साधकांच्या साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी लाभदायक ठरणारा मंत्र

मूषो न शिश्‍ना व्यदन्ति माध्यः स्तोतारं ते शतक्रतो ।
सकृत्सु नो मघवन्निन्द्र मृळयाधा पितेव नो भव ॥
– ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त ३३, ऋचा ३

अर्थ : हे इंद्रा, ज्याप्रमाणे उंदीर सुतांना खातात, त्याप्रमाणे तुझा भक्त होऊनही माझी मनोव्यथा मला खात आहे. धनी इंद्रा, एकदा आमच्यावर कृपा कर. आमचा पितृतुल्य रक्षक हो.

विवरण : ज्याप्रमाणे उंदीर सुतांना कुरतडून नष्ट करतात, तसेच मी साधक असूनही माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझे मन मला सतत व्यथाग्रस्त करते. त्यामुळे माझी साधना योग्य होत नाही. त्याकरता इंद्राला प्रार्थना करावी, माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यापासून माझे रक्षण कर.

साधकाकरता साधनेमध्ये व्यत्यय येत असल्यास हा मंत्र म्हणणे लाभदायक आहे. त्याकरता या मंत्राचा जप केल्यास साधनेमध्ये व्यत्यय येणार नाही. हा मंत्रजप सकाळी, दुपारी आणि सायंकाळी प्रत्येकी १०८ वेळा करावा.

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.