाच विरोध नाही, हा विचार. एक संस्थापक नसल्याने पहिल्यापासून विविध विचारसरणी ऐकायची सवय. कधीकधी
ई. इतिहास धर्माची विविध अंगे विस्तारित करून सांगणार्‍या ऋषीमुनींचा संप्रदायाची स्थापना करणार्‍यांचा
उ. प्रचाराचे माध्यम – ज्ञान सांगणे, व्यावहारिक जीवन सुखी होण्यासंदर्भात सांगणे आणि शस्त्र ज्ञान ज्ञान
१३. अंत अनादी आहे; म्हणून अंत नाही. उत्पत्ती नाही, म्हणून लयही नाही. आरंभ आहे, म्हणून अंत आहे. उत्पत्ती आहे, तेथे लय आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment