दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

    श्रीरामनवमी विषयक ध्वनिचित्रपट

    कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

    १. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

    २. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


    पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

    १८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


    विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

    हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


    खगोलशास्त्रावर प्रभुत्व

    असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

    कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


    सनातनची सात्त्विक उत्पादने

    लघुग्रंथ - आरतीसंग्रह

    ध्‍वनिचित्रतबकडी - श्रीराम

    ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?

      ग्रंथ - सोळा संस्कार

    ग्रंथ - देवघर व पूजेतील उपकरणे

    ग्रंथ - सण, धार्मिक उत्सव व व्रते

    वितरणासाठी संपर्क

    • मुंबईः ३२४३५६९९

    • ठाणेः ९३२२६५२५८०

    • रायगडः २७४५०३३८

    • पुणेः ९४२२४३७१३४

    • जळगावः ९४२३०५६४०३

    • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

    • नाशिकः ९४२२४४१७८२

    • इ-मेलः dainik@sanatan.org

अनुक्रमणिका


श्रीरामाच्या काही नावांचा उगम

अ. राम : हे नाव रामजन्माच्या आधीही प्रचलित होते. रम्-रमयते म्हणजे (आनंदात) रममाण होणे, यावरून राम हा शब्द बनला आहे. राम म्हणजे स्वत: आनंदात रममाण असलेला व दुसर्‍यांना आनंदात रममाण करणारा.
 
आ. रामचंद्र : रामाचे मूळ नाव `राम' एवढेच आहे. तो सूर्यवंशी आहे. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.

इ. श्रीराम : `श्री' हे भगवंताच्या षड्गुणांपैकी एक आहे. भगवंताचे षड्गुण याप्रमाणे आहेत - यश, श्री (शक्‍ति, सौंदर्य, सद्‌गुण, वगैरे), औदार्य, वैराग्य, ज्ञान व ऐश्वर्य. दुष्ट रावणाचा वध करून व लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वत:चे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला `श्रीराम' म्हणू लागले. वाल्मीकिरामायणात रामाला देव नव्हे, तर नरपुंगव म्हणजे `नरातील श्रेष्ठ' असे म्हटले आहे. (हनुमानाला कपिपुंगव म्हटले आहे. फक्‍त पुंगव या शब्दाचा अर्थ आहे बैल.) आपल्या नावाच्या आधी लावण्यात येणार्‍या `श्री'च्या नंतर पूर्णविराम असतो. ते `श्रीयुत्'चे संक्षिप्‍त रूप आहे. श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या नावांमध्ये `श्री'च्या नंतर पूर्णविराम नाही. आपण श्रीयुत् असतो, म्हणजे `श्री'युक्‍त असतो, म्हणजे आपल्यात भगवंताचा अंश असतो. याउलट श्रीराम व श्रीकृष्ण हे स्वत:च भगवंत होते.

 

 

२. रामपरिवार व अवतार



 


३. वैशिष्ट्ये

अ. सर्वार्थाने आदर्श

अ १. आदर्श पुत्र :
रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने `दु:ख करू नका' असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला चौदा वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो व पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.

अ २. आदर्श बंधु : अजूनही आदर्श अशा बंधुप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.

अ ३. आदर्श पति : श्रीराम एकपत्‍नीकाती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्‍तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्‍नीची आवश्यकता असतांना त्याने दुसरी पत्‍नी न करता सीतेची प्रतिकृति आपल्या शेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्‍नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने अनेक राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्वभूमीवर श्रीरामाचे एकपत्‍नीकात प्रकर्षाने जाणवते.

अ ४. आदर्श मित्र : रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात मदत केली.

अ ५. आदर्श राजा : प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून श्रीरामाने आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने `कौलिनभीते न गृहन्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्त: ।' (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालविले, मनातून नाही.), असा मार्मिक श्लोक लिहिला आहे.

अ ६. आदर्श शत्रु : रावणाच्या मृत्यूनंतर अग्‍निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ``मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.''

आ. धर्मपालक : श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला `मर्यादा-पुरुषोत्तम' म्हणतात.

इ. एकवचनी
१.
एखादा मुद्दा सत्य आहे, असे ठासून सांगायचे असल्यास आपण तो पुन:पुन्हा सांगतो. `मी त्रिवार सत्य सांगतो' असे म्हणतो. `शांति: । शांति: । शांति: ।' असेही तीन वेळा म्हणतात. त्रिवार सत्यमधील त्रिवार हा शब्द पुढील दोन अर्थांनी वापरलेला आहे.
अ. ब्रह्मा, विष्णु व महेश यांची शपथ घेऊन सांगतो.
आ. त्रिवार हा शब्द त्रि वार (म्हणजे तीन वार) या शब्दांपासून बनला आहे. तीन वारी सारखेच स्वप्न दिसले तर त्याला फक्‍त स्वप्न न म्हणता स्वप्नदृष्टान्त असे म्हणतात. त्यातील सूचनेनुसार वागावे किंवा त्या संदर्भात एखाद्या उन्नतांना विचारावे. तसेच तीन वेळा एखादी गोष्ट ऐकली, तरच ती सत्य समजावी. राम मात्र एकवचनी होता, म्हणजे त्याने एकदा काही म्हटले की ते सत्यच असायचे. तो मुद्दा पुन:पुन्हा ठासून तीन वेळा सांगायची जरूरी नसायची. कोणी रामालाही विचारायचे नाही, ``खरंच का ?''

२. संस्कृत व्याकरणात एकवचन, द्विवचन आणि बहुवचन अशी तीन वचने आहेत. त्यात राम हा `एकवचनी' आहे. याचा अर्थ असा की, रामाशी एकरूप होणे, म्हणजे तीनकडून (अनेकाकडून) दोघांच्या, म्हणजे गुरु व शिष्य या दोघांच्या नात्यातून एकाकडे, म्हणजे रामाकडे जाणे. अनेकातून एकाकडे व एकातून शून्याकडे जाणे, अशी अध्यात्मात प्रगति असते. येथे शून्य म्हणजे पूर्णावतार कृष्ण होय.

३. भूमितीनुसार तीन हा त्रिमिति (तीन डायमेन्शन्स) दर्शवितो, तर राम एका मितीचा दर्शक आहे. या एका मितीतून त्रिमिति निर्माण झाली आहे. ही एक मिति स्थल-कालातीत आहे.

ई. एकबाणी : रामाचा एकच बाण लक्ष्य वेधीत असल्याने त्याला दुसरा बाण मारावा लागत नसे.

उ. अति उदार : सुग्रीवाने रामाला विचारले, ``बिभीषण शरण आल्यावर तुम्ही त्याला लंकेचे राज्य दिले. (युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच रामाने तसे सांगितले होते.) आता रावण शरण आला, तर काय करणार ?'' त्यावर राम म्हणाला, ``त्याला अयोध्या देईन. आम्ही सर्व भाऊ जंगलात रहायला जाऊ.''

ऊ. मानवत्व : राम मानवाप्रमाणे सुख-दु:ख दाखवितो (व्यक्‍त करतो) व म्हणून तो आपल्याला इतर देवांपेक्षा अधिक जवळचा वाटतो, उदा. सीताहरण झाल्यावर राम अत्यंत शोकाकुल झाला होता. मात्र अशा प्रसंगीही रामाचे ईश्‍वरत्व कसे शाबूत होते, हे शंकर-पार्वतीच्या पुढील संवादावरून लक्षात येईल.

पार्वती : आपण ज्याचे नामस्मरण करता तो सामान्य माणसाप्रमाणे पत्‍नीसाठी किती शोक करीत आहे, ते पहा.
शंकर : तो शोक वरवरचा आहे. त्याने मनुष्यदेह धारण केल्यामुळे त्याला त्याप्रमाणे वागावे लागत आहे.
पार्वती : राम झाडाला आलिंगन देत फिरत आहे, म्हणजे तो सीतेसाठी खरंच वेडा झाला आहे.
शंकर : मी म्हणतो ते खरं कि खोटं याचा तूच अनुभव घे. तू सीतेचे रूप घेऊन त्याला भेट. मग राम कसा वागतो ते पहा. त्याप्रमाणे पार्वती गेली; पण रामाने तिला पाहिल्याबरोबर नमस्कार केला व म्हणाला, ``मी तुला ओळखले. तू आदिमाया आहेस.'' हे ऐकून रामाचा शोक वरवरचा आहे, याची पार्वतीला खात्री पटली.

 


४. रामायण

१ अ. व्युत्पत्ति व अर्थ

१. रामायण हा शब्द रं अयन या दोन शब्दांपासून बनला आहे. रम्-रमयते म्हणजे रममाण होणे. `साधनेत रममाण होणे' याच्याशी संबंधित आनंद आहे. अयन म्हणजे सप्‍तलोक. आपण साधनेत रममाण राहून, म्हणजे आनंदाची अनुभूति घेत सप्‍तलोकांना ओलांडून मोक्षाला कसे जायचे, हे ज्यात सांगितले आहे ते रामायण होय.

२. `समस्य अयनं रामायणम् ।' अयन म्हणजे जाणे, गति, रस्ता. जे परब्रह्म परमात्मरूप श्रीरामाकडे घेऊन जाते, तिकडे जाण्यासाठी चालना देते किंवा उत्साहित करते, जीवनाचा खराखुरा मार्ग दाखवते, तेच रामायण होय. अधर्मरूप रावणावर धर्मरूप रामाने चाल करून त्याचा नायनाट केल्याची कथा प्रामुख्याने ज्यात आहे तेच रामायण, असाही त्याचा अर्थ होतो. अयन म्हणजे आश्रयस्थान; म्हणून रामायण म्हणजे रामाचे अस्तित्व.

१ आ. विविध रामायणे
१ आ १. पूर्वरामायण व उत्तररामायण :
`रं' या बीजमंत्राच्या साधनेने अयनातून, म्हणजे सप्‍तलोकातून, प्रवास कसा करावा हे पूर्वरामायणात सांगितले आहे, तर अशी साधना केलेल्या रामाचे वर्णन उत्तररामायणात आहे.

१ आ २. अध्यात्मरामायण : उमा व महेश्वर यांचा संवाद, असे याचे स्वरूप आहे. उमा शंकराला प्रार्थना करते की, `परमेश्वराच्या प्राप्‍तीचा भक्‍तियोग हा एक श्रेष्ठ मार्ग आहे; पण अनेकांनी निरनिराळी मते मांडल्यामुळे परमेश्वराच्या स्वरूपाचा निश्चय होत नाही. तरी आपण माझ्यावर कृपा करून परमेश्वराचे खरे स्वरूप मला सांगावे.' या प्रश्‍नाचे उत्तर म्हणून शंकराने तिला अध्यात्मरामायण सांगितले.

 


५. रामायणातील काही प्रसंगांचा भावार्थ
 

अ. भूमिकन्या सीता प्रसंग : जमीन नांगरतांना सीता सापडणे
भावार्थ : पृथ्वीच्या गर्भातून येणार्‍या हिरण्यगर्भलहरींचे बालसीता हे साकार रूप होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्‍ति हे जसे एकत्र असतात व त्यातील एक घटक आला की जसे इतर सर्व येतात, उदा. नाम म्हटले की रूप, गंध इत्यादि येतात, तसे विशिष्ट शक्‍तीचे, हिरण्यगर्भ शक्‍तीचे, बालसीता हे रूप होते, तर रामपत्‍नी सीता हे रामाच्या शक्‍तीचे रूप होते.

आ. कैकेयीचे वर मागणे प्रसंग : कैकेयीने एका वराने रामास चौदा वर्षे वनवास व दुसर्‍या वराने भरतासाठी राज्य मागून घेतले.
भावार्थ :
श्रावणकुमाराचे आजोबा धौम्यऋषि होते व त्याच्या आईवडिलांचे नाव रत्‍नावली व रत्‍नऋषि असे होते. रत्‍नऋषि नंदिग्रामी अश्वपति राजाचे आस्थान पंडित (राजपुरोहित) होते. अश्वपति राजाच्या कन्येचे नाव होते कैकेयी. रत्‍नऋषींनी कैकेयीला सर्व शास्त्रे शिकविली होती व असेही सांगितले की, दशरथाला मुले झाल्यास ती राज्यावर बसू शकणार नाहीत किंवा दशरथानंतर चौदा वर्षे राजसिंहासनावर कोणी बसल्यास रघुवंश नष्ट होईल. तसे होऊ नये म्हणून पुढे वसिष्ठऋषींनी कैकेयीला दशरथाकडून जे वर मागून घ्यायला सांगितले त्यातील एका वराने तिने रामाला चौदा वर्षेच वनवासात पाठविले व दुसर्‍या वराने भरताला राज्य द्यायला सांगितले; कारण तिला हेही माहीत होते की राम असतांना भरत राजा होणार नाही, म्हणजे राजसिंहासनावर बसणार नाही. वसिष्ठऋषींनी सांगितल्यामुळेच भरताने रामाच्या प्रतिमेची सिंहासनावर स्थापना करण्याऐवजी त्याच्या पादुका आणल्या व त्यांची सिंहासनावर स्थापना केली. पादुकांऐवजी प्रतिमेची स्थापना केली असती, तर शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध एकत्र असतात या न्यायाने, राम गादीवर बसल्यावर जो परिणाम झाला असता, तसाच परिणाम झाला असता.

इ. भरताने रामाच्या पादुका मागणे : `पादुका मागणे' म्हणजे `चरणावर डोके ठेवणे' किंवा `संपूर्ण शरणागति'. पादुका मागितल्यावर रामाने त्या भरताला दिल्या. त्या डोक्यावरून नेतांना त्याने अंगठा पुढे येईल अशा तर्‍हेने नेल्या व त्यांची सिंहासनावर स्थापना करून पूजा सुरू केली. तेव्हापासून पादुकांची पूजा करणे सुरू झाले.

ई. भरताचे नंदिग्रामी रहाणे
१. प्रसंग :
रामाच्या पादुका मिळाल्यावर त्या घेऊन भरत नंदिग्रामी गेला व तेथे त्याने रामाच्या पादुका स्थापन केल्या. तो अयोध्येत राहिला नाही.
भावार्थ : नंदिग्रामी म्हणजे अंडकोषात, म्हणजेच ब्रह्मचारी राहिला. `रामाच्या पादुका स्थापन केल्या' म्हणजे साधक म्हणून राहिला.

२. प्रसंग : पादुका घेतांना भरताने रामाला विनविले की, आपण सीतेसह येण्याच्या एक दिवस आधी मला आपल्या आगमनाची बातमी कळली पाहिजे, म्हणजे मला आपल्या आगमनाची तयारी करता येईल. त्यावर रामाने `तथास्तु' म्हटले.
भावार्थ : सीतेसह म्हणजे शक्‍तीसह, म्हणजे कुंडलिनी जागृत झाल्यावर. `आपण येण्याच्या आधी' म्हणजे आत्मारामाची अनुभूति होण्याआधी, म्हणजे निर्बीज अवस्थेत जाण्याआधी, मी त्या अवस्थेत जाणार हे मला कळले पाहिजे, असे म्हटले.

उ. लक्ष्मणाचे वनवासातील जीवन प्रसंग : सीतेला वाटायचे की कंदमुळे आणतांना लक्ष्मण खाऊन आला असेल, तर रामाला वाटायचे की सीतेने त्याला जेवण दिले असेल; म्हणून ती दोघेही लक्ष्मणाच्या जेवणाची चौकशी करीत नसत.
भावार्थ : लक्ष्मण चौदा वर्षे वायुभक्षण करून राहिला. रामरक्षणासाठी तो झोपलाही नाही, सतत साधना करीत राहिला.

ऊ. सीताहरण प्रसंग : रावणाने सीतेला पळवून नेऊन स्वत:कडे ठेवले.
भावार्थ : खरी सीता रावणाकडे गेलीच नाही. ती अग्‍नीत गेली व सीतेची छाया रावणाकडे गेली. येथेच खर्‍या अर्थाने रामलीलेला सुरुवात झाली. मग रावणाकडून परततांना अग्‍निशुद्धीच्या निमित्ताने ती छाया पुन्हा अग्‍नीत गेली व खरी सीता बाहेर पडली.

ए. रामाने वृक्षांना आलिंगन देणे प्रसंग : सीताहरणानंतर `सीते, सीते' असा आक्रोश करीत रामाने वृक्षांना आलिंगन दिले.
भावार्थ : रामाने वृक्षवेलींचे हृद्गत जाणून घेतले.

ऐ. वालीचा वध प्रसंग : रामाने वालीला बाण मारला व त्यामुळे तो मेला.
भावार्थ : रामाने मारलेल्या बाणामुळे वालीची अनाहतचक्राशी अडकलेली आध्यात्मिक उन्नति पुढे सुरू झाली व तो मुक्‍त झाला.

ओ. रावणवध : रावण महान शिवभक्‍त होता. तो सहस्रारचक्रात अडकलेला होता. रामाने रावणाचा वध केला नाही, तर त्याच्या सहस्राराचा वेध घेऊन त्याला मोक्ष दिला.

औ. रजकाचा सीतेवर आरोप प्रसंग : रजक नावाचा धोबी म्हणाला की सीता अशुद्ध आहे; म्हणून रामाने सीतेचा त्याग केला.
भावार्थ १ : सीतेला दोष देणारा रजक, म्हणजे धोबी आहे. धोब्याचे काम आहे कपडा धुवून स्वच्छ करणे. रामावर कुठलाही डाग राहू नये म्हणून धोबी तसे म्हणाला.
भावार्थ २ : धोब्याचे नाव आहे रजक. रजक हा शब्द रज क या दोन शब्दांपासून बनला आहे. क हे अक्षर एखाद्या गोष्टीचा छोटा अंश दाखविते; म्हणजेच ज्याच्यात `रजोगुणाचा अंश आहे' असा तो धोबी होता व म्हणूनच सीतेची सात्त्विकता त्याला कळली नाही.

अं. शंबुकवध प्रसंग : शंबुक नावाच्या मातंगाने तपश्चर्या केल्याबद्दल रामाने त्याला मारले.
भावार्थ : शंबुकाने चुकीचे तप केल्याने पृथ्वीवरील वातावरण इतके बिघडले की, त्यामुळे प्रजेला त्रास होऊ लागला व ऋषींच्या साधनेत व्यत्यय आला; म्हणून रामाने प्रजापालनार्थ व ऋषीमुनींच्या संरक्षणार्थ त्याचा शिरच्छेद केला.

क. श्रीरामाने शरयु नदीत देहत्याग करणे प्रसंग : सीता धरणीमातेच्या पोटात गेल्यावर श्रीरामाने शरयु नदीत देहत्याग करणे
भावार्थ : शरयु नदीत श्रीरामाने जीव दिला नाही, तर जलसमाधि घेतली. समाधीचे भूमिसमाधि, जलसमाधि, अग्‍निसमाधि इत्यादि अनेक प्रकार आहेत. संत ज्ञानेश्वरांनी भूमिसमाधि घेतली. संत एकनाथ व रामतीर्थ यांनी जलसमाधि घेतली. ज्याचा देहभाव झडून गेला आहे, त्यालाच हे जमते. श्रीरामाच्या पाठोपाठ तर सर्व अयोध्यावासीयांनी शरयु नदीत जलसमाधि घेतली; कारण श्रीरामाच्या देहत्यागानंतर आता आपल्या जीवनात काही राम (अर्थ) उरला नाही, असे सर्वांना वाटले.

 

६. `श्रीराम जय राम जय जय राम' : या मंत्रातील शब्दांचा अर्थ

`श्रीराम जय राम जय जय राम' : या मंत्रातील शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.
श्रीराम : हे श्रीरामाचे आवाहन आहे.
जय राम : हे स्तुतिवाचक आहे.
जय जय राम : हे `नम:' प्रमाणे शरणागतिदर्शक आहे.

 

७. श्रीरामाची उपासना

श्रीरामाच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृती
प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळे उपासकाला त्या देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यास मदत होते. श्रीरामाच्या उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयी सनातनच्या साधकांना ईश्‍वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान पुढे तक्‍त्यात दिले आहे. या व यांसारख्या विविध कृतींमागील शास्त्र सनातनची ग्रंथमालिका `धर्मशास्त्र असे का सांगते ?' यात दिले आहे.



 


८. `श्रीरामा'ला प्रिय गोष्टी

`चैत्र महिना हा रामाला सर्वात अधिक प्रिय आहे. तसेच शुक्लपक्ष, नवमी, रविवार, पुनर्वसु, चंपकपुष्प, तुळस, ही रामाला फार आवडतात. जातिचंपक, मंदार, तुळसी, मुनिमालती, रमन, केतकी व सिंही ही नऊ प्रकारची पुष्पे रामाला प्रिय आहेत. मोदक, लाडू, मांडे, पुरणपोळी, फेण्या, वडे, पापड, सांजा व गुरोळया हे नऊ पदार्थच रामाला फार आवडतात.' (संदर्भ : आनंद रामायण, लेखक : विष्णु वामन शास्त्री)

मानवाची आदर्श जीवनाचारसंहिता म्हणजेच रामायण : ज्या आचारसंहितेच्या अनुरूप आचरण केले असता `मी असे करायला नको होते', असे मानवाला आमरण कधीही वाटणार नाही, अशी मानवाची आदर्श जीवनाचारसंहिता म्हणजेच रामायण. ``सनातन धर्माचे लोक जातपात मानतात, वर्णाश्रम मानतात, म्हणून सनातन धर्माचा ऱ्हास होत आहे व अनेक समस्या निर्माण होत आहेत, असे म्हटले जाते; परंतु हे सत्य नाही. सच्चा सनातनी हिंदु वर्णाश्रम व्यवस्थेला उचित मानतो. केवळ वर्णव्यवस्था एखाद्याला उच्च किंवा नीच ठरवण्यास कारणीभूत ठरत नाही, तर त्याचे आचरण कसे आहे, हे महत्त्वाचे ठरते. प्रभु श्रीराम क्षत्रिय कुळात जन्मले, तर रावण ब्राह्मण कुळात. श्रीरामाने राजधर्माचा स्वीकार केला. त्याने कोणताही यज्ञयाग केला नाही, तरीही रामाच्या प्रती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चारही वर्णांचे तसेच चारही आश्रमांचे लोक समर्पित आहेत; कारण त्याचे आचरण श्रेष्ठ व सर्वांसाठी अनुकरणीय होते. रावणाचा उत्तम कुळात जन्म झाला. तो रोज अग्‍निहोत्र करत असे, तसेच त्याला वेदांचे ज्ञान असूनही तो समाजात आदर्श नाही; कारण त्याचे आचरण योग्य नव्हते. आपला कोणत्या कुळात जन्म झाला हे महत्त्वाचे नाही; तर आपले आचरण कसे आहे हे महत्त्वाचे आहे.'' (दैनिक सनातन प्रभात, २१ ऑक्टोबर ०६, पृष्ठ २)

ईश्‍वरी राज्यासाठी आवश्यक साधना : ईश्‍वरी राज्य म्हणजेच रामराज्य. ईश्‍वरी राज्याची स्थापना करायची आहे, म्हणून श्रीरामाची उपासना. त्या राज्याचे रक्षण करण्यासाठी मारुतीची उपासना. व्यष्टीसाधनेसाठी कुलदेवीची उपासना. समष्टीसाधनेसाठी श्रीरामाची उपासना. श्रीरामाची प्रकट शक्‍ती म्हणजे मारुति व तारक शक्‍ती म्हणजे सीता.

रामनामाचे महत्त्व
`शंकर पार्वतीला सांगतात, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।
अर्थ : हे पार्वती ! रामनाम हे विष्णुसहस्रनामतुल्य आहे. मी सर्वदा राम राम राम अशा मनोरम रामनामात रमण करतो.

 


९. श्रीरामनवमी

तिथी : चैत्र शुद्ध नवमी

इतिहास : श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला.

महत्त्व : देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. श्रीराम नवमीला श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. श्रीराम नवमीला `श्रीराम जय राम जय जय राम ।' हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

उत्सव साजरा करण्याची पद्धत : `कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन व राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. - संकलक) याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.' त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात. या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात. हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.

 

१०. `श्रीराम' यांच्या जगन्मान्य अस्तित्त्वाचे दाखले

अ. रामाच्या सत्यतेचे पुरावे देणारे `झी न्यूज'चे उत्कृष्ट संशोधन !

(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात : १०.१.२००८)
`
झी' वृत्तवाहिनेने श्रीलंकेत जाऊन केलेले संशोधन कुठे हिंदुद्वेष्ट्यांचा उदोउदो करणारी एन् डी टी.व्ही., तर कुठे हिंदूंच्या श्रद्धांचे रक्षण करणारी झी न्यूज !

रामाच्या अस्तित्वावर शंका घेणार्‍या धर्मद्रोही काँग्रेसवाल्यांना चपराक !
मुंबई - रामाच्या अस्तित्वाबद्दल वारंवार शंका उपस्थित करणार्‍या तथाकथित विज्ञानवाद्यांचे तोंड बंद करणारे उत्कृष्ट संशोधन `झी न्यूज' या वृत्तवाहिनीने केले आहे. या वाहिनीने एका मालिकेच्या अंतर्गत रामायणातील कथांच्या अनुषंगाने श्रीरामाने भारत व श्रीलंका येथे भेट दिलेल्या अनेक ठिकाणांचे चित्रीकरण केले आहे. रामायणातील प्रसंगांची सत्यता सिद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्‍न या मालिकेतून करण्यात आला आहे. (हिंदु धर्मरक्षणासाठी `झी न्यूज'ने केलेले हे कार्य निश्चितच गौरवास्पद आहे. हिंदुद्वेषाने पछाडलेल्या अनेक वाहिन्यांनी `झी न्यूज'चा आदर्श घ्यावा ! - संपादक) या वाहिनीच्या चमूने श्रीरामाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्‍नांत श्रीलंकेच्या पूर्वेकडील नोरोलिया या पर्वतीय भागात रावणाचे अस्तित्व असल्याचे सबळ पुरावे गोळा केले. तेथील सीतेचे अग्नीकुंड, शिलालेख, आजूबाजूचा परिसर हे सर्व रामायणातील कथांशी आजही मिळतेजुळते आहेत, हे या वाहिनीने दाखवून दिले. हनुमानाने लंकादहनाच्या वेळी ज्या क्षेत्राला आग लावली, तेथील माती अद्यापही राखेसारखी आहे. हनुमानाने स्वत:ची शेपटी विझवलेल्या ओढ्यापलीकडची माती मात्र पिवळसर आहे. श्रीराम व रावण यांच्यात झालेल्या युद्धाच्या ठिकाणाचे दगड अद्यापही जळल्यासारखे आहेत. हनुमानाने उचललेल्या मेरू पर्वतावरील सर्व वनस्पतींमध्ये आजही औषधी गुणधर्म आहेत, अशा अनेक मुद्यांच्या आधारे तर्कसंगत संशोधन करून `झी न्यूज'ने श्रीलंकेतील रामायणाच्या खुणा पद्धतशीरपणे उलगडल्या आहेत. रावणाने पुष्पक विमान उतरवण्यासाठी पर्वताच्या सर्वांत उंच भागावर बांधलेले पाच विमानतळ, नोरोलिया पर्वताच्या सर्वांत उंच भागात रावणाचे शरीर असलेली प्रचंड गुहा येथपर्यंत या वाहिनीचा चमू पोहोचला. या वाहिनीने केलेल्या संशोधनाची दखल श्रीलंकेच्या सरकारनेही घेतली आहे. `झी न्यूज'ने केलेले हे संशोधन सध्या या वाहिनीवरून रोज रात्री ८ वाजता दाखवण्यात येत आहे.


आ. श्रीलंकेत मिळालेल्या राम व रावण यांचे अस्तित्व दर्शवणार्‍या खुणा


रावणाने सीतेला ठेवले होते ती जागा : अशोक वाटिका



रामसेतू


रामसेतूचा तरंगणारा दगड


रावणाचा पुरला गेलेला श्रीलंकेतील राजवाडा


कोरीव चित्रात वानरसेना दिसत आहे

(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात : ३.२.२००८)

श्रीलंकेतील पुरातत्त्व खात्याने त्यांच्या देशात केलेल्या शोधात रावणाचे अस्तित्व दर्शवणारी व रामायणातील काही महत्त्वाच्या घटनांचे पुरावे देणारी महत्त्वाची ठिकाणे आणि काही वास्तूंचे अवशेष पूर्वेकडील नोरोलिया या पर्वतीय भागात सापडले आहेत. याबाबतचे विस्तृत वृत्त
एन्.डी.टी.व्ही. या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्तामध्ये रावणाने सीतामातेला पळवतांना ज्या ठिकाणी तिचे केस मोकळे सुटले, ते ठिकाण, श्रीरामाने बिभीषणाचा राज्याभिषेक केलेले ठिकाण, प्रभू श्रीरामाने सीतेची अग्नीपरीक्षा घेतलेले ठिकाण, रावणाचे प्रचंड मोठे विमानतळ, रावणाने तयार केलेली गुप्‍त गुहा व रावणाच्या आईच्या शवाचे दहन केलेले ठिकाण अशा महत्त्वाच्या स्थानांचा शोध लागला आहे.

१. रावणाने सीतामातेला पळवतांना ज्या ठिकाणी तिचे केस मोकळे सुटले, ते ठिकाण :
या ठिकाणी रहाणार्‍या विविध धर्मांतील सर्वच स्त्रिया सीतामातेची आठवण रहावी म्हणून त्यांचे केस नेहमी मोकळे सोडतात. शेतात व मळयात काम करणार्‍या स्त्रियाही मोकळे केस ठेवून काम करतांनाचे दृश्य दाखवले होते.

२. श्रीरामाने बिभीषणाचा राज्याभिषेक केलेले ठिकाण : ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाने बिभीषणाला लंकेचा राजा म्हणून त्याची निवड करून राज्याभिषेक केला, त्या ठिकाणी बिभीषणाचे चित्र आहे व त्या ठिकाणी बिभीषणाचे एक मंदिर असून तेथील लोक त्याची पूजा करतात.

३. प्रभू श्रीरामाने सीतेची अग्नीपरीक्षा घेतलेले ठिकाण : या ठिकाणी सीतामातेचे अग्नीपरीक्षेच्या संदर्भातील एक चित्र आहे.

४. रावणाचे प्रचंड मोठे विमानतळ : या ठिकाणी एक डोंगर असून त्याच्या सपाट माथ्यावर रावणाने पाच विमानतळ बांधले होेते. रावणाची विमाने गरुडासारखी होती. ती दुरुस्त करण्यासाठी त्याच्याकडे स्वत:ची कार्यशाळाही होती.

५. रावणाने तयार केलेली गुप्‍त गुहा : रावण हा वास्तूशिल्पकार होता. त्याने लंकेतील मध्यभागी जमिनीखाली एक दगडी गुहा तयार केली होती. त्या गुहेत केवळ त्याला एकट्यालाच जाण्याची परवानगी होती. त्या गुहेत लंकेतील महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारे गुप्‍त मार्ग होते, उदा. विमानतळ, दक्षिण समुद्रतट, महाल इत्यादी. या गुहेद्वारे रावण केव्हाही कोठेही पोहोचत असे.

६. रावणाच्या आईच्या शवाचे दहन केलेले ठिकाण : जेव्हा रावणाच्या आईचे निधन झाले, तेव्हा तिच्या देहाचे दहन करण्यासाठी त्याने एक जागा निवडली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर तेथे गोडे पाणी नसल्याचे रावणाच्या लक्षात आले. तेव्हा त्याला खूप राग आला व त्याने जमिनीवर ७ ठिकाणी त्याच्या जवळील त्रिशुळाने वार केले. त्या ठिकाणी गोड्या पाण्याचे ७ कुंड निर्माण झाले. त्या प्रत्येक कुंडामधील पाण्याचे तापमान निराळे आहे. आता या कुंडांमध्ये अनेक लोक स्नान करतात. सदर वृत्त दाखवतांना निवेदक सकारात्मक निवेदन करीत होता. ठिकाण दाखवतांना त्याचा रामायणातील घटनांशी असलेला संबंध प्रेक्षकांना सुस्पष्ट व्हावा, यासाठी श्री. रामानंद सागर यांच्याद्वारे बनवलेले रामायणावरील ध्वनीचित्र-मालिकेतील काही प्रसंग त्या त्या वेळी दाखवत होते. शेवटी बातमीचे निवेदन करणार्‍या व्यक्‍तीने सांगितले, `भारत सरकारने `आमच्याजवळ रामाच्या अस्तित्वाचे काहीही पुरावे सापडत नसल्यामुळे रामाचे अस्तित्व नाही' असे सांगणारे निवेदन सर्वोच्च न्यायालय दाखल केले आहे. याच वेळी श्रीलंकेत रावणाचे अस्तित्व दर्शवणारे अनेक पुरावे सापडल्यामुळे श्रीलंका सरकारने `राम व रावण यांचे अस्तित्व होते', असे ठामपणे सांगितले आहे. श्रीलंका सरकारकडे असलेले रामाचे पुरावे व त्यांनी मान्य केलेले रामाचे अस्तित्व यांमुळे भारत सरकार कोंडित सापडले आहे व ते त्यांनी दिलेल्या निवेदनावर फेरविचार करत आहे. श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍यांना त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रभू श्रीरामानेच स्वत:चे अस्तित्व दर्शवणारे पुरावे श्रीलंकेत दाखवले आहेत !' - कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


वरील खुणांच्या संदर्भात साधिकेला २००१ सालीच मिळालेली पूर्वसूचना श्रीलंकेत राम व रावण यांचे अस्तित्व सिद्ध करणार्‍या त्यांच्या संदर्भातील खुणांचा दृष्टांत २००१ सालीच झालेला असणे : `२००१ मध्ये मला नामजप करतांना, तसेच स्वप्नात एक दृश्य ४-५ वेळा दिसले. त्यामध्ये एक मोठे त्रिशूळ जमिनीत खुपसले जाऊन त्या ठिकाणी पाण्याची कुंडे निर्माण होतांना दिसली होती. तसेच एका डोंगराच्या पठारावर जुन्या काळातील विमाने उभी असल्याचे अस्पष्ट दिसून `तो विमानतळ असावा', असे वाटत होते. ही दृश्ये पहातांना `मी काळाचा पडदा ओलांडून भूतकाळात जात आहे व दैवी घटनेशी संबंधित दृश्य पहात आहे', असे जाणवत असे. तसेच दृश्यात प्रभू श्रीराम दिसत नसले, तरीही त्यांचे अस्तित्व जाणवून त्यांची आठवण येत असे. मला दिसलेल्या दृश्यांचा उलगडा श्रीलंकेतील वृत्त पाहिल्यावर झाला.' - कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. सनातनच्या प्रत्येक साधकाने कु. मधुरा भोसले यांच्यासारखी जिज्ञासू वृत्ती ठेवली व आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचे समष्टीच्या दृष्टीने मूल्य तपासत राहिले, तर प्रत्येक साधक उत्तम वार्ताहर बनू शकतो, हे या लेखातून आपल्याला शिकायचे आहे.


इ. अमेरिकेतील `नासा' या संस्थेने अवकाशातील उपग्रहातून घेतलेले `रामसेतू'ची चित्रे





ई. रामसेतू मानवनिर्मित !

सरकारी प्रकाशनातील माहिती (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात : १०.१२.२००७)

काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारला सणसणीत चपराक !
नवी दिल्ली, ९ डिसेंबर (वृत्तसंस्था) - तामीळनाडूच्या समुद्रकिनारपट्टीवरील वादग्रस्त `अँडम्स पूल' हा मानवनिर्मित असू शकतो, असे संसदेत मागील आठवड्यात पटलावर ठेवण्यात आलेल्या सरकारी प्रकाशनात म्हटले आहे. (केंद्रातील काँग्रेस सरकारचा भयंकर गलथान कारभार ! सरकारच्या एका दस्तऐवजात सेतू मानवनिर्मित असल्याचा उल्लेख असतो, तर दुसरीकडे सरकार त्याच्या विरुद्ध माहिती न्यायालयात मांडते. असे सरकार राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ? - संपादक) त्यामुळे रामायणातील रामसेतूच्या उल्लेखाला बळ मिळाले आहे. या नव्या घडामोडीमुळे केंद्रातील संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे पुस्तक `इमेजेस इंडिया' या शीर्षकाच्या अंतर्गत हैद्राबाद येथील `नॅशनल रिमोट सेन्स्ंािग एजन्सी' (एन्आर्एस्ए)ने प्रकाशित केले आहे. ही संस्था अंतराळ विभागाच्या अखत्यारित काम करते. `३० कि.मी. लांबीच्या या सेतूचे मूळ हे एक रहस्यच आहे. हा पूल आदीम युगातील म्हणजे १ कोटी ७ लाख ५० हजार वर्षांपूर्वींचा असल्याचे पुरातत्वीय अभ्यासावरून स्पष्ट झालेले आहे; परंतु त्याच्या आराखड्यावरून तो मानवनिर्मित असावा असे वाटते', असे या पुस्तकाच्या पृष्ठक्रमांक ३९ वरील `स्टनिग स्ट्रक्चर्स' या उपशीर्षकाखालील प्रकरणात नमूद केले आहे. या पुस्तकाला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष श्री. जी. माधवन यांची प्रस्तावना आहे. यापूर्वी ``हा पूल मानवनिर्मित असल्याचे सिद्ध झाले, तर मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन'', असे केंद्रीय जहाजबांधणी मंत्री आणि द्रमुकचे नेते श्री. टी.आर्. बालू यांनी म्हटले होते. (रामसेतू हा मानवनिर्मित असल्याचे आता सरकारी पुस्तकावरूनच स्पष्ट झाल्याने श्री. टी.आर्. बालू यांनी लगेचच स्वत:च्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, हे उत्तम ! - संपादक)

 


११. रामसेतू

अ. भारतीयांचे श्रद्धास्थान :

`रामसेतू' प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेवर चढाई करून रावणाचा नाश करण्याच्या उद्देशाने वानरांच्या मदतीने `रामसेतू' बांधला. ४८ कि.मी. लांब व २ कि.मी. रूंद असा हा `रामसेतू' त्रेतायुगात (१७ लाख २५ हजार वर्षांपूर्वी) बांधला गेला. आज `सेतूसमुद्रम् प्रकल्पा'च्या अंतर्गत हा रामसेतू तोडून पाल्कची सामुद्रधुनी व मनारचे आखात यांना जोडणारा एक कालवा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा कालवा तयार झाल्याने जहाजांना सध्या श्रीलंकेस फिरून जाण्यासाठी लागणारा इंधनखर्च वाचू शकेल, तसेच भारतास हा समुद््रमार्ग वापरल्याबद्दल परकीय चलन मिळेल, हा या योजनेमागील फायदा सांगितला जातो; मात्र काही नौदल प्रमुख, सागर अभियंते यांच्या मते या कालव्याची उंची कमी असल्याने तेथून मोठी जहाजे जाऊ शकणार नाहीत. या योजनेचे भारतभरात उमटलेले पडसादही यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. भौगोलिक अभ्यासकांच्या दृष्टीने मागे दक्षिण भारतात आलेला त्सुनामीचा तडाखा रोखण्याच्या दृष्टीने रामसेतूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. `रामसेतू' तोडल्यास भविष्यकाळात त्सुनामीच्या लाटांपासून केरळ राज्याला धोका संभवतो. तसेच जलप्रवाहाची दिशा बदलल्यास दक्षिण तटावरील थोरियमचा प्रचंड साठा नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताच्या परमाणू योजनेचे प्रचंड नुकसान होऊ शकते, असे मत एका प्रसिद्ध भू-राजनीती तज्ञाने व्यक्‍त केले आहे. पर्यावरणतज्ञांच्या मते `रामसेतू'चे खोदकाम केल्याने या भागातील पाण्याचे तापमान वाढून या परिसरातील ३६०० प्रकारचे समुद्रीजीव नष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाखो कोळी बांधव भविष्यात बेरोजगार होतील. हा `रामसेतू' इजिप्‍तचे पिरॅमिड, चीनची भिंत यापेक्षाही पुरातन असल्याने आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचे एक गौरवस्थान आहे. यापेक्षाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले सर्वांचेच श्रद्धास्थान असलेला रामसेतू नष्ट करणे, म्हणजे धार्मिक भावनांशी खेळण्यासारखे आहे. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता रामसेतू नष्ट करणे म्हणजे आपला प्राचीन वारसा नष्ट करणे होय.


आ. सेतूसमुद्रम प्रकल्पाचे हिंदुद्वेषी कुभांड !

साडेसतरा लाख वर्षांपूर्वी रावणाच्या (श्री)लंकेत प्रवेश करण्यासाठी प्रभू रामचंद्राने तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम शहराजवळून लंकेत जाणारा `श्रीरामसेतू' वानरसेनेच्या मदतीने बांधला. याविषयी रामायणात सविस्तर वर्णन आहेच. या सेतूच्या निर्माणकार्याच्या वेळी चिमुकल्या खारूताईने उचललेला `खारीचा वाटा' व दगड पाण्यावर तरंगल्याची घटना पौराणिक गोष्टी म्हणून आम्हा हिंदूंच्या पिढ्यांपिढ्यांना माहीत आहेत. श्रद्धावान हिंदूंना भारत व श्रीलंका यांच्या अंतर्गत `रामसेतू' आहे कि नाही, हे शोधण्याची कधी गरजही भासली नाही; एवढा आमचा रामावर, रामायणावर व रामराज्यावर विश्‍वास ! काही नतद्रष्ट बुद्धीवादी मात्र रामायण व महाभारत यांना काल्पनिक संबोधून या विश्वविख्यात रामसेतूचे अस्तित्वच नाकारण्याचा खुजा प्रयत्‍न करत आहेत. या तथाकथित बुद्धीवाद्यांना केंद्रातील हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारची राजकीय साथ मिळाली आहे. हिंदु या शब्दाचीच `अँलर्जी' झालेल्या या केंद्रातील महाभागांनी व्यावसायिक फायदा लक्षात घेऊन हा पुराणकालीन सेतू उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले आहे. हे षडयंत्र म्हणजे `सेतूसमुद्रम शिपिंग कॅनॉल' ! हा प्रकल्प म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेवरच आघात आहे. काँग्रेस सरकारची व्यावसायिक भूमिका या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २ हजार ८२७ कोटी रुपये खर्च करण्याची तयारी केंद्रातील हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारने दाखवली आहे. अरबी समुद्रातील भारतीय बंदरे, उदा. कांडला, पणजी, मुंबई, कोझ्झीकोड, मद्रास वगैरे येथून भारताच्या पूर्वेकडील बंदरांकडे निघालेल्या जहाजांचा श्रीरामसेतूच्या अस्तित्वामुळे श्रीलंका या देशाला वळसा घालून जावे लागते. जहाजांना हा वळसा टळावा, यासाठी ३० कि.मी अंतर असलेल्या रामसेतूचा तब्बल साडेचार कि.मी. एवढा भाग या प्रकल्पाद्वारे उद्ध्वस्त करण्याचा काँग्रेसच्या राज्यकर्त्यांचा डाव आहे. असे केल्यामुळे तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येणार्‍या जहाजांचा ६५० कि.मी.चा वळसा टळेल, असा दावा या हिंदुद्वेष्ट्यांकडून केला जात आहे. उद्या कोणी ताजमहालाचा काही भाग तोडू असे म्हटल्यास सरकारकडून ते मान्य केले जाईल का ?, असा येथे प्रश्‍न आहे. या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी असणार, हे वेगळे सांगायला नको. राष्ट्रघातकी व हिंदुद्रोही कृत्य `त्सुनामी'च्या वेळी रामेश्वरपासून थेट केरळपर्यंतची किनारपट्टी या सेतूमुळेच बचावली होती, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हा सेतू उद्ध्वस्त केल्यास देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घातक असलेल्या `लिट्टे'च्या दहशतवाद्यांना मोकळे रान मिळेल, असे संरक्षणतज्ञांचे मत आहे. सेतूसमुद्रम प्रकल्प म्हणजे दुसर्‍या विध्वंसक त्सुनामीला आमंत्रण आहे, अशा शब्दांत डॉ. एस्. मूर्ती यांनी या प्रकल्पाचे वर्णन केले आहे. `सायन्स ऑफ त्सुनामी हझार्डस्' या जगप्रसिद्ध त्सुनामी नियतकालिकाचे ते संपादक आहेत. `अवकाश व संरक्षण' विषयातील अमेरिकेतील जगप्रसिद्ध संशोधक डॉ. शिव सुब्रमण्यम यांनीही या प्रकल्पाला विरोध करतांना, ``हिंदूंच्या विरोधात रचलेला कट म्हणजे सेतूसमुद्रम प्रकल्प !'', असे म्हटले आहे. जागतिक किर्तीच्या संशोधकांनी पोटतिडकीने केलेली ही विधाने हिंदुद्वेष्ट्यांच्या हिंदुद्रोही कृत्यांची पोचपावती देण्यास पुरेशी आहेत. हिंदूंना आवाहन हिंदूंच्या धार्मिक व सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या श्रीरामसेतूच्या रक्षणासाठी देशभरातील हिंदूंनी उठाव करावा, असे आवाहन अलीकडेच चारही शंकराचार्यांनी एकत्रित येऊन केले आहे. हिंदूंनो, असले हिंदुघातकी भूमिका घेणारे राज्यकर्ते तुमच्या धार्मिक भावना जपणार नाहीत, हे लक्षात घ्या व त्यांच्यापासून धर्मश्रद्धांचे रक्षण करण्यासाठी धर्मयोद्धे बना !


इ. सेतूसमुद्रम् या धर्मद्रोही प्रकल्पाला धर्माभिमान्यांचा विरोध

रामसेतू नष्ट करून सेतूसमुद्रम प्रकल्प उभारायचे दुष्ट कारस्थान काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांनी आरंभले आहे. या धर्मद्रोही प्रकल्पाला धर्माभिमानी विरोध करत असून त्यासंदर्भातील हा थोडक्यात घटनाक्रम. तामिळनाडू मच्छिमार संघाने २००१ सालापासून या प्रकल्पाला विरोध केला आहे. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यावर ३७ लाख सह्यांचे निवेदन त्यांनी राष्ट्रपतींना दिले. २१ फेब्रुवारी २००७ : त्सुनामी सोसायटी ऑफ ओटावाचे उपाध्यक्ष प्रो. टाड एस्. मूर्ती यांनी भारत सरकारला `इ-मेल' ने अहवाल पाठवला - `रामसेतू तोडला तर भविष्यात केरळचे संरक्षण अशक्य आहे.' रामनवमीच्या दिवशी (२७.३.२००७) उत्खनन कामाचा शुभारंभ करण्यासाठी `अँक्वेरियस' हे जहाज पाठवण्यात आले. उत्खनन करणार्‍या यंत्राचे नाव `हनुमान' असे ठेवले. अशी चार यंत्रे आतापर्यंत मोडली. नौकानयन मंत्री टी.आर्. बालू (द्रमुक) हे तंजावरच्या सरस्वती महल पुस्तकालयात गेले व त्यांनी रामसेतू विषयक नकाशे व दस्तऐवज नष्ट करण्याची सूचना दिली.

 


हिंदूद्वेष्ट्यांकडून `श्रीरामा'चे हीन पातळीवर केले जाणारे विडंबन


पादत्राणांवर असलेले श्रीरामाचे चित्र



ऑर्कुट संकेतस्थळावर केलेले श्रीरामाचे विडंबन


 

राम मुद्रा

नेदरलँडमधील देवनागरी भाषेतील चलन





नेदरलँडचे `डॉलर' हे चलन आहे. त्यांच्या चलनात आता `एक राम', `पाच राम', `दस राम' ही दुसरे चलन आले आहे. नेदरलँडमध्ये या मुद्रांचा वापर दहा डॉलरसाठी एक राम, असा केला जात आहे. या मुद्रांवर `रामराज्य : विश्व शांती राष्ट्र', असे देवनागरी लिपीमध्ये लिहिले आहे. या वैशिष्टपूर्ण मुद्रेच्या डाव्या बाजूला हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाचे छायाचित्र आहे. छायाचित्राच्या दोन्ही बाजूला हिंदी, इंग्रजी या भाषांसह इतर भाषांमध्ये `राम' असे लिहिले आहे. `विश्व शांती राष्ट्रा'ची स्थापना करण्याच्या संकल्पनेतून ही मुद्रा बनवण्यात आली आहे, असे सांगण्यात येत आहे. `रामराज्य' हेच शांती आणि सौख्य देणारे असल्याची खात्री नेदरलँडला झाली आणि त्यातून हे चलन स्वीकारण्यात आले, असे म्हटले जात आहे. परदेशात हिंदूंची संस्कृती व देवता यांचा अभ्यास करून त्यांचा उपयोग सामाजिक स्वास्थ्यासाठी कसा केला जात आहे, त्याचे हे उदाहरण आहे. महर्षि महेश योगी यांनी अमेरिकेमध्ये `विश्व शांती राष्ट्रा'ची स्थापना केली होती. त्यानंतर `वन राम' ही मुद्रा `युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट'ने पहिल्यांदा २००२ मध्ये स्वीकारली. सध्या या `युनिव्हर्सिटीच्या कॅम्प्स'मध्ये डॉलर व राम मुद्रा ही दोन्ही चलने समान प्रमाणात वापरण्यात येत आहेत. या देशातील सर्व युनिव्हर्सिटी कॅम्प्समध्ये ही मुद्रा वापरण्याबाबत मोठ्या प्रमाणात फलक लावले आहेत. या मुद्रेस विश्‍वातील ५० देशांनी मान्यता दिली आहे. त्यातील नेदरलँड हे एक राष्ट्र आहे. त्यामुळे काही दिवसांत ही मुद्रा जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाईल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. या राममुद्रेचा वापर विश्व शांतिप्रिय लोकांना एकत्रित करण्याच्या कामी करता येईल, असे `युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट'चे प्रशासकीय अधिकारी श्री. टॉम ब्रुक्स यांचे म्हणणे आहे. (निद्रिस्त आणि नतद्रष्ट हिंदूंनो तुम्हाला तुमच्या श्रद्धास्थानांचे महत्त्व कधी कळणार ? - संपादक)

 

१. अनुभूती

अ. श्रीरामनवमीच्या निमित्ताने साधकांच्या अनुभूती

१. श्रीरामनवमीपूर्वी ३ दिवस नामजप करतांना निळा प्रकाश स्वत:च्या शरीरात पाझरत असल्याचे जाणवणे : १८.४.२००५ रोजी श्रीरामनवमी होती. रामनवमीच्या ३ दिवस आधीपासून नामजपाला बसल्यानंतर मला डोळयांसमोर निळा प्रकाश जाणवत होता. तो स्वत:च्या शरीरात पाझरत असल्याचे मला जाणवत होते. त्या वेळी माझा श्रीरामाचा नामजप खूप आतून होत होता. - डॉ. (सौ.) मधुवंती पिंगळे, मिरज आश्रम

२. शिवाच्या नामजपाऐवजी श्रीरामाचा नामजप आपोआप सुरू होणे व रामनवमी जवळ आल्याचे नंतर समजणे : १०.४.२००३ रोजी रात्री मी वाईट शक्‍तींींच्या निवारणार्थ `ॐ नम: शिवाय ।' हा नामजप करत होते; परंतु माझ्या नकळतच श्रीरामाचा नामजप मधेच सुरू होत होता. पुन:पुन्हा जाणीवपूर्वक शिवाचा नामजप करूनही श्रीरामाचाच नामजप होत होता. ११ तारखेला श्रीरामनवमी असल्याने श्रीरामाचा नामजप चालू झाला, हे नंतर कळले . - श्री. अरुण शर्मा, दुबई (एखाद्या देवतेशी संबंधित काळ जवळ आला की, त्या देवतेची पवित्रके जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात. त्यामुळे अशा अनुभूती येतात. - संकलक)

३. नामजप करतांना आश्रमातील सर्व वस्तूंमध्ये श्रीरामाचे अस्तित्व जाणवणे, तसेच स्वत:च्या अंतरातही श्रीराम दिसणे व शंख वाजवतांना साक्षात् ईश्‍वराने अवतार घेतल्याचे जाणवणे :
१८.४.२००५ रोजी श्रीरामनवमी होती. त्या दिवशी नामजप करतांना दुपारी ११.४५ ते १२ या वेळेत संपूर्ण आश्रमामध्ये निळा प्रकाश जाणवत होता. त्यानंतर श्रीराम सोनेरी सिंहासनावर बसलेला दिसला. त्या वेळी सर्व वस्तूंमध्ये श्रीरामाचे अस्तित्व जाणवत होते. माझ्या अंतरात व बाहेरही मला श्रीराम दिसत होता व मला खूप आनंद जाणवत होता. त्यानंतर शंख वाजवतांना मला साक्षात् ईश्‍वराने अवतार घेतल्याचे जाणवले. - श्री. ओंकार होमकर, मिरज आश्रम

४. श्रीरामाची आरती म्हणतांना आश्रम अयोध्या असल्याचे व सर्व साधक श्रीरामाला आणण्यास जात असल्याचे वाटणे :
९.४.२००५ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मिरज येथील सनातनच्या आश्रमाच्या दारासमोर गुढी उभी केल्यानंतर आम्ही श्रीरामाची आरती म्हणत होतो. त्या वेळी `म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।' ही ओळ म्हणत असतांना `आश्रम ही अयोध्या आहे व आम्ही सर्व साधक प्रभु श्रीरामाला आणण्यासाठी जात आहोत', असे मला वाटले. - कु. कल्पना डुबे, धारूल, जिल्हा बीड

५. श्रीरामनवमीच्या दिवशी मानस पाद्यपूजा करतांना श्रीराम व प.पू. डॉक्टर यांचे दर्शन होणे आणि श्रीराम म्हणजेच प.पू. डॉक्टर आहेत, असे वाटणे :
१८.४.२००५ रोजी श्रीरामनवमी होती. सकाळी ७.३० ते ८ या वेळेत माझा श्रीरामाचा नामजप भावपूर्ण झाला. त्या वेळी मानस पाद्यपूजा करतांना मला मधेच श्रीराम व मधेच प.पू. डॉक्टर दिसत होते. `श्रीराम म्हणजेच प.पू. डॉक्टर आहेत', असे मला वाटत होते. त्या वेळी मला प.पू. डॉक्टरांबदल कृतज्ञता वाटली. - डॉ. (सौ.) शरदिनी कोरे, मिरज आश्रम



आ. रामरक्षास्तोत्र म्हणतांना आलेली अनुभूती

`रामरक्षा ऐकण्यासाठी प्रत्यक्ष श्रीराम आलेला आहे व प्रत्येक शब्द त्याच्यापर्यंत पोहोचत आहे', याची जाणीव होऊन भाव जागृत होणे व आनंद जाणवणे : `मी रामरक्षास्तोत्र म्हणतांना माझ्या मनातील विचार कमी होऊन माझी एकाग्रता वाढते. मी सावकाश व जास्तीतजास्त प्रेमाने रामरक्षास्तोत्र म्हणण्याचा प्रयत्‍न करत असतांना `प्रत्यक्ष श्रीराम रामरक्षा ऐकण्यासाठी आलेला आहे व मी म्हणत असलेला प्रत्येक शब्द त्याच्यापर्यंत पोहोचत आहे', याची जाणीव होऊन भाव जागृत होतो व आनंद जाणवतो.'

रामरक्षास्तोत्र म्हणत असतांना शारीरिक त्रास होणे, मांत्रिकाचे छातीपासून डोक्यापर्यंत अस्तित्व जाणवणे, रामरक्षेत केलेली श्रीरामाची स्तुती व वर्णन आवडत नसल्याने त्याने डोक्यावर आघात केल्याने तीका डोकेदुखी सुरू होणे आणि डोळयांवर आवरण निर्माण केल्याने शब्द अंधुक दिसणे : रामरक्षास्तोत्र म्हणत असतांना मला तीका डोकेदुखीचा त्रास सुरू होऊन चक्कर येते. प्रत्येक शब्दाचा उच्चार करतांना माझ्या हिरड्या व दात यांमध्ये तीव्र वेदना होतात व माझा श्‍वास कोंडला जाऊन छातीवरही दाब जाणवतो. तेव्हा तोंडाने श्‍वास घ्यावा लागत असल्यामुळे खूप प्रयत्‍न करून प्रत्येक शब्द म्हणावा लागतो. काही वेळा उच्चारही व्यवस्थित होत नाहीत. माझ्यातील मांत्रिकाचे माझ्या छातीपासून डोक्यापर्यंत अस्तित्व असल्याचे मला जाणवते व तो माझ्या डोळयांवाटे प्रकट होतो. मांत्रिकाला रामरक्षास्तोत्रात श्रीरामाचे केलेले वर्णन व स्तुती अजिबात आवडत नाही. मी रामरक्षास्तोत्र म्हणू नये, यासाठी तो माझा घसा आवळतो व माझ्या डोक्यावर आघात करून डोकेदुखीचा तीका त्रास मला देतो, तसेच डोळयांवर आवरण निर्माण करतो. त्यामुळे लघू-ग्रंथातील शब्द मला अंधुक दिसतात व डोळयांमध्ये वेदना होऊन मला सलग वाचताही येत नाही. - कु. महेश्वरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.



इ. श्रीरामाचे मराठी `पाळणागीत' ऐकल्यावर मराठी न कळणार्‍या विदेशातील साधकांना आलेल्या अनुभूती

१. मी संपूर्ण पाळणागीत एकाग्रतेने ऐकत होतो. त्या वेळी माझे ध्यान लागले. - श्री. शॉन क्लार्क, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया.

२. चैतन्य जाणवणे

संपूर्ण शरीर चैतन्यमय होत असल्याचे जाणवणे व थकवा दूर होऊन ताजेतवाने वाटणे : पाळणागीत ऐकत असतांना मला खूपच आनंद जाणवत होता व `माझे संपूर्ण शरीर चैतन्यमय होत आहे', असे मला जाणवले. ते चैतन्य माझ्या सहाव्या चक्रापर्यंत व थोड्या प्रमाणात सातव्या चक्रापर्यंत आल्याचे मला जाणवले. माझा थकवा कमी होऊन मला एवढे ताजेतवाने वाटत होते की, मला रात्री झोप येईल कि नाही, असे वाटले. मी जे अनुभवत होतो, ते मी शब्दांत सांगू शकत नाही. दुसर्‍या दिवशीही मला खूप हलके वाटत होते. - श्री. डेविड एरन्स्पर्जर, कोलोरॅडो, अमेरिका.

३. आनंद जाणवणे

पाळणागीत ऐकत असतांना माझ्या अनाहत चक्राजवळ चैतन्याची जाणीव होत होती. मी गीताच्या लहरींकडे ओढला गेलो व माझा भाव जागृत झाला. - श्री. आंद्रे, बेलग्रेड, सर्बिया.

पाळणागीत ऐकतांना सहा दिवसांचे बाळ उठल्यावर न रडणे व ते ५ वेळा हसणे :
माझी सहा दिवसांची मुलगी `शांती' झोपेतून उठल्यानंतर रडते. संगणकावर पाळणागीत ऐकवले तेव्हा ती नुकतीच झोपेतून उठत होती; मात्र ती सवयीप्रमाणे बिलकूल रडली नाही. एवढेच नाही, तर ते ऐकत असतांना ती ५ वेळा हसली. माझ्या माहितीप्रमाणे एक आठवड्याच्या आतील बाळाच्या मज्जासंस्थेची वाढ अपरिपक्व असल्याने स्नायूंवर त्याचा ताबा नसतो. त्यामुळे त्याला हसणे शक्य नसते. त्यानंतर अद्याप आम्ही तिला हसतांना पाहिले नाही. - श्री. ड्यान, (शांतीचे वडील) बेलग्रेड, सर्बिया.
पाळणागीत ऐकत असतांना मला आनंद जाणवला. मला श्रीराम व लक्ष्मण यांचे अस्तित्व जाणवले व `ते नदीच्या पलीकडे जात आहेत', असेही जाणवले. - कु. आफोलाबी मिसा, (वय वर्षे ७) रेस्टन, अमेरिका.
(मराठी भाषेतील पाळणागीताविषयी काहीही माहिती नसतांना विदेशातील मराठी न कळणार्‍या साधकांनी जे अनुभवले, ते आध्यात्मिक स्तरावरील आहे. `अनुभूती मानसिक स्तरावर असतात', असे म्हणणार्‍यांनी यातून बोध घ्यावा. `अनुभूती' पंचज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी यांच्या पलीकडील गोष्ट असल्याने `आपण जे ऐकत आहोत, त्यातून आपल्याला काय जाणवते' हे विदेशातील साधकांनी पाहिले. त्यामुळे पाळणागीतातील शब्दांत असलेल्या भावाप्रमाणे त्यांना अनुभूती आल्या. त्यावरून साधनेचे व अध्यात्माला भाषेचे बंधन नसल्याचे लक्षात येते. - संकलक)