कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !
१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !
२. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !
पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !
१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन
विश्वाच्या उत्पत्तीचा विचार
हल्ली शोधलेले विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्तातील सिद्धान्तांशी जुळतात !
खगोलशास्त्रावर प्रभुत्व
असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !
कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्हास करणारे आधुनिक विज्ञान
|