दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

    कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

    १. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

    २. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


    पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

    १८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


    विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

    हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


    खगोलशास्त्रावर प्रभुत्व

    असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

    कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


    सनातनची सात्त्विक उत्पादने

    १. ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?

    २.  ग्रंथ - सोळा संस्कार

    ३.  ग्रंथ - देवघर व पूजेतील उपकरणे

    वितरणासाठी संपर्क

    • मुंबईः ३२४३५६९९

    • ठाणेः ९३२२६५२५८०

    • रायगडः २७४५०३३८

    • पुणेः ९४२२४३७१३४

    • जळगावः ९४२३०५६४०३

    • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

    • नाशिकः ९४२२४४१७८२

    • इ-मेलः dainik@sanatan.org


रथसप्तमी
विषयक - आध्यात्मिक माहिती
 

अनुक्रमणिका

 

 

रथसप्‍तमी
 

कु. मधुरा भोसले

हिंदुधर्म व भारतीय संस्कृति यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण व उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण व इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृति सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी `रथसप्‍तमी' हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते. सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांना रथसप्‍तमी व सूर्य यांच्याविषयी ईश्‍वराकडून मिळालेली माहिती पुढे देत आहोत.

महत्त्व
सर्व संख्यांमध्ये `सात' या अंकाचे महत्त्व विशेष आहे. `सात' या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादि सूक्ष्म-लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्‍तमी या तिथीला शक्‍ति व चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्त्व आणि शक्‍ति, आनंद व शांति यांच्या लहरी २० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्‍तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या (अतिसूक्ष्म सूर्यतत्त्वाच्या) लहरी इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात.

सूर्य

अ. सूर्योपासनेचे महत्त्व : भारतीय संस्कृति व हिंदुधर्म यांत सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे.

१. सूर्योपासनेमुळे जिवाची चंद्रनाडी बंद होऊन सूर्यनाडी लवकर जागृत होण्यास मदत होते. चंद्राच्या उपासनेपेक्षा सूर्याची उपासना करणे अधिक श्रेष्ठ असते.

२. सूर्याच्या उपासनेने सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता ३० टक्क्यांनी व चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता २० टक्क्यांनी वाढते.

३. सकाळी सूर्याला अर्घ्य देऊन त्याचे केवळ दर्शन घेतले, तरीही तो प्रसन्न होतो. त्याचे दर्शन घेणे, हा त्याच्या उपासनेतील एक भागच आहे.

४. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक केल्याने डोळ्यांची क्षमता वाढते व नेत्रज्योत अधिक प्रबळ होते.

५. पंचतत्त्वांच्या उपासनेत सूर्योपासना करणे (तेजतत्त्वाची उपासना करणे), हा महत्त्वाचा टप्पा आहे.

६. सूर्यनमस्कार घालणे : योगासनांपैकी सूर्यनमस्कार घालणे हा महत्त्वाचा व्यायामप्रकार आहे. यात सूर्याला स्थूल शरीराचा वापर करून नमस्कार करायचा असतो. किमान २० वर्षे रोज नित्याने सूर्यनमस्कार घातल्यावर सूर्यदेवता प्रसन्न होते.

आ. कार्य : हे कार्य स्थूल-नेत्रांनी जो सूर्य दिसतो, त्याचे नसून सूक्ष्मातील सूर्याच्या कार्याबाबतचे आहे. सूर्य जरी स्थिति संदर्भातील कार्य करत असला, तरीही साधनेला पूर्णत्व येण्यासाठी त्याच्याकडून उत्पत्ति व लय यांबाबतही कार्य झालेले आहे.

आ १. उत्पत्तीच्या संदर्भातील माहिती

आ १ अ. स्थूल : सूर्यदेवतेपासून यम व शनि या देवता पुत्ररूपाने, तर तपी व यमी या देवी पुत्रीच्या रूपाने निर्माण झाल्या. यमीपासून यमुना नदीची निर्मिति झाली, तर तपीपासून तापी नदीची निर्मिति झाली.

आ १ आ. सूक्ष्म
१. सूर्यमंडलातील ग्रह व नक्षत्रलोक, शनिलोक आणि ग्रहलोक या सर्व उपलोकांची निर्मिति सूर्यापासूनच झाली आहे.

२. तेज, तेजयुक्‍त चैतन्य व केवळ पहिल्या स्तराच्या चैतन्यापैकी ३० टक्के चैतन्य हे सूर्यापासून निर्माण झाले आहे.

३. सुदर्शनचक्र, सूर्यास्त्र, तेजतत्त्वाशी संबंधित बाण व अस्त्रे यांची निर्मिति सूक्ष्म-सूर्यापासून झाली आहे.

४. सूर्याने त्याचे तेज देवतांची विविध शस्त्रे व अस्त्रे यांना प्रदान केले आहे. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे दिव्य व तेजस्वी दिसतात.

आ २. स्थितीच्या संदर्भातील माहिती

आ २ अ. स्थूल :
सूर्यदेवता दररोज स्थूलातील सूर्याच्या रूपाने येऊन ब्रह्मांडातील विविध ग्रहांना व जिवांना ऊर्जा आणि प्रकाश देते. अशा प्रकारे सूर्यदेवता त्यांचे संगोपनच करते.

२ आ २ आ. सूक्ष्म : सूर्यदेवतेकडून स्थूलातून प्रक्षेपित होणारा प्रकाश व ऊर्जा यांच्याबरोबरच मोठ्या प्रमाणात चैतन्यही प्रक्षेपित होत असते. त्या चैतन्यामुळे अनेक जिवांना साधना करण्यासाठी शक्‍ति मिळते. तसेच त्यांचे मन व बुद्धि यांवरील आवरण कमी होऊन त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होते.

आ ३. लयाच्या संदर्भातील माहिती

आ ३ अ. स्थूल :
सूर्याच्या उष्णतेने सरोवरे व नद्या यांतील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. त्यामुळे अनेक वेळा नद्या व सरोवरे सुकून जातात. अति उष्णतेमुळे अनेक वनस्पती जळून जातात, तसेच जिवांनाही त्रास होतो व काही जण मृत्यूमुखी पडतात.

आ ३ आ. सूक्ष्म : सूर्याचा प्रकाश व उष्णता यांमधून सूर्याचे सूक्ष्म-तेज प्रक्षेपित होत असते. या सूक्ष्म-तेजामुळे सूक्ष्मजंतू व रज-तमात्मक सूक्ष्म-जिवांचा नाश होतो. त्यामुळे वायुमंडलातील रज-तमाचे प्रमाण कमी होऊन सात्त्विकता वाढते व त्रिगुणांचा समतोल राखला जातो.
सूर्य उगवल्यानंतर तो दिवसभर आकाशात असतो व सायंकाळी त्याचा अस्त होतो. सूर्याचे हे उत्त्पत्ति, स्थिति व लय यांचे कार्य अनुक्रमे सुरू असते.

इ. सूर्याचे गुण
इ १. नित्योपासना : सूर्याची ऋषींप्रमाणे सतत नारायणाची उपासना सुरू असते.
इ २. शिस्त : सूर्य वेळेचे पालन काटेकोरपणे करतो.
इ ३. त्याग : सूर्य स्वत:च्या जवळील तेज, ऊर्जा व चैतन्य स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतरांना देतो. इतर कनिष्ठ देवतांच्या तुलनेत सूर्याची चैतन्य ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वाधिक असते.
इ ४. व्यापकत्व : ब्रह्मांडातील विविध जिवांना सूर्य निरपेक्षपणे तेज, ऊर्जा व चैतन्य देत असतो.
इ ५. समष्टिभाव : सूर्य हा त्याच्याकडील तेज व ऊर्जा त्याच्या लोकापुरती मर्यादित न ठेवता विविध लोकांतील जिवांनाही प्रक्षेपित करतो. त्यासाठी तो सतत भ्रमण करीत असतो. समष्टि भाव जास्त असल्यामुळे त्याच्यात उच्च देवतांचे २० टक्के गुण आहेत.
इ ६. ज्ञानदान व सूक्ष्मातून मार्गदर्शन करणे : ज्ञान म्हणजे प्रकाश होय. प्रकाश हे ज्ञानाचे एक रूप आहे. सूर्य ज्ञानासंदर्भातही कार्य करतो. त्यामुळे त्याच्याकडून सूक्ष्म अशा ज्ञानलहरी व ज्ञानप्रकाशलहरी प्रक्षेपित होत असतात. या ज्ञानलहरींच्या माध्यमातून तो ३० टक्के इतके ज्ञान देऊ शकतो. कर्णाला सूर्यदेवता रोज दर्शन देत असे व सूक्ष्मातून मार्गदर्शन करत असे. याचा महाभारतात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो.

इ ७. उत्तम गुरु : सूर्य शास्त्र व शस्त्रकला या दोन्हीमध्येही निपुण आहे. या दोन्ही कला अवगत करण्यासाठी रुद्रावतार मारुति सूर्यलोकात गेला होता. तेव्हा त्याला सूर्याने `गुरु' म्हणून उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. तो इतरांना ज्ञानप्रकाश देऊन त्यांच्या जीवनातील स्थूल व सूक्ष्म अहंकाररूपी तिमिर नष्ट करतो.

इ ८. उत्तम पिता : सूर्याने त्याचे पुत्र व पुत्री यांच्यासाठी आवश्यक ती सर्व कर्तव्ये वेळोवेळी पूर्ण केली. ब्रह्मांडातील सर्व जिवांप्रति तो पित्याच्या दृष्टीनेच पहातो व त्यांना मदत करतो.

इ ९. क्षात्रभाव : इंद्र हा सर्व कनिष्ठ देवतांचा प्रमुख आहे. सूर्यदेवता इंद्राच्या अधिपत्याखाली असली, तरीही इंद्राने अयोग्य निर्णय दिल्यावर ती त्याला विरोध करते व इंद्राच्या अयोग्य आज्ञेचे पालन करत नाही. पुढे येणार्‍या वाईट काळात (धर्मयुद्धाच्या वेळी) कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवता ही क्षात्रवीर व धर्मवीर साधकांना आणि धर्माच्या बाजूने लढणार्‍यांना सर्वाधिक प्रमाणात मदत करील. कनिष्ठ देवतांपैकी सूर्यदेवतेमध्ये सर्वाधिक सात्त्विकता, व्यापकत्व, त्याग, समष्टि भाव व क्षात्रभाव असतो.

इ १०. समभाव : सूर्य सर्वच जिवांकडे समदृष्टीने पहातो. तो गुणग्राहक आहे. त्यामुळे तो कोणावरही अन्याय करत नाही. याचे उदाहरण म्हणजे मारुतीमध्ये शनीच्या तुलनेत शिष्याचे गुण जास्त प्रमाणात असल्यामुळे सूर्याने त्याला शिष्य म्हणून स्वीकारले व ज्ञान आणि विविध विद्या दिल्या.
- ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १०.२.२००५, सकाळी ६.२० ते ९.०९)

ई. सूर्याचा रथ व त्याचे पूजन : सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भुवलोक, नागलोक, स्वर्गलोक व स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्‍त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथाची गति आवश्यकतेप्रमाणे बदलते. सूर्यदेवतेच्या इच्छेप्रमाणे रथ वायुमंडलात उड्डाण करतो. रथाच्या सोन्याच्या चाकांवर संपूर्ण सूर्याचे चित्र नाजूकपणे कोरले आहे. त्या चित्रातून सूर्याचे तेज व तेजतत्त्व हे आजूबाजूला ३० टक्के प्रक्षेपित होत असते. श्रीविष्णूच्या कृपाशीर्वादामुळे व तेजतत्त्वाच्या प्रक्षेपणामुळे रथाभोवती संरक्षककवच निर्माण झालेले असते. त्यामुळे सूर्यदेवतेच्या कार्यात वाईट शक्‍ती अडथळा आणू शकत नाहीत.

सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते. रथ हे तिचे वाहनच आहे. देव देवळात असल्यामुळे देवळाला महत्त्व प्राप्‍त होते. तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे `रथसप्‍तमी'ला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते.

उ. सूर्याच्या सारथ्याचे गुण : अरुण हा सूर्याचा सारथी आहे. त्याच्यात सूर्याचे ४० टक्के गुण अहेत. तो केवळ एकाच डोळयाने पाहू शकतो. `एकत्वाकडे जाणे व आहे त्या परिस्थितीत चांगल्या प्रकारे सेवा करणे', हे गुण त्याच्याकडून शिकायला मिळतात.

ऊ. सूर्यलोक : स्वर्गलोकाच्या बाजूला सूक्ष्म-सूर्यलोक आहे. सूक्ष्म-सूर्यलोकात पंचमहाभूतांपैकी सूक्ष्म-तेजतत्त्वाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त असते. दिव्य प्रकाश, अग्नि व अग्नीच्या ज्वाळा दिसणे आणि उष्णता जाणवणे हे तेजाचे स्थूलरूप आहे. त्यांची अनुभूति सूर्यलोकात येते. अनेक जिवांची पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने त्यांना सूर्यलोकात जाता येत नाही. पातळी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास तेजतत्त्वाची उपासना करता येत नाही. पर्यायाने तेजतत्त्वाचे स्थूलरूप, म्हणजे दिव्य प्रकाश, अग्नि व उष्णता सहन होत नाही. सूर्यलोकात स्थान मिळण्यासाठी सूर्यदेवतेचे गुण ५० टक्क्यांपेक्षा अधिक व जिवाची पातळी किमान ५० टक्के असणे अपेक्षित आहे.
(वरील माहितीचे टंकलेखन करतांना मला सूर्यलोकाचे सूक्ष्मातून दर्शन झाले. तेथे पिवळया व लाल रंगांचा खूप प्रकाश दिसत होता. सूर्यलोकाच्या जवळ गेल्यावर सर्वत्र लाल रंगाच्या मोठ्या ज्वाळा दिसल्या. मला तेथील तप्‍त वातावरणाचा अजिबात त्रास झाला नाही. पुढे गेल्यावर मला सूर्याचा सुवर्णमहाल दिसला. त्यामध्ये उगवत्या सूर्याचे चित्र कोरलेले सुवर्णसिंहासन दिसले. - कु. मधुरा)

ए. सूर्योपासनेचे महत्त्व : सूर्याच्या उपासनेने जिवाला स्वत:मधील सूक्ष्म-तेजतत्त्व वाढवण्याची संधि असते. यासाठी जिवाने तेजतत्त्वाच्या `ॐ' काराची उपासना करणे उपयुक्‍त ठरते. त्याचप्रमाणे गायत्रीमंत्र व सूर्याचे विविध मंत्र यांचे पुरश्चरण करणे फलदायी ठरते. सूर्योपासनेने जिवाच्या मनाची एकाग्रता वाढते. नेत्र हे तेजतत्त्वाशी निगडीत असल्याने सूर्योपासनेने (तेजतत्त्वाच्या उपासनेमुळे ) जिवाला दिव्यदृष्टि प्राप्‍त होते.
- ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.२.२००५, सायंकाळी ७.०७ ते ७.४०)

ऐ. प्रभु श्रीराम सूर्यवंशी असल्याने रामराज्याची स्थापना करू शकणे : सूर्याच्या गुणांमुळे त्याच्या राज्यात (लोकात) पितृशाही असते. सूर्योपासकात वरील गुण असले, तरच त्याला सूक्ष्म-सूर्यलोकात स्थान मिळते. सूर्याची उपासना करणार्‍यांना व सूर्याचे गुण अंगी असणार्‍यांना `सूर्यवंशी', असे संबोधले जाते. प्रभु श्रीराम हा सूर्यवंशी होता. त्यामुळे तो आदर्श पिता व आदर्श पुत्र होण्याबरोबरच रामराज्याची (पितृशाहीची) स्थापना करू शकला.

ओ. `भारत' हे सूर्याचे एक नाव असणे : सूर्य हा देवता, ऋषीमुनी व मानव या सर्वांनाच पूजनीय आहे. हिंदुधर्मात सूर्याला विशेष महत्त्व आहे. भारतीय पंचांगातही चंद्रापेक्षा सूर्याला जास्त महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. `भारत' हेदेखील सूर्याचेच एक नाव आहे. `स' हे सूर्याचे, म्हणजेच तेजाचे बीजाक्षर आहे.
- ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १०.२.२००५, सकाळी ६.२० ते ९.०९)

 

 


रथसप्‍तमीच्या दिवशी दूध तापवून त्याचा प्रसाद म्हणून वापर का करतात ?
 

सौ. अंजली गाडगीळ

रथसप्‍तमीचा दिवस म्हणजेच तेजोपासनेचा दिवस. या निमित्ताने सनातनच्या साधिका
सौ. अंजली गाडगीळ यांना ईश्‍वराकडून रथसप्‍तमीच्या संदर्भात मिळालेले ज्ञान पुढे देत आहोत.

रथसप्‍तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणार्‍या कोषाकडे आकृष्ट झाल्याने दूध प्रसाद बनणे
संकलक : रथसप्‍तमीच्या दिवशी अंगणात गोवर्‍या पेटवून त्यावर बोळक्यात / सुगडात दूध उतू जाईपर्यंत तापवतात व नंतर प्रसाद म्हणून सगळयांना वाटतात. यात काही ठिकाणी तांदूळ घालून भात शिजवतात. या संदर्भातील शास्त्र काय आहे ?
एक विद्वान :
१. रथसप्‍तमीचे महत्त्व : रथसप्‍तमीचा दिवस म्हणजेच तेजोपासनेचा दिवस. या दिवशी सूर्याच्या किरणांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरी पृथ्वीच्या कक्षा भेदून भूतलावर अवतरतात. ज्या वेळी त्यांचा पृथ्वीच्या अंतरिक्ष कक्षेत प्रवेश होतो, त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या आपकणांशी त्यांचा संयोग घडून येतोे. त्यामुळे किरणातील तेज मवाळता धारण करते. हे तेजरूपी किरण आपतत्त्वात्मक लहरींच्या साहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायूमंडलात प्रवेश करतात.
२. दुधाचा प्रसाद होण्याची प्रक्रिया : वायूमंडलात प्रवेश करणारे किरण आकृष्ट करण्यासाठी सुगडाची रचना केलेली असते. ज्या वेळी गोवर्‍यातून निर्माण होणार्‍या सात्त्विक तेजरूपी अग्नीने सुगडरूपी घटातील दूध तापवले जाते, त्या वेळी दुधातून प्रक्षेपित होणार्‍या आप-तेजतत्त्वात्मक लहरींचा सुगडाभोवती पारदर्शक कोष बनतो. या कोषाकडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट झाल्याने या लहरींनी भारीत दूध प्रसाद म्हणून भक्षण केल्याने जिवाच्या प्राणमयकोषाची शुद्धी होऊन त्याच्या शरीरातील पंचप्राणांचे प्रदीपन होण्यास मदत होते. अशा तर्‍हेने जिवाचे तेजोबल वाढल्याने त्याची आत्मशक्‍ती जागृत होते. पृथ्वीरूपी घटाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या सुगडात गोवर्‍यांच्या साहाय्याने दूध तापवून त्यातून निर्माण होणारा आप व तेज लहरींचा कोष हा रथसप्‍तमीच्या दिवशी पृथ्वीवर तयार होणार्‍या वायूमंडलाशी साधर्म्य दर्शवतो. सुगडात तांदूळ घालून भात शिजवण्यापेक्षा आपतत्त्वात्मक लहरींचे प्राबल्य असलेल्या दुधाचा उपयोग करणे जास्त इष्ट व फलदायी ठरते. दूध उतू जाईपर्यंत तापवण्याची आवश्यकता नसते. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.१.२००६, रात्री ८.३३)

 

 
संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात