सनातन (रामनाथी) आश्रमाला भेट देणारेदोन विदेशी वैज्ञानिक कार्य पाहून प्रभावित !

रामनाथी आश्रमाला भेट देणार्‍या दोन विदेशी वैज्ञानिकांनी कार्य
पाहून प्रभावित होणे आणि शास्त्रीय संशोधन करण्याची इच्छा व्यक्त करणे

३.२.२०१४ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला २ विदेशी वैज्ञानिकांनी भेट दिली. त्यांचा परिचय आणि त्यांना आश्रमात आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.

डावीकडून डॉ. दुर्गेश सामंत, उजवीकडून पहिले <br/> पू. गाडगीळकाका आणि श्री. शॉन क्लार्क विदेशी वैज्ञानिकांशी बोलतांना

डावीकडून डॉ. दुर्गेश सामंत, उजवीकडून पहिले
पू. गाडगीळकाका आणि श्री. शॉन क्लार्क विदेशी वैज्ञानिकांशी बोलतांना

परिचय

वैज्ञानिकांतील डॉ. थॉर्नटन स्ट्रीटर, डी.एस्सी. हे ‘सेंटर फॉर बायोफिल्ड सायन्सेस’चे युनायटेड किंगडम आणि भारत येथील संचालक आहेत. ते ‘झुरोस्ट्रियन कॉलेज सेक्शन ऑफ ह्युमन बायोफिल्ड रिसर्च’चे प्रमुखही आहेत. किंबर्ली शिप्की या ‘एम्.एस्., सी.सी.टी.’ आणि ‘बायोमेडिकल’चे तंत्रज्ञ आहेत. त्यांचा ‘टिश्यु इंजिनियरिंग’, ‘सेल्युलर/टिश्यु मेक्नो-बायालॉजी अ‍ॅन्ड मेडिकल डिवाईस डिझाइन’मध्ये ६ वर्षांहून अधिक काळ संशोधन केल्याचा अनुभव आहे.

१. आश्रमात आल्यावर केलेले प्रयोग आणि आलेल्या विविध अनुभूती

दोघांनीही आश्रमात आल्यावर अनेक प्रयोग केले. त्या वेळी त्यांना आलेल्या विविध अनुभूतींविषयी त्यांनी पुढीलप्रमाणे सांगितले.

१ अ. प.पू. डॉक्टर रहात असलेल्या खोलीचे परीक्षण

१. खोलीतील भिंतींना हात लावल्यावर दोघांनाही भिंती श्वासोच्छ्वास करत असल्याचे जाणवले.

२. खोलीतील भूमीतून वेगवेगळी स्पंदने येत असल्याचे जाणवले.

१ आ. मंत्रपठण ऐकणे

आश्रमात यज्ञवेदीच्या ठिकाणी आणि पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या यंत्राची पूजा करतांना होणार्‍या मंत्रपठणाकडे डॉ. स्ट्रीटर आकर्षिले गेले. ते मंत्रपठण लक्षपूर्वक ऐकत होते.

२. कार्यातील पारदर्शकता आवडणे

‘वाईट शक्तींच्या त्रासांमुळे प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र विद्रूप झाले असतांनाही तुम्ही ते प्रदर्शनामध्ये ठेवले आहे. हे पारदर्शकतेचे प्रतीक आहे’, असे डॉ. स्ट्रीटर म्हणाले.

३. शास्त्रीय संशोधन करण्यास साहाय्य करण्याची इच्छा व्यक्त करणे

आश्रमात ठिकठिकाणी घडणार्‍या वेगवेगळ्या घडामोडींचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून संशोधन करून त्याचे लेखी पुराव्यांसमवेत जतन केलेले पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी त्याची प्रशंसाही केली. त्यासंदर्भात ‘बायोफीडबॅक’ मशीनद्वारे वैज्ञानिक दृष्टीकोनातून शास्त्रीय संशोधन करण्यास साहाय्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

४. डॉ. स्ट्रीटर यांनी प.पू. डॉक्टर
आणि आश्रम यांविषयी काढलेले उद्गार !

प.पू. डॉक्टरांच्या खोलीत मला अतिशय शांत वाटले. एवढी मोठी व्यक्ती इतकी साधी कशी रहाते, याचे मला आश्चर्य वाटते. आश्रम म्हणजे खर्‍या अर्थाने विविध पैलूंचे आध्यात्मिक शिक्षण देणारे एक विश्वविद्यालय आहे. आश्रमात ४०० साधक आपल्या ऐहिक जीवनाचा त्याग करून (ईश्व‍रप्राप्तीचे) ध्येयपूर्तीसाठी गुण्यागोविंदाने रहातात, हे कौतुकास्पद आहे.(तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो, पाश्चात्त्यांच्या नको त्या गोष्टींचे अनुकरण करण्यापेक्षा त्यांची जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि प्रांजळपणाने कौतुक करण्याची त्यांची वृत्ती समजून घ्या अन् त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. भारतातील अध्यात्म, मंत्रसामर्थ्य यांविषयी पाश्चात्त्यांना केवढे कुतूहल आणि कौतुक असते. भारतभूमीत जन्म घेतलेले अनेक बुद्धीवादी करंटे मात्र अध्यात्म, देवता यांच्याकडे हेटाळणीच्या दृष्टीने पहातात आणि कोणत्याही गोष्टीवर अभ्यासहीन टीका करण्यात धन्यता मानतात. त्यांच्या कर्मदरिद्रीपणामुळे अध्यात्माच्या अलौकिक सामर्थ्यापासून ते स्वतः तर वंचित रहातातच; पण इतरांच्या मनातही अश्रद्धेचे विष पेरून त्यांनाही खर्‍या आनंदापासून दूर ठेवतात. अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा ठेका घेतल्याचा आव आणणार्‍यानी डॉ. स्ट्रीटर यांच्याप्रमाणे जिज्ञासूपणाने सर्व बुद्धीअगम्य घटना समजून घ्याव्यात आणि नंतरच अध्यात्म, संत, देवता इत्यादींविषयी बोलावे. – संपादक )

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment