हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

Anup_Sardesai
(डावीकडून) श्री. अनुप सरदेसाई यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे श्री. महावीर श्रीश्रीमाळ 

     रामनाथी (गोवा) – हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्याचा परिचय करून दिला. या वेळी श्री. सरदेसाई म्हणाले, सनातनचे कार्य अतिशय चांगले आहे. या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.

श्री. अनुप सरदेसाई यांचा परिचय

    गोवा येथील श्री. अनुप सरदेसाई हे सरदेसाई ग्रूपचे प्रमुख आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांनी अभियंता म्हणून सेवा बजावली आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी या लेखनास आरंभ केला. गेली ५ वर्षे देशातील धार्मिकदृष्ट्या राजकीय समस्यांचा त्यांनी प्रदीर्घ अभ्यास केला आहे. त्यांनी नथुराम गोडसे-स्टोरी ऑफ अ‍ॅन असॅसिन (नथुराम गोडसे-वधाची कथा) आणि महात्माज ब्लंडर्स-व्हाय डिड गोडसे किल गांधी ? (महात्म्याची घोडचूक – गोडसे यांनी गांधींना का मारले ?) ही पुस्तके लिहून पं. नथुराम गोडसे यांची सकारात्मक बाजू जगासमोर आणली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात