सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात झालेला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट

audumbar_sanatan_ashram
रामनाथी आश्रमाच्या ध्यानमंदिराच्या जवळ आणि यज्ञकुंडापासून १ – २ मीटर अंतरावर औदुंबराची रोपे जवळजवळ उगवली आहेत. (औदुंबराची रोपे गोलात मोठी करून दाखवली आहेत.)

‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करण्यास आरंभ केल्यापासूनच्या सनातन आश्रमाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे उगवणे आणि ही रोपे म्हणजे प.पू. डॉक्टरांच्या भोवती संरक्षक कवच निर्माण झाल्याचे द्योतक असल्याचे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगणे

“गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात १७ सप्टेंबर २०१५ पासून प्रतिदिन २० साधक सकाळ-सायंकाळ प्रत्येक वेळी दीड घंटा ‘दत्तमाला मंत्र’ म्हणत आहेत. हे पठण चालू केल्यापासून पठण करत असलेल्या जागेपासून काही अंतरावर आश्रमाच्या मोकळ्या जागेत औदुंबराची ५८ रोपे उगवली आहेत. हे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांना सांगितले आणि त्यांना त्या रोपांचे छायाचित्रही दाखवले. तेव्हा योगतज्ञ दादाजी म्हणाले, हे ऐकून पुष्कळ आनंद झाला. हे प.पू. डॉक्टरांच्या भोवती संरक्षक कवचाचे वलय निर्माण झाले आहे.”

– श्री. अतुल पवार, नाशिक

 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे
दत्तमाला मंत्रजप केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या
आश्रम परिसरात औदुंबराची रोपे उगवण्यामागील कारणमीमांसा

Dr_Ajay_Joshi
डॉ. अजय जोशी

देवाने ही चराचर सृष्टी निर्माण केली. मनुष्य, प्राणी, पक्षी आणि झाडे-झुडपे यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी वनामध्ये रहायचे. वनातील वनस्पतींचे, फुलांचे आणि झाडांचे महत्त्व त्यांनी ओळखले. माणसाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगराई दूर होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या वनौषधी निर्माण केल्या.

भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष म्हणून संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर ! अनेक प्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेले आहे, या झाडामध्ये त्रिमूर्तींचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा, मध्यभागात विष्णु आणि अग्रभागात शिवाचे अस्तित्व असते. त्यामुळे या झाडाची पूजा करावी, असे सांगितले जाते.

dr_ghole
डॉ. प्रमोद घोळे

ही झाडे हवेमध्ये पुष्कळ जास्त प्रमाणात प्राणवायू (ऑक्सीजन) सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही हे पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचे झाड आहे. अशा देववृक्षांनी पुष्कळ अधिक संख्येने सनातनच्या आश्रमात उगवण्याची काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे समजून घेऊया.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेनुसार रामनाथी येथील सनातन आश्रमात मंत्रपठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे आपोआप उगवली आहेत. यावरून मंत्रपठणामुळे वातावरण सत्त्वप्रधान होते आणि मंत्रातील तत्त्वानुसार निसर्गातही सकारात्मक पालट होतो, ही गोष्ट सिद्ध होते. दत्तमाला मंत्रजप पठणानंतर आश्रम परिसरात झालेला नैसर्गिक पालट आणि दोन मास (महिने) दत्तमाला मंत्रजप करतांना एका साधकाला आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

संकलकांचा थोडक्यात परिचय

१. डॉ. अजय गणपतराव जोशी हे १६ वर्षे पुणे येथील बीएआयएफ् या संस्थेत कार्यकारी अधिकारी होते, तसेच त्यांनी पुणे येथील व्हेंट्री बायोलॉजिकल्स् येथे १६ वर्षे उत्पादन व्यवस्थापक (प्रॉडक्ट मॅनेजर) म्हणून काम केले आहे. सध्या ते सनातनच्या रामनाथी आश्रमातील ग्रंथ विभागात पूर्णवेळ सेवा करतात.

२. डॉ. प्रमोद मार्तंड घोळे यांनी पुणे येथे B.Sc.(Agriculture) ही पदवी प्राप्त केली असून देहलीतील इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे कृषी कीटकशास्त्र (Agricultural Entomology) या विषयात त्यांनी M.Sc. आणि Ph. D. केली आहे. नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) या आस्थापनात त्यांना ३० वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते या आस्थापनाच्या चंदिगढ येथील शाखेत चीफ जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत.

१. दत्तमाला मंत्रजप पठणानंतर आश्रम परिसरात झालेला नैसर्गिक पालट

ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाल्यापासून अनुमाने ३० दिवसांनी त्याच्या शेजारील यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५६ रोपे आपोआप उगवणे

दोन मासांपासून (महिन्यांपासून) ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू आले. ध्यानमंदिराच्या दक्षिण दिशेकडील खिडकीच्या शेजारी अनुमाने (९ मी. ९ मी.) चा यज्ञकुंडाचा परिसर आहे. त्याच्या सभोवती चारही बाजूंनी आश्रमाच्या इमारतींचा पाया आहे. दत्तमाला मंत्रजप चालू झाल्यानंतर अनुमाने ३० दिवसांनी यज्ञकुंडाच्या परिसरात अनुमाने १५ सें.मी. उंचीची औदुंबराची ५८ रोपे आपोआप उगवली आहेत.

२. एखाद्या ठिकाणी रोप उगवण्यामागील संभाव्य कारणे

२ अ. लागवड केल्यावर रोप येणे

एखाद्या भूमीमध्ये बी पेरणी केली असता त्या भूमीमध्ये रोप येऊ शकते अथवा कुणीतरी त्या भूमीमध्ये त्या झाडाचे रोप लावल्यावर त्या ठिकाणी त्याची वाढ होऊ शकते.

२ आ. नैसर्गिक हालचालींतून रोप येणे : यामध्ये पक्ष्यांच्या विष्ठेतून भूमीत बिजारोपण होऊन रोपे उगवतात अथवा अथवा हवा किंवा पाणी यांच्या वहनातून हे बी भूमीत रुजल्यामुळे तेथे रोप उगवू शकते.

२ इ. वास्तूतील आध्यात्मिक चैतन्यामुळे रोप येणे : काही वृक्ष हे अतीपवित्र देववृक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांमध्ये वड, पिंपळ, औदुंबर यांचा समावेश होतो. त्यांची निर्मिती कोणत्याही स्थूल कारणाने नव्हे, तर आपोआप होते, उदा. वाडी येथील औदुंबर वृक्ष, देहू येथील नांदुरकी (पिंपळ) वृक्ष इत्यादी. पवित्र वास्तूमध्ये हे वृक्ष आपोआप येतात. चैतन्याचे प्रक्षेपण हे यांचे कार्य असते.

३. आश्रम परिसरात औदुंबराची रोपे उगवण्यामागे २ अ
आणि २ आ ही कारणे असू शकत नसल्यामागील कारणमीमांसा

३ अ. २ अ या सूत्रानुसार औदुंबराच्या वृक्षांची लागवड केली जात नाही.

(संदर्भ : http://www.sciencebehindindianculture.in/some-trees-are-considered-sacred-why/)

३ आ. आश्रमात असणार्‍या औदुंबराच्या झाडांना फलधारणा झालेली नसणे आणि पक्ष्यांच्या विष्ठेतून भूमीत बिजारोपण होऊन औदुंबराची एवढी रोपे उगवणे अशक्य असणे

२ आ या सूत्रानुसार पूर्वी आश्रमाच्या इमारतीच्या बाहेर आणि डांबरी रस्त्याच्या जवळ आश्रमाच्या भूमीत एकही औदुंबराचे झाड नव्हते. आश्रमाचे बांधकाम झाल्यानंतर वर्ष २००९ पासून तेथे औदुंबराची लहान लहान रोपे दिसू लागली. आता त्यांतून अनुमाने ३ – ४ मीटर उंचीची ४ झाडे झाली आहेत; पण त्यांना फलधारणाही झालेली नाही, तसेच पक्ष्यांच्या विष्ठेतून भूमीत बिजारोपण होऊन औदुंबराची एवढी रोपे उगवणे अशक्य आहे; कारण यज्ञकुंडाच्या सभोवती इमारतींच्या २ – ३ मजली भिंती असल्याने यज्ञकुंडाच्या परिसरात पक्षी येत नाहीत. त्यातही विशेष गोष्ट म्हणजे ध्यानमंदिराजवळ आणि यज्ञकुंडापासून १ – २ मीटर अंतरावर औदुंबराची रोपे दाटीने जवळजवळ उगवली आहेत. त्यामुळे ही रोपे चैतन्याचा स्रोत दर्शवतात.

४. मंत्रातील सत्त्वप्रधान स्पंदनांच्या प्रक्षेपणामुळे
पुष्कळ संख्येने औदुंबराची रोपे उगवल्याचे जाणवणे

जून २००० मधील मासिक मनशक्तीच्या अंकामध्ये त्यांनी पराशक्ती आणि वनस्पती या लेखामध्ये पुढील सूत्र दिले आहे.

डॉ. ग्रँड म्हणतात, माणसांच्या शरिरातून कोणतीतरी क्ष नावाची शक्ती किंवा प्रेरणा बाहेर पडत असावी की, जी प्राणी आणि वनस्पती यांच्यावर परिणाम घडवते. याला आपण मनाची सूक्ष्म किंवा पराशक्ती म्हणू. काही काळाने या संशोधनावरून परा मानसशक्ती, विचार प्रक्षेपण, प्रार्थना आणि संगीत यांचा वनस्पतीवर होणारा परिणाम सांगता येईल, असे तज्ञांचे मत आहे.

तज्ञांच्या या मतावरून आश्रमातील ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाल्यापासून मंत्रातील सत्त्वप्रधान स्पंदनांच्या प्रक्षेपणामुळे येथे पुष्कळ संख्येने औदुंबराची रोपे उगवली, असे म्हणू शकतो.

५. वड, पिंपळ, चाफा, तुळस, बेल, शमी, चिंच, पारिजातक आणि औदुंबर हे
वृक्ष २४ घंटे वातावरणात प्राणवायू सोडत असल्याने त्यांना देववृक्ष असे संबोधले जाणे

वड, पिंपळ, चाफा, तुळस, बेल, शमी, चिंच, पारिजातक आणि औदुंबर हे वृक्ष २४ घंटे वातावरणात प्राणवायू सोडतात, ज्याची प्राणीमात्राला जगण्यासाठी आवश्यकता असते. इतर वृक्ष वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाक्साईड इत्यादी प्रदूषणकारी वायू बाहेर टाकतात. त्यामुळे वड, पिंपळ, चाफा, तुळस, बेल, शमी, चिंच, पारिजातक आणि औदुंबर यांना प्राचीन काळापासून देववृक्ष असे संबोधण्यात येते. बाकीच्या सगळ्या झाडांना वृक्ष किंवा वनस्पती म्हणतात, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

(संदर्भ : विश्‍वचैतन्याचे विज्ञान)

६. साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर लाभ
होण्यासाठी आश्रमात पुष्कळ अधिक प्रमाणात औदुंबराची रोपे आल्याचे जाणवणे

बोविसने वनस्पतींच्या किरणोत्सर्जनाच्या शक्तीतरंगाचा अभ्यास केला. त्यावरून पुढे सायमनटनने निरनिराळ्या स्थितीतल्या खाद्यपदार्थांच्या वेव्हलेंग्थस् मोजल्या. या संशोधनावरून त्याने निष्कर्ष काढला की, वनस्पतीजन्य अन्न माणसाचे शक्तीतरंग वाढवू शकतात आणि त्याद्वारे त्या शरीर अन् मन या दोन्हींचे आरोग्य सुधारू शकतात. (संदर्भ : मनशक्ती जून २०००.)

आश्रमातील साधकांना होणार्‍या थकवा आणि अंगदुखी यांसारख्या त्रासांवर शारीरिक, तसेच मानसिक अन् आध्यात्मिक स्तरांवर लाभ होण्यासाठी अनुमाने १ मासामध्ये (महिन्यामध्ये) यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे आपोआप आल्याचे जाणवले.

७. वनस्पतींमध्ये सूक्ष्मातील स्पंदने आणि
लहरी ग्रहण 
करण्याची विशेष क्षमता असल्याने सात्त्विक ठिकाणी
वनस्पतींची 
वाढ अधिक प्रमाणात होते, हे विविध वैज्ञानिक प्रयोगांतून सिद्ध होणे

अतीसूक्ष्म लहरींमुळे वनस्पतींच्या अनेक ऊतींवर (टिश्यूंवर) होणारा परिणाम आणि त्यांच्या पेशींच्या आतील आवरणाच्या (सेल मेम्ब्रेेनच्या) क्षमतेत होणारे तत्सम पालट यांचा अभ्यास करणारे श्री. जगदीशचंद्र बोस हे पहिले संशोधक होते. वनस्पतींनाही भावना असतात. त्यांना वेदना होऊ शकतात, तसेच त्यांना प्रेम उमजू शकते, अशा विविध संकल्पना त्यांनी मांडल्या. (संदर्भ : en.wikipedia.org/wiki/Jagdish_Chandra_ Bose.)

वरील सूत्रांवरून वनस्पती बाह्य वातावरणाच्या संदर्भात पुष्कळ संवेदनशील असतात, तसेच त्यांच्यात संवेदनांद्वारे सूक्ष्मातील स्पंदने आणि लहरी जाणण्याची, तसेच ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते, हेच स्पष्ट होते. त्यामुळे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना दोन मासांपासून (महिन्यांपासून) ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू आले. ध्यानमंदिराच्या दक्षिण दिशेकडील खिडकीच्या शेजारी अनुमाने (९ मी. ९ मी.) आकाराच्या यज्ञकुंडाच्या सभोवती दत्तमाला मंत्रजप चालू झाल्यानंतर अनुमाने ३० दिवसांनी यज्ञकुंडाच्या परिसरात अनुमाने १५ सें.मी. उंचीची औदुंबराची ५८ रोपे आपोआप उगवण्याचे हे कारण असावे, असे वाटते.

८. दोन मास (महिने) दत्तमाला मंत्रजप करतांना एका 
साधकाला आणि आश्रमदर्शनासाठी आलेल्या साधकांना आलेल्या अनुभूती

ऋषीमुनी तपश्‍चर्या किंवा अनुष्ठान करतांना सुकलेल्या काठीला पालवी (अंकुर) फुटणे आदी बुद्धीअगम्य घटना घडल्याचे अनेक पुराणांमध्ये वाचायला मिळते. अध्यात्म हे शास्त्र आहे. त्यामुळे अध्यात्मशास्त्रातील भाव तेथे देव, पंचमहाभूतांद्वारे सजीव-निर्जिवांची उत्पत्ती होते आदी सिद्धांतांनुसार पुराणकाळात आलेल्या अनुभूती सध्याच्या कलियुगातही येतात; पण त्यासाठी ईश्‍वरप्राप्तीच्या उद्देशाने भक्तीभावाने साधना करावी लागते. ईश्‍वर विविध संप्रदायांनुसार साधना करणार्‍यांना आणि सनातनच्या साधकांना अशा अनुभूती नेहमीच देतो.

८ अ. मंत्रजपातून चैतन्य मिळणे

प.पू. गुरुदेव म्हणतात, या मंत्रजपातून समष्टीला आणि प्रसारात चैतन्य मिळते. त्यांच्या सांगण्याप्रमाणेच साधकांना या मंत्रजपातून चैतन्य मिळत आहे, हे मला जाणवले.

८ आ. मंत्रजप करतांना झोप किंवा गुंगी न येणे

मला अन्य वेळी नामजप करतांना झोप किंवा गुंगी येते; पण दत्तमाला मंत्रजप करतांना झोप किंवा गुंगी येत नाही. हा मंत्रजप एकाग्रतेने अखंड होतो. – एक साधक

८ इ. आश्रमदर्शनाला येणार्‍या अनेक जिज्ञासूंना येणारी अनुभूती दत्तमाला मंत्रजप ऐकल्यावर मन प्रसन्न झाल्याचे जाणवणे

आश्रमदर्शनाला येणारे पाहुणे हा मंत्रजप चालू असतांना ध्यानमंदिरात येतात. तेव्हा त्यांनाही मंत्रजप शांत चित्ताने ऐकूया, असे वाटते, तसेच मंत्रजप ऐकल्यावर मन प्रसन्न होते, अशी अनुभूती येत असल्याचे अनेक जिज्ञासूंनी सांगितले आहे.

– डॉ. अजय जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि डॉ. प्रमोद घोळे, चीफ जनरल मॅनेजर, नाबार्ड, चंदीगढ. (१५.११.२०१५)

 

वनस्पतीशास्त्रातील तज्ञ आणि
अभ्यासू,तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी
यांना वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात नैसर्गिक पालट घडत आहेत.

१. आश्रमात दत्तमाला मंत्रजप चालू केल्यानंतर औदुंबराची रोपे उगवण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?

२. अधिक संख्येने औदुंबराचीच रोपे उगवण्याचे कारण काय ? या ठिकाणी इतर रोपे का आली नाहीत ?

३. पठण चालू झाल्यावर ध्यानमंदिराच्या शेजारी यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे आपोआप उगवली. आश्रमात अन्य ठिकाणी ही रोपे का उगवली नाहीत ? ध्यानमंदिराच्या शेजारी यज्ञकुंडाच्या परिसरात, वातावरणात किंवा मातीत कोणता पालट झाल्यामुळे ही रोपे उगवली ?

४. औदुंबराच्या या रोपांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?, या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.

– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात