श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग ३)

६. यमुना नदीत भगवान श्रीकृष्णासमवेत जलक्रीडा करणे

balak_bhav_1_C6_b

६ अ. चित्राचे विवरण

‘अमेरिकेत आल्यापासून मी नियमितपणे नयनरम्य अशा ओढ्याजवळच्या एका पाऊलवाटेने फिरायला जाते. (सौ. उमाक्का त्यांच्या अमेरिकास्थित मुलीकडे गेल्या होत्या. – संकलक) सतत श्रीकृष्णाचे अस्तित्व अनुभवता यावे, यासाठी हे चित्र काढण्याची प्रेरणा मला आतून मिळाली. या चित्रात मी प्रत्यक्ष गोकुळात असून गोवर्धन पर्वतानजीक असलेल्या यमुना नदीत मी भगवान श्रीकृष्णासमवेत खेळत आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (११.१०.२०१२)

६ आ. चित्राचे वैशिष्ट्य

‘यमुनारूपी भक्तीसरितेत शुद्ध भावाने सूक्ष्म-देहांसहित स्नान केले, तर सर्व देहांची शुद्धी होऊन देहबुद्धी गळून पडते आणि बाल्यावस्था प्राप्त होते. बालकभावाच्या निर्मळ अंतःकरणातील भक्तीरसात डुंबणार्‍या जीवात्म्यावर प्रसन्न होऊन भगवंत चैतन्यरूपाने प्रगटतो आणि कृपाजलाचे चैतन्यमय तुषार त्याच्यावर उडवून त्याच्या आनंदात सहभागी होतो. अशा प्रकारे बालकभक्ताच्या निर्मळ अंतरंगातील आनंदडोहात भक्तासह भगवंत डुंबत असतो.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

७. श्रीकृष्णासमवेत नृत्य करणे

balak_bhav_1_C7_b

७ अ. चित्राचे विवरण

‘सभोवतीचे लोक, परिस्थिती आणि देहभान हे सर्व विसरून मी माझ्या ईश्वरासमवेत नृत्य करत आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई

७ आ. चित्राचे वैशिष्ट्य – ‘नृत्य आणि पैंजण’ यांचा अतुट संबंध असल्याने केवळ याच चित्रामध्ये साधिकेने बालिकेच्या पायांतील पैंजण अत्यंत स्पष्टपणे रेखाटणे

‘नृत्य आणि पैंजण’ यांचा अतुट संबंध आहे; म्हणून साधिकेने या चित्रात श्रीकृष्णासमवेत नृत्य करणार्‍या बालकभावातील साधिकेच्या पायांत पैंजण दाखवले आहेत. इतर चित्रे पहाता त्यांत पैंजण एवढ्या स्पष्टपणे रेखाटलेले नाहीत. म्हणजेच प्रत्येक चित्र काढतांना भगवंताचा प्रत्येक विचार साधिकेने बारकाईने टिपला असल्याने तिच्याकडून आपोआपच विषयाचे सखोल चिंतन केले जाऊन त्यानुरूप पार्श्वभूमी रेखाटली गेली आहे.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment