दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

२. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


खगोलशास्त्रावर प्रभुत्व

असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


सनातनची सात्त्विक उत्पादने

१. ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?

२.  ग्रंथ - सोळा संस्कार

३.  ग्रंथ - देवघर व पूजेतील उपकरणे

वितरणासाठी संपर्क

  • मुंबईः ३२४३५६९९

  • ठाणेः ९३२२६५२५८०

  • रायगडः २७४५०३३८

  • पुणेः ९४२२४३७१३४

  • जळगावः ९४२३०५६४०३

  • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

  • नाशिकः ९४२२४४१७८२

  • इ-मेलः dainik@sanatan.org


परशुराम जयंती विशेषांक

 

अनुक्रमणिका

 

 

ब्राह्मशक्‍ती व क्षात्रसामर्थ्य यांनी शत्रूला संपूर्ण पराभूत करण्यास समर्थ असलेला परशुराम !
 

परशुरामाची माहिती येथे देत आहोत. `भृगुवंशाचे परशुराम म्हणजे वेदर्षी जमदग्नीचा पुत्र. त्याचे आजोबा ऋचीक. आजोबांप्रमाणे परशुरामदेखील वेद व शास्त्र यांत निष्णात होता. परशुरामाची माता रेणुका ही इक्ष्वाकू वंशाची राजकन्या होती. ब्रह्मवर्चस व क्षात्रतेजाने उद्दीप्‍त अशा वंशात परशुराम जन्मला.

परशुरामाच्या साधनेने प्रसन्न होऊन शंकराने त्याला दिव्य अस्त्रांची दीक्षा आणि दुर्भेद्य परशु देणे व दुर्जन मदांधांपासून पृथ्वीला मुक्‍त करण्याचा आदेश देणे
परशुराम शंकराला प्रसन्न करून घेण्याकरता तपश्चर्या करायला निघून गेला. परशुरामाची परमोत्कट भक्‍ती, परमतीव्र संवेग व अविचल आणि अखंड ध्यान यांमुळे शिवशंकर प्रसन्न झाला. त्याने परशुरामाला दिव्य अस्त्रांची दीक्षा व आपल्या जवळचा अजेय व दुर्भेद्य परशु त्र्यंबकदंड दिला आणि आदेश दिला, `जा. आततायी, अनन्वित अनाचारी, अत्याचारी, अतिरेकी, आसुरी व मदांध यांच्यापासून पृथ्वीला मुक्‍त कर.'

परशुरामाने केलेल्या सहस्त्रार्जुनाच्या संहाराने प्रसन्न होऊन इंद्राने त्याचे विजयधनुष्य परशुरामाला देणे, परशुरामाने त्या धनुष्याच्या साहाय्याने अत्याचारी क्षत्रियांचा २१ वेळा नाश करणे व पुढे त्याने ते त्याचा शिष्य कर्ण याला देणे
परशुरामाने सहस्त्रार्जुनाच्या सहस्त्र भुजा एकेक मोजून आपल्या परशूने छाटून टाकल्या व त्याचा संहार केला. बाणांची बरसात करून त्याची प्रचंड सेना परास्त करून टाकली. सगळया देशाने सहस्त्रार्जुनाच्या संहाराचे अत्युत्कट स्वागत केले. स्वर्गही परम संतुष्ट झाला. देवराज इंद्राने आनंदी होऊन आपले परमिप्राय् `विजय' धनुष्यच परशुरामाला दिले. त्या धनुष्याने इंद्राने दानव कुलांचा विनाश केला होता. या `विजय' धनुष्यावर चढवलेल्या प्राणांतिक बाणांनीच परशुरामाने २१ वेळा अत्याचारी व प्रजापीडक क्षत्रियांचा विनाश केला. पुढे ते धनुष्य परशुरामाने आपला शिष्य कर्ण याला त्याच्या परम गुरुभक्‍तीवर प्रसन्न होऊन दिले. या परशुरामदत्त `विजय' धनुष्यामुळेच कर्ण अजेय बनला होता.

अश्वमेध महायागाच्या वेळी परशुरामाने पुरोहित कश्यपाला संपूर्ण पृथ्वी समर्पित करणे, परशु फेकून स्वत:ला रहाण्यासाठी सागराकडून भेट मिळालेला प्रदेश घेणे व तो परशुरामभूमी म्हणून प्रसिद्ध असणे
पितरांच्या आदेशानुसार परशुरामाने अश्वमेध महायाग केला. यज्ञ-पुरोहित कश्यप याला संपूर्ण पृथ्वी समर्पित केली व तो स्वत: दक्षिण सागरतिरावर गेला. परशुरामाने समुद्रकिनार्‍यावरच्या सह्याद्री पर्वतावरून आपला परशु वेगाने समुद्रात फेकला व भडोचपासून कन्याकुमारीपर्यंतचा सगळा सागर्रीैंादेश सागराकडून भेट घेतला. परशुरामाने संपूर्ण पृथ्वीचे दान कश्यपाला दिल्याने त्याने सागराकडून हा नवा समुद्रगत प्रदेश घेतला. ती परशुरामभूमी होय.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००५)

परशुरामाच्या साधनेने प्रसन्न होऊन शंकराने त्याला दिव्य अस्त्रांची दीक्षा आणि दुर्भेद्य परशु देणे व दुर्जन मदांधांपासून पृथ्वीला मुक्‍त करण्याचा आदेश देणे : परशुराम शंकराला प्रसन्न करून घेण्याकरिता तपश्चर्या करायला निघून गेला. परशुरामाची परमोत्कट भक्‍ती, परमतीव्र संवेग व अविचल आणि अखंड ध्यान यांमुळे शिवशंकर प्रसन्न झाला.
त्याने परशुरामाला दिव्य अस्त्रांची दीक्षा व आपल्या जवळचा अजेय व दुर्भेद्य परशु त्र्यंबकदंड दिला आणि आदेश दिला, `जा. आततायी, अनन्वित अनाचारी, अत्याचारी, अतिरेकी, आसुरी व मदांध यांच्यापासून पृथ्वीला मुक्‍त कर.

परशुरामाच्या युद्धकौशल्याची चाचणी घेण्यासाठी शंकराने त्याला युद्धाचे आव्हान देणे, शंकराच्या त्रिशूळाचा वार चुकवतांना परशुरामाने आवेशाने केलेल्या परशूच्या प्रहारामुळे शंकराच्या कपाळावर खोक पडणे व त्याच्या युद्धकौशल्याने प्रसन्न झालेल्या शंकराने तो वार अलंकार मानून धारण करणे
परशुराम प्रस्थान करीत असतांना शंकराने परशुरामाच्या युद्धकौशल्याची चाचणी घेण्यासाठी त्याला युद्धाचे आव्हान दिले. गुरुदेव शंकर व शिष्य परशुराम यांचे भीषण युद्ध भडकले. हे भयंकर द्वंद्वयुद्ध सतत २१ दिवस सुरू होते. शंकराच्या त्रिशूळाचा वार चुकवतांना परशुरामाने आवेशाने परशूचा प्रहार केला. तो नेमका शंकराच्या कपाळावर झाला. त्यामुळे शंकराच्या कपाळाला खोक पडली. शिष्याच्या या अद्‌भुत युद्धकौशल्याने शंकर प्रसन्न झाला. त्याने परशुरामाला हृदयाशी धरून दृढ आलिंगन दिले. शिष्याची कीर्ती अक्षय व अक्षुण्ण व्हावी, यासाठी शंकराने तो आघात अलंकारासारखा जपला. तो घाव अलंकार मानून धारण केला. चिदानंद शिवाच्या प्रणम्य सहस्रनामावलीमध्ये `खंडपरशु' हे एक नाव आहे.

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

ब्राह्मशक्‍ती व क्षात्रसामर्थ्य यांनी शत्रूला पूर्णपणे पराभूत करायला समर्थ असलेला परशुराम !
`अग्रत: चतुरोवेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।'
अर्थ : माझ्या मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता व धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्‍तीने शापदग्ध करीन व क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्‍तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


 

 


परशुराम : श्रीविष्णूचा सहावा अवतार
 

कु. मधुरा भोसले


परशुराम श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याच्या कथा रामायणात, महाभारतात व काही पुराणांत आढळतात. त्याच्या आधीच्या अवतारांसारखे त्याच्या नावाचे स्वतंत्र पुराण नाही.

३ अ. आईवडील : परशुरामाची आई रेणुका व वडील भृगुकुलोत्पन्न ऋषी जमदग्नी हे होत. एकोणिसाव्या त्रेतायुगात (महाभारतानुसार त्रेता व द्वापार युगांच्या संधीकालात) परशुरामाचा जन्म झाला.

३ आ. कार्य
३ आ १. अधम अशा क्षत्रियांचा वध :
`वाल्मीकीने त्याला `क्षत्रविमर्दन' न म्हणता `राजविमर्दन' म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.'
कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परत आल्यावर त्याला हे कळताच त्याने कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामाने त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे तो तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेला.
परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.' या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले.

३ आ २. क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित करणे : परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.

३ इ. वैशिष्ट्ये
१. अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थ : चार वेद मुखोद्गत आहेत, म्हणजे पूर्ण ज्ञान आहे व पाठीवर बाणांसह धनुष्य आहे, म्हणजे शौर्य आहे; म्हणजेच येथे ब्राह्मतेज व क्षात्रतेज अशी दोन्ही तेजे आहेत. जो कोणी विरोध करील, त्यास शाप देऊन अथवा बाणाने परशुराम हरवील.

२. तेज रामात संक्रमित करणे : एकदा (दशरथपुत्र) रामाची कीर्ती ऐकून त्याच्या पराक्रमाची परीक्षा पहाण्यासाठी परशुराम त्याच्या वाटेत आडवा आला व आपले धनुष्य रामाच्या हातात देऊन ते वाकवून त्याला बाण लावून दाखवण्यास सांगितले. रामाने तसे केले व हा बाण मी कशावर सोडू म्हणून विचारले. `माझी या (काश्यपी)भूमीवरची गती निरुद्ध कर', असे परशुरामाने सांगितल्यावर रामाने तसे केले. या प्रसंगी परशुरामाने स्वत:चे धनुष्य रामाला देऊन टाकले. अशा प्रकारे परशुरामाने धनुष्य देऊन आपले क्षात्रतेज रामात संक्रमित केले.

३. धनुर्विद्येचा सर्वोत्तम शिक्षक : एकदा शस्त्र खाली ठेवल्यानंतर परशुरामाने क्षत्रियांशी वैरभाव सोडून दिला व ब्राह्मण, क्षत्रिय या सर्र्वांना समभावाने अस्त्रविद्या शिकवायला सुरुवात केली. महाभारतातील भीष्माचार्य, द्रोणाचार्य इत्यादी थोर योद्धे परशुरामाचेच शिष्य होते.

४. दानशूर : परशुरामाने ज्या क्षत्रीयवधासाठी मोहिमा केल्या, त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर त्याचे स्वामित्व आले. त्यामुळे त्याला अश्वमेध यज्ञाचा अधिकार प्राप्‍त झाला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. यज्ञाच्या शेवटी या यज्ञाचा अध्वर्यु कश्यप याला परशुरामाने सर्व भूमी दान केली.

५. भूमीची नवनिर्मिती : जोपर्यंत परशुराम या भूमीत आहे, तोपर्यंत क्षत्रीय कुळांचा उत्कर्ष होणार नाही, हे जाणून कश्यपाने परशुरामाला सांगितले, `आता या भूमीवर माझा अधिकार आहे. तुला इथे रहाण्याचाही अधिकार नाही.' यानंतर परशुरामाने समुद्र हटवून स्वत:चे क्षेत्र निर्माण केले. वैतरणा ते कन्याकुमारीपर्यंत असलेल्या या भूभागाला `परशुरामक्षेत्र' ही संज्ञा आहे.

६. परशुराम हा सप्‍तचिरंजीवांपैकी एक आहे.

३ ई. परशुरामक्षेत्रे : सह्याद्रीच्या उत्तर टोकावर साल्हेरच्या डोंगरावरील मध्ययुगीन गडावर, पंजाबात कांगडा जिल्ह्यामध्ये, कोकणात चिपळूणपासून पाच मैलांवरील एका डोंगरावर तसेच गोमंतकात काणकोण येथे परशुरामाचे एक पुरातन मंदिर आहे.

३ उ. मूर्ती : भीमकाय देह, मस्तकी जटाभार, खांद्यावर धनुष्य व हातात परशू अशी परशुरामाची मूर्ती असते.

३ ऊ. पूजाविधी : परशुराम हा श्रीविष्णूचा अवतार असल्याने तो उपास्यदेवता म्हणून पुजला जातो. वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी परशुराम जयंती एक कात व उत्सव म्हणून साजरी केली जाते.
(सनातनचा ग्रंथ ` विष्णु व विष्णूची रूपे')

सध्याच्या कलीयुगातील राष्ट्र व धर्म यांच्या शत्रूंशी लढण्यासाठी आपल्याला स्वत:मध्ये परशुरामाप्रमाणे क्षात्रतेज व ब्राह्मतेज वाढवणे आवश्यक आहे. स्वत:मध्ये क्षात्रतेज वाढवण्यासाठी `धर्मशक्‍ती सेने'च्या प्रशिक्षण वर्गांमध्ये सामील होऊन प्रशिक्षण घ्या व स्वत:मध्ये ब्राह्मतेज वाढवण्यासाठी साधना करा व धर्मशिक्षण घ्या.

- कु. मधुरा भोसले, धर्मसत्संगसेविका  

 
संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2002-2008 - दैनिक सनातन प्रभात