हिंदूंनो, ३१ डिसेंबरच्या रात्री नव्हे, गुढीपाडव्याला वर्षारंभ साजरा करा !

३१ डिसेंबरनिमित्त विशेष संस्कृती गौरव प्रश्नमंजुषा  |  दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान






पाश्चात्त्य संस्कृतीचे दुष्परिणाम !

संपूर्ण वर्षात जेवढे गर्भपात होतात, त्याच्या तिप्पट प्रमाणात ते फेब्रुवारी व मार्च महिन्यात होतात. हे सर्व गर्भपात ३१ डिसेंबरच्या रात्री साजर्‍या केल्या जाणार्‍या `हॅपी न्यू इयरची\' देणगी असते. (संदर्भ : राज एक्सप्रेस पुरवणी `सहेली\', भोपाळ संस्करण, २७.१२.२००६)



पाश्चात्त्य संस्कृतीची मर्यादा !

देवाजवळ लावायचा पितळेचा दिवा (`कुटूविलक्क\' असे त्यास तमिळ भाषेत म्हणतात) पिढ्यान् पिढ्या चालतो. तो पुन:पुन्हा नवा आणावा लागत नाही; परंतु विजेचा बल्ब मात्र पुन:पुन्हा बदलावा लागतो. पाश्चात्त्यांची विचार करण्याची पद्धत ही अशीच आहे. तिला स्वत:च्या काही मर्यादा आहेत. ते फक्‍त आपले कारखाने चालावे, अधिकाधिक नफा व्हावा, अधिकाधिक उत्पन्न व्हावे, एवढाच विचार करत असतात. आपल्या भौतिक तृष्णांचा अंत नसल्यामुळे, तृष्णांची पूर्ण शांति होऊन समाधान मिळणार नसल्यामुळे आपण परमेश्वराला काय मागितले पाहिजे ते पूज्यपाद आद्य शंकराचार्य खालील शब्दांत मांडतात - अशनं गरलं फणी कलापो वसनंचर्मच वाहनं महोक्ष । मम दास्थसि कि किमस्ति शंभो तवपादाम्बुजभक्‍तीमेव देहिं ।। - कांची कामकोटी पीठाचे जगद्‌गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती



सनातनची सात्त्विक उत्पादने

१.  ध्वनितबकडी -  धार्मिक कृती कश्‍या कराव्‍यात व 
त्‍यामागील शास्‍त्रीय दृष्‍टीकोन

२.  ध्वनितबकडी - सनातन धर्मसत्‍संग

३.  ग्रंथ - संस्कार हीच साधना

४.  ग्रंथ -  देवळात दर्शन कसे घ्‍यावे?

५.  ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?

६.  ग्रंथ - देवपूजेच्या कृतीचे शास्त्र

७.  ग्रंथ - देवघर व पूजेतील उपकरणे

वितरणासाठी संपर्क

  • मुंबईः ३२४३५६९९

  • ठाणेः ९३२२६५२५८०

  • रायगडः २७४५०३३८

  • पुणेः ९४२२४३७१३४

  • जळगावः ९४२३०५६४०३

  • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

  • नाशिकः ९४२२४४१७८२

  • इ-मेलः dainik@sanatan.org


  अनुक्रमणिका  





भारतीयांनो, १ जानेवारी रोजी पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्यास नववर्षारंभ साजरा करा !

सध्या नववर्षारंभ सर्वत्रच पाश्चिमात्य संस्कृतीनुसार १ जानेवारी रोजी साजरा केला जातो. नववर्षारंभ साजरा करण्याच्या या पद्धतीस विकृत स्वरूपही प्राप्‍त झाले आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत खार्‍या, गोड्या जेवणावळी, मद्यपान करून ध्वनिवर्धकाच्या तालावर हिडीस अंगविक्षेप करत नृत्य करणे, धिंगाणा घालणे, मारामार्‍या करणे, मद्यपान करून भरधाव वेगाने वाहने हाकणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फोडणे, अश्लील शब्दांत बोलणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, महिलांची छेड काढणे, यांसारखे अनेक गैरप्रकारही होतात. यांमुळे नव्या वर्षाची सुरुवात शुभ होण्याऐवजी अशुभ पद्धतीने होते. नव्या वर्षाची सुरुवात मंगलदायी व्हावी, यासाठी शास्त्र समजून घेऊन भारतीय संस्कृतीनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करणे हे नैसर्गिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक या सर्वच दृष्टीने श्रेयस्कर व फायदेशीर आहे. ब्रह्मदेवाने सृष्टि निर्माण केली, म्हणजेच सत्ययुगाला सुरुवात झाली, तो गुढीपाडवा हा दिवस असल्याने यादिवशी वर्षारंभ केला जातो. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण केल्याने भारतीय संस्कृतीचे होणारे अध:पतन आपणच रोखणे, हे आपल्या सर्वांचेच आद्यकर्तव्य आहे.



डॉ. जयंत आठवले

निधर्मी भारत सरकारने हिंदु धर्म धुडकावून लावून वैश्विक शक्‍तींशी व येथील मातीशी अजिबात संबंध नसलेले हिंदूंवर लादलेले दिवस बदलण्यास सिद्ध व्हा !

हिंदु धर्म अनादी असल्यामुळे त्याचा प्रत्येक गोष्टीत अनादी ईश्‍वराच्या विविध रूपांशी संबंध असतो, उदा. विश्‍वात श्री गणेशतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा ज्ञानदायी व विघ्नहर्ती श्री गणेशचतुर्थी; शक्‍तीतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा नवरात्र; ज्ञान, भक्‍ती व वैराग्यदायी शिवतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा शिवरात्र असते. याउलट इतर पंथियांतील महत्त्वाचे दिवस पृथ्वीवर होऊन गेलेल्या घटनांशी संबंधित आहेत ! पुढील काही उदाहरणांवरून हिंदु धर्माची महानता व भारतियांची इंग्रजांची मानसिक गुलामगिरी व विचारांचा क्षुद्रपणा लक्षात येईल.
अ. भारतीय संस्कृतीवर आधारित `शालिवाहन शक\' वगैरे शक वर्षगणनेसाठी न मानता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून काळाशी कोणत्याही तर्‍हेचा संबंध नसलेले `इ.स.\' ही पद्धत वर्षगणनेसाठी पाळायला सुरुवात केली.
आ. पाडव्याला निर्मितीशी संबंधित प्रजापतिलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो वर्षारंभाचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून १ जानेवारी हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस वर्षारंभाचा दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली.
इ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्त्व पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो `शिक्षक दिन\' म्हणून न पाळता भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस `शिक्षक दिन\' म्हणून पाळायला सुरुवात केली.
ई. लष्करातील जवानांचा दिवस विजयादशमीला साजरा केला असता, तर ते योग्य झाले असते.
उ. धनत्रयोदशी हा दिवस आरोग्याची देवता धन्वंतरी हिचा दिवस म्हणून पाळण्याऐवजी पाश्चात्त्यांचा `जागतिक आरोग्यदिन\' मानसिक गुलामगिरीतून स्वीकारला.
ऊ. श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून १ एप्रिल हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली.
ए. आठवड्याचा सुटीचा दिवस म्हणून भारतीय संस्कृतीतील सर्वांत महत्त्वाचे तत्त्व म्हणजे गुरुतत्त्व त्याची उपासना करण्यासाठी गुरुवार हा दिवस न ठेवता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून रविवार हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस निवडला.
ऐ. बालकांशी काहीएक संबंध नसलेल्या पंडित नेहरूंचा जन्मदिवस `बालदिन\' म्हणून साजरा करणे सुरू झाले. त्याऐवजी तो बालकांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदातील ग्रंथ लिहिणारे महर्षी काश्यप यांच्या नावे साजरा करणे योग्य झाले असते. याउलट पाकिस्तानने इस्लामवर आधारित कालगणना व इतर गोष्टी स्वीकारल्या, उदा. हिजरी शक सुरू करून रविवारऐवजी शुक्रवार हा दिवस साधना करता यावी यासाठी म्हणून सुटीचा दिवस ठरवला. इस्लामवर आधारित राज्यकारभारामुळे छोटासा पाकिस्तान `महान\' भारताला क्रिकेटपासून राजकारणापर्यंत प्रत्येक गोष्टीत जगात हरायला लावतो. हिंदु धर्म व संस्कृती यांच्याशी नाळ जोडलेली नसलेल्या अशा सर्व गोष्टी आपण ईश्‍वरी राज्यात बदलणार आहोत. - डॉ. जयंत आठवले

 




३१ डिसेंबरची वर्षाखेर हिंदूंनो, ही आपली संस्कृति नव्हे !

धर्मशिक्षणाच्या अभावी दिशाहीन झालेल्या आताच्या पिढीला संस्कृतीला अनुरूप कृति करणे कित्येकदा लज्जास्पद वाटते. आजची युवा पिढी तर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यातच धन्यता मानते. त्यामुळे पाश्चात्त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आज आपणसुद्धा ३१ डिसेंबर ही आपली वर्षाखेर मानून आदल्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. आपला धर्माभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने या संदर्भात काही मुद्यांचा ऊहापोह येथे केला आहे.

संकलक श्री. सुधांशु जोशी, ठाणे

३१ डिसेंबर हा दिवस हिंदु संस्कृतीप्रमाणे वर्षाचा शेवटचा दिवस नव्हे; परंतु इंग्रजांनी भारतावर केलेले दीडशे वर्षांचे राज्य व भारतीयांचे पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल असलेले आकर्षण यांमुळे हिंदू आपली सर्वोच्च संस्कृति सोडून पाश्चात्त्यांच्या भोगवादी संस्कृतीचे लांगूलचालन करत आले आहेत. याचाच परिणाम म्हणून अनेक हिंदू ३१ डिसेंबर हा दिवस वर्षाखेर म्हणून साजरा करतात.
पूर्वतयारीसाठी वेळ आणि पैसा यांचा अपव्यय
३१ डिसेंबरसाठी एक महिना आधीपासून मुंबई व गोवा यांसारख्या ठिकाणी मोठमोठी हॉटेल्स् व जहाजे आरक्षित केली जातात. यासाठी अवैधरीत्या दारूचा व्यापार होतो. अनेक निरपराध प्राण्यांची यानिमित्ताने कत्तल केली जाते. त्या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रोषणाई केली जाते. या सार्‍यात वेळ व पैसा यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.

सामाजिक दुष्परिणाम
रात्री उशिरापर्यंत अनेक जण ३१ डिसेंबरच्या पाटर््या करत असतात. ३१ डिसेंबर रोजी कर्णकर्कष आवाजात रात्रभर हिडीस गाण्यांच्या तालावर अंगविक्षेप करत नृत्ये केली जातात. या दिवशी मोठ्या शहारातील पब आणि हॉटेल्स खचाखच भरलेली असतात. रात्रभर अनेक ठिकाणी अनाठायी विजेचा वापर केला जातो. त्यामुळे सरकारच्या कितीतरी मेगावॅट विजेचे एका दिवसातच निष्कारण नुकसान होते. १ जानेवारी किंवा त्यानंतर दोन-तीन दिवस विविध प्रसारमाध्यमांतून तरुणींवर बलात्कार, मुलींची छेडछाड, अपहरण, अपघात, दारूमुळे विषबाधा यांसारख्या अनेक बातम्या येतात. पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने आपण अधोगतीला जातो, याची जाणीव नसणे पाश्चात्त्य संस्कृतीचे या आणि अशा पद्धतीने अंधानुकरण केल्याने आपण हळूहळू अधोगतीला जोतो, याची कल्पना ते करणार्‍यांना नसल्यामुळे ते करतात, त्याप्रमाणे आचरण करणे, यात आनंद आहे, असे सगळयांना वाटते. याहीपेक्षा अधिक आनंद देणार्‍या गोष्टी आपल्या संस्कृतीत आहेत, याचा त्यांनी अनुभव घेतलेला नसतो व या अंधानुकरणामुळे होणार्‍या भयंकर दुष्परिणामांचे गांभीर्यही समाजाला नसते. या सर्वांना अनेक मुद्दे कारणीभूत आहेत. त्यांपैकी काही येथे देत आहे.

धर्मशिक्षणाचा अभाव : आज आपल्या शाळा, महाविद्यालये तसेच मंदिरे यांतून धर्म व संस्कृति यांबाबत योग्य मार्गदर्शन केले जात नाही. इतर धर्मीयांमध्ये शाळा, महाविद्यालये तसेच मदरसे व चर्च यांतून धर्मशिक्षणाचे धडे दिले जातात. निधर्र्मी सरकार असल्यामुळे आपल्या शिक्षणपद्धतीत धर्मपालनाच्या गोष्टी अंतर्भूत नाहीत. घरांतूनही मुलांवर आपल्या धर्मातील रीतीरीवाजांचे महत्त्व बिंबवले जात नाही. आई-वडीलच सर्रास पाश्चात्त्य पद्धतींचे अनुकरण करत असतात. त्यांनाही त्यात भूषण वाटते. त्यामुळे तरुण पिढी याकडे वळली तर त्यात नवल ते काय ? यात पाश्चात्त्य भोगवादी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या नवीन वर्ष साजरे करण्याच्या या पद्धतीच्या भयावह दुष्परिणामांची कल्पना समाजाला नाही. या सर्वांच्या मुळाशी धर्मशिक्षणाचा अभाव हेच मूळ कारण असल्याचे समोर येते.

प्रसारमाध्यमांचा प्रभाव : दूरदर्शनवाहिन्या, वृत्तपत्रे ही सारीच प्रसारमाध्यमे सातत्याने पाश्चात्त्य संस्कृति, त्यांचे रहाणीमान यांचे प्रदर्शन करणारे कार्यक्रम, मालिका, बातम्या अगदी तिखट-मीठ लावून दर्शकांपुढे ठेवतात. लहान-थोर सर्वांवर त्याचा मोठा परिणाम होतो; परंतु आपल्या संस्कृतीतील उच्च मूल्ये आचरणात आणण्याबाबत कोणी विशेष काही बोलत किंवा दाखवत नाही. ज्यांनी समाजाला दिशा द्यायची ते समाजाला मोठ्या प्रमाणात दिशाहीन करत आहेत. त्यामुळे सध्या आपली अवस्था `अवघे आंधळेची मिळाले । तेथे डोळसाचे काय चाले ।\' अशी झालेली आहे.

तरुण पिढासमोर `आदर्श\' नाहीत : सध्याच्या युवा पिढीपुढे स्वामी विवेकानंद, छत्रपति शिवाजी महाराज, स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकर, शहीद भगतसिंग यांच्यासारख्या थोर विभूतींचे आदर्श ठेवण्यास शिक्षणपद्धतिही अपयशी ठरली आहे आणि घरातील संस्कारही पुरे पडलेले नाहीत. सध्या आपण कोणाचा आदर्श समोर ठेवू शकतो, अशीही ठळक उदाहरणे नाहीत. आजची युवा पिढी आजच्या तथाकथित चित्रपट कलाकारांना आपले आदर्श मानते आणि त्यांच्या जीवनशैलीचे डोळे झाकून अनुकरण करते. `डान्स पाटर््या\' आणि दारू पिणे ही त्यांची जीवनशैली आहे.

निधर्मी व स्वार्थी राज्यकर्ते : सध्याचे राज्यकर्ते हे केवळ सत्ता व पैसा या दोनच गोष्टींसाठी काम करतात. देश टिकवण्यासाठी देशाची पुढच्या पिढीची काळजी घेणे, याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. राज्यकर्त्यांना हिंदुधर्माचे वावडे आहे व हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांचे हिंदुप्रेम बेगडी आहे, हे अनेक उदाहरणांतून वारंवार जनतेसमोर येते.

धर्माबद्दल उदासीनता : पाश्चात्त्यांच्या इतर गोष्टींचे अंधानुकरण करायला हिंदूंना सहजरीत्या जमते; परंतु त्यांच्यासारखे धर्मपालन व धर्माचारण मात्र करत नाहीत किंवा धर्माविषयी जाणून घेण्याच्या संदर्भात काही अभ्यासही करत नाहीत.

हिंदुधर्म नष्ट करण्याचा कुटिल डाव : हिंदुधर्मीयांवर विविध माध्यमांतून होणारे हल्ले, धर्मांतरण तसेच अंनिससारखे कायदे या सर्वांतून अंतर्गत हिंदुधर्म नष्ट करण्याचा कुटिल डाव सुरू आहे, असाच अर्थ निघतो. या सर्वांतून हिंदूंच्या डोळयात धूळफेक होत असते. हे सारे होत असूनही बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना व अनेक हिंदू आपले मूग गिळून बसलेले आहेत.

हिंदूंनो, जागृत व्हा !
धर्मग्लानी दूर करा !

आपला देश व धर्म यांचे व पर्यायाने स्वत:चे रक्षण करण्यासाठी हिंदूंनो, झोपेतून जागे होण्याची वेळ आली आहे. उघड्या डोळयांनी राष्ट्र व धर्म यांच्या दूरवस्थेकडे पहात बसण्यापेक्षा राष्ट्ररक्षण व धर्मपालन करण्यासाठी काहीतरी ठोस कृति करण्याची गरज आहे. १९४७ साली आपल्या क्रांतिकारकांनी परकीयांशी लढून, आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्‍त करून स्वतंत्र केले. आज आपण स्वकीयांशी लढून आपला देश व धर्म यांना या दलदलीतून मोकळे करण्याची वेळ आली आहे. `धर्मो रक्षति रक्षित:।\' या वचनाप्रमाणे जर आपण धर्माचे रक्षण केले, तरच धर्म (ईश्‍वर) आपले रक्षण करतो. हिंदूंनो, स्वत:चे तसेच राष्ट्र व धर्म यांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांवर येऊन पडली आहे. उच्चभू्रंना या गोष्टींशी देणेघेणे नाही. हिंदूंनो, आता आपणच सक्षम होणे, ही काळाची गरज बनली आहे. भारतमातेला राष्ट्रद्रोही व नीतिमत्ताहीन राजकारण्यांपासून व धर्माला हानि पोहोचवणार्‍या धर्मद्रोह्यांपासून मुक्‍त करूया आणि अखंड हिंदुस्थानच्या निर्मितीसाठी काळानुसार क्षात्रधर्म साधनेचा अंगीकार करून जगात भारत हे हिंदुराष्ट्र असल्याचे पुन्हा दाखवून देऊया !





३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरणच !

खरे तर ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करणे, ही पाश्चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे; मात्र आता हिंदूंनाही हा दिवस म्हणजे भारतीय उत्सवांपैकी एक आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. या दिवशी काय काय करायचे, नवीन काय खरेदी करायचे, कोणत्या हॉटेलमध्ये जायचे, सुटीसाठी कोणत्या ठिकाणी जायचे, याची तयारी ते जोमाने करतात. आजही मुख्य शहरांपासून ते ज्या ठिकाणी वीज आणि पाणीसुद्धा नियमित येत नाही, अशा गावागावांमध्येही हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो. पाश्चात्त्यांचे अनुकरण करून आपण आपली संस्कृती तर नष्ट करतच आहोत; परंतु आपल्या भावी पिढीवरही पाश्चात्त्य विचारसरणीचे संस्कार करून भोगवादी समाजाचे एक सदस्यच बनवत आहोत, याचे भान हिंदूंना राहिले नाही. याच गोष्टींचा ऊहापोह करणारा हा लेखप्रपंच.
संकलक : श्री. संदीप शिंदे, पुणे


धर्माभिमान नसलेले हिंदू !
एखाद्या व्यक्‍तीने धर्मांतर केल्यानंतर ती व्यक्‍ती त्या धर्मातील प्रथा व उत्सव साजरा करून त्या धर्माचे आचरण करते. त्याचप्रमाणे आपणही जर आपल्या धर्माप्रमाणे आचरण न करता, इतर धर्मांप्रमाणे म्हणजेच ३१ डिसेंबर वा िख्रास्मस यांसारखे दिवस साजरे करायला लागलो, तर इतर धर्माप्रमाणे आचरण केल्याने एका दिवसापुरते का होईना, आपण धर्मांतरण केल्यासारखेच होईल. मात्र हिंदूंना आपला धर्म विसरून भोगवादी पाश्चात्त्यांचे `दिवस\' साजरे करतांना धर्मद्रोहाचे पाप आपल्याच माथी लागत आहे, याची जाणीव नाही. आज हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.



गुढीपाडवा सणापेक्षा ३१ डिसेंबरच्या रात्रीला अधिक महत्त्व देणारे जन्महिंदू !
हल्ली ३१ डिसेंबरच्या रात्री लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण एकमेकांना भेट कार्डाद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून `हॅपी न्यू इयर\' म्हणत नववर्षाच्या शुभेच्छा देत असतात. मुळात भारतीय संस्कृतीप्रमाणे `गुढीपाडवा\' हा हिंदूंचा `नववर्षदिन\' असतांना हिंदू मात्र नववर्षदिन म्हणून ३१ डिसेंबरची रात्र साजरी करण्यात धन्यता मानतात. अलीकडच्या काळात गुढीपाडवा या भारतीय वर्षारंभी एकमेकांना शुभेच्छा देणारे हिंदू बघायला मिळणे दुर्मिळ झाले आहेत.

भोगवादी युवापिढीचे निद्रिस्त पालक!
हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ब्राह्ममुहुर्तावर म्हणजेच पहाटे लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ वस्त्रे व अलंकार परिधान करून, धार्मिक विधीने करतात. त्यामुळे व्यक्‍तीवरही त्या वातावरणातील सात्त्विकतेमुळे चांगले संस्कार होत असतात. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून, धांगडधिंगा करत भोगवादी वृत्तीने रात्र घालवल्याने आपल्या चित्तावर होणारे संस्कारही भोगवादाचेच होणार, तसेच रात्रीच्या वेळी वातावरणही तामसिक असल्याने आपल्यातील तमोगुण वाढणार. या गोष्टींचे ज्ञान नसल्याने म्हणजेच धर्मशिक्षणाच्या अभावामुळे या प्रकारांना बळी पडून आजची तरुण पिढी भोगवादी व चंगळवादी बनत चालली आहे आणि याबाबत कोणत्याही प्रकारची जाणीव त्यांच्या पालकांमध्येही दिसून येत नाही.

रावणरूपी पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारूया !
आज हिंदु धर्मावर विविध मार्गाने आक्रमणे होत असून पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण सर्वांत मोठे आहे, हे आक्रमण मोडून काढणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. ज्या प्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभु श्रीरामचंद्र रावणवधानंतर अयोध्येला आले आणि तेथे गुढी उभारून विजयदिवस साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदूंनो, या रावणरूपी पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण मोडून काढून गुढीपाडव्याला नववर्षाची गुढी उभारून आपले धर्मकर्तव्य बजावा !




गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरा न करण्याविषयी कालातीत होऊन मिळालेले ज्ञान



श्री. निषाद देशमुख

हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारी रोजी नववर्ष साजरा करण्याचे `फॅड\' भारतामध्ये प्रचलित होत आहे. याबाबत सनातनचे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना मिळालेले ईश्‍वरी ज्ञान येथे देत आहोत.
कालचक्रामध्ये कालातीत होतांना जाणवलेला भाग
अ. कालपोकळीत लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित झाल्यावर कालपुरुषातून प्रकट झालेली काळाची अनंत रेषा दिसली व त्या रेषेचे युगांचे चार भाग आणि त्या प्रत्येक भागात वर्षांसाठी असंख्य भाग आहेत, असे दिसले.
आ. कालरेषेमध्ये असलेले प्रत्येक विभाजन गोलाकार कालचक्राच्या स्वरूपात दिसले व त्या कालचक्राचा व्यास ब्रह्मांड व ब्रह्मांडपोकळीपर्यंत व्यापलेला असून काळाच्या क्रियालहरींप्रमाणे त्याचे कार्य होत असल्याचे दिसले.
इ. काळाच्या शून्यत्वामध्ये शून्य क्रियाकाळामध्ये स्थिर होणे व तेथे युगकालचक्रामध्ये एका वर्षाच्या काळाची उत्पत्ती झाल्याचे जाणवले

नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
अ. नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्‍तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?
३१ डिसेंबरच्या कालपोकळीतून सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीच्या भागातून उत्पत्ती काळाशी निगडित नसून लयाच्या भागातून सुरू झाल्याचे दिसले व त्यामुळे कालरेषा आणि कालचक्र यांत साम्य नसल्यामुळे दोन्ही रेषाचक्रांत घर्षण होऊन कालचक्राचा भाग तेजहीन स्वरूपाचा होत आहे, असे दिसले. जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर नव्हे, तर व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे व ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जाणे : त्यानंतर मी कालपोकळीच्या बाहेरच्या बाजूस जात असल्याचे जाणवून मला पुढील ज्ञान मिळाले, `कालपोकळीत आतापर्यंत दिसलेली कालचक्रे वगैरे सर्व गोष्टी काळाची प्रत्यक्ष निर्मिती व संचारण यांच्याशी संलग्न आहेत. समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर कनिष्ठ, म्हणजेच सगुण स्तरावरच्या काळाची निर्मिती होऊन प्रत्यक्ष सगुणत्व स्वरूपातून सगुणत्व काळाच्या क्रियारूपाच्या अनुषंगाने सगुण स्तरावरील काळरूप घटनाचक्र गतीमान होऊन कार्य करते. अशा प्रकारे होणारी काळाची निर्मिती, हे काळाच्या स्थितीरूप संचारणाशी निगडित असल्यामुळे ब्रह्मांडाच्या कालचक्राच्या स्थितीरूपाच्या संचारणात्मक भागात ब्रह्मांडाच्या स्तरावरील काळाच्या अनुषंगाने पृथ्वीवरील काळाच्या घटक स्वरूपातून सगुणत्वरूपी काळाची निर्मिती होते. काळाची निर्मिती अयोग्य काळी केल्यावर होणारे काळाचे भासमान परिणाम गतीमान स्तरावर परिणामांच्या स्वरूपात प्रकट केले जातात. १ जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे. या दिवसापासून नववर्ष सुरू केल्यावर जीव स्वत:च्या भासमान काळात अडकतो व व्यष्टीरूपी काळ ब्रह्मांडाच्या स्थितीरूपाशी निगडित नसल्यामुळे जीव ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून काळाच्या अनुषंगाने प्रकटत असलेल्या ईश्‍वरी तेजाचा विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जातो; म्हणून कोणीही `१ जानेवारी\' या कालगणनेपासून नववर्षाला प्रारंभ करू नये.\' - एक ज्ञानी

पृथ्वीवरील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासून वर्षारंभ करत असले, तरी ते मांत्रिकांना कालचक्राचा पूर्ण ताबा घेता न येण्याची कारणे
संकलक :

पूर्ण विश्‍वाच्या अनुषंगाने बघितल्यास विश्‍वातील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासूनच नववर्ष प्रारंभ करतात व अशा लोकांचे बाहुल्य असल्यामुळे १ जानेवारीपासून पृथ्वीवरील वर्ष आरंभ होते. असे असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा भुवलोकातच किंवा मांत्रिकांचा गुलाम म्हणूनच कार्य करत राहील. याचे स्पष्टीकरण काय ?
एक ज्ञानी : अ. हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणार्‍या स्थूलातील व सूक्ष्मातील १० टक्के जिवांमुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत रहाणे समष्टी स्तरावरील कालचक्र हे व्यष्टी जिवाशी निगडित नसून समष्टी धारणेशी निगडित असल्यामुळे समष्टी स्तरावरील १ जानेवारीपासून निर्माण होणार्‍या मायावी वर्षात पूर्ण सृष्टी अडकलेली आहे. त्यामुळे मांत्रिकांचा ताबा पूर्ण सृष्टीवर कार्यरत आहे व मांत्रिकांच्या काळाच्या नियोजनाच्या अनुषंगानेच समष्टी स्तरावरील मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असले तरी हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणारे १० टक्के स्थूल (पृथ्वीवरील माणसे) व सूक्ष्म जीव (हिमालयातील ऋषी, साधना करणारे जीव आदी) यांनी साधना व कर्मरूपी धर्माचरण यांच्या बळावर नववर्षाची निर्मिती केल्यामुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत राहिल्यामुळे मांत्रिकांना पूर्ण पृथ्वीवरील कालचक्र त्यांच्या मायावी बळावर सुरू करणे शक्य होत नाही.
आ. प.पू. डॉक्टरांनी गुढीपाडव्यापासून वर्षारंभ करण्याच्या केलेल्या संकल्पामुळे कालचक्रावर ईश्‍वराचे अधिष्ठान ३० टक्के व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या-टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होते (उदा. `एक विद्वान\' यांनी `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होणार\', असे सांगितले होते. - श्री. निषाद)
इ. १ जानेवारीपासून नववर्ष साजरे करणार्‍या जिवाची पातळी ५० टक्क्यांच्या वर असली, तरच त्याला मायावी कालपोकळीतून सुटता येते व गुढीपाडव्याला वर्षारंभ करणार्‍या जिवाची पातळी कमी असली, तरी त्याचे मांत्रिकांपासून रक्षण होते.


गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला नववर्ष साजरा करणे अयोग्य असण्याविषयी कालातीत होऊन मिळालेले ज्ञान
हल्ली पाश्चात्त्य संस्कृतीप्रमाणे गढीपाडव्याऐवजी १ जानेवारी रोजी नववर्ष साजरा करण्याचे `फॅड\' भारतामध्ये प्रचलित होत आहे. याबाबत सनातनचे ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांना मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.
नववर्षाच्या उत्पत्तीबद्दल मिळालेले ज्ञान
नववर्षाच्या उत्पत्तीच्या वेळी कालचक्रातून क्रियालहरींचे प्रक्षेपण होऊन सृष्टीधारणा नवचेतनेने भारित होत असणे व नववर्षारंभ साजरा करणे, म्हणजेच या लहरींना ग्रहण करून धर्मशक्‍तीच्या तेजाच्या माध्यमातून सृष्टीरूपाला धर्मतेज पुरवणे, तसेच या माध्यमातून स्वत:ची व समाजाची उन्नती करून घेणे नववर्षारंभ गुढीपाडव्याऐवजी १ जानेवारीला साजरा करणे अयोग्य का ?
अ.
३१ डिसेंबरच्या कालपोकळीतून सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीच्या भागातून उत्पत्ती काळाशी निगडित नसून लयाच्या भागातून सुरू झाल्याचे दिसणे व त्यामुळे कालरेषा आणि कालचक्र यांत साम्य नसल्यामुळे दोन्ही रेषाचक्रांत घर्षण होऊन कालचक्राचा भाग तेजहीन स्वरूपाचा होणे
आ. शून्यकाळात एका वर्षाच्या कालचक्राची उत्पत्ती होतांना दिसणे व त्यात बीजरूपी दोन लहान कालपोकळींतील १ जानेवारीच्या कालपोकळीत प्रविष्ट होण्याचा विचार येऊन त्याप्रमाणे होणे : मी एका वर्षाच्या कालरेषेच्या कालपोकळीत असतांना संचारणात्मक कालपोकळीच्या स्थितीकाळाला सोडून शून्यकाळात गेलो असल्याचे जाणवले. त्या शून्यावस्थेत मला एका वर्षाच्या कालचक्राची उत्पत्ती होतांना ते कालचक्र काही अंतरावर दिसले. `या पोकळीचा मार्ग कुठे आहे\', असा प्रश्‍न माझ्या मनात आल्यावर मला माझ्यासमोर कालस्वरूपात्मक बीजरूपी दोन लहान कालपोकळी दिसल्या. (कालस्वरूपात्मक बीजरूपी पोकळी म्हणजे ज्या शून्यत्व काळाशी निगडित काळात पुढचे अवस्थारूप घेणारे कालचक्र स्वत:च्या पूर्ण रूपाला प्राप्‍त होते, त्या काळाच्या उत्पत्तीरूपी बिंदूशी निगडित बीज आकर्षणशक्‍तीतून कार्यरत झालेली बीजपोकळी.) त्यांपैकी एका कालपोकळीकडे बघून `ही पोकळी गुढीपाडव्याची आहे व दुसरी कालपोकळी १ जानेवारीची आहे\', असे मला जाणवले. `प्रथम १ जानेवारीच्या कालपोकळीत प्रविष्ट होऊ या\', असा आतून विचार आल्यावर मी त्या कालपोकळीत समाविष्ट झालो.
२ इ. जानेवारीच्या नवीन वर्षाचे कालचक्र उत्पत्तीस येतांना कंपनात्मक स्वरूपात गतीमान झाल्यामुळे त्या कालचक्राकडे बघून चांगले न वाटणे व आधीचे आणि हे नवीन कालचक्र सारख्याच गतीने गतीमान होत असल्यामुळे त्यांचे घर्षण होऊन ती दोन्ही कालचक्रे तेजहीन होत असल्याचे जाणवणे
२ ई. १ जानेवारीच्या कालपोकळीतून ब्रह्मांडाच्या स्तरावरील कालचक्राच्या पोकळीत गेल्यावर `ते कालचक्र काळया शक्‍तीच्या जोरावर चालत आहे व तेथे सर्व कृत्रिम स्वरूपाचे आहे\', असे जाणवले.
२ उ. गुढीपाडवाच्या कालपोकळीतील प्रवास त्यानंतर मी ब्रह्मांडाच्या कालपोकळीतून बाहेर पडलो व हवेत स्थिर झाल्यावर मला माझ्या डोक्यावर एक भोवरा दिसून मी त्या भोवर्‍यात प्रविष्ट झालो व त्याच्याद्वारे तीका वेगाने फेकला गेल्याप्रमाणे संचारणात्मक कालपोकळीत शिरलो. कालपोकळीत जाताच मला माझ्यासमोर गुढीपाडव्याची कालपोकळी दिसून मी तिच्यात प्रविष्ट झालो.
२ उ १. गुढीपाडव्याच्या कालपोकळीत जुन्या एका वर्षाच्या कालचक्राच्या लयाची व नवीन कालचक्राच्या उत्पत्तीची प्रक्रिया समजणे व सहजगतीने कालधुरेवर गतीमान झालेल्या नवीन कालचक्राकडे बघून खूप आनंद वाटणे
२ उ २. गुढीपाडव्याच्या कालपोकळीतून गुढीपाडव्याच्या काळात आल्यावर त्या एका वर्षाच्या कालचक्राऐवजी ब्रह्मांडाच्या महाकालचक्रात प्रवास करत असल्याचे जाणवणे व ते कालचक्र ईश्‍वरी चैतन्याच्या बळावर कार्यरत होत असल्याचे जाणवणे
२ ऊ. १ जानेवारीपासून नववर्षाला प्रारंभ करणे, म्हणजे समष्टीच्या इच्छाशक्‍तीच्या बळावर नव्हे, तर व्यष्टीरूपी कालगणनेच्या स्वरूपात मायावी भासमान कालस्वरूपात स्वत:ला अडकवणे व ईश्‍वरी चैतन्याला विरोध करून मांत्रिकांच्या ताब्यात जाणे
२ ए. १ जानेवारीपासून निर्माण होणारे वर्षचक्र हे धर्माच्या धुरेला स्थिर ठेवणार्‍या कालचक्राच्या समरेषेत नसल्यामुळे त्याला वर्षारंभ करणारा जीव ईश्‍वरापासून दूर होऊन मांत्रिकांच्या ताब्यात जाणे १ जानेवारीपासून निर्माण होणारे वर्षचक्र हे प्रत्यक्ष सृष्टीरूपी धर्मधारणेच्या अनुषंगाने ब्रह्मांडाच्या स्तरावर गतीमान होऊन सृष्टीरूपी धर्माच्या धुरेला स्थिर ठेवणार्‍या कालचक्राच्या समरेषेत नसल्यामुळे ब्रह्मांडाच्या स्तरातून प्रक्षेपित होणार्‍या काळरूपी व्यासत्वाच्या भागाला सोडून ते मांत्रिकांच्या मायावी कालपोकळीत चालणार्‍या वर्षचक्राशी निगडित होते व जिवाचे अस्तित्व मांत्रिकांच्या मायावी विश्‍वात काळरूपाच्या अनुषंगाने निर्माण होते. मायावी विश्‍वात जिवाचे वावरणे असल्यामुळे तो हळू हळू ईश्‍वराच्या अस्तित्वापासून अलग होऊन मांत्रिकांच्या ताब्यात जातो व मृत्यूनंतर भुवलोकात किंवा प्रत्यक्ष मायावी मांत्रिकांचा गुलाम म्हणून अनेक काळपर्यंत अडकून रहातो. - एक ज्ञानी
२ ऐ. पृथ्वीवरील बहुसंख्य जीव १ जानेवारीपासून वर्षारंभ करत असले, तरी ते मांत्रिकांना कालचक्राचा पूर्ण ताबा घेता न येण्याची कारणे
संकलक : पूर्ण विश्‍वाच्या अनुषंगाने बघितल्यास विश्‍वातील बहुसंख्य जीव १ जानेवरीपासूनच नववर्ष प्रारंभ करतात व अशा लोकांचे बाहुल्य असल्यामुळे १ जानेवारीपासून पृथ्वीवरील वर्ष आरंभ होते. असे असल्याने पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा भुवलोकातच किंवा मांत्रिकांचा गुलाम म्हणूनच कार्य करत रहील. याचे स्पष्टीकरण काय ?
एक ज्ञानी : अ. हिंदु धर्माचे पालन करून नववर्ष साजरा करणार्‍या स्थूलातील व सूक्ष्मातील १० टक्के जिवांमुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत ढकललेल्या कालचक्राचा सृष्टीच्या धर्मरूपी व्यासत्वाशी संपर्क खंडित न होता शाबूत रहाणे (हा भाग `दैनिक सनातन प्रभात\'च्या ३१.१२.२००६ रोजीच्या अंकात वाचा.)
आ. प.पू. डॉक्टरांनी गुढीपाडव्यापासून वर्षारंभ करण्याच्या केलेल्या संकल्पामुळे कालचक्रावर ईश्‍वराचे अधिष्ठान ३० टक्के व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होणे प.पू. डॉक्टरांनी `नववर्ष गुढीपाडव्यापासूनच सुरू करावे\', या केलेल्या संकल्पामुळे मांत्रिकांनी मायावी कालपोकळीत नेलेले कालचक्र ब्रह्मांडाच्या स्तरावरील कालचक्रामध्ये १० टक्के समाविष्ट झाल्यामुळे मांत्रिकांचा कालचक्रावरील प्रभाव ७० टक्के असला, तरी ३० टक्के ईश्‍वराचे अधिष्ठान व्यापून राहिल्याने मांत्रिकांचे काळाच्या टप्प्या टप्प्यावर ठरलेले नियोजन निष्फळ होणे सुरू झाले, उदा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बारगळणे. प्रत्यक्ष परात्पर गुरूंच्या संकल्पचेतनेतून हे कार्यविमोचन झाल्यामुळे वरिष्ठ मांत्रिकांनापण याची कल्पना आली नाही. हे झाले समष्टी स्तरावरील कालगणनेचे स्पष्टीकरण. (`एक विद्वान\' यांनी `अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होणार\', असे सांगितले होते. - श्री. निषाद)
इ. १ जानेवारीपासून नववर्ष साजरा करणार्‍या जिवाची पातळी ५० टक्क्यांच्या वर असली, तरच त्याला मायावी कालपोकळीतून सुटता येणे व गुढीपाडव्याला वर्षारंभ करणार्‍या जिवाची पातळी कमी असली, तरी त्याचे मांत्रिकांपासून रक्षण होत असणे व्यष्टी स्तरावरील वर्षरूप कालचक्र हे जिवाच्या प्रत्यक्ष कर्मरूपाच्या अनुषंगाने निर्माण झालेले असल्यामुळे त्याने केलेल्या कर्माच्या आधारे त्याचा स्थितीकाळ ठरलेला असून काळरूपाच्या अनुषंगाने जिवाची पुढच्या योनी रूपातील यातना ठरते, उदा. १ जानेवारीपासून नववर्ष साजरा करणार्‍या जिवाद्वारे साधनेच्या बळावर कर्म केले गेले असेल, तरीही मायावी कालपोकळीत गतीमान होणार्‍या जिवाच्या व्यष्टी चक्राची प्रत्यक्ष गतीची दिशा ही चक्राकारातून अचक्राकार स्वरूपात फिरणे सुरू होऊन जीव प्रत्यक्ष साधनेच्या बळावर मायावी पोकळीतून सुटून ब्रह्मांडाच्या पोकळीत स्थान निर्माण करून ईश्‍वरी चैतन्याच्या अनुषंगाने साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. मात्र या सर्व प्रक्रियेत जिवाचे स्थान हे मायावी कालपोकळीत असल्यामुळे ५० टक्क्यांच्या पुढील पातळीवरच्या जिवालाच मायावी कालपोकळीतून सुटून ब्रह्मांडाच्या कालपोकळीत स्थान निर्माण करता येईल. याउलट वर्षाच्या कालचक्राची सुरुवात गुढीपाडव्यापासून केल्यास ३० टक्के पातळी असलेला जीवही ब्रह्मांडाच्या कालपोकळीत स्थान निर्माण करतो, तर ४० टक्के पातळीचा जीव ब्रह्मांडाच्या काळपोकळीच्या मूळ बिंदूत स्थान निर्माण करू शकतो. म्हणून सर्वच जिवांनी गुढीपाडव्यापासूनच नववर्षारंभ करणे जास्त श्रेयस्कर आहे. याउलट जे जीव असे करत नाहीत, त्यांना मात्र त्यांच्या कर्माच्या अनुषंगाने भुवलोकात किंवा पाताळातील मांत्रिकांचा गुलाम म्हणून जगावे लागते व अनंत यातना सोसाव्या लागतात.
 




शिक्षिकांच्या शिबिरात सनातनच्या साधिका असलेल्या शिक्षिकेने केलेल्या प्रबोधनाचे फलित !

१ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याचा शिक्षिकांचा निर्णय !
पुणे, २९ डिसेंबर (वार्ता.) - नववर्ष हे पाश्चात्त्यांप्रमाणे १ जानेवारी रोजी साजरे करण्याऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याचा स्तुत्य निर्णय येथील शिक्षिकांच्या शिबिरातील शिक्षिकांनी घेतला. २१ डिसेंबर रोजी शिरवळ (ता. खंडाळा) येथे `छंदवर्ग शिक्षिका शिबिरा\'चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिरवळ, सांगवी, पलशी, भोळी, शिंदेवाडी व नायगाव येथील शिक्षिका उपस्थित होत्या. शिरवळमधील शाळेच्या शिक्षिका व सनातनच्या साधिका सौ. छाया पवार यांनी या संदर्भात प्रबोधन केल्यावर वरील निर्णय घेण्यात आला. (शिबिरातील शिक्षिकांना धर्माचरणास प्रवृत्त करणार्‍या सौ. छाया पवार यांच्यासारख्या साधिका हीच सनातनची शक्‍ती होय ! - संपादक)
शिबिरात पुढील पंधरवड्याचे नियोजन करतांना `१ जानेवारी या पाश्चात्त्यांच्या नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून भेटकार्ड तयार करून घ्यावयाचे व ते त्यांना एकमेकांना, तसेच शिक्षिकांना भेट देण्यास सांगावयाचे\', असे शिबिरार्थी शिक्षिकांनी ठरवले. त्यावर सौ. छाया पवार यांनी नववर्ष हे पाश्चात्त्यांप्रमाणे १ जानेवारी रोजी साजरे करण्यापेक्षा हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्याला साजरे करण्याचे महत्त्व सांगून उपस्थितांचे प्रबोधन केले. ``असे केल्यामुळे शिक्षिका व विद्यार्थी यांच्याकडून धर्मपालन आणि धर्माचरण होईल\'\', असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर १ जानेवारी रोजीचा वरील कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याचे व विद्यार्थ्यांनाही तसे करण्यास सांगण्याचे सर्व शिक्षिकांनी एकमुखाने सांगितले. (धर्माचरणाचे महत्त्व कळल्यानंतर तत्परतेने योग्य कृती करणार्‍या सर्व शिक्षिकांचे अभिनंदन ! पुढच्या पिढीवर संस्कार करण्याची आणि देशाचे नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याने त्यांनी धर्माचरणाचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे, ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. - संपादक) ``हे आम्हाला यापूर्वी कोणीही सांगितले नाही\'\', असेही या शिक्षिकांनी या वेळी सांगितले. (यावरून समाजास धर्मशिक्षणाची किती गरज आहे, हे लक्षात येते. सनातनतर्फे चालवले जाणारे सत्संग, सनातनची नियतकालिके व ग्रंथ, तसेच ध्वनीफिती व ध्वनीचित्र तबकड्या यांच्या माध्यमातून धर्मशिक्षण दिले जाते. - संपादक) दोन महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका शिबिरात सौ. पवार यांनी `वाढदिवस आध्यात्मिक पद्धतीने कसा साजरा करावा ?\', याचे प्रात्यक्षिक करून दाखवले होते. या माहितीमुळे प्रभावित झालेल्या इतर शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे वाढदिवस शास्त्रानुसार साजरे केले होते.
 




ख्रिस्त्यांच्या नववर्षी हिंदूंनी देवळात गर्दी न करण्याचे हैद्राबादमधील बालाजी देवस्थानच्या मुख्य पुजार्‍यांचे आवाहन !


दिशाहीन हिंदूंना योग्य दिशा देणार्‍या पुजार्‍यांचे अभिनंदन !



ख्रिस्त्यांच्या नववर्षदिनी हिंदूंनी मंदिरात जाणे, हे हिंदूंचे धर्माबद्दलचे घोर अज्ञान !

हैद्राबाद, २४ डिसेंबर (वृत्तसंस्था) - येथील चिलकूर बालाजी मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांनी `` ख्रिस्त्यांच्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच १ जानेवारी रोजी हिंदूंनी देवळात गर्दी करू नये\'\', असे आवाहन भाविकांना केले आहे. ``हिंदु धर्मानुसार १ जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरू होत नाही\'\', असे त्यांनी म्हटले आहे. (हिंदुबहुल देशात हिंदूंना ही बाब कुणीतरी सांगावी लागते, हे लज्जास्पद आहे. ही स्थिती बदलण्यासाठी प्रत्येक हिंदूने स्वत: धर्मशिक्षण घेणे व दुसर्‍यालाही ते देणे अनिवार्य आहे ! - संपादक) याबाबत या मंदिराचे मुख्य पुजारी श्री. एम्.व्ही. सौंदाराजन व श्री. सी.एस्. गोपाळकृष्ण यांनी सांगितले की, नववर्षाची सुरुवात म्हणून १ जानेवारी रोजी हिंदूंनी मंदिरात जाऊन दर्शन घेणे, हा चुकीचा प्रघात आहे. तेलगू लोकांचे नवीन वर्ष `उगाडी\' या दिवशी सुरू होते, तर केरळमधील हिंदूंचे नवीन वर्ष `विसू\' या दिवशी सुरू होते. आगमशास्त्रानुसार चालवण्यात येणार्‍या काही मंदिरांमध्ये ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी खास आरती केली जाते. हे चुकीचे आहे. ( ख्रिस्त्यांनी गुढीपाडव्याला चर्चमधील घंटा वाजवल्याचे कधी ऐकले आहे का ? हिंदू मात्र पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊन ख्रिस्त्यांच्या नववर्षदिनी खास आरत्या करतात. या आरत्यांचा हिंदूंना अपेक्षित आध्यात्मिक लाभ तर होणार नाहीच, पण असल्या कणाहीनतेमुळे इतर धर्मियांसमोर त्यांची पत आणखी खालावेल, यात शंका नाही ! - संपादक)




विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देण्याऐवजी `प्रेम' करण्यास प्रोत्साहन देणारे नीतीमत्ताहीन चांगू काना ठाकूर महाविद्यालय !

माझी मुलगी चांगू काना ठाकूर महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. तिने मला एक भेटकार्ड दाखवले. ते गुलाबदिवसानिमित्त (रोझ डे) महाविद्यालयानेच छापले आहे. त्याची किंमत २ रुपये आहे. त्यात ते कार्ड आणि १ गुलाब मिळणार. हे कार्ड विद्यार्थ्याने विकत घेऊन आपले नाव भरून ज्याला द्यायचे त्याचे नाव लिहून एका खोक्यामध्ये जमा करायचे. मग त्या दिवशी तो खोका उघडून ते कार्ड सर्वांसमोर वाचून दाखवण्यात येणार आहे व ज्याला ते लिहिले असेल, त्याला कार्ड व गुलाब दिले जाणार आहे. यात चीड आणणारी गोष्ट म्हणजे त्यात ३ पर्याय आहेत. एक म्हणजे ओळख, दुसरे म्हणजे मैत्री व तिसरे प्रेम. कार्डाच्या बाहेरील बाजूस ``तुमचे ह्रदय सांगते ते ऐका, कारण ते नेहमीच खरे सांगते\'\', असे इंग्लिशमध्ये लिहिले आहे. (विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करण्याऐवजी अशा प्रकारे अनैतिक धडे देणारे महाविद्यालय भावी पिढीचा ऱ्हासच करत आहे. पालकांनी अशा महाविद्यालयाच्या विरोधात आवाज उठवायला हवा. - संपादक) महाविद्यालयात विद्यार्थांनी चांगले शिक्षण घेऊन आपल्या भवितव्याचा पाया भक्कम करावा, अशी शिकवण देण्याऐवजी `प्रेम करा\' असे उघडपणे सांगणारी महाविद्यालये निर्माण होत आहेत. विद्यार्थांकडून वेगवेगळया कारणांसाठी पैसे उकळले जातात. वर्षाच्या शेवटी `तोड-फोड\' या नावाखाली प्रत्येकाकडून पैसे उकळले जातात. अशी किती रुपयांच्या सामानाची तोडफोड विद्यार्थ्यांकडून होत असणार ? हजारो विद्यार्थांकडून हजारो रुपये उकळले जातात. हे कार्ड छापण्यामागे पैसे मिळवणे, हा उद्देश आहेच; पण त्याचबरोबर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून नीतीमत्ता रसातळाला नेण्याचे दुर्दैवी कामसुद्धा ही महाविद्यालये करत आहेत. अशा संस्कृतीमधूनच मग एकतर्फी प्रेम, बळजबरी, चेहर्‍यावर अँसिड फेकणे, खून करणे अशा विकृती बळावतात आणि त्या निष्पाप विद्यार्थांना आयुष्यातून उठवतात. पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळेच आज आपले धार्मिक सण, उत्सव यांचे स्वरूप विकृत झाले आहे आणि रोझ डे, व्हॅलेंटाईन डे, रिबन डे, सारी डे असे साजरे करण्यात नवीन पिढी बरबाद होत आहे. हा सर्व प्रकार बघितल्यावर धर्मशिक्षणाची किती नितांत गरज आहे, हे लक्षात आले. - श्री. नंदू मुळये, पनवेल




संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात