सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग २)

२. श्रीकृष्णाप्रमाणे मधुराधिपती, जगन्माता,
जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांची मधुर आठवण

balak_bhav_2_C25_b

२ अ. चित्राची पार्श्ववभूमी

१. ‘प.पू. डॉक्टरांची प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णाप्रमाणेच मधुर आहे’, अशा आशयाचा परिच्छेद वाचून साधिकेला प.पू. डॉक्टरांच्या मधुर भेटीची आठवण होणे

‘परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये आणि कार्य (संक्षिप्त ओळख)’ हा सनातनचा ग्रंथ वाचत असतांना पुढील परिच्छेद माझ्या वाचनात आला.

‘श्रीकृष्णावर लिहिलेल्या ‘मधुराष्टका’त वर्णन केल्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांचे हसणे, बोलणे, चालणे, बघणे, हालचाली इत्यादी सर्वच मधुर आणि आनंददायी आहेत’, असे त्यात लिहिले आहे. हे वाक्य वाचताक्षणीच अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या वेळी झालेल्या प.पू. डॉक्टरांच्या भेटीची आठवण होऊन मी त्या मधुर आठवणीच्या विश्वात गेले.

२. तामिळनाडू येथून आलेल्या धर्माभिमान्यांची ओळख करून दिल्यावर प.पू. डॉक्टरांनी ‘त्यांना साधना सांगितली नाही का ?’, असे विचारणे आणि त्यांना अपेक्षित असे प्रयत्न करण्यात अपयशी ठरल्याची जाणीव होऊन साधिकेच्या डोळ्यांत अश्रू येणे

तामिळनाडू येथून आलेल्या धर्माभिमान्यांची प.पू. डॉक्टरांशी ओळख करून देत होते. त्यांनी एका धर्माभिमान्याला ‘तुम्ही साधना करण्यास आरंभ केला का ?’, असे विचारले. त्यावर त्याने ‘साधनेविषयी मला काहीही ठाऊक नाही’, असे सांगितले. लगेचच मला प.पू. डॉक्टरांनी मधुर स्वरात गंमतीने विचारले, ‘काय उमाक्का ! तुम्ही त्यांना साधनेविषयी काही सांगितले नाही का ?’ हे शब्द ऐकताक्षणी माझ्या डोळ्यांत अश्रू आले.

प.पू. डॉक्टर मला रागावले यापेक्षा ‘प.पू. डॉक्टरांना अपेक्षित असे प्रयत्न करण्यात मी अत्यंत अपयशी ठरले’, याची मला तीव्रतेने जाणीव झाली. त्या क्षणी ‘माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही’, असे मला वाटले.

(‘अशी संवेदनक्षमता आणि तळमळ किती साधकांत आहे ? या गुणामुळेच सौ. उमाक्का यांची प्रगती जलद होत आहे.’ – (प.पू.) डॉ. आठवले)

३. जगन्माता, जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या सांत्वनपर प्रेमळ आणि मधुर शब्दांमध्ये न अडकता ‘त्यांचे बोल आचरणात आणून साधनेत प्रगती करावी’, यासाठी त्यांनी चित्र काढण्याची प्रेरणा दिल्याचे साधिकेला जाणवणे

सर्वसाधारण आईसुद्धा आपल्या बाळाच्या डोळ्यांतील अश्रूचा एक थेंबही पहाणे सहन करू शकत नाही, तर जगन्माता, जगत्पिता असणारे प.पू. डॉक्टर साधकाच्या डोळ्यांत अश्रू कसे पाहू शकणार ! आपल्या बाळाची अत्यंत काळजी घेणार्‍या, प्रेमळ आईप्रमाणे स्मित करत प.पू. डॉक्टरांनी माझे सांत्वन केले आणि ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका ! तुम्ही सांगितलेच असेल; पण त्यांनी ऐकले नसेल.’’ प.पू. डॉक्टरांचे ते मधुर मधुर शब्द ऐकण्यासाठी मी किती सहस्रावधी वर्षे तप केले असेल, ते ज्ञात नाही, तरीही ‘मी त्या शब्दांमध्ये अडकू नये अन् त्यांचे बोल आचरणात आणून साधनेत प्रगती करावी’, अशी त्यांची इच्छा असल्याने त्यांनी मला हे चित्र काढण्याची प्रेरणा दिली.

भावजागृतीच्या या अनुभू्तीनंतर मी चरित्रातील पुढील परिच्छेद वाचला. त्यात म्हटले आहे, ‘त्यांच्या कृतीतून, बोलण्यातून प्रत्येक साधकाला त्यांच्याशी झालेल्या प्रत्येक भेटीमध्ये काहीतरी नवीन शिकायला मिळते. या सर्व अनुभूतीतले बोलणे, कृती, विचार इत्यादीतील वैशिष्ट्ये लिहिल्यास प्रत्येक आठवड्याला एक नवीन ग्रंथ होईल !’

हे प्रभो, मधुर तुझे बोलणे, मधुर तुझे रागावणे, मधुर तुझे हसणे, मधुराधिपते, अखिलम् मधुरम् !’

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२१.६.२०१३)

२ आ. चित्राचे वैशिष्ट्य

‘स्मरणभक्तीतून, मधुररसातून व्यक्त होणारा कृतज्ञताभाव, बालकभाव, आर्तभाव आणि याचकभाव यांची वाटचाल संपूर्ण समर्पणात्मक शरणागतभावाकडे होत आहे.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

३. श्री शांतादुर्गा आणि श्री रामनाथ या मंदिरांच्या मध्ये सनातनच्या
(रामनाथी) आश्रमाची स्थापना हा निवळ योगायोग नसून भगवान श्रीकृष्णाने
इच्छा अन् संकल्प यांद्वारे धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी स्वतः ते ठिकाण निवडलेले असणे

balak_bhav_2_C26_b

३ अ. चित्र काढण्यामागील पार्श्वभूमी

१. सनातनचा रामनाथी येथील आश्रम म्हणजे साक्षात् भगवान श्रीकृष्णाचा वास असलेले भूलोकातील वैकुंठ !

‘दोन्ही ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशनां’च्या वेळी मी प्रतिदिन श्री शांतादुर्गा मंदिर ते सनातनचा आश्रम आणि सनातनचा आश्रम ते श्री रामनाथ देवस्थान हे अंतर पायी चालत जात असे. सकाळच्या शुद्ध हवेत श्वास घेत चालत असतांना ते वातावरण मला दैवी विश्वात घेऊन जात असे. श्री रामनाथ देवस्थानात जाण्याच्या वाटेत दिव्य सनातनचा आश्रम दिसताक्षणी माझ्या अंगावर रोमांच येऊन ‘मी साक्षात् भगवान श्रीकृष्णाचा वास असलेले भूलोकातील वैकुंठ पहात आहे’, असे वाटायचे.

२. ‘श्री रामनाथ देवस्थानात प्रत्यक्ष भगवान शिव वास्तव्य करत असून तो त्रिशूळाच्या साहाय्याने वाईट शक्तींना नष्ट करून साधकांचे रक्षण करतो’, असे जाणवणे

आश्रमासमोर दिसणारा डोंगर पाहिल्यावर श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर उचललेला गोवर्धन पर्वत डोळ्यांसमोर आला अन् त्याने मला त्याच्या कार्यात सहभागी होण्याची आठवण करून दिली. आश्रमातून घरी (चेन्नईला) जातांना मला जेवढे चैतन्य नेता येईल तेवढे हवेच होते; म्हणून मी दीर्घ श्वास घेऊन हे चैतन्य ग्रहण करायचा प्रयत्न करत श्री रामनाथ देवस्थानाकडे अधिवेशनाच्या कार्यस्थळी निघाले. ‘तिथे प्रत्यक्ष भगवान शिव आपल्या पूर्ण शक्तीसामर्थ्यासह वास्तव्य करत असून तो त्रिशूळाच्या साहाय्याने वाईट शक्तींचा नाश करून साधकांचे रक्षण करतो आणि त्यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरणा देतो’, असे जाणवले.

३. सनातनच्या आश्रमाचे ठिकाण साक्षात् श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी निवडलेले असणे, श्री शांतादुर्गादेवी अन् भगवान शिव वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून साधकांचे रक्षण करून प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्यात साहाय्य करत असणे

श्री शांतादुर्गा आणि श्री रामनाथ या मंदिरांच्या मध्ये सनातनच्या आश्रमाची स्थापना हा निवळ योगायोग नसल्याचे माझ्या लक्षात आले. इच्छा आणि संकल्प यांमुळे भगवान श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी दोन्ही मंदिरांच्या मध्ये असलेले हे ठिकाण वास्तव्यासाठी निवडले आहे. आई शांतादुर्गा मातृवात्सल्याने साधकांची काळजी घेते आणि भगवान शिव वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून साधकांचे रक्षण करतो. अशा प्रकारे देवता प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्यात साहाय्य करतात. आई शांतादुर्गा आणि भगवान शिव (रामनाथ देव) त्यांच्या दिव्य अस्तित्वाने सारे वातावरण पावन करून सनातनच्या आश्रमाच्या स्वरूपात कृष्ण निवासासाठी अनुकूल स्थान करत आहेत. हे भगवंता, तुझ्या चरणकमलात विलीन होण्याची माझी तीव्र तळमळ कधीच शमणार नाही.’

– सौ. उमा रविचंद्रन, चेन्नई (२७.७.२०१३)

(वर दिलेल्या अनुभूती या त्या साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. ‘जसा भाव तसा देव’ या उक्तीप्रमाणे साधकांचा प.पू.डॉक्टरांप्रती तसा भाव असल्याने त्यांना त्या अनुभूती आल्या आहेत. त्या सर्वांना येतीलच असे नाही. – संकलक)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग २) (धर्मसंदेश देणारी श्रीकृष्णाची चित्रे अनुभूतींसह)’

Leave a Comment