सनातन संस्थेचे अमर्याद कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव ! – प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस

मिरज, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – देश दिवसेंदिवस बुडत आहे. माणसे अयोग्य मार्गाला जात आहेत. अशा स्थितीत धर्म आणि संस्कृती टिकवण्याचे महत्त्वाचे कार्य सनातन संस्था करत आहे. सनातन हे नावच ऐकून समाधान वाटले. सनातन संस्थेचे कार्य म्हणजे शाश्वताचे वैभव आहे. या कार्याला कोणीही बंधने घालू शकत नाही, असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिराळे-मलकापूर येथील शिवशक्ती सिद्धपीठ सह्याद्री पहाड ट्रस्ट-मुक्तानंद तीर्थस्थळ आश्रमाचे प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस यांनी काढले. प.पू. स्वामी गणेशानंद परमहंस यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्थेच्या मिरज येथील आश्रमास सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे भक्त सर्वश्री श्रीकृष्ण यादव, महेश यादव, महेश मोरे उपस्थित होते.

सनातन संस्थेचे श्री. अतुल पवार आणि श्री. नितीन पांडे यांनी आश्रमात चालणार्‍या विविध सेवांविषयी प.पू. स्वामीजींना अवगत केले. श्री. अतुल पवार यांनी पुष्पहार घालून, शाल-श्रीफळ देऊन स्वामीजींचा सन्मान केला. या वेळी स्वामीजींना सनातनने प्रकाशित केलेला हिंदु राष्ट्र का हवे ?, हा ग्रंथ भेट देण्यात आला.

प.पू. स्वामीजी म्हणाले…

१. सिद्धगुरु भेटणे कठीण असते; मात्र असे गुरु तुम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात.

२. हा देह गुरूंच्या चरणी अर्पण केला आहे. तो आता धर्मकार्यासाठीच आहे. येथे धर्मकार्य चालू आहे. ते पहाण्यासाठी, त्याला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही येथे आलो.

३. मी येथे आलो नाही, मला ईश्वरी शक्ती घेऊन आली आहे.

४. ईश्वरी कार्य करतांना अडथळे येतातच. आपण त्यांना न जुमानता साधना करत आपले कार्य चालूच ठेवले पाहिजे.

५. हिंदु धर्मावर चित्रपट, विज्ञापने, नाटक, तसेच अन्य मार्गांनी होत असलेल्या आघातांची माहिती ऐकल्यावर ते रोखण्यासाठी तात्काळ प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या भक्तांनीही असे विडंबन तात्काळ रोखले पाहिजे, असेही ते म्हणाले.

प.पू. डॉक्टर अत्युच्च अवस्थेला !

प.पू. डॉ. जयंत आठवले हे आत्म्याशी एकरूप झाले आहेत. ही अत्युच्च अवस्था आहे. सदगुरुंच्या कृपेनेच हे सर्व होते.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment