दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?

१. पिंडदानाच्या वेळी लिंगदेहाने कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्न भक्षण करणे


‘काकगती’ ही पिंडदानात केलेल्या आवाहनानुसार पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणार्‍या लिंगदेहाच्या गतीशी साधर्म्य दर्शवते. तसेच कावळ्याचा काळा रंग हा रज-तमदर्शक असल्याने, तो ‘पिंडदान’ या रज-तमात्मक कार्याशी संबंधित विधीशी साधर्म्य दर्शवतो. कावळ्याभोवती असलेल्या सूक्ष्म कोषातही लिंगदेहाभोवती असलेल्या कोषासारखेच आपकणांचे प्राबल्य अधिक असल्याने लिंगदेहाला कावळ्याच्या देहात प्रवेश करणे सोपे जाते. वासनांत अडकलेले लिंगदेह हे भूलोक, मत्र्यलोक, भुवलोक आणि स्वर्गलोक यांमध्ये अडकलेले असतात. असे लिंगदेह पृथ्वीच्या वातावरणकक्षेत प्रवेश केल्यानंतर कावळ्याच्या देहात प्रवेश करून पिंडातील अन्न भक्षण करतात. मधला पिंड हा मुख्य लिंगदेहाशी संबंधित असल्याने या पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे समजले जाते. प्रत्यक्ष पिंडातील अन्न कावळ्याच्या माध्यमातून भक्षण करून स्थूल स्तरावर, तसेच अन्नातून प्रक्षेपित होणारे सूक्ष्म-वायू ग्रहण करून सूक्ष्म स्तरावर, अशा दोन्ही माध्यमातून लिंगदेहाची तृप्ती होते आणि पृथ्वीची कक्षा भेदून पुढे जाण्यासाठी त्याला या अन्नातून स्थूल अन् सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर ऊर्जा मिळते. स्थूल ऊर्जा ही लिंगदेहाच्या बाहेरील वासनात्मक कोषाचे पोषण करते, तर सूक्ष्म-वायूरूपी ऊर्जा ही लिंगदेहाला पुढे जाण्यासाठी आंतरिक बळ प्राप्त करून देते.’

(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.३.२००५, दुपारी १२.१०)

२. पिंडाला कावळा शिवतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारे चित्र

चित्र मोठे पाहण्यासाठी त्यावर क्लिक करणे

पिंडाला कावळा शिवतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारे चित्र

पिंडाला कावळा शिवतांना होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया दर्शवणारे चित्र

अ. चित्रातील त्रासदायक स्पंदने : २ टक्के’- प.पू. डॉ. आठवले

आ. ‘सूक्ष्म-ज्ञानविषयक चित्रातील स्पंदनांचे प्रमाण : त्रासदायक शक्ती ४.२५ टक्के.

इ. इतर सूत्रे

१. कावळा पिंडातील घास घेतो, त्या वेळी लिंगदेहाच्या अतृप्त इच्छांची पूर्ती झाल्याचे जाणवते. कावळ्याच्या माध्यमातून लिंगदेह इच्छांची पूर्ती करतो.

२. ज्या वेळी लिंगदेहाच्या अतृप्त इच्छांची पूर्ती होत नाही, त्या वेळी लिंगदेहातून तमोगुणी मारक शक्तीच्या लहरींचे वातावरणात आणि कावळ्याकडे प्रक्षेपण होत रहाते. त्या लहरी कावळ्याला जाणवतात आणि त्या लहरींमुळे कावळा पिंडाला स्पर्श करत नाही.

३. सामान्य व्यक्ती मायेत अधिक गुंतलेली असल्याने तिच्यामध्ये अतृप्त इच्छांचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी पिंडदान देऊन अन्नाच्या स्वरूपात इच्छांची पूर्ती करण्यात येते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (भाद्रपद शु. द्वादशी, कलियुग वर्ष ५१११ (१.९.२००९))

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

2 thoughts on “दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?”

    • नमस्कार श्रेया जी,

      याविषयी शास्त्रीय संदर्भ मिळाल्यावर इथे तशी माहिती देण्याचा प्रयत्न करू.

      आपली,
      सनातन संस्था

      Reply

Leave a Comment