आध्यात्मिक उपायांसाठीची खोक्यांची उपयुक्तता अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली
आध्यात्मिक उपायांसाठीची खोक्यांची उपयुक्तता
अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या
उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

      एखादी व्यक्ती शारीरिक स्वच्छतेविषयी ज्याप्रमाणे सजग असते, त्याप्रमाणे तिने स्वतःच्या आध्यात्मिक स्तरावरील स्वच्छतेविषयीही, म्हणजे स्वतःभोवतीची आणि स्वतःतील त्रासदायक स्पंदने दूर करण्याविषयी सजग असायला हवे. दैनंदिन जीवनात विविध आध्यात्मिक कारणांमुळे सर्वसाधारण व्यक्तीभोवती त्रासदायक स्पंदने निर्माण होऊ शकतात. त्याचा परिणाम व्यक्तीच्या स्वतःच्या, तसेच तिच्या संपर्कातील इतरांच्याही शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकतो. व्यक्तीभोवतीची त्रासदायक स्पंदने दूर करण्यासाठी (आध्यात्मिक उपायांसाठी) रिकाम्या खोक्यांचा वापर करण्याची नाविन्यपूर्ण पद्धत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितली आहे. या पद्धतीची उपयुक्तता जाणण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश

     एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

 

२. चाचणीचे स्वरूप

     या चाचणीमध्ये दोन साधकांभोवती १० मिनिटे विशिष्ट पद्धतीने खोके ठेवण्यात आले. प्रत्येक साधकाचे यू.टी.एस्. उपकरणाद्वारे खोके ठेवण्यापूर्वीचे आणि ठेवल्यानंतरचे परीक्षण करण्यात आले. या दोन्ही परीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. (खोक्यांचा आकार आणि ते ठेवण्याची पद्धत यांविषयीची माहिती सूत्र ३ आ मध्ये दिली आहे.)

 

३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

३ अ. चाचणीत सहभागी झालेले
साधक (चाचणीचा दिनांक : २७.१२.२०१५)

table_1   

टीप १ : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

टीप २ : व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय.

टीप ३ : निर्जीव वस्तू म्हणजे एक टक्का आणि ईश्‍वर म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक स्तर, असे गृहित धरून त्या तुलनेत व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीनुसार त्याचा वर्तमान आध्यात्मिक स्तर निश्‍चित करता येतो. एका संतांना समष्टी कार्याच्या आवश्यकतेनुसार साधकांच्या आध्यात्मिक स्तराविषयी ध्यानातून उत्तरे मिळतात. त्याविषयी सनातन प्रभात नियतकालिकांत वेळोवेळी लिखाण प्रसिद्ध करण्यात येते.

३ आ. चाचणीसाठी वापरलेले रिकामे
खोके आणि चाचणीच्या वेळची त्यांची रचना

१. खोके चौकोनी आकाराचे होते. त्याचा आकार (१७.५ सें.मी. १५ सें.मी. २५ सें.मी.) होता.

२. खोक्याच्या सहा बाजूंपैकी एक बाजू उघडी होती. ती उघडी बाजू चाचणीच्या वेळी चाचणीत सहभागी झालेल्या साधकांच्या दिशेने येईल, अशा प्रकारे खोके ठेवण्यात आले होते.

३. साधकाच्या मागे, पुढे, उजवीकडे आणि डावीकडे असे एकूण चार खोके ठेवले होते.

४. प्रत्येक खोका साधकापासून एक फूट (३०.४८ सें.मी.) अंतरावर होता.

५. चाचणीच्या वेळी साधक आसंदीवर (खुर्ची) बसत असल्याने खोक्यांची उघडी बाजू साधकांच्या दिशेने व्यवस्थितपणे यावी, यासाठी खोके भूमीपासून २ फूट (६०.९६ से.मी.) उंचीवर ठेवले होते.

३ ई. खोक्यांच्या माध्यमातून
करावयाच्या आध्यात्मिक उपायांचा कालावधी

     चाचणीसाठी व्यक्तीवर खोक्यांचा परिणाम अभ्यासण्यासाठी १० मिनिटांचा अवधी निश्‍चित केला.

 

४. यू.टी.एस्. (Universal Thermo
Scanner) उपकरणाद्वारे प्रभावळ मोजणे

४ अ. यू.टी.एस् उपकरणाची ओळख

या उपकरणाला ऑरा स्कॅनर असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्याची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगणा येथील भूतपूर्व परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००३ मध्ये विकसित केले. वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्‍या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे, असे ते सांगतात.

khoke_Upay_4
(सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील (प.पू.) डॉ. आठवले संकलित आगामी ग्रंथ रिकाम्या खोक्यांचे उपाय-शारीरिक अन् मानसिक विकार-निर्मूलनासह वास्तूशुद्धीचे उपाय ! लवकरच प्रकाशित होत आहे.)

४ आ. उपकरणाद्वारे करावयाच्या
चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण

४ आ १. नकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा हानीकारक असते. याअंतर्गत पुढील २ प्रकार येतात.

अ. अवरक्त ऊर्जा (इन्फ्रारेड) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी इन्फ्रारेड ऊर्जा मोजतात.

आ. जंबुपार ऊर्जा (अल्ट्राव्हायोलेट) : यात घटकापासून प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ऊर्जा मोजतात.

४ आ २. सकारात्मक ऊर्जा : ही ऊर्जा लाभदायी असून ती मोजण्यासाठी स्कॅनरमध्ये सकारात्मक ऊर्जा दर्शवणारा +Ve हा नमुना ठेवतात.

४ इ. यू.टी.एस् उपकरणाद्वारे घटकाची प्रभावळ मोजणे 

प्रभावळ मोजण्यासाठी त्या घटकाची सर्वाधिक स्पंदने असणारा नमुना वापरतात, उदा. व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ किंवा तिचे छायाचित्र, वनस्पतीच्या संदर्भात तिचे पान, प्राण्याच्या संदर्भात त्याचे केस, वास्तूच्या संदर्भात तेथील माती आणि देवतेच्या मूर्तीच्या संदर्भात मूर्तीला लावलेले चंदन, गंध, शेंदूर आदी.

 

५. चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता

अ. उपकरण हाताळणारी व्यक्ती आध्यात्मिक त्रास (नकारात्मक स्पंदने) नसलेली होती.

आ. उपकरण हाताळणार्‍या व्यक्तीने परिधान केलेल्या वस्त्रांच्या रंगाचा परिणाम चाचणीवर होऊ नये, यासाठी त्या व्यक्तीने पांढरी वस्त्रे परिधान केली होती.

इ. दोन्ही साधकांची चाचणी एकाच ठिकाणी घेण्यात आली. एका साधकाची चाचणी घेऊन झाल्यावर त्या साधकाच्या स्पंदनांचा परिणाम त्याच ठिकाणी होणार्‍या दुसर्‍या साधकाच्या चाचणीवर होऊ नये, यासाठी दोन्ही साधकांच्या चाचणींमधील कालावधी ५१ मिनिटे ठेवण्यात आला होता.

 

६. निरीक्षणे आणि त्यांचे विवेचन

६ अ. यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) 
उपकरणाद्वारे केलेली निरीक्षणे (चाचणीचा दिनांक : २७.१२.२०१५)

table_2table_3
टीप १ : मूलभूत नोंद घेऊन झाल्यानंतर दुपारी ३.०५ ते ३.१५ या वेळेत साधकाभोवती खोके ठेवले होते.

टीप २ : मूलभूत नोंद घेऊन झाल्यानंतर दुपारी ४.२० ते ४.३० या वेळेत साधकाभोवती खोके ठेवले होते.

टीप ३ : स्कॅनर १८० अंशाच्या कोनात उघडल्यासच त्या घटकाची प्रभावळ मोजता येते. त्यापेक्षा अल्प अंशाच्या कोनात स्कॅनर उघडला, तर त्याचा अर्थ त्या घटकाभोवती प्रभावळ नाही, असा होतो.

६ आ. निरीक्षणांचे विवेचन

१. दुसर्‍या साधकापासून अल्प प्रमाणात प्रक्षेपित होणारी अल्ट्राव्हायोलेट ही नकारात्मक प्रकारची ऊर्जा त्याच्याभोवती १० मिनिटे खोके ठेवल्यानंतर पूर्णपणे दूर झाली आहे.

२. साधकांभोवती १० मिनिटे खोके ठेवल्यानंतर दोन्ही साधकांची प्रभावळ त्यांच्या मूलभूत नोंदीच्या तुलनेत पुष्कळ प्रमाणात वाढली आहे.

 

७. निष्कर्ष

      आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक स्पंदने असणार्‍या आणि नसणार्‍या अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींसाठी खोक्यांच्या माध्यमातून न्यूनतम १० मिनिटे केलेले उपाय आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायक आहेत, हेच या चाचणीतून लक्षात येते.

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.१.२०१६)

ई-मेल : [email protected]

Universal Thermo Scanner
या उपकरणाद्वारे आध्यात्मिक त्रासावर उपाय म्हणून
रिकामे खोके लावण्यापूर्वी आणि लावल्यानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या
साधकावर होणार्‍या परिणामांची चाचणी घेतांना साधकाला आलेल्या अनुभूती

table_4
टीप – वेळ अदमासे गृहीत धरली आहे. १ – २ मिनिटे मागे-पुढेही असू शकते.
–  साधक (२७.१२.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात