रात्रीच्या वेळी पाळावयाचे आचार

अनुक्रमणिका

१. रात्रीच्या वेळी आरशात का पाहू नये ?
२. रात्रीच्या वेळी बोंबा मारू नका किंवा शिटी वाजवू नका !
३. मद्यपान करून नाचगाणी केल्याने होणारे तोटे
४. सुखदायी झोप कशी घ्यावी ?


पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाच्या प्रभावाखाली सध्या भारतीय आणि विशेषकरून युवा पीढी ही रात्रीच्या वेळी करमणूकीसाठी म्हणून मद्यपान करून डान्सबारमध्ये नाचगाण्यात दंग होतांना आपल्याला पहावयास मिळते. या लेखात ते अयोग्य कसे आहे याचे शास्त्रीय विवेचन करण्यात आले आहे; तसेच रात्रीच्या वेळी कोणत्या कृती निषिद्ध आहेत, सुखदायी झोप कशी घ्यावी यांविषयी जाणून घेऊया.

१. रात्रीच्या वेळी आरशात का पाहू नये ?

(आरशातील प्रतिबिंबावर वातावरणातील प्राबल्यदर्शक वाईट शक्ती
लगेचच आक्रमण करू शकत असल्याने रात्रीच्या वेळी आरशात पहाणे निषिद्ध असणे)

‘रात्रीचा काळ हा रज-तमात्मक वायूविजनाला पूरक असल्याने तो सूक्ष्म रज-तमात्मक हालचालींशी आणि वाईट शक्तींच्या सजगतेशी संबंधित असतो. आरशात पडणारे देहाचे प्रतिबिंब हे जास्त प्रमाणात देहातून प्रक्षेपित होणार्‍या जिवाच्या सूक्ष्म-लहरींशी संबंधित असल्याने या प्रतिबिंबावर वातावरणातील प्राबल्यदर्शक वाईट शक्ती लगेचच आक्रमण करू शकतात.

याउलट सकाळच्या वेळी वायूमंडल सात्त्विक लहरींनी युक्त असल्याने आरशात पडलेल्या सूक्ष्म-प्रतिबिंबावर वायूमंडलातील सात्त्विक लहरींच्या साहाय्याने आध्यात्मिक उपाय होऊन स्थूलदेहाला आपोआपच हलकेपणा प्राप्त होतो. त्यामुळे सकाळी आरशात प्रतिबिंब पहाणे लाभदायक, तर तेच प्रतिबिंब रात्रीच्या रज-तमात्मक हालचालींना पूरक असणार्‍या काळात पाहिले, तर त्रासदायक ठरू शकते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, रात्री ७.५०)

१ अ. व्यक्तीच्या आरशातील प्रतिबिंबावर वातावरणातील प्राबल्यदर्शक
वाईट शक्तींनी आक्रमण केल्यास त्याचा व्यक्तीवर काय परिणाम होतो ?

‘प्रतिबिंबातील जिवाशी निगडित लहरी त्याच्या सूक्ष्मदेहाशी जास्त प्रमाणात संबंधित असल्याने वाईट शक्तींच्या आक्रमणाचा जास्त प्रमाणात परिणाम जिवाला वाईट शक्तींचा आध्यात्मिक स्तरावर त्रास होण्यात होऊ शकतो. या आक्रमणाने जिवाचे शरीर आणि मन यांवर परिणाम होऊन प्राणशक्ती घटणे, थकवा येणे, अस्वस्थता जाणवणे, मनात आत्महत्येचे विचार येणे, वाईट शक्तीचा देहात शिरकाव होणे, वाईट शक्तीच्या प्रभावामुळे स्वतःचे अस्तित्व अल्प होणे यांसारख्या आध्यात्मिक त्रासांना जिवाला सामोरे जावे लागू शकते.

१ आ. प्रत्यक्ष व्यक्तीवर आक्रमण करण्यापेक्षा व्यक्तीच्या प्रतिबिंबाच्या
माध्यमातून व्यक्तीवर आक्रमण करणे वाईट शक्तींना जास्त लाभदायक का असते ?

व्यक्तीच्या प्रतिबिंबाच्या माध्यमातून वाईट शक्तींना जिवाचे एक सूक्ष्म-रूपच प्रत्यक्ष दर्शरूपात मिळू शकते. सूक्ष्म-रूपावर आक्रमण केल्यास आक्रमणाचा परिणाम त्या जिवावर दीर्घकाळ टिकू शकतो आणि आक्रमणाचे पडसाद देहावर खोलवर उमटल्याने त्याचा उपयोग करून वाईट शक्तींना जिवाच्या देहातील सूक्ष्म-कोषांत त्रासदायक शक्तीचे स्थान बनवणे सोपे जाऊ शकते. यासाठी स्थूलदेहावर आक्रमण करण्यापेक्षा व्यक्तीच्या प्रतिबिंबातील सूक्ष्म-रूपाचा उपयोग करून घेऊन जिवाला दीर्घकाळ त्रास देणे आणि त्याच्या देहात प्रत्यक्ष शिरकाव करणे वाईट शक्तींना सोपे जाऊ शकते.

१ इ. वाईट शक्तीने व्यक्तीच्या आरशातील प्रतिबिंबाच्या माध्यमातून
व्यक्तीवर आक्रमण करू शकणे आणि प्रत्यक्ष व्यक्तीवर आक्रमण करू शकणे

 

वाईट शक्तीने व्यक्तीवर आक्रमण करणे
प्रत्यक्ष व्यक्तीवर वर्णन आणि त्याचे विविरण व्यक्तीच्या आरशातील
प्रतिबिंबाच्या माध्यमातून
१. आक्रमणाचा स्तर स्थूल सूक्ष्म
२. आक्रमणातील तत्त्व तेज-पृथ्वी तेज-वायू
३. आक्रमणातील
शक्तीचा स्तर
इच्छा-क्रिया क्रिया
४. आक्रमणात सहभागी
होणार्‍या वाईट शक्ती
भुते, पूर्वज वाईट शक्ती
आणि गुलाम मांत्रिक
राक्षस आणि वरिष्ठ
मांत्रिक
५. आक्रमणातील
माध्यम
काळे तंतू आणि काळे गोळे काळा वायू आणि काळ्या लहरी
६. आक्रमणाचा वायूमंडलावर होणारा
परिणाम
वायूमंडलात दुर्गंध पसरणे आणि वातावरण जड होणे वायूमंडलात उष्णता
निर्माण होणे
७. आक्रमणाचा जिवावर
होणारा परिणाम
शारीरिक स्तरावर त्रास
होण्याचे प्रमाण जास्त असणे
शारीरिक, मानसिक आणि
आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर त्रास होणे
८. आक्रमणाशी संबंधित जिवाचा देह स्थूलदेह सूक्ष्मदेह
९. वाईट शक्तींना
होणारी फलप्राप्ती
जिवाच्या बाह्य देहमंडलात,
म्हणजेच स्थूलदेहाच्या बाह्यअंगात काळ्या शक्तीचे स्थान

बनवणे सोपे जाणे आणि या
स्थानाच्या माध्यमातून
त्रासदायक शक्तीच्या
देवाणघेवाणीतून जिवाशी
संपर्क ठेवणे शक्य होणे

जिवाला दीर्घकाळ त्रास
देता येणे आणि देहात
खोलवर काळ्या शक्तीचे
स्थान बनवणे शक्य होणे
अन् देहात शिरकाव करणे
सोपे जाणे’

 

२. रात्रीच्या वेळी बोंबा मारू नका किंवा शिटी वाजवू नका !

‘बोंबा मारणे’ याला मांत्रिकांच्या भाषेत ‘हाकारा’ म्हणतात. अशा पद्धतीचा ध्वनी उत्पन्न करून मांत्रिक कनिष्ठ पातळीच्या गुलाम वाईट शक्तींना बोलावतात आणि अघोरी विधीतून शिटीसारखा ध्वनी उत्पन्न करून कनिष्ठ पातळीच्या वाईट शक्तींतील शक्ती जागृत करून त्यांना वाईट कर्म करण्यास उद्युक्त करतात. म्हणून ‘बोंबा मारणे’ हे तामसिकतेचे, म्हणजेच वाईट शक्तींना आवाहन करण्याचे, तर ‘शिटी वाजवणे’ हे रजोगुणाचे, म्हणजेच वाईट शक्तींतील कार्यशक्तीला जागवण्याचे प्रतीक असल्याने रात्रीच्या रज-तमोगुणी काळात बोंबा मारू नयेत किंवा शिटी वाजवू नये.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १९.२.२००५, दुपारी ३.२१)

३. मद्यपान करून नाचगाणी केल्याने होणारे तोटे

‘रात्रीच्या वेळी करमणूक, आवड किंवा वेळ घालवण्यासाठी म्हणून मद्यपान करून डान्सबारमध्ये (मद्य पीत संगीताच्या तालावर नृत्य करण्याचे ठिकाण) नाचणे आणि गाणी म्हणणे यांमुळे अल्प काळात मोठ्या प्रमाणात तमोगुण वाढून व्यक्तीला वाईट शक्तींचा तीव्र त्रास होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीत वाढलेल्या तमोगुणाचा परिणाम अवतीभोवती आणि घरातील वातावरणावर होऊन वातावरण दूषित होते.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री १०.५०)

४. सुखदायी झोप कशी घ्यावी ?

अ. झोपण्याच्या खोलीत पूर्ण अंधार करू नका.

आ. झोपतांना अंथरुणाभोवती देवतांच्या सात्त्विक नामजपपट्ट्यांचे मंडल करा.

इ. दिवसभरात स्वतःकडून घडलेल्या अपराधांविषयी देवाची क्षमा मागा.

ई. उपास्यदेवतेला प्रार्थना करा, ‘तुझे संरक्षक–कवच माझ्याभोवती सतत असू दे आणि झोपेतही माझा नामजप अखंड चालू राहू दे.’

उ. पूर्व-पश्चिम दिशेने आणि शक्यतो डाव्या कुशीवर झोपा.

ऊ. तिरपे, उताणे, दक्षिणेकडे पाय करून, तसेच अगदी देवासमोर झोपू नका.

याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘दिनचर्येशी संबंधित आचार आणि त्यांमागील शास्त्र’

Leave a Comment