वास्तूकलाशास्त्रामुळे समस्त ब्रह्मांडांची निर्मिती झाली आहे
`वैदिक वास्तूकार प्राध्यापक सेतुमाधवन म्हणतात, `नियम व व्यवस्थापन प्रतिपादित
करणारे स्थापत्य हे वास्तूकलाशास्त्र आहे. त्यामुळे समस्त ब्रह्मांडाची
निर्मिती झाली आहे. स्थापत्य म्हणजे जडात चेतनाचा आविष्कार असून ते वेद-ज्ञान,
विज्ञान आहे. त्यात जीवनाला प्रकृती-नियमात बद्ध करण्याचे सामर्थ्य आहे.'
पण बर्याच वर्षांपासून आपण प्रकृती-नियमांप्रमाणे चालत नाही.' (दिशाचक्र,
पृ. ७९. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
हजारो वर्षांपूर्वी निसर्ग, वास्तू व शरीर यांच्यामधील ऊर्जासंतुलन वास्तूशास्त्राच्या
माध्यमातून साधण्याची कला अवगत असलेले महान द्रष्टे !
निसर्ग, वास्तू व शरीर यांच्यामधील ऊर्जासंतुलन वास्तूशास्त्राच्या माध्यमातून
साधण्याची आपल्या पूर्वज द्रष्ट्यांची (ऋषींची) ही कला समजून घेणे, त्यावर
अधिक संशोधन करून आजच्या धकाधकीच्या जीवनात वैयक्तिक तसेच व्यापक सामाजिक
हितासाठी त्याचा उपयोग करणे, हे वास्तूतज्ञांचे आद्यकर्तव्य ठरते.' (आर्किटेक्ट
श्री. महाशब्दे, अकोला यांच्या पत्रकावरून) (दिशाचक्र, पृ. ८२. प.पू. परशराम
माधव पांडे महाराज, अकोला)
साधनेचा वास्तूवर परिणाम
`एका खोलीत मी अनेक वर्षे ध्यानाला बसत असे. परिणामत: ती खोली तुमच्या
या टाकी(खोली)पेक्षाही अधिक प्रभावशाली झाली आहे. माझी ती एक खास टाकीच
आहे म्हणा ना ! त्या खोलीत ध्यानासाठी बसणार्याला मी पूर्वी जपलेला मंत्र
आजही ऐकू येतो.' - स्वामी मुक्तानंद संतांचा वास्तूवर परिणाम : पावसचे
स्वामी स्वरूपानंद, गोंदवल्याचे गोंदवलेकर महाराज, अशा संतांनी ज्या वास्तूंत
वास्तव्य केले होते तेथे किंवा संतांच्या समाधिस्थळी (उदा. शेगावची श्री
गजानन महाराजांची समाधि) खूप चांगली स्पंदने असतात.
प्राचीन वास्तूशास्त्राचा आधार घेणेच योग्य !
अंनिसचे आव्हान स्वीकारले !
`कोणतीही वास्तू लाभावी, यासाठी प्राचीन वास्तूशास्त्राचा आधार घेण्यात
काहीही गैर नसून ते मूलभूत शास्त्र असल्याचा दावा करून अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे याबाबतचे आव्हान स्वीकारण्याची तयारी श्री. दत्ता नरवणे यांनी
दाखवली आहे. वास्तूशास्त्रातील प्रत्येक नियमात तांत्रिक आधार देता येऊ
शकतो. `अंनिसच्या कार्यकर्त्यांना मी सांगेन त्या इमारतीत राहून दाखविल्यास
आपले म्हणणे मागे घेण्यास मी केव्हाही तयार आहे. समितीबरोबर याबाबत चर्चेसही
आपली तयारी आहे', असे त्यांनी सांगितले. दिशा, गुरुत्त्वाकर्षण, वैश्विककिरण
व पाणी, या विश्वात असलेल्या गोष्टींचा वास्तूवर होणारा परिणाम अभ्यासून
हे शास्त्र निर्माण झाले आहे व जगाने त्याला मान्यताही दिली आहे. `वास्तूवैदिक
रिसर्च फाऊंडेशन' ही संस्था याबद्दलचे शास्त्रीय संशोधन करीत आहे. वास्तूशास्त्राचे
आणखी एक अभ्यासक व अभियंते श्री. अविनाश देशपांडे यांनीही अंनिसवाल्यांचा
दावा फेटाळून लावतांना सांगितले की, फ्लॅट बांधतांना वास्तूशास्त्राचे
सर्व नियम पाळणे शक्य होणार नाही, हे खरेच आहे. हे शास्त्र, `तोडफोड करायला
लावते', असे म्हणणेही चुकीचे आहे. उलट हे शास्त्र मानवाला विधायक दृष्टिकोन
ठेवून सुख-शांती मिळवण्यात मदत करते.' (दिशाचक्र, पृ. ८३-८४. प.पू. परशराम
माधव पांडे महाराज, अकोला)
सनातनची सात्त्विक उत्पादने
ग्रंथ
ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?

देवघर व पूजेतील उपकरणे

सोळा संस्कार

संस्कार हीच साधना

सण, धार्मिक उत्सव व व्रते

सकाम कर्म, निष्काम कर्म
कर्मफलत्याग व अकर्म कर्म

पुण्य-पाप व पापाचे प्रायश्चित्त

देवपूजेच्या कृतीचे शास्त्र

हठयोग

सात्विक नामपट्ट्या


वितरणासाठी संपर्क
|

विश्वकर्मा
विश्वकर्माने ब्रह्मदेवाच्या साहाय्याने सात्त्विक वास्तूंची निर्मिति करण्यासाठी वास्तूशास्त्राची निर्मिति केली. वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तूची रचना केल्यास वास्तू सात्त्विक बनते. याबद्दल सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांना ईश्वराकडून मिळालेली माहिती येथे प्रसिद्ध करत आहोत.
निर्मिती
सृष्टीच्या रचनेच्या कार्यात ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचे महत्त्वाचे स्थान आहे, त्याप्रमाणेच विश्वकर्म्यालाही महत्त्व आहे. देवतांच्या वास्तूंचा शिल्पकार म्हणून संपूर्ण ब्रह्मांडात विश्वकर्म्याची ख्याती आहे. ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या तत्त्वांच्या संयोगाने विश्वकर्मा याची निर्मिति झाली.
महत्त्व
विश्वकर्मा त्याच्या कृतीतून कला व बुद्धि यांच्या योग्य संयोगाने सात्त्विक वास्तूंची रचना करून ईश्वरप्राप्ती करण्याचा मार्ग दाखवून देतो.
कार्य
अ. उत्त्पत्ती
अ १. देवतांच्या महालांची निर्मिति करणे : विश्वकर्माने प्रथमच सात्त्विक वास्तूंची निर्मिती केली. यामध्ये त्याने सर्वप्रथम सगुणलोकामध्ये उच्च देवतांच्या महालांची निर्मिती केली. त्याने निर्मिलेले श्रीलक्ष्मी, श्रीकृष्ण, श्रीराम व मारुति यांचे महाल विलक्षण सुंदर आहेत. त्यानंतर त्याने स्वर्गलोकातील इंद्र व इतर देवता यांच्या महालांची निर्मिति केली. त्रेतायुगाच्या प्रारंभी त्याने लंकेत शिव व पार्वती यांच्यासाठी `लंकापुरी' या सुवर्णनगरीची निर्मिती केली. त्यामध्ये त्याने शिव व पार्वती यांच्यासाठी सुवर्णमहालाची रचना केली होती. प्रत्येक देवतेच्या महालाची रचना, शिल्पकला व नक्षीकाम निराळे आहे.
३ अ २. मंदिरांची निर्मिति करणे : शिव, देवी व इतर देवता यांच्या प्राचीन मंदिरांची निर्मिती विश्वकर्म्याद्वारेच झाली आहे. यामध्ये बर्याच मंदिरांवरील नक्षीकाम व शिल्पाकृती यांचे देवतांच्या महालांशी साधर्म्य आहे. विश्वकर्माने त्या वेळी मंदिराचे शिल्पकाम व रचना करणार्या कारागिरांना सूक्ष्मातून मार्गदर्शन केले होते. त्यामुळे सात्त्विक मंदिरांची निर्मिती झाली.
आ. स्थिती
विश्वकर्माने ज्या वास्तूंची निर्मिति केली, त्या वास्तूंची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडेच असते. त्या वास्तूंची सात्त्विकता शेवटपर्यंत टिकून ठेवणे, त्या वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी विविध वास्तुदेवतांची निर्मिति करणे, त्यांना वास्तूच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविणे, हे कार्य विश्वकर्माच करतो. त्याचप्रमाणे इतर देवतांना वास्तुशास्त्राचे ज्ञान देणे, हे त्याचे कार्यही सुरू असते.
इ. वास्तूशास्त्राची निर्मिती करणे : विश्वकर्माने ब्रह्मदेवाच्या साहाय्याने सात्त्विक वास्तूंची निर्मिति करण्यासाठी वास्तूशास्त्राची निर्मिति केली. वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तूची रचना केल्यास वास्तु सात्त्विक बनते. यामध्ये जागा, दिशा, वास्तूचे बांधकाम करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, उंची, वास्तूची रंगसंगती, वास्तूचे अंतर्सौंदर्य या सर्वांचा समावेश असतो. त्यामुळे वास्तूमध्ये कोणतेही दोष रहात नाहीत. वास्तूशास्त्रानुसार वास्तु बांधल्यास तिची सात्त्विकता वाढते व वास्तूमध्ये उच्च देवतांच्या लहरी ग्रहण करण्याची क्षमता येते. सात्त्विक वास्तूमध्ये उच्च देवतांच्या लहरी खेळू लागतात. वास्तूचे संरक्षण करणारा वास्तुपुरुष हा उच्च देवतांच्या लहरींमुळे संतुष्ट होतो. तसेच या लहरींमुळे वास्तूचे वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी त्याला बळ प्राप्त होते.
इ १. साधना करणारे जीव वास्तूत रहात असल्यास होणारे परिणाम
इ १ अ. वास्तूचे वातावरण जास्त काळ सात्त्विक रहाण्यास मदत होते.
इ १ आ. वास्तूचे वातावरण सात्त्विक राहिल्यामुळे वास्तुपुरुष प्रसन्न होतो व तो वास्तूचे वाईट शक्तींपासून रक्षण करतो.
इ १ इ. वास्तू सात्त्विक झाल्यामुळे वास्तूमध्ये उच्च देवतांच्या लहरी जास्त प्रमाणात आकृष्ट होऊ लागतात. साधक जिवांनी भावपूर्ण साधना केल्यास अशा वास्तूला देवता सूक्ष्मातून भेटी देतात.
इ १ ई. सात्त्विक वास्तूच्या भोवती ईश्वर सूक्ष्मातून संरक्षककवच तयार करतो.
इ २. सात्त्विक वास्तूंची निर्मिती म्हणजे एक अभूतपूर्व कार्य होय ! : विश्वकर्मानेसात्त्विक वास्तूंची निर्मिति केली आहे. त्याने विविध वास्तुशिल्पांची निर्मिति केली आहे. यामध्ये मंदिर, घर व इमारत यांसारख्या वास्तूंच्या निरनिराळया वास्तूशिल्पांच्या आकृत्या आहेत.
- ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १८.२.२००५, दुपारी १.३० ते ३.०२)
शापित शिवगण, हीच पृथ्वीवरील स्थानदेवतांची वेगवेगळी रूपे : सेवेमध्ये शिवगणांकडून काही चूक झाल्यास भगवान शंकर किंवा इतर उच्च देवता कनिष्ठ शिवगणांना पंचतत्त्वात जाऊन स्थानदेवतेच्या रूपात सामील होऊन कार्य करण्याचा शाप देतात. शापित शिवगण पंचतत्त्वात कार्य करण्यासाठी येतात, तेव्हा ते त्यांच्या मूळ स्वभावाच्या दुप्पट तामसिक व राजसिक होतात. यामुळेच शिवगण पंचतत्त्वात प्रकट राहून स्थानदेवतेचे कार्य सांभाळू शकतात. यांना शापासाठी उ:शाप नसतो. त्यांनी स्वत:च साधना करावयाची असते.
- ब्रह्मतत्त्व (१६.३.२००४, सकाळी ११.३० वा.)


वास्तूशास्त्र
हिंदूंनो, प्राचीन भारतीय वास्तूशास्त्राचे महत्त्व जाणा !
माणूस हा घरात रमणारा प्राणी आहे. केवळ माणूसच नाही, तर प्रत्येक प्रत्येक जीव हा आपल्या घरट्यात सुख, समाधान, सुरक्षितता अनुभवतो. घर हे बांधावे लागते. ते आपोआप उभे रहात नाही. घराचे घरपण हे त्यात रहाणार्या माणसांवर अवलंबून असले, तरी त्या माणसांना माणुसकीने रहायला उद्युक्त करायला त्या वास्तूतील वातावरण प्रामुख्याने जबाबदार असते. वास्तूशास्त्र हे पुरातन शास्त्र आहे. महाभारत काळात मयासुराने बांधलेल्या मयसभेचा, तसेच इंद्रप्रस्थाचा उल्लेख आहे. मयानेही वास्तूशास्त्रात मोलाची भर टाकली आहे.
वास्तूशास्त्र म्हणजे निसर्गावर आधारलेल्या अनेक शास्त्रांपैकी एक शास्त्र. नैसर्गिक दिशा, पृथ्वीच्या पोटातील चुंबक, भौगोलिक परिस्थिति यांचा शास्त्रीयदृष्ट्या वास्तू बांधण्यासाठी उपयोग म्हणजे वास्तूशास्त्र.
सर्व चराचर सृष्टी ही आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी व्यापलेली आहे. या पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचे गुण व कार्य निरनिराळे आहेत. यांपैकी आकाशतत्त्व हे शब्दगुणयुक्त असून जीव निर्माण करणे, कोणत्याही गोष्टीसाठी साधनांची उपलब्धता देणे, हे त्याचे कार्य आहे. वायूतत्त्व हे स्पर्शगुणयुक्त असून वहन, नियंत्रण आणि वितरण हे त्याचे कार्य आहे. तेजतत्त्व हे रूपगुणयुक्त असून शुद्धीकरण, दिशा देणे, अधिकार, नेतृत्व यासाठी ते उपयुक्त आहे. आप महाभूत हे रसगुणयुक्त असून तृप्ती, समाधान, पुष्टी, तुष्टी हे त्याचे कार्य आहे. पृथ्वीतत्त्व हे गंधगुणयुक्त असून संघटन, संयोजन या कामात ते महत्त्वाचे ठरते. वास्तूशास्त्र हे ज्योतिषशास्त्राप्रमाणेच प्राचीन आहे आणि ज्योतिषशास्त्रातील ग्रहांचे कारकत्व, त्यांचे पंचमहाभूतातील वर्गीकरण यांचा उपयोग वास्तूशास्त्रात केला आहे. त्याचे वर्गीकरण रवि, मंगळ-अग्नीतत्त्व, चंद्र, शुक्र-जलतत्त्व, गुरु-आकाशतत्त्व, शनि-वायूतत्त्व आणि बुध-पृथ्वीतत्त्व असे आहे.
वेदकालापासून दशदिशांवर विविध देवतांचे स्वामित्व आणि त्यांच्या गुणानुसार कार्य सांगितले आहे. ते या क्रमाने आहे.
पूर्वदिशा :: देवता - इंद्र, ग्रहाधिपति - रवि
अग्नेय : देवता - अग्निदेव, ग्रहाधिपति - शुक्र
दक्षिण : देवता - यम, ग्रहाधिपति - मंगळ
नैऋत्य : देवता - नैऋति, ग्रहाधिपति - राहु, केतु
पश्चिम : देवता - वरुण, ग्रहाधिपति - शनि
वायव्य : देवता - वायुदेव, ग्रहाधिपति - चंद्र
उत्तर : देवता - कुबेर, ग्रहाधिपति - बुध
आपल्यापैकी प्रत्येकाचे कार्य व गरजा हे पंचमहाभूते, अष्टदिशा यांच्या बाहेर नाही आणि वास्तूशास्त्रात याच गोष्टींचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. आपण घरात ज्या वास्तूत रहातो, तेथील वातावरणाचे गुण आपण अंगिकारलेल्या कर्मासाठी, त्या कर्मानुसार मिळणार्या फळासाठी पोषक किंवा घातक असतात. ते जास्त शुभफलदायी व्हावे; म्हणून वास्तूशास्त्रात जमिनीचा आकार, जमिनीचा चढउतार, शल्यशोधन, माती परीक्षण, प्रवेशद्वार अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला आहे.
आपल्या घरात बैठकीची खोली, स्वयंपाकघर, शयनगृह, देवघर अशी विविध दालने असतात आणि त्या प्रत्येक खोलीत करावयाची कर्मे निरनिराळया गुणांची असतात; उदा. बैठकीच्या खोलीत चर्चा, खलबते, विचारविनिमय, निर्णय होतात.
स्वयंपाकघरात उदरभरण, पुष्टी, तुष्टी ही कर्मे केली जातात.
शयनगृहात विश्रांति, विषयसेवन ही कर्मे केली जातात, तर देवघरात विश्वास, शांतता, समाधान मिळत असते.
अनुभवजन्य वास्तूशास्त्रानुसार असे सिद्ध झाले आहे की, नैसर्गिक दिशांच्या गुणांशी आपल्या कर्मगुणांची सांगड घालून घरातील विविध दालनांची विभागणी केल्यास कमी श्रमात जास्त यश पदरी पडते आणि या शास्त्राच्या विरुद्ध वर्तन केल्यास कष्ट करूनही अपयशाचे धनी व्हावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून घरातील विविध दालनांची विभागणी करावी.
१. स्नानगृह : कर्म - स्वच्छता - हे अग्नीतत्त्वाचे कार्य असल्यामुळे स्नानगृह पूर्वेला असावे.
२. स्वयंपाकघर : कर्म - चविष्ट पदार्थांची निर्मिती, तृप्ती - हे अग्नि (अग्निदेव) व जलतत्त्व (शुक्र) यांचे कार्य असल्यामुळे अग्नेय दिशेस असावे.
३. घरातील तिजोरी : कर्म - धनवृद्धी - हे पृथ्वीतत्त्व (बुध) आणि देवता (कुबेर) यांचे कार्य असल्यामुळे ती उत्तर दिशेकडे उघडणारी असावी.
अशा प्रकारेच कार्यकारणभाव ठेवून इतर दालनेही पुढील दिशांना ठेवता येतील.
४. शयनगृह : दक्षिण
५. बैठकीची खोली : पूर्व
६. भोजनगृह : पश्चिम
७. धान्यगृह, कोठार : वायव्य
८. शौचालय : दक्षिण-अग्नेय किंवा पश्चिम-वायव्य
९. पाण्याची टाकी : उत्तर - इशान्य किंवा पूर्व-इशान्य
१०. दूरदर्शन संच, संगणक, इलेक्ट्रिक मीटर : आग्नेय
११. देवघर : इशान्य
अशा प्रकारे अष्टदिशांना घरातील विविध दालनाची विभागणी केल्यास तेथील कार्यास गति मिळते.
वास्तूशास्त्र हे फक्त रहावयाच्या घरांसाठीच मर्यादित नसून देवालये, दुकाने, कारखाने यांच्या उत्कर्षासाठीही त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो.
आपल्या पूर्वजांनी सखोल अभ्यासाने संपन्न केलेल्या या शास्त्राच्या अनुकरणाने आपले आयुष्य सुखी, समृद्ध, संपन्न करूया !
- श्री. सुनील घैसास, डोंबिवली (प.)



प.पू. पांडे महाराज
अकोला येथील संत प.पू. परशराम माधव पांडे महाराज, यांनी वास्तूकलेविषयी दिलेली माहिती देत आहोत.
घर हे केवळ आधुनिक `गृहरचना शास्त्र व तंत्र' यांनी बनवलेली उपयोगी वस्तू नसून, ते दिशा आणि देवतांच्या संदर्भातून वास्तूकला व वास्तूविज्ञान विकसित होण्याचे शास्त्र व तंत्र आहे. (दिशाचक्र, पृष्ठ ६. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.)
सर्व देवता दिक्पाल रूपात विराजमान असलेले श्रीकृष्णाचे गोकुळधाम !
`श्री श्री ब्रह्मसंहिता ७-८'मध्ये दिशा व दिक्पाल यांच्यासंबंधी पुढील माहिती दिली आहे. `श्री गोकुळधाम हे श्रीकृष्णाचे धाम आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ सर्व प्राप्तीसाठी साधनभूत मूर्तिमान मंत्राने तेथे विराजमान आहेत. ऊर्ध्व, अध: व दिशा, विदिशा (उपदिशा) या दहाही दिशांमध्ये मंत्ररूप दिक्पाल हे वज्र, शक्ति, दण्ड, खड्ग, पाश, अंकुश, गदा, शूल, चक्र व पद्म अशा दहा अस्त्रांनी मंडित आहेत. या गोकुळधामामधील इंद्रादि देवता अस्त्रांसहित प्रपंचगत स्वर्गादिमध्ये असलेल्या देवतांचे मूळरूप आहेत. तेथे या सर्व देवता नित्य असून दिक्पाल रूपाने व भगवंताच्या पार्षदरूपाने विराजमान आहेत.' (दिशाचक्र, पृष्ठ १०, प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.)
दिशांसंबंधी सूर्य हा महत्त्वाचा घटक असणे
`सूर्य हा प्रेरणा व जीवनशक्ति यांचा दायक आहे. दिशाचक्रानुसार पूर्व, ईशान्य व उत्तर या दिशा `धन' आहे; म्हणून कोणतेही शुभकार्य पूर्व किंवा उत्तर या दिशांना बसून करतात.' (दिशाचक्र, पृष्ठ १०, प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.)
दिशाचक्राच्या दृष्टीने वास्तूशास्त्र
`प्राचीन काळी वास्तूशास्त्र ठरवितांना भारतातील दिशा, त्यांची देवता व ऋतंूतील बदलणारी परिस्थिती यांचा विचार करण्यात आला होता. हवामानशास्त्र, त्या वेळची जीवनपद्धती, समाजव्यवस्था व उपलब्ध तंत्रज्ञानाचा अभ्यास करूनच वास्तू बांधण्यात येई. वर्षातले आठ महिने नैऋत्येकडून व पश्चिमेकडून वारे वाहतात, तर चार महिने वायव्य व पश्चिम दिशेकडून वारे वाहतात. सकाळी सर्वप्रथम पूर्व व आग्नेय दिशेकडून सूर्यकिरण पडतात; परंतु या दिशांकडून वारे वाहत नाहीत.

प्रवेशद्वारापुढील परिसर
पूर्वेकडील मुख्य दारासमोरच्या भागातील अंगणात सडा टाकून अंगणाला एक प्रकारची पवित्रता येते. तेथे तुळशी-वृंदावन असते. तुळशी-वृंदावनाची पूजा केली जाते. तुळशीजवळ, अंगणात तसेच उंबरठ्याजवळ रांगोळी काढत, आजही बर्याच ठिकाणी काढतात. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी वातावरण प्रसन्न रहाते. लक्ष्मीची पावलेही काढतात. समोरून येणारी लक्ष्मी ही वाजत-गाजत येते.' (दिशाचक्र, पृ. ७०. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
वास्तूचे प्रवेशद्वार पूर्व दिशेला असण्यामागचे शास्त्र व महत्त्व
`दिशाचक्रावरून दिसून येईल की, पश्चिमेला जलाची वरुणदेवता आहे. वायव्य ही वायूची देवता आहे. त्यामुळे पाऊस व हवा त्याच बाजूने येतात. पश्चिमेकडे प्रवेशद्वार असेल तर आपल्याला पावसाळयात, तसेच थंडी-वार्यापासून हिवाळयात व ऊन-वार्यापासून उन्हाळयात त्रास होतो. त्याकरिता वेगळे संरक्षण करावे लागते. उन्हाळयात दुपारी व ऊन उतरतांनाही त्या बाजूने त्रास होतो. शिशिर ऋतूत झाडांचा पाला-पाचोळा घरात शिरतो. उलट पूर्व दिशेला प्रवेशद्वार असल्यास हा त्रास होत नाही. ईर्शान्य कोपर्यातही दिवसभर स्वच्छ, सौम्य प्रकाश असतो. समोरचा भाग असल्यामुळे तो मोकळाच असतो. म्हणूनच वारा, सूर्यप्रकाश व उष्णतेची तीकाता या भागात सर्वांत कमी असते.' (दिशाचक्र, पृ. ७०. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
दक्षिण दिशेला प्रवेशद्वार नको !
दक्षिण दिशेला प्रवेशद्वार असेल, तर पूर्व दिशेसारखे किंवा उत्तर दिशेसारखे फायदे मिळत नाहीत. उजेड किंवा स्वच्छ प्रकाश मिळत नाही. नैऋत्येकडील पाऊस व वारे हे दक्षिण बाजूला जास्त त्रास देतात. ऋतू किंवा दिशा यांच्या व्यवस्थेप्रमाणे, तसेच हवामानाच्या दृष्टीने दक्षिण दिशा ही फलदायक ठरत नाही. म्हणून ती वर्र्ज्य केली आहे.' (दिशाचक्र, पृ. ७२. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.)
उंबरठा
उंबरठ्याचे महत्त्व व त्याची पूजा : `उंबरठा हे प्रवेशद्वार आहे. बाहेर व आत या दोन भागांना जोडणारा तो दुवा आहे. तो सुसंस्कृतीची मर्यादा दाखवतो. सीमारेषा दाखवतो. संयम जागृत ठेवतो. त्याची जाणीव कायम रहावी व त्याची जपणूक व्हावी, म्हणून त्याचे स्मरण व पूजन केले जाते.
लग्न झालेली वधू आपल्या घरी येते, त्या वेळी ती `गृहलक्ष्मी आहे', हा भाव असल्यामुळे, धान्याने भरलेले भांडे, घरात धान्य पडेल अशा रितीने उलटवून, तिने घराचा उंबरठा ओलांडून आत यायचे असते.
मनुष्य बाहेरून येतो, म्हणजे बाहेरील वातावरणाशी समरस होऊन येतो. त्या वेळी त्याच्या मनावर बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होऊन, तो त्या मनोवृत्तीने घरात शिरत असतो; परंतु त्याला जर उंबरठ्याची, संयम रेषेची जाणीव असेल, तर तो बाहेरील सर्व विकल्प सोडून, मोठ्या आनंदाने व उत्साहाने घरात प्रवेश करेल. त्यामुळे घरातील वातावरण दूषित होणार नाही. म्हणूनच आपण आपली पादत्राणे ओसरीवर (व्हरांड्यात) काढून आत जातो. आत गेल्यावर त्याच्यावर घरातील वातावरणाचा परिणाम होतो. हात-पाय धुतल्यावर देवघरातील मंद प्रकाशाने तेवत असलेल्या दीप-ज्योतीने व देवघरातील पवित्र वातावरणाने तो प्रसन्न होतो.' (दिशाचक्र, पृ. ७०-७१. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.)
स्वयंपाकघर
`स्वयंपाकघर आग्नेयेकडे असेल, तर सकाळच्या कोवळया सूर्यकिरणापासून तेथे आवश्यक ती जीवनसत्त्वे मिळतात व निर्जंतुकीकरण होते. हा कोपरा वारा येणारा नसल्याने, धूर घरभर पसरत नाही. दिशेच्या दृष्टीने पूर्व दिशेची देवता इंद्र आहे. सामर्थ्यसंपन्न अशा पुरुषाचे त्या दिशेकडे लक्ष आहे. आग्नेयेला अग्नीदेवता आहे. ती स्वयंपाकघरात `पावक' या स्वरूपातून कार्य करते. आपल्या पोटातील अग्नीला वैश्वानर म्हणतात. तेव्हा या अग्नीची स्वयंपाकघरावर (अँटीनाप्रमाणे) दृष्टी असते. (दिशाचक्र, पृ. ७१-७२. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
देवघर किंवा बैठकीची खोली ईशान्येकडे व कोठार नैऋत्येकडे असण्याचे महत्त्व
`ईशान्येकडील देवता ही, `आतील आत्मा व बाहेरील जगाचा कर्ता', असा ईश्वर आहे. त्याचा पूर्वेकडून दृष्टीक्षेप असल्याने वास्तूपुरुषाचे ईशान्येकडे डोके व नैऋत्येकडे पाय आहेत. राक्षसांचा अधिपती नैऋती हा नैऋत्येचा स्वामी आहे. त्याला सांभाळण्यासाठी व त्याच्यावर नियंत्रण राखण्यासाठी त्याला पायाने दाबले आहे; म्हणून त्या बाजूला घरातील कोठार (जडवस्तू) ठेवायचे असते. ईशान्येकडे देवघर किंवा बैठकीची खोली असेल, तर स्वच्छ प्रकाशाचा व समशीतोष्ण हवामानाचा फायदा मिळाल्यामुळे हा भाग दिवसभर प्रसन्न असतो.' (दिशाचक्र, पृ. ७२. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
देवघराची आवश्यकता
`मानवाला दिलेल्या शरीर रचनेप्रमाणे शरीरात मनाचे स्थान महत्त्वाचे आहे. मन स्वस्थ असेल, तर मनुष्याला उत्साह रहातो. तेव्हा मन:स्वास्थ्यासाठी, आपल्याला देवाची पूजा, ध्यान-धारणा यांचे महत्त्व सांगितले आहे; म्हणूनच घरात देवघर असणे आवश्यक आहे. घराचा आकार, कुटुंबियांची धर्माविषयीची धारणा, यांवर देवघराचा आकार अवलंबून असतो. धार्मिक विधी, सणवार हे ऋतुमान आणि कृषी-संस्कृतीप्रमाणे केले जातात. देवघराकरिता स्वतंत्र जागा शक्य नसेल, तर ज्या ठिकाणी थोडा वेळ बसून निवांतपणे ध्यान-धारणा करून मन शांत करता येईल, अशी पूर्वेकडे किंवा ईशान्याकडे स्वयंपाकघरांतील जागा निवडल्यास चालेल. तेथील वातावरण प्रसन्न व पवित्र राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. (दिशाचक्र, पृ. ७२-७३. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
सद्य:स्थिती
आज देवळेसुद्धा आपल्या नवसापोटी बांधण्यात येतात. पुष्कळ व्यापारी, कारखानदार तर आयकर (इन्कमटॅक्स) वाचावा, म्हणून मंदिरे बांधतात. एका शहरात मोठा कारखाना आहे. त्याचे प्रवेशद्वार दक्षिणेला आहे. तसेच केवळ आयकर (इन्कमटॅक्स) वाचविण्यासाठी देऊळ बांधले आहे. आता त्या कंपनीचे दिवाळे वाजल्यामुळे कारखाना बंद आहे. साहजिकच एवढ्या सुंदर बांधलेल्या देवळाकडे दुर्लक्ष होत आहे. (दिशाचक्र, पृ. ७३. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
वास्तूत रहाणार्या कुटुंबाची भूमिका व्यापक झाली की, ते विश्व-कुटुंबात परिणत होते
`कुलदेवतेची स्थापनाही तशीच असते. ती परंपरेने चालत येते. तिची कृपा ही त्या कुटुंबापुरती असलेली भूमिका आपण विश्व-कुटुंबात परिणत करायची असते. स्त्री ही कुटुंबाला माया देते, त्यामुळे ते कुटुंब टिकून असते. तेच स्त्री-पुरुष आपली भूमिका वाढवून, विश्व-कुटुंबाला आपली माया व प्रेम देतात, त्या वेळी ते कुटुंब विस्तारीत व व्यापक होते.' (दिशाचक्र, पृ. ७४. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
आधुनिक वास्तू माणूस आणि निसर्ग यांचा प्रेमळ संवाद साधून, कुटुंबातील
प्रत्येक सदस्याच्या स्वातंत्र्याचा विचार करण्याची विशालता असलेली `निसर्गमित्र
घरे'
`आर्किटेक्ट पँ्रऎक लॉइड राईट यांचे म्हणणे असे, `घरात एकात एक गुंफत गेलेली दालने असावीत. वार्याने इकडून तिकडे सहजपणे जावे, अशी मोकळी रचना असावी. माणूस आणि निसर्ग यांचा प्रेमळ संवाद साधला जावा. त्यात कुटुंबाच्या गरजा, त्यांच्या सोयी व प्रत्येक सदस्याचे स्वातंत्र्य यांचा विचार केलेला असावा.' बांधकामासाठी स्थानिक साधनांचाच वापर व्हावा. लोकांनी स्वत:चे घर स्वत:च बांधावे, म्हणून त्यानी `निसर्गमित्र घरे' हे पुस्तक लिहिले. त्यामुळे निसर्ग घरात आणला आणि घरे निसर्गांत नेली. त्याला त्यानी, `ऑरगॅनिक आर्किटेक्चर', असा शब्द वापरला आहे.' (दिशाचक्र, पृ. ७४. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
विज्ञानाने केलेल्या प्रगतीची देणगी म्हणजे `फ्लॅट-संस्कृती' !
`आधुनिक शास्त्र हे प्रगत झाले आहे', असे आपण म्हणतो; परंतु लोकसंख्या वाढ व कामासाठी खेड्यांतील आणि इतर ठिकाणच्या माणसांचे मोठ्या शहरांकडे धावणे, यांमुळे सध्याच्या परिस्थितीनुसार निसर्गमित्र घरांना वाव नाही व तेथे वरील नियमही पाळता येणे शक्य नाही. जागा तेवढीच असल्याने जास्तीतजास्त विस्तारीकरण होऊन घराचा प्रश्न कायमच आहे. म्हणूनच सध्या `फ्लॅट-संस्कृती' आली आहे व तिचा प्रसार सर्वत्र होत आहे. अनेक मजली इमारती असल्यामुळे, माणसाला आकाशाची भव्यता व मोकळेपणा अनुभवायला मिळत नाही. शुद्ध हवा मिळत नाही. प्रदूषण वाढले आहे. बाहेर व आत प्रदूषणच असल्यामुळे मन:स्वास्थ्य बिघडले आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वणवण करावी लागते. प्रवासातच वेळ जातो, थकून-भागून आलेला जीव रात्री १०-११ वाजता येतो, तेव्हा त्याला विश्रांतीही मिळत नाही. घरात वातावरण प्रसन्न नसते. आजूबाजूला प्रत्येक जण `संपर्क विरहित' रहात असल्यामुळे शेजारधर्मही रहात नाही. वेळप्रसंगी, अडीअडचणीत मदत नसते. तिसर्या-चौथ्या मजल्यावर रहात असल्यामुळे वयोवृद्ध लोकांना चढणे-उतरणे कठीण जाते. कुटुंबाची व्याप्ती कमी झाल्यामुळे विस्तारित कुटुंब त्या वास्तूत सामावू शकत नाही. आई-वडिलांचाही प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. साहजिकच नवरा, बायको व त्यांची एक-दोन मुले यालाच `कुटुंब' म्हणावे लागते.
`फ्लॅट-संस्कृती' जरी परिस्थितीनुसार टाळता येण्यासारखी नसली, तरी मन:शांतीसाठी त्या वास्तूचा विचार करून त्यात तशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे. आजही ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी वास्तूनियमांप्रमाणे घराची व त्यातील परिस्थितीची योजना करतात; परंतु पुढील काळात लोकसंख्यावाढीमुळे व फ्लॅट-संस्कृतीमुळे, `केवळ रहाण्यासाठी व विश्रांतीसाठी घर, हीच वास्तूची व्याख्या राहील', असे वाटते.' (दिशाचक्र, पृ. ७४. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
मानवाचे शरीर हेच त्याचे घर असून ईश्वर तेथे राहून कार्य करतो
`ईश्वराने सर्व दृष्टीने परिपूर्ण बनविलेले आपले शरीर, हे प्रथम आपले घर आहे. त्यात तो स्वत: राहून कार्य करत आहे. म्हणूनच `मानवाने विचाराने व आचरणाने आपले शरीर शुद्ध कसे होईल', हे प्रथम पाहिल्यास त्यात रहाणार्या भगवंतालाही आनंद होईल. परंतु हा विचारच मुळी आपल्याला शिवत नाही. याचा परिणाम म्हणजे दु:ख, प्रेमशून्यता, (ऐकमेकाबद्दल आत्मीयता नसणे) व कृतघ्नता (उपकाराची जाणीव नसणे) निर्माण होते. आपले शरीर हे मंदिर व्हावे, यासाठी तेथे पवित्र वातावरण निर्माण करायला हवे.' (दिशाचक्र, पृ. ७४. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
प्रभूच्या विचारांशिवाय इतर गोष्टींना प्राधान्य मिळत असेल, तर घर हे मंदिर नसून ती केवळ इमारत असणे !
`मनुष्य ज्या वास्तूत रहातो, तेथे प्रभू-विचारांशिवाय इतर गोष्टींना प्राधान्य मिळत असेल, तर ते मंदिर नसून नुसती विटा, रेती व सिमेंट यांची ती इमारत बनेल. तेथे पवित्र वातावरण निर्माण केल्यास ते `समाज-मंदिर' होईल. सर्वच ठिकाणी भगवंताचे अस्तित्व असल्यामुळे ते त्या वास्तूतील वस्तूंमधेही आहे. त्यामुळे ती वास्तू, वास्तूपुरुषरूपी प्रतिकात्मक चैतन्य व आनंद देणारे भगवंताचे स्वरूप म्हणून कार्य करावयास लागेल.' (दिशाचक्र, पृ. ७६. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
वास्तूशास्त्राप्रमाणे वास्तू न बांधल्यास होणार्या त्रासांची काही उदाहरणे
१. घराच्या वर, पूर्व दिशेला पाण्याची टाकी असेल, तर तेथे रहाणार्या लोकांना चांगले असते, उलट ईशान्य दिशेला पाण्याची टाकी असेल, तर स्वास्थ्य बिघडते.
२. पूर्व दिशेला झोपण्याची खोली किंवा स्वयंपाकघर असेल, तर रक्तदाब किंवा मधुमेहाचा आजार होण्याचा संभव असतो.
३. ईशान्य दिशेला शौचालय असेल, तर मानसिक रोग होतात. आर्थिक हानी सहन करावी लागते.
असा या शास्त्रातील नियमांचा अवलंब केल्यास शारीरिक, मानसिक, सांपत्तिक व कौटुंबिक समस्या दूर होण्यास मदत होते.' (दिशाचक्र, पृ. ७९. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)


वास्तूदेवता
व्याख्या व अर्थ
वास्तू म्हणजे एखाद्या मोकळया जागेवर चार भिंती बांधून बंदिस्त केलेली जागा. त्या जागेला छप्पर असो किंवा नसो, ती वास्तुच असते. या जागेची अधिपति देवता म्हणजे वास्तूदेवता. वास्तूतील स्पंदने त्या वास्तूबाहेर जाणवत नाहीत, उदा. एखाद्या खोलीत सूक्ष्मातील सुगंध आला तर तो उंबरठ्याबाहेर जाणवत नाही.
इतर नावे
वास्तूदेव, वास्तुपुरुष. पृथ्वी ही वास्तुपुरुषाची गृहस्वामिनी होय.
कार्य
वास्तूदेवता म्हणजे वास्तूचे शक्तिकेंद्र होय. चांगले-वाईट जे घडत आहे त्याला शक्ति देणे, हे वास्तूदेवतेचे कार्य. त्यामुळे वास्तुदेवता `तथास्तु', म्हणजे `तसे होवो' असे म्हणते, असे समजतात; म्हणूनच घरात अभद्र बोलू नये.
वास्तूदेवतेची शक्ती
फार पूर्वी घरे नव्हती, मनुष्य जंगलात रहायचा. घरे बांधायला लागल्यावर त्याला काही घरे लाभदायक, आनंददायक आहेत, तर काही त्रासदायक आहेत, याची अनुभूति आली. त्यातूनच पुढे वास्तुशास्त्राचा उगम झाला. आनंददायक व त्रासदायक अशी जी वास्तूतील स्पंदने असतात त्यांच्यातील फरक समजून घेण्याआधी आपण प्रथम वास्तूत स्पंदने कशी निर्माण होतात, हे पाहू. रिकाम्या खोलीच्या वास्तूतील स्पंदने पुढील तीन प्रकारची असतात. (स्पंदनांची विस्तृत माहिती `मुद्दा ६ अ. क्षेत्रपालदेवता' यात दिली आहे.)
अ. वास्तूतील जमिनीतून येणार्या लहरी सरळ वर आकाशाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. गोमुखी, व्याघ्रमुखी, गर्दभमुखी आकाराच्या भूखंडांतून तशा आकार व गुणधर्माची स्पंदने येतात. ज्या भूखंडावर वास्तू उभी आहे, त्या भूखंडाच्या संदर्भात असलेली माहिती मुद्दा `६ उ ५' यात दिली आहे. प्रत्यक्ष वास्तूपासून येणार्या स्पंदनांची माहिती मुद्दा `६ उ ६' यात दिली आहे.
आ. `३६० लहरी' वास्तूत गोल (वर्तुळाकार) फिरत रहातात.
इ. वास्तूचे बांधकाम करणारे, तेथे येणारे व तेथे रहाणारे, यांच्या विचारांच्या लहरी भिंतींवर व छतावर आपटून इकडेतिकडे परावर्तित होत असतात.
आकृति `अ' मधील १, २ व ३ पहा.
अ

आ

या तीन लहरींच्या एकमेकांवरील परिणामामुळे एकंदर लहरींचे फिरणे वास्तूत कसेही असते. थोडक्यात त्यांचे स्वरूप गोंधळासारखे असते (आकृति `आ').
घर बांधावयाचा भूखंड चुंबकीय वृत्त : भूखंडाची किंवा घराची एखादी भिंत होकायंत्राच्या काट्याला समांतर, म्हणजे दक्षिणोत्तर हवी.
लांबी-रुंदी
१. चंद्रवेधी भूखंड : पूर्व-पश्चिम लांबीपेक्षा दक्षिणोत्तर लांबी जास्त. हा भूखंड भाग्यदायी ठरतो. चंद्रनाडीप्रमाणे हा शीतलता देतो.
२. सूर्यवेधी भूखंड : पूर्व-पश्चिम लांबीपेक्षा दक्षिणोत्तर लांबी कमी. हा भूखंड हानिकारक ठरतो. सूर्यनाडीप्रमाणे हा तापदायक ठरतो. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ)


`वास्तूदेवता' : सतत फिरणारी वास्तूदेवतेची स्पंदने एकत्र येऊन एका ठिकाणी तिची
मूर्ती तयार होणे हीच `वास्तूदेवता'
वास्तू म्हणजे एखाद्या मोकळया जागेवर चार भिंती बांधून बंदिस्त केलेली जागा. या जागेची अधिपती देवता म्हणजे वास्तूदेवता. वास्तूदेव, वास्तूपुरुष व पृथ्वी ही वास्तूपुरुषाची गृहस्वामिनी होय. वास्तूदेवतेबद्दल सनातनच्या साधिका सौ. कविता विक्रमसिंह पाटील यांना ब्रह्मतत्त्वाकडून मिळालेली माहिती येथे देत आहोत.

वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वास्तूदेवतेने त्या वास्तूमध्ये आपले एक स्थान निवडणे : वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वास्तुदेवता त्या वास्तूमध्ये आपले एक स्थान निवडते. ज्या वेळी तिचे स्मरण त्या वास्तूत होते, तेव्हा वास्तूदेवता आपल्या निवडलेल्या स्थानावर पूर्णपणे (तिच्या वेषभूषेमध्ये) उभी राहून तेथील कुटुंबियांना आशीर्वाद देते. याचाच अर्थ असा की, ज्या वेळी वास्तुदेवता आशीर्वाद देणार असते, तेव्हा तिची सर्व जागेत फिरणारी पवित्रके एकत्र येऊन तिची सूक्ष्मातून मूर्ती बनते. तिच्या या रूपाला `शांती', असे नाव आहे. एरव्ही तिची स्पंदने पूर्ण वास्तूभर गोलाकारात फिरत असतात व लहानसहान वाईट शक्तींची स्पंदने कोणत्याही दिशेतून त्या स्थानात प्रवेश करू नयेत; म्हणून सतत गोलाकार फिरून जागरूक रहात असतात. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
बांधकामात वास्तूदेवतेचे स्थान नसणे म्हणजे तेथे वाईट शक्तींना रहाण्यासाठी प्रवेश : वास्तूचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी वास्तूदेवतेला आवाहन करून रक्षण करण्याबद्दल प्रार्थना केली गेली नाही, तर बांधकाम पूर्ण होण्यामध्ये खूप अडथळे व बाधा आड येतात. कधी कधी तर त्या वास्तूचे बांधकामच काही कारणाने पूर्ण होत नाही किंवा पूर्ण झाले, तरी ती वास्तू तशीच ओस पडते. ना तेथे कोणी राहू शकते, ना कोणी तेथे रहाण्याचा विचार करते. अशा वास्तूवर शेवटी लहानसहान वाईट शक्तीच कब्जा करतात व ती वास्तू म्हणजे भूतबंगला किंवा अर्धवट बांधकाम असणारी म्हणून पडके घर या नावाने ओळखली जाते. भरवस्तीत असूनही अशा वास्तूंकडे समाज पूर्णपणे दुर्लक्ष तर करतोच; पण त्या जागेच्या आजूबाजूला रहाणार्यांना मात्र वाईट शक्तींच्या झळा सहन कराव्या लागतात. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
वास्तूदेवतेने पूजाविधीसाठी तिच्या स्थानावर स्थिर होणे म्हणजेच `वास्तूशांती' : वास्तुदेवतेच्या कृपादृष्टीबद्दल भावभक्तीने कृतज्ञता व्यक्त करून तिचा आशीर्वाद घेणे, यालाच वास्तूशांती, असे म्हणतात. या विधीमध्ये वास्तूतून सर्वत्र नित्य फिरणार्या वास्तूदेवतेच्या पवित्रकांना त्यांच्या स्थानावर (म्हणजेच वास्तूदेवतेचे वास्तूतील प्रकट होण्याचे स्थान) पूजाविधि होईपर्यंत शांत रहाण्यासाठी विनंती केली जाते. त्या वेळी वास्तूतून फिरणारी वास्तूदेवतेची सर्व पवित्रके एका स्थानावर (वास्तूदेवतेचे स्थान प्रथमपासून ठरलेले व एकच असते. ते कधीही बदलत नाही.) स्थिर होतात किंवा शांत होतात. पवित्रकांच्या याच अवस्थेला `शांती अवस्था', असे म्हणतात. पूजाविधीनंतर वास्तुदेवता `ॐ शांति:, शांति: शांति: ।' या मंत्राचा उच्चार करते व आपल्या हातातून त्या मंत्राची शक्ती त्या वास्तूत प्रक्षेपित करते. याला वास्तूदेवतेचा कृपाशीर्वाद मिळाला, असे म्हणतात. सूक्ष्मातील जाणणार्यांना कधी कधी वास्तूदेवतेच्या दर्शनाबरोबरच या मंत्राचा नादही ऐकायला येतो. आंब्याची टहाळी पाणी भरलेल्या तांब्याच्या लोट्यात घालून तो कलश वास्तूचे स्थान (सूक्ष्मातून स्थान शोधून काढलेले असते) किंवा देवघरात स्थापन करून त्यावर नित्यनेमाने फुले वाहिली जातात व वास्तूसाठी नामजप केला जातो. अशा वास्तूमध्ये नित्य आशीर्वाद देण्यासाठी वास्तूदेवता आपल्या स्थानावर सू्क्ष्मातून प्रकट होत असते. त्यामुळे रोजच वास्तुशांती केल्याचे फळ त्या वास्तूतील कुटुंबियांना मिळत असते. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
वास्तूदेवता ही भूमीकन्या असून, आम्रपर्णांच्या तोरणाने तिची जास्तीतजास्त पवित्रके कार्यस्थळी आकृष्ठ होणे व तिचा नैवेद्य म्हणजे दहीभात : वास्तूदेवता पंचतत्त्वापासून निर्माण झाली आहे. ती भूमिकन्या असल्याने तिला मृतिकेचाच सुगंध आहे. ती तेज तत्त्वाची उपासना करत असल्याने व सतत भ्रमण करत असल्याने तिला दहीभाताचा थंड नैवेद्य द्यावा लागतो. आम्रवृक्षावर व वृक्षाच्या खाली वास्तूदेवतेची जास्त पवित्रके आढळतात. तेथे त्यांचा वास असतो; म्हणूनच शुभकार्याच्या वेळी आम्रपर्णांचे तोरण बांधणे, आम्रपर्णांचाच मंडप घालणे, ठिकठिकाणी आम्रवृक्षाच्या डहाळया बांधणे इत्यादी आवर्जून केले जाते. असे केल्याने वास्तूदेवतेची जास्तीतजास्त पवित्रके कार्यस्थळी आकृष्ठ होऊन वास्तूदेवतेचा कृपाशीर्वाद मिळतो. सर्वसामान्यपणे नैवेद्य देण्याची पद्धत म्हणजे सर्व स्थानात दहीभाताची शीते नामजप करत उधळणे; कारण वास्तूदेवता जास्त वेळ स्थिर राहू शकत नाही. ती फिरतच भोजन करते. वास्तूदेवता तेजतत्त्वाची उपासक असल्याने ती सात्त्विक लहरी प्रक्षेपित करते. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
स्थानदेवता
स्थानदेवतेने मूर्तीरूप धारण केल्यानंतरच तिचे सूक्ष्मातून दर्शन होणे : वास्तूदेवतेप्रमाणेच स्थानदेवतेची स्पंदनेही सतत त्या स्थानात फिरत असतात. त्या स्पंदनांनी एकत्र येऊन स्थिर होऊन मूर्तीरूप धारण केल्यानंतर स्थानदेवतेचे रूपही सूक्ष्मातून पहायला मिळते. म्हसोबा, वीर इत्यादी स्थानदेवता होत. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
संतांपुढे स्थानदेवता तिच्या स्थानासहित प्रकट झाल्यावर स्थानदेवतांची स्थाने निश्चित होणे : एखाद्या स्थानात गेल्यानंतर `येथील स्थानदेवतेचे स्थान कुठे असेल ?', असा संतांच्या मनात फक्त विचार जरी आला, तरी स्थानदेवता त्यांना साक्षात् आकार धारण करून दर्शन देते. तिचे स्थान संतांना शोधावे लागत नाही. सूक्ष्मातूनच स्थानदेवता त्यांच्या पुढ्यात स्थानासहित उभी रहाते. अशाच प्रकारे आतापर्यंतची स्थानदेवतांची स्थाने निश्चित केली गेली आहेत. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
प.पू. डॉक्टर : स्थानदेवता त्यांच्या पुढ्यात स्थानासहित उभी रहाते. स्थानासहित म्हणजे काय ?
ब्रह्मतत्त्व : ज्या स्थानदेवतांचे स्थान भक्तांना निश्चित झालेले नाही किंवा स्थानदेवतेचे पूजन व अर्पण चुकीच्या ठिकाणी होत असेल, अशा वेळी त्या स्थानात संतांचे आगमन झाल्यानंतर स्थानदेवता संतांचे लक्ष तिच्या नेमक्या (निश्चित) स्थानावर पुन:पुन्हा आकर्षित करत असते. आपली नजर किंवा लक्ष पुन:पुन्हा नेमक्या ठिकाणावर जाऊन का स्थिर होत आहे, याची जिज्ञासा झाली की, मग स्थान देवता त्या स्थानात काही क्षण आकारते; म्हणून याला स्थानासहित, असे म्हणतात. (काही काही स्थानदेवतांचे स्थान झाडाच्या ढोलीत, पाण्याने भरलेल्या विहिरींच्या भिंतींच्या खाचेतील दगडांवर, अशा ठिकाणीही असते.) (१.४.२००४, सायं. ८.३०)
स्थानातील लहानसहान वाईट शक्तींना दमदाटी करून ताब्यात ठेवणे, हे स्थानदेवतेचे कार्य असल्याने ती तमोगुणी असणे : स्थानदेवता ही कनिष्ट पुरुषदेवता आहे. ती तमोगुणी असते. तिला भगवान शंकराचा कृपाशीर्वाद लाभलेला असतो. स्थानातील लहानसहान वाईट शक्तींना दमदाटी करून स्थानात प्रवेश न देणे किंवा सतत त्या वाईट शक्तींना स्वत:च्या ताब्यात ठेवणे, हेच स्थानदेवतेचे कार्य. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
दगड किंवा नारळ हे स्थानदेवतेचे स्थान : स्थानदेवतेला स्थानातील तिच्या स्थानात दगडावर, नारळांवर वगैरे रहाण्यासाठी स्थान दिलेले असते. पूजनाच्या वेळी व नैवेद्याच्या वेळी स्थानदेवता आपल्या स्थानावर प्रकट होत असते. एरव्ही ती सतत भ्रमण करत असते. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
स्थानदेवतेला मांसाहार आवडत असल्याने मांसाहार मिळाला नाही, तर ती रागावते व स्वप्नात येऊन तिच्या आवडीचा आहार मागते : स्थानदेवतेला मांसाहार करायला आवडतो. तिला मांसाहार दिला नाही, तर ती त्या स्थानातील लोकांवर रागावते व स्वप्नदृष्टांत देऊन कोंबडा, अंडे, दारू, पानाचा विडा वगैरे मागते. स्थानदेवता स्थानातील भुताखेतांवर पाळत ठेवून, त्यांना दमदाटी करत असल्याने तिच्याकडे तमोगुणच असावा लागतो; म्हणूनच ती मांस भक्षण करते. स्वप्नदृष्टांतात बोलतांनासुद्धा कधी कधी ती दारूच्या नशेतच बोलत असते. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
स्थानदेवतेला पानाचा विडा खाण्याचे प्रचंड व्यसन व तमोगुणी असल्याने पावलांचा आवाज करत चालण्याची पद्धत : स्थानदेवता सतत पान चघळत असते. तिला पान खाण्याचे प्रचंड व्यसन असते. विड्याचा तोबरा सतत तोंडात असल्याने स्थानदेवतेचे उच्चार बोबडे बोलल्याप्रमाणेच होतात. तसेच स्थानदेवता तामसिक व राजसिक वृत्तीची असल्याने ती पावलांचा आवाज करत चालते. अमावस्येच्या रात्री वाईट शक्तींचा दाब प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने स्थानदेवतेलाही जास्त प्रमाणात कार्यरत व्हावे लागते. अमावस्येच्या रात्री स्थानदेवता चालतांना तिच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकायला येतो. स्थानदेवतेच्या जोराने चालण्याचा आवाज फक्त तिच्या स्थानातील लोकच ऐकू शकतात. बाहेरील लोकांना तो आवाज ऐकायला येत नाही. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४ सायं. ४.५० वा.)
स्थानदेवतेच्या मनाविरुद्ध कृति झाल्यास ती रागवते व तिचा राग शांत करण्यासाठी ितिच्या आवडीचे भोजन देणे आवश्यक
: स्थानदेवतेच्या स्थानात तिच्या मनाविरुद्ध काही कृति झाल्यास ती तात्काळ रागावते. तिचा राग शांत करण्यासाठी तिला हवे ते भोजन द्यावे लागते. - ब्रह्मतत्त्व (२७.२.२००४, सायं. ४.५० वा.)


मंदिराचे वास्तूशास्त्र
कु. मधुरा भोसले
मंदिराच्या वास्तूशास्त्राविषयी सनातनच्या रामनाथी आश्रमातील
येथील साधिका कु. मधुरा भोसले यांना ईश्वराकडून मिळालेले
ज्ञान येथे देत आहोत.
व्याख्या
`पृथ्वीवरील भगवंताचे स्थान म्हणजे मंदिर. मंदिराला `देऊळ' हा एक समानार्थी शब्द आहे. देऊळ हा शब्द `देव उळ' या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. त्याचा अर्थ `देवाने जवळ येणे.' निर्गुणातील देव देवळातील मूर्तीच्या माध्यमातून आपल्या जवळ आलेला असतो.
महत्त्व
हिंदूंची मंदिरे म्हणजे ईश्वराने मानवाला दिलेली अभूतपूर्व भेटच आहे. कलियुगातही मंदिरांमुळे भूतलावरील सात्त्विकता टिकून आहे.
मंदिरांचे कार्य वातावरणातील सात्त्विकता व विशिष्ट देवतेचे तत्त्व वाढवणे
मंदिरांमुळे आजूबाजूच्या वातावरणातील सात्त्विकता वाढते. त्याचबरोबर ज्या देवतेचे मंदिर असते, त्या देवतेचे तत्त्व त्या परिसरात जास्त प्रमाणात कार्यरत असते. या व्यतिरिक्त मंदिरांच्या माध्यमांतून जे सूक्ष्म-कार्य होते, त्याची कल्पनाही आपल्याला नसते.
मंदिरात कासव असण्याचे महत्त्व
श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असणे
कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी', अशी इच्छा निर्माण झाली. कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्याच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्यासमोर कासव असते.
कासवाचे गुण
१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.
२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.
३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीका इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी रहाते.
कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याचा भावार्थ
कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते', असा आहे.
- ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २५.१.२००५, सायंकाळी ७.०७ ते ७.५१)


वास्तूशास्त्र महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने भारतीय संस्कृतीवर आधारित आहे; मात्र सध्या या शास्त्रामध्ये पाश्चात्त्य संस्कृतीचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. `कला' व `शास्त्र' या दोन्ही नजरेतून पहाण्यासारखे हे वास्तूशास्त्र आधुनिकतेच्या पाशात अडकलेले आहे. परिणामी या शास्त्राकडे केवळ कलेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ लागले आहे. वास्तूशास्त्र अभ्यासक्रमात होत असलेला हा बदल पहाता भविष्यात वास्तूशास्त्र महाविद्यालयांमधून बाहेर पडणार्या वास्तूशास्त्र अभ्यासक्रमातील पदवीधरांंची वैचारिक बैठक ही भारतीय संस्कृतीवर आधारित वास्तूशास्त्राप्रमाणे असेलच, याची तीळमात्र खात्री वाटत नाही. वास्तूशास्त्र व त्यामध्ये होणारे बदल यांवर आधारित जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स वास्तूशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य राजन वाकुळे यांनी दैनिक `सनातन प्रभात'चे प्रतिनिधी श्री. नित्यानंद भिसे यांच्याकडे व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत.
ज्याप्रमाणे भारतीय संगीतशास्त्रावर पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण झाले आहे. त्याप्रमाणेच वास्तूशास्त्रावरही पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा बसत चालला आहे. या क्षेत्राकडे `शास्त्र' व `कला' या दोन्ही दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता असतांना मात्र वास्तूशास्त्र अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेले विद्यार्थी याकडे केवळ कलेच्या माध्यमातूनच अधिकाधिक पाहू लागले आहेत. परिणामी वास्तूची संरचना शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करण्याऐवजी सोयीसुविधांसह आकर्षक पद्धतीने कशी होईल, एवढ्यावरच हे शास्त्र सीमित राहिले आहे, असे `जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स महाविद्यालया'च्या वास्तूशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य राजन वाकुळे म्हणाले.
भारतीय संगीतात `पॉप'चा समावेश झाला. तसेच वस्त्रनिर्माण क्षेत्रातही पाश्चात्त्यांची अतिशय तोकड्या कपड्यांची `फॅशन' रूढ झाली. अशा प्रकारे पाश्चिमात्य संस्कृतीचा सर्व भारतीय शास्त्रांवर परिणाम होऊ लागलेला आहे. त्यामधून वास्तूशास्त्रदेखील सुटलेले नाही. पाश्चात्त्य लोकांच्या राहणीमानाची पद्धत स्वीकारण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे वास्तूशास्त्र महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी या शास्त्राकडे आधुनिकतेच्या नजरेतून पाहू लागले आहेत. वास्तू ही डोळयाने दिसत असते. त्यामुळे `जी वस्तू दिसते तिच्याप्रति मनात भावना उत्पन्न होत असतात.' या सूत्राप्रमाणे वास्तू सर्वसमृद्ध बनवणे, अशी सर्वसाधारण धारणा निर्माण होत असते. त्यासाठी शयनगृहात किंवा दिवाणखान्यात गेल्यावर त्या-त्या प्रकारच्या भावना कशा उत्पन्न होतील, त्या दृष्टीने घराची संरचना कशी करता येईल, असाच विचार या अभ्यासक्रमातील विद्यार्थी सध्या प्रामुख्याने करतात, असेही प्राचार्य वाकुळे म्हणाले.
हे शास्त्र आदिमानवापासून निर्माण झाले आहे. आदिमानवाच्या काळात सुरक्षित वातावरणात एकत्र रहाणे, ही संकल्पना सर्वप्रथम समोर आली. तेव्हापासून वास्तूशास्त्राच्या निर्मितीला प्रारंभ झाला. त्या वेळी केवळ आसर्यासाठीच निवारा इथपर्यंत ही संकल्पना मर्यादित होती. त्यानंतर माणूस याकडे शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहू लागला. घराची निर्मिती करतांना वातावरणशास्त्राचाही अभ्यास सुरू झाला. सूर्य व वारा यांची दिशा पाहून वास्तू बांधणे, दक्षिण दिशेच्या बाजूला कमीतकमी खिडक्या बांधणे, पश्चिम दिशेला पाण्याची व्यवस्था करणे, त्यामुळे सूर्य किरणे घरात आल्याबरोबर नैसर्गिक प्रक्रियेतूनच पाण्याची शुद्धी होईल, दरवाजाची दिशा `पूर्व' दिशेला ठेवणे आदी उदाहरणादाखल काही बाबी सांगता येतील. या सर्व बाबींमागे शास्त्र आहे. या संपूर्ण शास्त्रावरच वास्तूशास्त्राची निर्मिति झालेली आहे. वास्तूशास्त्र अभ्यासक्रमामध्ये प्रथम व द्वितीय या वर्षांमधील अभ्यासक्रमात भारतीय हिंदु वास्तूशास्त्राची सविस्तर माहिती दिली जाते. त्याबरोबर द्रविडीयन, जैन, इस्लाम व ख्रिस्तीयांच्याही वास्तूशास्त्रासंबंधीच्या संकल्पना अभ्यासल्या जातात; परंतु भारतीय वास्तूशास्त्रामध्ये वैविध्यता आढळून येते. म. गांधीजींनी `भारतात दर १४ मैलांवर भाषा बदलते, त्याप्रमाणे वास्तूचे स्वरूपही बदलत असते', असे म्हटले आहे. ते तंतोतत खरे आहे. मुंबई उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, राजाभाई टॉवर किंवा छत्रपति शिवाजी टर्मिनल या सर्व वास्तूंची निर्मिती वास्तूशास्त्राप्रमाणे झालेली आहे. शंभर ते दीडशे शतकांची परंपरा या वास्तू दर्शवतात. त्यामुळे हे शास्त्र काळाचे द्योतक आहेत. अशा प्रकारे वास्तूशास्त्राचा जसा सांस्कृतिक, आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्राशी संबंध येतो, तसा सामाजिक क्षेत्राशीदेखील संबंध येतो. ही वास्तूशास्त्रामधील विशेष बाब आहे; परंतु आता जसजसा विकास वाढत चालला आहे, तसतसा या शास्त्रामधील मूळ गाभा बदलला जाऊ लागला आहे. या शास्त्रामागील उद्देश कालबाह्य होऊन त्या ठिकाणी `इंटिरीयर डेकोरेशन'च्या नावाखाली आधुनिकता येऊ लागली आहे, असेही प्राचार्य वाकुळे म्हणाले.


दिशांच्या दृष्टीने वास्तूशास्त्र व आधुनिक तज्ञांची मते
मनुष्याचे जीवन सुखकर होण्यासाठी ऋषीमुनींनी संशोधन केलेले वास्तूशास्त्र
`मनुष्याने आपले जीवन सुखकर व्हावे; म्हणून नैसर्गिक-प्राकृतिक नियम समजून घेऊन त्यांचा उपयोग करून घेतला. ऋषीमुनींनी या बाबतीत बरेच संशोधन करून संस्कार, विधी व यज्ञ यांमध्ये दिशांचा उपयोग करून घेतला. एवढेच नव्हे, तर वास्तूशास्त्रातही दिशांचा काय उपयोग आहे, हे दाखवले. त्या शास्त्राप्रमाणेच पूर्वी बांधकाम करत असत.
सूर्य, चंद्र व नक्षत्रे इत्यादीकांचा या भूतलावरील वस्तंूवर परिणाम होत असल्यामुळे, जो शास्त्राप्रमाणे वास्तू बांधतो त्याला सुख मिळते
`महर्षी महेश योगी सध्याचे वेदाचे पंडित असून विश्वविद्यालयाद्वारे वेदाचा प्रचार करत आहेत. ते म्हणतात, `स्थापत्यवेदाचा महिमा वेदाप्रमाणे महान आहे. स्थापत्यवेदाप्रमाणे जर नगर व ग्राम यांमधील घरांचे बांधकाम झाले नसेल, तर त्यांत रहाणार्या लोकांचे स्वास्थ्य व मानसिक स्थिती चांगली रहात नाही. कुटुंबात तसेच बाहेरच्या जीवनात, सर्वच क्षेत्रांत सफलता मिळत नाही. त्यामुळे चिंता व असफलता यांच्या प्रभावात मानव नेहमी रहातात. याचे कारण म्हणजे सूर्य, चंद्र व नक्षत्रे इत्यादीकांचा या भूतलावरील वस्तंूवर होणारा परिणाम होय. याचे विधान वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांमध्ये आहे. जो शास्त्राप्रमाणे वास्तू बांधतो त्याला
सुख मिळते.' (दिशाचक्र, पृ. ७९. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)
भारतीय वास्तूशास्त्र हे युरोपमधील वास्तूशास्त्रापेक्षा जास्त समृद्ध व प्रभावशाली आहे !
`दक्षिण भारतातील प्रसिद्ध वैदिक वास्तूकार, तसेच महर्षी वैदिक
विश्वविद्यालयाचे प्राध्यापक, श्री. क्यामी प्यागुर कृष्णन् नम्बुद्रिपाद
यांच्या कथनानुसार, `भारतीय वास्तूशास्त्र हे युरोपमधील
वास्तूशास्त्रापेक्षा जास्त समृद्ध व प्रभावशाली आहे. युरोपमधील
वास्तूशास्त्र लांबी, रुंदी, उंची व वेळ या चार भागांत विभागले आहे, तर
भारतीय वास्तूशास्त्रात लांबी, रुंदी, उंची, वेळ (दिशांसहित), खोली, नृत्य,
संगीत, अध्यात्म व आकाशीय ऊर्जा असे ९ आयाम आहेत. या गोष्टी लक्षात न घेता
वास्तूचे बांधकाम केल्यामुळे पुढे त्रास सहन करावा लागतो.'
घराची रचना शास्त्रानुसार केल्यास चांगली फळे मिळतात
`भारतीय वास्तूशास्त्र हे ऋषीमुनींनी लिहिलेले, त्रिकालाधित असे शास्त्र असून या शास्त्रानुसार आपल्या वास्तूची रचना
केलेली असेल, तर निश्चितच चांगली फळे मिळतात; तसेच रचना चुकीची असेल, तर त्यावर, `उपाय आहेत', असे ठाम प्रतिपादन वास्तूशास्त्रज्ञ अँड्. अरविंद वझे यांनी केले आहे.' (दिशाचक्र, पृ. ८३. प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला)



 सौ. अंजली गाडगीळ
हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे धार्मिक विधी केले जात नाहीत किंवा कित्येकदा धार्मिक विधी नेमके कसे करायचे व का करायचे यामागचे शास्त्र माहीत नसते. सनातनच्या साधिका सौ. अंजली गाडगीळ यांना `एक विद्वान' यांच्याकडून मिळालेली गृहप्रवेशाच्या वेळी करावयाच्या धार्मिक विधींचे ज्ञान व सौ. कविता पाटील यांना ब्रह्मतत्त्वाकडून वास्तूशांतीच्या संदर्भात मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
गृहप्रवेश करण्याचे महत्त्व काय ?
(गृहप्रवेशानंतर वास्तूदेवतेने इतर कनिष्ठ देवतांच्या साहाय्याने आठही दिशा मोकळया करून देणे व स्थानदेवतेच्या अस्तित्वामुळे वास्तूभोवती सूक्ष्म लहरींचे मंडल तयार होणे)
गृहप्रवेश करण्याचा विधि करून त्यानंतर वास्तूशांतीचा विधि करावा. गृहप्रवेश करणे, म्हणजे वास्तूभोवती असलेल्या आठही दिशा मोकळया करणे. गृहप्रवेश विधीमध्ये प्रथम वास्तूमध्ये पाण्याने भरलेल्या कलशाची स्थापना करून या कलशावरील नारळातून प्रक्षेपित होणार्या लहरींच्या साहाय्याने आठही दिशांतील त्रासदायक स्पंदनांचे उच्चाटन केले जाते व त्यानंतर वास्तूदेवतेला आपली वास्तू अर्पण करून तिला आपल्या वास्तूचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना केली जाते. जमिनीवर अक्षता ठेवून त्यावर कलशाची स्थापना करून वास्तूदेवतेला कायमचे स्थान दिले जाते. वास्तूदेवता ही इतर कनिष्ठ देवतांच्या साहाय्याने आपल्याला आठही दिशा मोकळया करून देते. स्थानदेवतेच्या अस्तित्वामुळे वास्तूभोवती सूक्ष्म लहरींचे मंडल तयार होते. - एक विद्वान (१६.१.२००५, सायं. ७.४८)
गृहप्रवेश करतांना पुढे यजमान व मागे सुवासिनी, |