ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव ।

महर्षींनी नाडीवाचन क्रमांक ६५मध्ये साधकांना दिलेली सूचना

AVV_Icon_

 

येणार्‍या आपत्कालाविषयी सतर्क रहा
आणि व्यष्टी साधना वाढवण्याकडे लक्ष द्या !

ईरोड, तमिळनाडू येथे झालेल्या ६५ क्रमांकाच्या नाडीवाचनात महर्षि म्हणतात – गोकुळाष्टमीपर्यंत धर्मप्रसारासाठी नवीन क्षेत्र निवडण्याऐवजी सध्या चालू असलेल्या ठिकाणीच प्रभावीपणे प्रसार करा. या काळात एकमेकांमध्ये संघटन बनवा. संघटित होत असतांना स्व-संरक्षण प्रशिक्षणावर भर द्या. काळ कठीण असल्याने प्रसारकार्य करतांना व्यष्टी साधनेकडे अधिकाधिक लक्ष द्या. अधिकतर आपल्या साधनेविषयी सतर्क रहा. साधनेचे प्रयत्न अखंड रहातील, असे पहा. सत्संग, मार्गदर्शन, आढावा बैठका यांतून साधनेची घडी नीट बसवा. तुम्ही संघटित झाला की, आम्ही (महर्षि) विशिष्ट प्रकारची दैवी शक्ती या काळात तुमच्याकडे प्रक्षेपित करू. यामुळे तुमचे आत्मबळ वाढेल. या आत्मिक शक्तीमुळे येणार्‍या काळातील अनेक संकटे दूर होतील.

 

१. अधिकाधिक जप करणे

आतापर्यंत साधक श्रीकृष्ण किंवा आकाशदेवता यांचा जप करत होते. यापुढे सर्वांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करावा. हे चारही जप क्रमाने केले की, एक जप, अशा प्रकारे हा जप करावा. हा जप करतांना अंगठ्याच्या मुळाशी तर्जनीचे (अंगठ्याच्या बाजूच्या बोटाचे) टोक लावून मुद्रा (आकाशदेवाचा जप करतांना करत होतो तीच मुद्रा) करावी. हा निर्गुणाचा जप असल्याने न्यास दिलेला नाही.

 

Download करा !

पालटलेला जप करतांना काही साधकांचा आरंभी आतून वेगळा जप चालू होतो. त्या वेळी त्यांनी काळानुसार महर्षींनी दिलेला जप प्रयत्नपूर्वक करत राहिल्याने मनावर त्या जपाचा संस्कार होऊन तो जप करणे त्यांना शक्य होईल.

 

२. जय गुरुदेव असे म्हणणे

साधनेत मरगळ आली असेल, तर एकमेकांना भेटतांना किंवा संघटित होतांना केवळ जय गुरुदेव असे म्हणा. यामुळे आकाशातून स्वयं दत्तात्रेय, म्हणजेच त्रिमूर्ती तुमच्याकडे पहातील आणि म्हणतील, हा कोण बरे आमची आठवण काढत आहे ? या जयघोषामुळे देवाचे लक्ष तुमच्याकडे जाईल आणि आपोआपच तुमचे मन आनंदी होईल. तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (१०.३.२०१६, सायं. ५.५६)

 

३. महर्षींनी सांगितलेला जप
आपापल्या प्रकृतीप्रमाणे योग्य त्या चालीत करावा !

1342782166_p-gadgilkaka150
(पू.) डॉ. मुकुल गाडगीळ

सर्व साधकांना आता महर्षींनी सांगितल्याप्रमाणे काळानुसार आवश्यक असणारा ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप करण्यास सांगितले आहे.

 

 

 

 

४. जे संत किंवा ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक समष्टीसाठी नामजप करतात, त्यांनी आता हाच नामजप समष्टीसाठी करावा.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१६)

 

साधकांनो, आध्यात्मिक त्रासासाठी वेगळा जप करा !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

महर्षींनी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जो जप सांगितला आहे, तो समष्टीसाठी आहे. एखाद्याला वाईट शक्तींमुळे त्रास होत असेल, तर व्यष्टीसाठीचा जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे आवश्यक असते. जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे कठीण वाटत असेल, तर यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या सर्वांसाठीचे उपाय यामधील सूचनेप्रमाणे श्रीकृष्णाचा किंवा आकाशदेवाचा नामजप करावा. वाईट शक्तींमुळे होणारा त्रास या नामजपामुळे नियंत्रणात रहात असेल, तर उपायांची वेळ सोडून अन्य वेळेत महर्षींनी सांगितलेला नामजप करावा. वाईट शक्तींमुळे होणारा त्रास नियंत्रणात रहात नसेल, तर दिवसभर उपायांचाच नामजप करावा.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

महर्षींनी समष्टीसाठी सांगितलेल्या नामजपाचा
आम्हाला कळलेला अर्थ आणि जाणवलेला कार्यकारणभाव

महर्षींनी आता समष्टीसाठी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा नामजप करण्यास सांगितले आहे. या सर्वांचे कळलेले अर्थ पुढीलप्रमाणे आहेत.

१. ॐ निसर्गदेवो भव ।

pu_anjali_gadgil
पू. (सौ.) अंजली गाडगीळ

निसर्गच आता आपल्याला येणार्‍या काळात वाचवणार आहे. निसर्गाला देव मानले, तरच आपले रक्षण होणार आहे; कारण विनाशकालात सर्व खेळ पंचमहाभूतांचाच असतो. निसर्ग म्हणजेच पंचमहाभूतांचा अधिपती. त्यालाच शरण गेले, तर जीवनाचे वरदान आपल्याला आपोआपच लाभणार आहे.

२. ॐ वेदम् प्रमाणम् ।

वेदांनाच प्रमाण मानले, तरच आपल्याभोवतीचे कवच घट्ट होणार आहे. कार्य करण्यातील आत्मविश्‍वास वाढणार आहे. विश्‍वात वेद हेच एकमेव सत्य आहेत आणि सत्यमेव जयति । या वचनानुसार सत्याच्या ठिकाणी जय आहेच.

वैदिक शक्तीवरच सर्व विश्‍व चालू आहे. वेद हेच ब्रह्मांडाचे चलनवलन आहे. वेदरूपी वैश्‍विक शक्तीलाच प्रमाण मानले, तर आपल्याला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही.

३. हरि ॐ जयमे जयम् ।

असे झाल्यावर निश्‍चितच जय आपलाच आहे.

४. जय गुरुदेव

आणि हा जय तर आपल्याला गुरुदेवांमुळेच (दत्तगुरूंमुळे) मिळणार आहे; म्हणून जोशात आणि आत्यंतिक स्फूर्तीने म्हणूया….. जय गुरुदेव !

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (१५.३.२०१६, सकाळी ७.३५)

 

महर्षींनी साधकांना आपत्काळात
करण्यास सांगितलेल्या जपाचे महत्त्व
आणि तो भावाने कसा करायचा, याविषयी केलेले मार्गदर्शन

महर्षी म्हणतात, ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप अधिकाधिक केल्यावर आम्ही साधकांच्या प्रत्येक त्रासाचे मूळच नष्ट करणार आहोत. अनेक मंत्रजप आहेत; परंतु ज्या नामजपाने देव अधिक आणि लवकर जवळ येतील, तोच जप आम्ही करण्यास सांगितला आहे. हा जप करतांना एखादे मूल जसे आईला आर्ततेने आणि जिव्हाळ्याने हाक मारते, तशीच साद (हाक) देवाला घाला. देव लवकर येईल.

संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (१२.३.२०१६, सायं. ५.५३)

मधल्या बोटाने आपल्या हिरड्या साफ करण्याचे महत्त्व !

आपल्या शरिरातील प्रत्येक दुखण्याची सुरुवात दाताकडे असलेल्या एका नाडीपासूनच होते. त्यामुळे जेवण झाल्यानंतर मधल्या बोटाने आपल्या हिरड्या साफ कराव्यात आणि कोमट पाण्याने चूळ भरून टाकावी.

संदर्भ : नाडीवाचन क्रमांक ६५, १०.३.२०१६

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (१२.३.२०१६, सायं. ६.४९)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Facebooktwittergoogle_plusmail