दैवी कणांचे वैज्ञानिक दृष्टीकोनातून केलेले संशोधन
आणि यापुढील संशोधन करण्याचे वैज्ञानिकांना आवाहन

अध्यात्माचा विज्ञानाद्वारे कस न लावताच अध्यात्माला
खोटे ठरवणारे असतात तथाकथित पुरोगामी, तर अध्यात्म
विज्ञानाच्या पद्धतीने मांडणारी सनातन संस्था आहे खरी पुरोगामी !

 प.पू. डॉ. आठवले यांच्या हातावर प्रथम दिसलेले दैवी कण (वर्तुळात)

प.पू. डॉ. आठवले यांच्या हातावर प्रथम दिसलेले दैवी कण (वर्तुळात)

५ जुलै २०१२ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्परगुरु प.पू. डॉ. आठवले यांच्या हाताच्या त्वचेवरील सोनेरी दैवी कण त्यांनी हाताची त्वचा चोळल्यावर अलग होऊन खाली पडले आणि ते गोळा करता आले. त्यामुळे नाविन्यपूर्ण अशा दैवी कणांचा शोध लागला. त्यानंतर दुसर्‍या दिवसापासून प.पू. डॉ. आठवले रहात असलेल्या गोव्यातील रामनाथी येथील आश्रमातील साधकांना आणि मग काही दिवसांत ते आठवड्यांत भारतातील, तसेच सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या जगभरातील साधकांना दैवी कण मिळू लागले. हे दैवी कण त्यांना त्यांचे शरीर, वस्तू आणि ते वास्तव्य करत असलेले ठिकाण येथे मिळू लागले. ते चंदेरी, सोनेरी आणि इतर रंगांचेही होते.

जसे एखाद्याची मनोभावे चाकरी किंवा सेवा केली की, तो प्रसन्न होऊन आपल्याला भेटस्वरूप काहीतरी देतो, तसे ईश्‍वराचेही आहे. ईश्‍वरप्राप्तीसाठी मनोभावे साधना केली की, ईश्‍वराकडून काही ना काही लाभ होतोच. याचीच प्रत्यक्ष साक्ष दैवी कणांच्या रूपात साधकांना मिळत आहे. साधक गेली १० ते १५ वर्षे सातत्याने साधना करत आहेत. साधकांनी भावजागृतीसाठी प्रयत्न केले, तळमळीने साधना केली, तेव्हा त्यांना दैवी कण मिळाले. तसेच ईश्‍वर भक्तांचा कैवारी आहे. साधकांना साधना करतांना जेव्हा शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रास होतात, तेव्हा त्यांना दैवी कण मिळतात आणि त्यांचे ते त्रास ईश्‍वरकृपेमुळे दूर होतात. हे झाले दैवी कणांविषयीचे संक्षिप्त अध्यात्मशास्त्र.

साधकांना मिळत असलेल्या कणांना दैवी कण का म्हटले आहे ?, असा प्रश्‍न कोणाच्याही मनात येईल. याचे उत्तर असे की, या कणांमुळे साधकांना येथे दिल्याप्रमाणे चांगले अनुभव आले आहेत. हे कण कधी निर्माण होणार ? त्यांची निर्माण होण्याची प्रक्रिया काय ?, हे साधकांना समजत नाही. ते ईश्‍वराच्या इच्छेने निर्माण होतात आणि ते कणांच्या रूपात असतात; म्हणून त्यांना दैवी कण म्हटले आहे. बिग बँग नावाचा महाप्रयोग करणार्‍या स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांना सापडलेल्या कणांचा उल्लेख हिग्स-बोसॉनचे गॉड पार्टिकल, म्हणजे हिग्स-बोसॉनचे देव कण, असा केला जात आहे. त्याप्रमाणेच साधकांना मिळत असलेल्या कणांचा उल्लेख आम्ही दैवी कण असा करत आहोत.

दैवी कण मिळणे, ही सध्याच्या मानवजातीसाठी नाविन्यपूर्ण घटना असल्यामुळे दैवी कण म्हणजे नेमके काय आहे ?, याचा सनातनने वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही अभ्यास करायचे ठरवले. याकरता ते चाचण्यांसाठी मुंबई येथील भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बी.ए.आर्.सी.) आणि आय.आय.टी. या नामांकित संस्थांना पाठवले. तसेच आणखी कोणत्या तंत्रज्ञानाने दैवी कणांचे गुणधर्म शोधणे शक्य आहे, याचा शोध घेतला. त्यासाठी विविध ठिकाणच्या वैज्ञानिकांना दैवी कण दाखवून त्यांना ते संशोधनासाठी दिले. यातून दैवी कणांची जी काही माहिती मिळाली, ती येथे देत आहोत.

१. वैज्ञानिक संस्थांनी दिलेले अहवाल


१ अ. एक प्रयोगशाळा

१. १०० पट आकार दिसणार्‍या सूक्ष्मदर्शक यंत्रातून बघितल्यावर असे लक्षात आले की, सर्व रंगांचे दैवी कण षट्कोनी या आकाराचे आहेत. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

२. दैवी कण अ‍ॅक्वारेजिया या आम्लामध्ये २४ घंटे ठेवल्यावरही विरघळत नाहीत. (धातू अ‍ॅक्वारेजियामध्ये विरघळतात.) याचा अर्थ दैवी कणांमध्ये कोणताही सर्वसामान्यपणे आढळणारा धातू नाही.

१ आ. भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र (बी.ए.आर्.सी.), मुंबई


एनर्जी डिस्पर्सिव्ह एक्स-रे फ्ल्यूरोसन्स (Energy Dispersive X-Ray Fluorescence) या पद्धतीने केलेल्या पृथक्करणात आढळले की,

१. दैवी कणांमध्ये सोने किंवा चांदी हे धातू नाहीत.

२. दैवी कणांमध्ये इतर कोणतेही धातू नाहीत.

१ इ. आय.आय.टी., मुंबई


एनर्जी डिस्पर्सिव्ह स्पेक्ट्रोस्कोपी (Energy Dispersive Spectroscopy) या पद्धतीने केलेल्या पृथक्करणात प्रत्येक रंगाच्या दैवी कणात केवळ कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्ये असून त्यांचे प्रमाण किती, हे शोधले गेले. आय.आय.टी.ने दिलेल्या अहवालाद्वारे विविध रंगांच्या दैवी कणांची रासायनिक सूत्रे (फॉर्म्यूले) बनवण्यात आली आणि ती पुढीलप्रमाणे आहेत.


या सूत्रांचा अर्थ याप्रमाणे आहे. C3NO म्हणजे यात कार्बनचे ३ अणू, नायट्रोजनचा १ अणू आणि ऑक्सिजनचा १ अणू आहे. याप्रमाणे इतरही सूत्रांचा अर्थ आहे. दैवी कणांच्या चाचणीतून मिळालेली ही सूत्रे सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या सूत्रांशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे दैवी कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते.

२. सनातन संस्थेच्या सत्संगाच्या ठिकाणी सत्संग
चालू होण्यापूर्वी, चालू झाल्यावर आणि संपल्यावर तेथील वातावरणातील
दैवी कणांचा आणि वायूजैवघटकांचा(एअरोबायोकाँपोनंट्सचा) एका महाविद्यालयाने केलेला अभ्यास


पुणे येथील भारती विद्यापिठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या संशोधन केंद्राद्वारे २४ ते २६ नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सनातन संस्थेच्या सत्संगाच्या वेळी व्हॉल्युमेट्रिक टिळक एअर सँपलर या यंत्राद्वारे हवेचे नमुने घेतले गेले. सत्संगाच्या सात्त्विकतेमुळे तेथील वातावरणात काय पालट होतात, हे सत्संग चालू होण्यापूर्वी, चालू झाल्यानंतर आणि संपल्यावर पुढील २ दिवस हवेचे नमुने घेऊन बघितले. त्या सत्संगाच्या वेळी भूमीवर आणि साधकांच्या अंगावर असंख्य दैवी कण मिळाले. त्या वेळी त्या यंत्रानेही वातावरणात दैवी कण असल्याचे दाखवले आणि त्यांची वैशिष्ट्ये नमूद केली. ती पुढीलप्रमाणे आहेत.

२ अ. हवेतील दैवी कणांचे रंग, मिळण्याचे प्रमाण (टक्के) आणि लांब


२ आ. हवेतील दैवी कणांचा आकार

त्रिकोणी, चौकोनी आणि आयताकृती

३. दैवी कणांची आर्.एफ्.आय. रीडींग उपकरण आणि पिप तंत्रज्ञान यांद्वारे केलेली चाचणी

३ अ. आर्.एफ्.आय. रीडींग उपकरण आणि पिप तंत्रज्ञान यांची ओळख

आर्.एफ्.आय. (रेझोनेन्ट फिल्ड इमेजिंग) रीडींग उपकरणाच्या साहाय्याने आपण वातावरणातील वैश्‍विक ऊर्जा मोजू शकतो, तर पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूभोवती असणार्‍या स्पंदनांची गती, तसेच त्या वस्तूची रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय उपकरणाला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्यात असलेल्या वेगवेगळ्या फिल्टरद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जावलये पहाता येतात. हे उपकरण रंगांचे विभाजन करते. यात सकारात्मक आणि नकारात्मक रंग त्यांच्या क्षमतेनुसार दिसण्याची सोय आहे. पिप प्रणालीनुसार नारिंगी आणि जांभळा रंग तणावाची किंवा त्रासदायक स्पंदने यांचे प्रतीक आहे. गुलाबी रंग राजसिकतेचे प्रतीक आहे. हिरवा रंग आध्यात्मिक उपायांशी (हीलिंग पॉवरशी) संबंधित सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे, तर निळा रंग सात्त्विकता किंवा शांती यांचे प्रतीक आहे.

३ आ. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण


– श्री. संतोष शामराव जोशी (वैश्‍विक ऊर्जा संशोधक, सर्वाश्रम वैश्‍विक आध्यात्मिक ऊर्जा संशोधन केंद्र, पुणे) (१९.११.२०१२)

३ इ. निष्कर्ष


दैवी कणांमुळे मानसिक स्तरावरील लाभ होतातच, तसेच आध्यात्मिक उपाय होणे, आनंद मिळणे, कल्याण होणे, मारक शक्ती मिळणे, असे आध्यात्मिक स्तरावरील लाभही होतात. सोनेरी दैवी कण आध्यात्मिक उपाय करणारे आहेत. चंदेरी दैवी कण आनंद देणारे आहेत. तपकिरी दैवी कण क्रियाशिलता वाढवणारे आहेत. हिरवे दैवी कण कल्याणकारी आहेत. लाल दैवी कण मारक शक्ती देणारे आहेत. गुलाबी दैवी कण प्रीती दर्शवणारे आहेत, ही दैवी कणांची गुणवैशिष्ट्ये आर्.एफ्.आय. नोंदींतून मिळाली.

४. दैवी कण मिळण्याचा सांख्यिकी विश्‍लेषणाद्वारे केलेला अभ्यास

५.७.२०१२ या दिवसापासून साधकांना दैवी कण मिळू लागले; म्हणून ५ जुलै ते ३१ जुलै या कालावधीतील माहिती या अभ्यासासाठी प्रातिनिधिक स्वरूपात घेतली आहे. या कालावधीत कोणाला किती दैवी कण मिळाले ? ते कुठे मिळाले ? केव्हा मिळाले ? त्या कणांचा रंग कोणता ? इत्यादी माहिती साधकांकडून गोळा केली आणि त्याद्वारे पुढील निष्कर्ष काढले.

४ अ. विविध देशांत सापडलेल्या दैवी कणांची संख्या

भारतात दैवी कण मिळू लागल्यानंतर ५ व्या दिवसापासून विदेशात युरोपमध्ये दैवी कण मिळण्यास आरंभ झाला. त्यानंतर १० दिवसांत दुबई, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका अशा सर्व ठिकाणच्या साधकांना असंख्य दैवी कण मिळू लागले.

४ आ. भारतातील विविध राज्यांत सापडलेल्या दैवी कणांची संख्या

गोव्यातील साधकांना दैवी कण प्रथम मिळाल्यानंतर त्याच्या दुसर्‍या दिवशी महाराष्ट्रातील साधकांना दैवी कण मिळाले. पुढील १० दिवसांत गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू, झारखंड, उत्तरप्रदेश, ओडिशा, बिहार, मध्यप्रदेश आणि हरियाणा या १२ राज्यांमधील साधकांना असंख्य दैवी कण मिळू लागले.

४ इ. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत सापडलेल्या दैवी कणांची आणि साधकांची संख्या

१. महाराष्ट्रातील एकूण ३४ जिल्ह्यांपैकी २२ जिल्ह्यांतील साधकांना दैवी कण मिळाले. इतर जिल्ह्यांमध्ये साधकांचे वास्तव्य नाही.

२. प्रतिदिन १२ ते १७ जिल्ह्यांतील साधकांना दैवी कण मिळाले आणि ते असंख्य होते.

३. महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील साधकसंख्येच्या अधिकतम १५ टक्के साधकांना दैवी कण मिळाले. एकूण शेकडो साधकांना दैवी कण मिळाले.

४ ई. दैवी कण

गोव्यातील साधकसंख्येच्या ७.७ टक्के साधकांना दैवी कण मिळाले.

४ उ. आश्रम आणि सेवाकेंद्रे

गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात प.पू. डॉ. आठवले यांचे वास्तव्य असल्याने तेथे सर्वप्रथम दैवी कण मिळू लागले आणि त्यानंतर काही दिवसांनी भारतभरातील सनातनचे इतर आश्रम अन् सेवाकेंद्रे येथे कण मिळू लागले. अजूनही साधकांना दैवी कण मिळत आहेत.

५. वायूजीवशास्त्रज्ञांच्या (एअरोबायॉलॉजीच्या) अखिल
भारतीय परिषदेत दैवी कणांविषयीचे संशोधन मांडण्यात येणे


दिनांक १४ ते १६ डिसेंबर २०१२ या कालावधीत पुणे येथे इंडियन एअरोबायॉलॉजीकल सोसायटीची १७ वी अखिल भारतीय परिषद झाली. ही परिषद महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एम्.आय.टी.च्या) विवेकानंद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये सनातनच्या साधकांना मिळणार्‍या नाविन्यपूर्ण दैवी कणांविषयीचे केलेले संशोधन सौ. अंजली गाडगीळ यांनी भारतातील वायूजीवशास्त्र (एअरोबायॉलॉजी) विभागाच्या मान्यताप्राप्त वैज्ञानिकांसमोर मांडले. सनातन संस्थेच्या साधकांना ईश्‍वराच्या कृपेने दैवी कण मिळत आहेत. दैवी कण मिळणे, ही मानवजातीला सर्वप्रथम प्रत्ययाला आलेली घटना आहे. हे दैवी कण सर्व समाजासाठी किंबहुना संपूर्ण पृथ्वीतलासाठी कसे लाभदायक आहेत, हेही या संशोधनाच्या प्रस्तुतीकरणात स्पष्ट करण्यात आले. प.पू. डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हे संशोधन करण्यात आले. देशभरातून आलेल्या विविध क्षेत्रांतील १२५ हून अधिक वैज्ञानिकांसमोर मांडण्यात आलेले हे संशोधन सर्वांच्या उत्सुकतेचा विषय बनले. साधकांना मिळालेले दैवी कण त्यांना प्रत्यक्ष दाखवण्यातही आले.

६. अमेरिकेतील एका भारतीय वैज्ञानिकाने दैवी कणांच्या निर्मितीविषयी केलेले विचारमंथन !

४.१.२०१३ या दिवशी दैवी कणांविषयीची माहिती सनातन संस्थेने भारतात ३ ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन भारतातील लोकांसमोर उघड केली, तसेच पुण्यामध्ये वायूजीवशास्त्रज्ञांच्या (एअरोबायॉलॉजीच्या) अखिल भारतीय परिषदेत (कॉन्फरन्समध्ये) वैज्ञानिकांसमोर मांडली. त्यानंतर भारतातील एकाही वैज्ञानिकाने दैवी कणांविषयी चिंतन करून त्यांची निर्मिती किंवा वैशिष्ट्ये यांविषयी काही लिहिण्याचा प्रयत्न केला नाही.

याउलट अमेरिकेत लुइविल (Louisville) येथे असलेले वैज्ञानिक प्रा. प्रदीप देशपांडे पुणे येथे आले असतांना त्यांना हे दैवी कण दाखवल्यावर त्यांनी ते संशोधनासाठी मागून घेतले. प्रा. प्रदीप देशपांडे हे लुइविल येथील एमीरेट्स ऑफ केमिकल इंजिनिअरींग या विद्यापिठात प्राध्यापक आहेत, तसेच ते सिक्स सिग्मा अँड अ‍ॅडव्हांस्ड् कंट्रोल्स या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

त्यांनी अमेरिकेत परतल्यावर दैवी कणांवर इतर वैज्ञानिकांच्या साहाय्याने संशोधन करून दोन लेख लिहिले, हे कौतुकास्पद आहे. तसेच ते लेख प.पू. डॉ. आठवले यांच्याकडे पाठवून त्यांना त्या लेखांमध्ये काही सुधारणा असल्यास सांगण्याची आणि लेखांविषयी अभिप्राय देण्याची विनंती केली. यामधून त्यांची जिज्ञासा आणि विनम्रता दिसून येते. जिज्ञासेमुळेच त्यांनी सनातन संस्था करत असलेले अध्यात्माविषयीचे संशोधन जाणून घेण्यासाठी तिच्या गोव्यातील रामनाथी येथील आश्रमालाही भेट देण्याचे ठरवले आहे. त्यांनी दैवी कणांविषयी लिहिलेल्या दोन लेखांपैकी एक लेख जर्नल ऑफ कॉन्शस्नेस् एक्स्प्लोरेशन अँड रिसर्च (Journal of Consciousness Exploration & research) (एप्रिल २०१३) या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. दुसरा लेख अजून दुसर्‍या एका नियतकालिकात प्रसिद्ध व्हायचा आहे. या लेखांपैकी पहिल्या लेखामध्ये प्रो. प्रदीप देशपांडे यांनी प.पू. डॉ. आठवले यांच्या त्वचेवर दैवी कण निर्माण होण्याविषयी आणि प.पू. डॉ. आठवले यांच्यामुळे साधकांना दैवी कण मिळण्याविषयी पुढील वैज्ञानिक तत्त्व मांडले आहे.

६ अ. प.पू. डॉ. आठवले यांच्यामुळे साधकांना मिळत असलेल्या
दैवी कणांसंदर्भात भौतिकशास्त्रातील अनुकंपित (रेझोनन्स) स्थितीत असणे
(स्टोकॅस्टिक रेझोनन्स) या सिद्धांताच्या आधारे मांडलेली दैवी कणांच्या निर्मितीची प्रक्रिया

डॉ. आठवले यांनी साधना करून अध्यात्मातील एक उच्च अवस्था प्राप्त केली आहे. एखादी व्यक्ती (साधक) जेव्हा सर्वोत्कृष्ट आंतरिक स्थिती, म्हणजेच साधनेतील उच्च स्तर प्राप्त करते, तेव्हा ती अधिकाधिक ध्यानमग्न अवस्थेत असते. त्या वेळी देहात पंचतत्त्वांकडून (पंचमहाभूतांकडून) शक्ती किंवा स्पंदने आकृष्ट होऊन ती देहातून वहातात आणि जैवऊर्जेच्या प्रभावळीच्या (बायो-एनर्जी फिल्डच्या) स्वरूपात ती देहाभोवती प्रक्षेपित होतात. जैवऊर्जेची ही प्रभावळ हळूहळू विसर्जित होऊन व्यक्तीच्या देहाभोवती, तसेच तिच्या सभोवतालच्या वातावरणात असलेल्या वैश्‍विक स्पंदनांचाच (शक्तीचाच) एक भाग बनते. या स्पंदनांचे (शक्तीचे) घनीकरण होऊन अतिशय सूक्ष्म असे दैवी कण तयार होतात.

डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या साधकांची अशी श्रद्धा आहे की, साधकांना स्वतःला मिळणारे विविध रंगांचे दैवी कण त्यांच्या साधनेच्या स्थितीवर किंवा आध्यात्मिक स्तरावर अवलंबून असतात. अनुकंपित (रेझोनन्स) स्थितीत असणे (स्टोकॅस्टिक रेझोनन्स, म्हणजे कंप पावणार्‍या दोन वस्तूंची वारंवारता (फ्रिक्वेंसी) एकच असते, तेव्हा त्या दोन्ही वस्तू अनुकंपित (रेझोनन्स) स्थितीत असतात.) या भौतिकशास्त्रातील सिद्धांताच्या आधारे आपणास विविध रंगांचे दैवी कण तयार (सिद्ध) होण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी साहाय्य होईल. साधक डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असल्यामुळे ते डॉ. आठवले यांच्याभोवती असलेल्या वैश्‍विक स्पंदनांच्या प्रभावळीच्या कार्यक्षेत्रात असतात, असे गृहीत धरणे संयुक्तिक होईल. त्यामुळे डॉ. आठवले यांच्या स्पंदनांची वारंवारता (फ्रिक्वेंसी) आणि त्यांच्या साधकांच्या स्पंदनांची वारंवारता (फ्रिक्वेंसी) एकसारखी होत असल्यामुळे ते दोघेही (डॉ. आठवले आणि साधक) अनुकंपित (रेझोनन्स) स्थितीत येतात. असे असले, तरी प्रत्येक साधकाची साधना आणि त्याचा आध्यात्मिक स्तर भिन्न अन् डॉ. आठवले यांच्यापेक्षा न्यून स्तराचा असल्यामुळे डॉ. आठवले यांच्याभोवती असलेली जैविक ऊर्जेची प्रभावळ आणि साधकांभोवती असलेली जैविक ऊर्जेची प्रभावळ यांमध्ये भेद आढळतो. परिणामतः साधकांच्या देहातील जीवशास्त्रीय (बायॉलॉजिकल) आणि शरीरक्रियाशास्त्रीय (फिजिओलॉजिकल) व्यवस्था (संस्था) डॉ. आठवले यांच्याकडून येणार्‍या अतिरिक्त शक्तीचा स्वीकार करत नाहीत. त्यामुळे साधकांच्या स्तरानुसार त्यांच्यातील स्पंदने डॉ. आठवले यांच्या स्पंदनांशी जेवढ्या प्रमाणात जुळतात, तेवढ्या स्पंदनांचे (त्या रंगाचे) दैवी कण साधकांना मिळतात. साधकांची योग्य साधना आणि त्यांनी डॉ. आठवले यांच्या प्रभावळीच्या क्षेत्रात असणे, यांमुळे अनुकंपित (रेझोनन्स) प्रक्रिया अधिकाधिक प्रमाणात घडण्याची संभाव्यता असते, असे वाटते. अर्थात अशा संकल्पनांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची, तसेच नियोजनबद्धरित्या प्रयोग करण्याची आवश्यकता आहे.

(संदर्भ : प्रदीप बी. देशपांडे, महेंद्र संकारा आणि भास्कर डी. कुलकर्णी; पॉवर ऑफ मेडिटेशन : मटीरिअ‍ॅलायझेशन ऑफ एनर्जी/इंटेंशनस् (Power of Meditation: Materialization of Energy / Intentions); जर्नल ऑफ कॉन्शस्नेस् एक्स्प्लोअरेशन अँड रिसर्च, पुस्तक (व्हॉल्यूम) ४, भाग ४, एप्रिल २०१३)

७. ऊर्जेपासून अणूनिर्मितीची विश्‍वातील पहिली घटना म्हणजे दैवी कणांची निर्मिती !

७ अ. आईन्स्टाइनने शोधून काढलेल्या समीकरणामुळे (फॉर्मुल्यामुळे) शास्त्रज्ञांनी
द्रव्यापासून आण्विक ऊर्जा निर्माण करणारी आणि विविध क्षेत्रांत उपयोगी पडणारी यंत्रे निर्माण करणे

आइन्स्टाईनने E =mC2 हे समीकरण (फॉर्मुला) शोधून काढल्यानंतर द्रव्याच्या वस्तूमानाप्रमाणे कोणत्या द्रव्याच्या विशिष्ट वजनापासून किती ऊर्जा मिळेल, हे शास्त्रज्ञांना ठाऊक झाले. त्यावर पुढे संशोधन करून शास्त्रज्ञांनी द्रव्यापासून आण्विक ऊर्जा निर्माण करणारी आणि विविध क्षेत्रांत उपयोगी पडणारी यंत्रे निर्माण केली. त्यामुळे सध्या पेट्रोल आणि वीज या ऊर्जांवर चालणारी ९० टक्के यंत्रे पेट्रोलचा साठा संपल्यावर अन् वीज निर्माण करण्यास मर्यादा येत असल्याने भविष्यात ऊर्जेपासून मानवी जीवन कसे सुसह्य होईल ?, हा प्रश्‍न सुटला आहे. भविष्यामध्ये ९० टक्के व्यवहार आण्विक ऊर्जेमुळे चालतील.

७ आ. द्रव्यापासून ऊर्जा निर्माण करण्यात बरीच प्रगती झाली असली, तरी
अजूनपर्यंत जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत ऊर्जेचे अणूत रूपांतर करता आलेले नसणे

द्रव्यापासून ऊर्जा निर्माण करण्यात बरीच प्रगती झाली असली, उदा. हायड्रोजनच्या अणूंपासून हायड्रोजन बाँब निर्माण करता आला असला, तरी अजूनपर्यंत जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत ऊर्जेचे अणूत रूपांतर करता आलेले नाही, उदा. ऊर्जेपासून हायड्रोजन किंवा इतर कोणत्याही द्रव्याचे कण निर्माण करता आलेले नाहीत.

७ इ. प्रयोगशाळेत ऊर्जेपासून द्रव्याचे कण मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नसल्याने
दैवी कणांची निर्मिती ही ऊर्जेपासून अणूच्या निर्मितीची विश्‍वातील पहिलीच घटना असणे


विश्‍वाच्या उत्पत्तीच्या सर्वमान्य सिद्धांताप्रमाणे (big bang theory प्रमाणे) प्रथम प्रचंड स्फोट होऊन त्यातून प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेपासून विश्‍वातील सर्व ग्रह आणि तारे निर्माण झाले, म्हणजे ऊर्जेपासून अणू असलेली सर्व मूलद्रव्ये (elements) निर्माण झाली. सतत प्रसरण पावत असलेल्या विश्‍वात ऊर्जेपासून सतत नवीन तारे निर्माण होत असतात. तरीही अजून प्रयोगशाळेत ऊर्जेपासून द्रव्याचे कण मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश आलेले नाही किंवा त्यांनी तसे प्रयत्न केलेले नाहीत; म्हणून दैवी कणांची निर्मिती ही ऊर्जेपासून अणूच्या निर्मितीची विश्‍वातील पहिलीच घटना आहे

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले, चेंबूर, मुंबई. (२४.२.२०१३)

दैवी कण मिळण्यासारख्या बुद्धीअगम्य घटनेच्या
संदर्भातील संशोधनाला साहाय्य करण्याची वैज्ञानिकांना विनंती !

दैवी कण मिळणे, ही बुद्धीअगम्य घटना आहे. साधनेच्या प्रवासात साधक अशा अनेक बुद्धीअगम्य घटना घडलेल्या अनुभवत आहेत. त्यांविषयीचे शक्य तेवढे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करण्याचा प्रयत्न सनातन संस्था करत आहे. दैवी कणांसंदर्भात आतापर्यंत या लेखात दिल्याप्रमाणे संशोधन झालेले आहे. दैवी कणांचे यापुढील संशोधन करण्याची विनंती आम्ही शास्त्रज्ञांना करत आहोत. तसेच दैवी कणांतील घटकांचे विश्‍लेषण पूर्ण झाल्यावर दैवी कण बनवताही आले की, निर्मितीची प्रक्रियाही कळल्याने दैवी कणांविषयी संशोधन पूर्ण झाले, असे म्हणता येईल. हे संशोधन करण्यासाठीही आम्ही वैज्ञानिकांना विनंती करत आहोत. यासंदर्भात वैज्ञानिकांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ राहू.

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(संपर्क : (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, ई-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक 'सनातन प्रभात'

Leave a Comment