प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला मंगल भेट !

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचा संक्षिप्त परिचय

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक आणि अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कांची-कामकोटीपिठाचे शंकराचार्य स्वामी श्री जयेंद्र सरस्वती यांच्याकडून अनुग्रह घेतला आहे. प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी धार्मिक ग्रंथांचे सखोल अध्ययन केले असून श्रीमद्‌भगवद्‌गीता, महाभारत, रामायण, ज्ञानेश्‍वरी, दासबोध, योगवशिष्ठ आदी ग्रंथांवर ते देश-विदेशात प्रवचने देण्याचे कार्य करत आहेत.

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज <br/> यांच्याशी चर्चा करतांना प.पू. डॉ. आठवले
प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्याशी चर्चा करतांना प.पू. डॉ. आठवले

रामनाथी, ९ मार्च – अखिल भारतीय संत समितीचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी ९ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. चेतन राजहंस यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र, धर्म आणि आध्यात्मिक संशोधन यांच्या कार्याविषयी परिचय करून दिला.

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना सनातन प्रभात<br/> नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना श्री. चेतन राजहंस
प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती सांगतांना श्री. चेतन राजहंस

सनातन आश्रमाच्या वतीने सनातन प्रभात नियतकालिक समूहाचे माजी संपादक पू. श्री. पृथ्वीराज हजारे यांनी प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. तद्नंतर प.पू. स्वामी गोविंददेव गिरीमहाराज यांनी सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा सन्मान केला.

या प्रसंगी प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, पूर्वी मी प.पू. भक्तराज महाराज (सनातन संस्थेचे प्रेरणास्थान तथा प.पू. डॉ. आठवले यांचे गुरु) यांचे चरित्र वाचले आहे. त्या कार्याचा आज एवढा प्रचंड वटवृक्ष (सनातन संस्था) झाला आहे, हे पाहून आश्‍चर्य वाटले. यावर प.पू. डॉ. आठवले म्हणाले, बाबांचे (प.पू. भक्तराज महाराजांचे) आशीर्वाद असल्यामुळेच हे कार्य चालू आहे.

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की, मी छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या वढू या गावाचे नाव पालटून शंभूतीर्थ हे नाव ठेवले. तेथे आता मसुराश्रमाप्रमाणे घरवापसी केंद्र (धर्मांतरित हिंदूंचे शुद्धीकरण केंद्र) चालू झाले आहे.

या वेळी प.पू. डॉ. आठवले यांनी प.पू. स्वामींना जून मासात होणार्‍या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाचे सस्नेह निमंत्रण दिले. प.पू. स्वामींनी या अधिवेशनाला येण्यास त्वरित सिद्धता दर्शवली.

 

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचे सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार !

१. सनातन ज्या प्रकारे कार्य करत आहे, ते अद्भुत आहे. येथे अध्यात्म आहे आणि राजधर्मही आहे.

२. कुंभमेळ्यात सनातनने केलेली धर्मजागृती संस्मरणीय होती. मी तेथील साधूसंतांना आवर्जून सांगितले, तुम्हाला कार्य करायचे असेल, तर ते सनातनच्या साधकांप्रमाणे करा, तरच क्रांती घडेल.

३. सनातनच्या ग्रंथांमध्ये सुंदरतम विवेचन आहे. त्यांची मांडणी शास्त्रशुद्ध आहे. मी स्वतः अनेक ग्रंथ वाचले आहेत.

४. हिंदु राष्ट्राचे स्फुरण आणि पोषण म्हणजे सनातनचा आश्रम आहे. सनातनच्या कार्यामुळे जुने सर्व जळून जाईल आणि नवीन राष्ट्र उभे राहील.

५. हिंदु राष्ट्राचे कार्य जो कोणी करत असेल, ते मला आपले वाटतात. सनातनचे साधक मला भेटण्यासाठी आल्यानंतर मी त्यांना प्रथम भेटण्यास प्राधान्य देतो.

 

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचे प.पू. डॉ. आठवले यांच्याविषयी गौरवोद्गार !

१. तुम्ही (प.पू. डॉ. आठवले) ऋषीवर आहात. अनेक वर्षांपासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. तुमची भेट झाल्याने मला पुष्कळ आनंद झाला.

२. तुम्ही देवाचे प्रेषित आहात. आज देव, देश आणि धर्म यांसाठी जशा व्यक्तीची आवश्यकता होती, ती तुमच्या रूपाने पूर्ण झाली आहे; म्हणूनच या कार्यासाठी देवाने तुम्हाला पाठवले आहे. तुम्ही जे कार्य केले आहे, तसेच साधकांना तुम्ही ज्या पद्धतीने घडवले आहे, हे सर्व अतुलनीय आहे.

३. तुम्ही दोन-तीन जन्मांत करावयाचे कार्य एकाच जन्मात करत आहात. तुम्ही करत असलेल्या कार्यासारखे कार्य भारतभरात चहुबाजूंनी व्हायला हवे !

Leave a Comment