कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !
१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून
आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर
कार्यक्रम पहात बसतात !
२. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत,
तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !
पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले
!
१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची
गटारे मिळतात तेथील व तरंगणार्या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्याचे
लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी
हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन
विश्वाच्या उत्पत्तीचा विचार
हल्ली शोधलेले विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १०
व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्तातील सिद्धान्तांशी जुळतात !
खगोलशास्त्रावर प्रभुत्व
असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२०००
वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी
याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !
कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती,
तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्हास करणारे आधुनिक विज्ञान
सनातनची सात्त्विक उत्पादने
लघुग्रंथ - आरतीसंग्रह

वितरणासाठी संपर्क
|

१.
जन्माचा इतिहास
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी `पुत्रकामेष्टी यज्ञ' केला असता,
यज्ञातून अग्नीदेव प्रकट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस प्रदान
केले होते. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्या अंजनीलाही पायस
(खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) मिळाले होते व त्यामुळेच मारुतीचा जन्म
झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस `हनुमानजयंती' म्हणून
साजरा करतात. वाल्मीकि-रामायणामध्ये (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे
हनुमानाची जन्मकथा दिली आहे : अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर
`उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्वफळ असावे', या समजुतीने हनुमानाने आकाशात
उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला
गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच
आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती
छाटली गेली. यावरून त्याला हनुमान हे नाव पडले. 
  
२. कार्य व वैशिष्ट्ये
२ अ. सर्वशक्तीमान : जन्मत:च मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण
केले अशी जी कथा आहे, तीतून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला)
मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी,
आप, तेज, वायू व आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त
सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्तीमान आहे.
२ अ १. भुते व मारुति : सगळया देवतांमध्ये फक्त मारुतीला वाईट शक्ती
त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू
शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला `भुतांचा स्वामी' म्हटले जाते. भुताने कोणाला
पछाडले, तर त्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात नेतात किंवा मारुतिस्तोत्रे
म्हणतात. याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्तीवरून नारळ उतरवून तो
मारुतीच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्तीवरून नारळ उतरविल्याने व्यक्तीतील
वाईट शक्ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून
बाहेर पडणारी शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ
विसर्जित करतात.
२ आ. महापराक्रमी : राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम,
लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्चेष्ट झाले असता जांबवंताने हनुमानाच्या
पराक्रमाचे असे वर्णन केले - `वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर
जिवंत असता, सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे; परंतु
जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृततुल्यच आहोत.'
हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धुम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य वीरांचा नाश
केला. त्याने रावणालाही मूर्च्छित केले. समुद्रउड्डाण, लंकादहन, द्रोणागिरी
आणणे इत्यादी घटना या हनुमंताच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.
२ इ. भक्त : दास्यभक्तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अजूनही
मारुतीच्या रामभक्तीचेच उदाहरण देतात. तो आपल्या प्रभूंकरिता प्राण अर्पण
करण्यासाठी सदैव तयार असे. त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व व ब्रह्मत्व
यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे. हनुमान म्हणजे सेवक व सैनिक यांचे मिश्रण
! हनुमान म्हणजे भक्ती व शक्ती यांचा संगम !
२ ई. अखंड सावधता व साधना : युद्ध चालू असतांनाही मारुति थोडा वेळ
बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हासुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी
गदेवर असायची.
२ उ. बुद्धीमान : `व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, भाष्य, वार्तिक आणि
संग्रह यांत मारुतीची बरोबरी करणारा कोणी नव्हता.' (उत्तररामचरित्
३६.४४-४६) मारुतीला `अकरावा व्याकरणकार' मानतात.
२ ऊ. मानसशास्त्रात निपुण व राजकारणपटू : अनेक प्रसंगी सुग्रीवादी
वानरच काय, पण रामानेही याचा सल्ला मानला आहे. रावणाला सोडून आलेल्या
बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता, मारुतीने `त्याला
घ्यावे' असे सांगितले व रामाने ते मान्य केले. लंकेत सीतेच्या
प्रथमभेटीच्या वेळी तिच्या मनात स्वत:बद्दल विश्वास निर्माण करणे,
शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वत:च्या (रामाच्या)
आगमनाबद्दल भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठविणे,
यावरून त्याची बुद्धीमत्ता व मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते.
लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्वास
डळमळीत केला.
२ ए. जितेंद्रिय : सीतेच्या शोधासाठी रावणाच्या अंत:पुरात गेलेल्या
मारुतीची मन:स्थिती ही त्याच्या उच्च चारित्र्याची निदर्शक आहे. त्या वेळी
तो स्वगत म्हणतो, `नि:शंकपणे पडलेल्या या सर्व रावणस्त्रिया मी ह्या अशा
पाहिल्या खर्या; परंतु त्या पहाण्यामुळे माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न
झाला नाही.' - वाल्मीकिरामायण, सुंदरकांड ११.४२-४३. अनेक संतांनीही या
जितेंद्रिय अशा मारुतीची पूजा बांधून त्याचा आदर्श समाजापुढे ठेवला.
इंद्रियजित असल्यामुळेच मारुति इंद्रजितालासुद्धा हरवू शकला.
२ ऐ. साहित्य, तत्त्वज्ञान व वक्तृत्वकला यांत प्रवीण : रावणाच्या
दरबारातील मारुतीचे भाषण हे वक्तृत्वकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
२ ओ. संगीतशास्त्राचा प्रवर्तक : मारुतीला संगीत- शास्त्राचा एक
प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. यामागे त्याचा रुद्राशी असलेला संबंध
साहाय्यभूत असावा. त्याला रुद्राचा अवतार मानतात. रुद्र हे शिवाचे एक रूप
आहे. मारुति हा शिवाचा अवतार असला, तरी रामाच्या उपासनेने त्याच्यातील
विष्णुतत्त्व जास्त झाले आहे. शिवाच्या डमरूतून नाद निर्माण झाला; म्हणून
शिवाला संगीताचा कर्ता समजतात. मारुतीच्या अंगच्या गायनी कलेमुळे समर्थ
रामदासस्वामींनी त्याला `संगीतज्ञानमहंता' असे संबोधले आहे.
२ औ. नवसाला पावणारा : हा नवसाला पावणारा देव आहे, या श्रद्धेमुळे
व्रत किंवा नवस म्हणून कित्येक स्त्रीपुरुष मारुतीला
रोज ठराविक प्रदक्षिणा घालतात. `लग्न न होणार्या कुमारिकेने ब्रह्मचारी
मारुतीची उपासना करावी', असे जे सांगितले जाते, त्याचे काही जणांना
आश्चर्य वाटते. `कुमारिकेच्या मनात `बलदंड पुरुष नवरा म्हणून मिळावा' अशी
इच्छा असते व म्हणून ती मारुतीची उपासना करते', असेही काही जण चुकीचे
सांगतात; पण त्याची खरी कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. लग्न न होणार्यांपैकी जवळजवळ ३० टक्के व्यक्तींचे लग्न भूत, करणी
इत्यादी वाईट शक्तींच्या त्रासामुळे होत नाही. मारुतीच्या उपासनेने ते
त्रास दूर होतात व लग्न होणे शक्य होते. (१० टक्के व्यक्तींचे लग्न भावी
वधू किंवा वर याच्या अवास्तव अपेक्षा असल्याने होत नाही. त्या संदर्भात
अपेक्षा कमी केल्या की लग्न होते. ५० टक्के व्यक्तींचे लग्न प्रारब्धामुळे
होत नाही. प्रारब्ध मंद किंवा मध्यम असल्यास कुलदेवतेच्या उपासनेने
प्रारब्धामुळे असणारा अडथळा नष्ट होऊन लग्न होऊ शकते. तीव्र प्रारब्ध
असल्यास केवळ संतकृपेनेच लग्न होऊ शकते. उरलेल्या १० टक्के व्यक्तींचे
लग्न इतर आध्यात्मिक कारणांमुळे होत नाही. त्यासाठी त्या त्या कारणाप्रमाणे
उपाय योजावे लागतात.)
२. अत्युच्च पातळीच्या देवतांत ब्रह्मचारी किंवा विवाहित असा फरक नसतो.
सर्वांचे जन्म संकल्पातूनच, म्हणजे `अयोनिसंभव' असल्याने, त्यांच्यात
स्त्री किंवा पुरुष असा लैंगिकदृष्ट्या भेद नसतो. माणसाने तसा
फरक केलेला असतो. स्त्रीवाचक देवता म्हणजे देवांची शक्तीच असते.
२ अं. चिरंजीव : दर वेळी प्रभु श्रीराम अवतार घेतात तेव्हा ते तेच
असतात, मात्र मारुति दर अवतारी निराळा असतो. मारुति सप्तचिरंजीवांपैकी एक
असला, तरी सप्तचिरंजीव चार युगांचा शेवट झाला की, मोक्षाला जातात व त्यांची
जागा अतिशय उन्नत असे सात जण घेतात.

  
३. मूर्तीविज्ञान
३ अ. रंग : हनुमानाच्या स्वरूपासंबंधी वेगवेगळी माहिती आढळते. याची
मूर्ती क्वचित काळया आणि बव्हंशी तांबड्या रंगाची असते. हनुमानाचा काळा
वर्ण हा शनीच्या प्रभावाने निर्माण झाला असावा. तांबड्या रंगाचा हनुमान
म्हणजे शेंदूर माखलेला. हनुमानाच्या शेंदूरप्रेमाच्या कथाही आहेत.
१. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळावर शेंदूराचा टिळा लावला. हनुमानाने त्याचे
कारण विचारता सीता म्हणाली, ``त्यामुळे तुमच्या स्वामींचे आयुष्य वाढते.''
तीच गोष्ट हनुमानाने लक्षात ठेवली आणि त्याने आपल्या सर्वांगाला शेंदूर
फासला !
२. एकदा हनुमान द्रोणागिरी घेऊन लंकेला जात असता भरताने त्याला बाण मारला.
त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. ती जखम शेंदूर व तेल लावून बरी झाली;
म्हणून हनुमानाला शेंदूर व तेल आवडते.
३ आ. रूप : आकार व मुख यांनुसार हनुमानाच्या सर्वसाधारणत: पुढील
प्रकारच्या मूर्ती आढळतात.

३ आ १. प्रताप मारुति : प्रताप मारुतीचे स्वरूप भव्य असते. एका
हातात द्रोणागिरी व दुसर्या हातात
गदा, असे हे रूप असते.
३ आ २. दासमारुति : दासमारुति हा श्रीरामापुढे हात जोडून उभा असतो.
त्याचे मस्तक किंचित पुढे झुकलेले व पाय जुळवलेले असतात. त्या वेळी त्याची
शेपटी जमिनीवर रुळलेली असते.

३ आ ३. वीरमारुति : वीरमारुति हा युद्धाच्या पवित्र्यात असतो.
वीरमारुतीची मूर्ती वीरासन घातलेली असते. या मूर्तीच्या डाव्या हातात गदा
असते. डाव्या हाताला पुढे केलेल्या डाव्या पायाच्या मांडीचा आधार देऊन ती
गदा डाव्या खांद्यावर टेकवलेली असते. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला असून,
उजवा हात अभयमुद्रेत असतो. वीरमारुतीची शेपटी वर उभारलेली असते. काही वेळा
त्याच्या पायाखाली राक्षसाची मूर्ती असते. भूत, करणी वगैरेंचा त्रास दूर
करण्यासाठी वीरमारुतीची उपासना करतात.
वीरमारुतीमधून शक्ती, तर दासमारुति हा रामाशी एकरूप झालेला असल्याने
त्याच्यातून भाव व चैतन्य प्रक्षेपित होत असते.
३ आ ४. पंचमुखी मारुति : पंचमुखी मारुतीच्या मूर्ती बर्याच
प्रमाणात आढळून येतात. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह व कपिमुख ही ती पाच मुखे
होत. या दशभुज मूर्तींच्या हातात ध्वज, खड्ग, पाश इत्यादी आयुधे असतात.
पंचमुखी देवतेचा एक अर्थ असा आहे की, पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर या चार
दिशा व ऊर्ध्वदिशा अशा पाचही दिशांना त्या देवतेचे लक्ष आहे किंवा तिचे
त्यांच्यावर स्वामित्व आहे.
३ आ ५. दक्षिणमुखी (उजवीकडे पहाणारा) मारुति : दक्षिण हा शब्द दोन
अर्थांनी वापरला जातो. एक म्हणजे दक्षिण दिशा व दुसरा म्हणजे उजवी बाजू.
दक्षिण दिशावाचक अर्थ : या मूर्तीचे तोंड दक्षिणेकडे असते, यावरून
त्याला दक्षिणमुखी मारुति असे म्हटले जाते.
उजवी बाजूवाचक अर्थ : या मारुतीचे तोंड त्याच्या उजव्या बाजूकडे
वळलेले असते.
या मारुतीची सूर्यनाडी चालू असते. सूर्यनाडी ही तेजस्वी व शक्तीदायक आहे.
(गणपति व मारुति यांची सुषुम्नानाडी नेहमी चालू असते; पण रूप बदलल्यावर थोडा
बदल होऊन त्यांची सूर्य किंवा चंद्र नाडीही थोड्या प्रमाणात चालू होते.)
उजवीकडे पहाणारा मारुति हे उजव्या सोंडेच्या गणपतीप्रमाणेच कडक दैवत आहे.
वाईट शक्तींच्या निवारणासाठी याची उपासना केली जाते. महाराष्ट्रात मुंबई,
पुणे, औरंगाबाद वगैरे ठिकाणी, तर कर्नाटकात बसवगुडी क्षेत्रात असे मारुती
आढळतात.
३ आ ६. वाममुखी (डावीकडे पहाणारा) मारुति : वाम म्हणजे डावी बाजू
किंवा उत्तर दिशा.
उत्तर दिशावाचक अर्थ : या मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असते.
डावी बाजूवाचक अर्थ : या मारुतीचे तोंड त्याच्या डाव्या बाजूकडे
वळलेले असते.
या मारुतीची चंद्रनाडी चालू असते. चंद्रनाडी ही शीतल व आनंददायी आहे. तसेच
उत्तर दिशा ही अध्यात्माला पूरक आहे.
३ आ ७. अकरामुखी मारुति : या मारुतीला बावीस हात व दोन पाय असतात. (असा
मारुति सौराष्ट्रात आहे.)
(संदर्भ : सनातनचे प्र्रकाशन `मारुति')
३ इ. मारुतीरायाच्या हातातील गदा
`गदा ही असुरांचा नाश करण्यासाठी व भक्तांचे रक्षण करण्यासाठी उपयोगी ठरते.
गदेचा हातातील भाग लहान आहे; मात्र समोरील भाग मोठा आहे. या मोठ्या भागात
प्रचंड ईश्वरी शक्ती साठलेली असते. जेव्हा असुरांचा नाश करायचा असतो, त्या
वेळी ही शक्ती कार्यानुरूप प्रकट होते. (प्रकट रूपात कार्य करते.) गदेतून
प्रत्येक क्षणी प्रक्षेपित होत असणार्या तारक-मारक शक्ती व चैतन्य यांमुळे
भक्तांचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते.' (श्री. परशुराम गोरल यांच्या
माध्यमातून, १६.१२.२००५, दुपारी ४.२०)
३ ई. हनुमानाचे मुख कोणत्या दिशेला असते ?
हनुमानाच्या मंदिरात हनुमानाचे मुख नेहमी दक्षिणेलाच असते. (दिशाचक्र,
पृष्ठ १०, प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला.)
 श्री. माने
३ उ. ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रतीक असलेला हनुमंत !
हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा शिवाचा
अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती करतांना
त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक) सामर्थ्यही
आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धाच्या वेळी
आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव यांच्यातील युद्धात
श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले होते. तेव्हा
हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली
होती. (श्री. कुमार माने यांच्या माध्यमातून, ३०.३.२००६) 
  
४. पूजाविधी
४ अ. मारुतीच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृती
प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या
उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा
कृतीमुळेच त्या देवतेच्या तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यास मदत होते. मारुतीच्या
उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयी सनातनच्या
साधकांना ईश्वरी कृपेमुळे मिळालेले ज्ञान पुढे तक्त्यात दिले आहे. या व यांसारख्या
विविध कृतींमागील शास्त्र सनातनची ग्रंथमालिका `धर्मशास्त्र असे का सांगते ?' यात
दिले आहे. ४ आ. प्रचलित पूजा : महाराष्ट्रात शनिवार हा मारुतीचा वार समजतात, तर
इतर सर्व भारतात शनिवार व मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी
मारुतीला शेंदूर व तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची
रूढीही पूर्वापार चालत आलेली आढळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना म्हणून
वाममुखी (डावीकडे तोंड असलेला) मारुति किंवा दासमारुति पूजेत ठेवतात.
४ इ. मारुतीला तेल, शेंदूर व रुईची पाने-फुले अर्पण का करावीत ? : पूजेत जी
वस्तू ज्या देवाला अर्पण केली जाते, `ती वस्तू त्या देवाला आवडते', असे
बाळबोध भाषेत सांगितले जाते, उदा. गणपतीला तांबडे फूल, शंकराला बेल व
विष्णूला तुळस. मग ती वस्तू का आवडते हे सांगणारी एखादी गोष्ट सांगितली जाते.
प्रत्यक्षात शंकर, विष्णु, गणपति अशा उच्च देवतांना आवड-नावड असे काही नसते.
विशिष्ट वस्तू विशिष्ट देवाला वाहण्यामागील कारण याप्रमाणे आहे.
पूजेचा एक उद्देश असा असतो की, पूजा करीत असलेल्या मूर्तीत चैतन्य निर्माण
व्हावे व त्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा. ते चैतन्य
निर्माण करण्यासाठी एखाद्या देवाच्या मूर्तीला जी वस्तू क्षमता सर्वांत
जास्त असते; म्हणून मारुतीला तेल, शेंदूर व रुईची पाने अर्पण करतात.
४ ई. मारुतीला नारळ का व कसा अर्पण करावा ? : नारळ हा चांगल्या तसेच वाईट,
अशा दोन्ही प्रकारच्या लहरी आकर्षित व प्रक्षेपित करू शकतो. नारळ अर्पण
करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी व मारुतीची
सात्त्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी मारुतीची प्रार्थना करावी. त्यानंतर
नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व राहिलेला अर्धा भाग तेथील
स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या
परिसरातील त्रासदायक शक्ती व कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट
होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण
केल्याने मारुतीच्या सात्त्विक लहरींचा आपल्याला लाभ होतो. काही भाविक
देवाला नारळ पूर्णत: अर्पण करून टाकतात. नारळ पूर्णत: अर्पण करून टाकल्याने
त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना
आध्यात्मिक लाभ होत नाही. यासाठी शक्यतो देवाला नारळ अर्पण करू नये;
त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी
ठेवावा व देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
४ उ. शनीची साडेसाती व मारुतीची पूजा :
शनीची साडेसाती असतांना तिचा त्रास कमी व्हावा म्हणून मारुतीची पूजा करतात.
त्याचा विधी असा : एका वाटीत तेल घ्यायचे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या
तेलात स्वत:चा चेहरा पहायचा. मग ते तेल मारुतीला वाहायचे. एखादी आजारी व्यक्ती
जरी मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला मारुतीची पूजा
करता येते. तेलात चेहर्याचे प्रतिबिंब पडते तेव्हा वाईट शक्तीचेही
प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्तीचा नाश होतो.
खरा तेली शनिवारी तेल विकत नाही; कारण ज्या शक्तीच्या त्रासापासून सुटका
करून घेण्यासाठी एखादा माणूस मारुतीला तेल वाहात असेल, ती शक्ती तेल
विकणार्याला त्रास देण्याची शक्यता असते; म्हणूनच मारुतीच्या देवळाबाहेर
बसलेल्याकडून तेल विकत न घेता तेल घरून नेऊन वाहावे.
४ ऊ. शनिवारी दाढी का करू नये ?
दाढी ठेवणे व केसांच्या जटा वाढवणे हे पूर्वीच्या काळी ऋषीधर्माचे, म्हणजेच
ब्रह्मचर्यपालनाचे प्रतीक समजले जात होते. शनिवार हा शिवाच्या
ब्रह्मचारीव्रताचे पालन करणार्या हनुमानाचा वार आहे. या दिवशी ब्रह्मांडात
हनुमानतत्त्वाच्या लहरींचे प्राबल्य अधिक असल्याने या हनुमानतत्त्वाचा आदर
करून ऋषीधर्माचे पालन करावयाचे, म्हणजेच `संसारात असूनही कामवासनेवर विजय
मिळवायचा आहे', याची आठवण रहावी; म्हणून शनिवारी दाढी करू नये. हे सर्व
नियम कर्मकांड उपासनेच्या अंतर्गत येतात. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ
यांच्या माध्यमातून, १९.२.२००५, दुपारी १२.१५)
४ ए. देवघरात बसलेल्या मारुतीची मूर्ती का ठेवू नये ?
मारुतीच्या सगुण मारक तत्त्वाचा फायदा मिळण्यासाठी शक्यतो अप्रकट मारक शक्तीच्या
रूपातील बसलेल्या मारुतीची मूर्ती देवघरात न ठेवली जाणे
सप्तदेवतांमध्ये कमी कालावधीत प्रकट मारक सगुण कार्य करणारे असे
हनुमानतत्त्व आहे. `हनुमान' या शब्दाचा अर्थच असा आहे की, `ज्याच्या
हुंकाराचे अनुमान प्रत्यक्ष देवतांनाही करता येत नाही, असा.' देवता या
मारक कार्य करतांना प्रथम वायूवेगाने हालचाल करणार्या हनुमानतत्त्वाच्या
लहरींना वाहन बनवून ब्रह्मांडात अवतरतात; म्हणूनच त्याला `मारुति' अशी
संज्ञा मिळाली आहे. जो देवतांना आपल्या वायूतत्त्वाच्या लहरींच्या
साहाय्याने भक्तांच्या कल्याणासाठी कमी कालावधीत ब्रह्मांडात मूर्त रूप
साकार करण्यास भाग पाडतो, तो मारुति. हनुमानाच्या हुंकारातील आर्ततेमध्ये
ब्रह्मांडातील प्रगाढ ध्यानावस्थेत असलेल्या उच्च देवतांपैकी कोणत्याही
प्रकारचे तत्त्व जागृत करण्याची क्षमता आहे, तसेच याच्या मारक हुंकारामध्ये
सप्तलोक व सप्तपाताळ हलवण्याचीही क्षमता आहे.
बसलेल्या मारुतीची मूर्ती ही अप्रकट शक्तीचे प्रतीक आहे. वीरासनातील मूर्ती
ही हनुमानाच्या प्रकट मारक शक्तीचे प्रतीक आहे. मारुतीच्या सगुण मारक
तत्त्वाचा फायदा मिळण्यासाठी शक्यतो अप्रकट मारक शक्तीच्या रूपातील
बसलेल्या मारुतीची मूर्ती ठेवू नये. बसलेल्या मारुतीची मूर्ती ही त्याच्या
गाढ ध्यानावस्थेचे प्रतीक असल्याने या अवस्थेत त्याची कर्मेंद्रिये ही
अजागृत असल्याने या तत्त्वाचा सामान्य जिवांना सगुण स्तरावर फायदा मिळण्याचे
प्रमाण खूपच कमी असते. जिवाची पातळी ६० टक्क्यांच्या पुढे गेल्यानंतर तो
आपल्या भक्तीने गाढ ध्यानावस्थेत बसलेल्या मूर्तीतील देवत्व जागृत करू शकतो.
- एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.५.२००५, दुपारी
१.५६) 
  
५. हनुमान जयंती
५ अ. तिथी : काही पंचांगांच्या मते हनुमानाची जन्मतिथी आश्विन वद्य
चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान
जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते.
५ आ. उत्सव साजरा करण्याची पद्धत : या दिवशी हनुमानाच्या देवळात
सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला कीर्तन संपते
व हनुमानाचा जन्म होतो. त्यानंतर हनुमानाच्या मूर्तीची पूजा करतात व
सर्वांना प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
५ इ. हनुमान जयंतीला मारुतीचा नामजप जास्तीतजास्त का करावा ? : `हनुमान
जयंती' या तिथीला मारुतीचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने
कार्यरत असते. या दिवशी `श्री हनुमते नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त
केल्याने नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या मारुतित्त्वाचा
आपल्याला लाभ मिळतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन `मारुति')

  
६. हनुमंताचे अतुलनीय माहात्म्य
अ. हनुमंताचे जन्मदिन
`आनंद-रामायणात' हनुमंताच्या जन्मदिनाचे वेगवेगळे तीन दिवस आहेत. कार्तिक
शु. एकादशी, कार्तिक कृष्ण चतुर्दशी आणि कार्तिकी पौर्णिमा. प्रत्येक
कल्पात रामायण घडले व घडते. कल्पाकल्पातील रामकथांत भेद आहेत. कल्पभेदाने
सगळयाच कथा सत्य आहेत.
शिवशंकराचा अवतार हनुमंत. भगवान रुद्र वानर होतो. माणूस वानर झाला, तर तो
चमत्कार ! भगवंत वानर झाला, तर त्यात कसला चमत्कार ? कसले आश्चर्य ?
भगवंताचे मत्स्यावतार, कूर्मावतार, वराहावतार आहेतच.
हनुमंत मानव नाही आणि वानरही नाही. हनुमंत देवांचा देव आहे, अ-मानव आहे. अ-वानर
आहे, वास्तविक हनुमंत कोण आहे, ते हनुमंतच जाणे.
हनुमंत दिव्य `विभूति' आहे. उत्कट दिव्य व्यक्तिमत्त्व आहे. जगातल्या
कुठल्याही संस्कृतीला, कुठल्याही वा*्मयाला असे तेजोमय, ज्वलंत, दिव्य
विभूतिमत्व लाभले नाही. हनुमंतासारखा हनुमंतच !'
(प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाड्मय पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे,
अंक १.)
आ. हनुमानाचा जन्म
मुनीच्या आदेशानुसार अंजना वायुदेवाची आराधना करते. वायुदेव प्रसन्न होतात.
स्वत:च तिच्या पोटी जन्म घ्यायचे आश्वासन देतात. काही वर्षे जातात. अंजनेला
मूल होत नाही. ती तगमगते. भगवान शंकराची उपासना करते. काही वर्षे आराधना
करते. शंकराची कृपा संपादन करते. शंकर स्वत:च तिचा मुलगा होण्याचे आश्वासन
देतात. तिला मंत्र सांगतात.
अंजना आसनमांडी घालून बसते. मांडीवर हाताची ओंजळ असते. शिवमंत्राचा जप करत
असते. आकाशातून घार पायसपात्र घेऊन जात असते. अवचित सुसाट वादळ सुटते.
झंझावाताने घार थरथरते. पंख आणि पात्र लटपटतात. पायसपात्र खाली पडते, ते
नेमके अंजनेच्या ओंजळीत ! ती ध्यानस्थ असते. शंकराचा, वायूदेवाचा हा प्रसाद
ती अतीव श्रद्धेने प्राशन करते. अंजनेला दिवस जातात. मुलगा होतो. चैत्र
पौर्णिमा मंगळवारी सूर्योदयाला हनुमंताचा जन्म होतो.
इ. सुग्रीवाने हनुमानाला राम व लक्ष्मण कोण आहेत, याचा तपास करण्यास
पाठवणे
`पंपासरोवरावर धनुर्धारी राम व लक्ष्मण असतात. ऋष्यमूक पर्वतावर
सुग्रीव असतो. वालीची त्याला विलक्षण दहशत असते. गिरीशिखरावरून सुग्रीव हे
दोघे नवे तेज:पुंज शस्त्रधारी कुमार पहातो. `वालीचेच ते हेर आहेत, मारेकरी
आहेत', असे त्याला मनोमन वाटते. सुग्रीव थरथरतो. हनुमंत त्याचा सखा आणि
मंत्री आहे. त्याच्याजवळ तो आपले मनोगत सांगतो, ``वालीने पाठवलेले हे दोघे
मारेकरी आहेत. वाली राजा आहे. राजाला असंख्य मित्र असतात. या दोघा नवख्या
तरुणांचा शोध घेतला पाहिजे. त्यांचे अंतरंग जाणले पाहिजे. हनुमंता, तू शोध
घे ! वालीचेच जर ते हेर असतील, तर मला संकेत कर. लगोलग मी मंत्र्यांसह इथून
पळून जाईन. कुठेतरी अन्यत्र जागा घेईन.'' हनुमान राम व लक्ष्मण यांना
पर्वतावरूनच पहातो, न्याहाळतो. त्याला ओळख पटत नाही; पण त्याचा उजवा डोळा,
उजवा बाहू, उजवे अंग स्फुरत असते, फडकत असते. डोळयांत अश्रू तरळतात आणि
अजाणता, नकळत त्याचे अंत:करण राम व लक्ष्मण यांच्याकडे विलक्षण ओढ घेत असते.
`असे का होते', ते हनुमानालाही कळत नाही.
ई. हनुमानाची वक्तृत्वकला
हनुमान ब्राह्मणवेश घेऊन पंपासरोवरावर येतो व राम आणि लक्ष्मण यांच्याजवळ
जातो. आत हनुमंताची अवस्था विलक्षण असते. त्याचे अंगांग मोहोरते, डोळे
पाणावतात व हृदय थरथरते. `काहीतरी अघटित घडणार', असे त्याच्या अंतर्मनाचा
कण्नकण् सांगत असतो. हनुमंत झुकतो. रामचरणी माथा ठेवतो. अत्यंत विनयाने
संभाषण करतो, ``आपण कोण क्षत्रियकुमार आहात ? साधारण पुरुष इतका तेजोमय कधी
असूच शकत नाही. आपले तेज, आपली कांती असामान्य आहे. अलौकिक, अद्वितीय असे
पुरुष आपण कोण आहात ? इथले वन आणि पर्वत भीषण आहेत. क्रूर हिंस्त्र श्वापदांचे
इथे भय आहे. निर्जन, भयानक वनात कशाकरता आलात ? आपले ज्वलंत तेज आणि अपूर्व
कांतीने मी स्तिमीत झालो आहे.''
हनुमानाचे मनोहर आणि मधूर भाषण सुरूच असते. रामप्रभु एकाग्रतेने ते ऐकत
असतात. ब्राह्मणरूपाने आलेल्या हनुमंताचे रूप आणि एकंदर व्यक्तिमत्त्व ते
न्याहाळून पहातात, रोखून पहातात, बोलत मात्र काहीच नाहीत. हनुमंतालाही या
गोष्टीचे आश्चर्य वाटते. थोडा वेळ तो बोलतो आणि गप्प होतो. तो बोलत रहावा;
म्हणून श्रीरामप्रभु ब्राह्मणाला पुढे बोलणे सुरू ठेवायला सांगतात. हे
सांगतांनाच हनुमंताच्या संभाषणाविषयी आणि एकंदर व्यक्तिमत्त्वाविषयी
लक्ष्मणाला सांगतात, ``लक्ष्मणा, वेदांचा अभ्यास न केलेल्या कोणालाही असे
भाषण करता येणे शक्य नाही. संपूर्ण व्याकरण याने अनेक वेळा ऐकलेले असावे;
कारण हा पुष्कळ बोलत होता, तरी अशुद्ध एकही शब्द त्याच्या मुखातून निघालेला
नाही. भाषणात उगाच पाल्हाळ नाही. ते संदिग्ध नाही. अस्खलित आहे. ऐकणार्याला
कंटाळा आणणारे नाही. मनात आधी उत्कृष्ट रीतीने प्रविष्ट होऊन नंतरच याचे
भाषण कंठविवरापासून श्रोत्यांच्या कानावर पडत असल्यामुळे त्याचा उच्चार
मध्यम रीतीने होतो आहे. त्या त्या स्वरवर्णाचे संस्कार क्रमाने अंत:करणावर
ठसवण्याला समर्थ आहेत. याची वाणी, याचे संभाषण त्वरारहित आहे. विलंबशून्य
आहे; म्हणूनच मनाला आनंद देणारे आहे. ऊर, कंठ आणि शिर या तिन्ही ठिकाणी
अभिव्यक्त होणार्या याच्या अद्भुत वाणीने, खड्ग उपसून तत्पर असलेल्या
शत्रूचे हृदयही बदलेल. तो याची स्तुतीच करील. अशा प्रकारचा दूत ज्या
राजापाशी असेल, त्याची कोणती कामगिरी कशी अयशस्वी होईल ? अशा गुणांचा
कार्यसाधक ज्याच्याजवळ असेल, त्याचे मनोरथ सिद्धीस जातीलच. लक्ष्मणा, तू
याच्याशी बोल.''
उ. श्रीरामाच्या प्रथम भेटीच्या वेळी हनुमंताचा भाव जागृत होणे
लक्ष्मण श्रीरामप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे हनुमंताशी बोलतो. ``आम्ही
दोघे अयोध्येचा राजा दशरथाचे
कुमार ! हा माझा मोठा भाऊ श्रीराम, मी लक्ष्मण ! आम्ही विरक्त आहोत. चौदा
वर्षांच्या वनवासाला आलो आहोत ! श्रीरामाच्या पत्नीला सीतादेवीला कुणी
राक्षसाने पळवून नेले आहे. या गहन वनात आम्ही तिचाच शोध घेतो आहोत ! तुम्ही
कोण ?'' श्रीरामप्रभुवर हनुमंतांची दृष्टी खिळलेली असते. माथी जटा,
कांती श्यामवर्णाची, भुवनमोहन रूप असे अद्भुत सौंदर्य ! सौंदर्याचाच ओतीव
पुतळा. हनुमंत नेत्रांनी ते अद्भुत रामरूप पित होता. त्याचे रोम रोम
रामरूप प्राशन करीत होते. नेत्रांत अश्रू असतात. अंगांग मोहोरलेले असते,
पुलकीत असते. व्याकुळ हनुमंत श्रीरामचरणी माथा ठेवतो. अंजनेयाच्या अश्रूला
विराम नसतो, वाणी अवरुद्ध असते.
ऊ. प्रभु श्रीरामाने हनुमंताचा स्वीकार करणे
हनुमंताला ब्राह्मणवेशाची स्मृतीच उरत नाही. ब्राह्मणवेशाचे अवधानच उरत नाही.
हनुमंत परम संवेदनशील होतो. त्याचे ब्राह्मण वेशाचे ते आवरण आपोआप दूर होते.
वास्तविक रूप प्रगटते. रामप्रभुचरणी हनुमंत माथा ठेवतो. अश्रू ढाळतो.
रामचरणी प्रार्थना करतो. हनुमंताचे आवरण हटते. वास्तविक रूप प्रगटते. आता
कसला उशीर ? श्रीरामप्रभु हनुमंताला उठवतात. आपल्या हृदयाशी धरतात. दृढ
आलिंगन देतात. रामप्रभूंच्या हृदयातले
हनुमंताच्या हृदयी जाते. अदृश्य शक्ती हनुमानाच्या हृदयी प्रवेश करते.
भगवान आणि भक्त एक होतात. भगवंताची आणि भक्ताची दोघांचीही एक अद्भुत
अवस्था असते. श्रीराम हनुमंताच्या मस्तकाचे अवघ्राण करतात. हनुमंताच्या
आनंदाला सीमा नसते.' (प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाड्मय
पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे, अंक ५.)
ए. प्रत्येक रामकथेला हनुमंताची उपस्थिती
`यत्र यत्र रघुनाथकीर्तनं, तत्र तत्र कृतमस्तकाज्जलिम् ।
बाष्पवारि परिपूर्ण लोचनम् मारुतिं नमत राक्षसान्तकम् ।।
राक्षसान्तक असा कठोर हृदयाचा मारुति जिथे जिथे रामकथा, रघुनाथाचे संकीर्तन
सुरू असेल, तिथे तिथे हात जोडून, नतमस्तक होऊन अश्रुपूर्ण नेत्रांनी सदैव
उपस्थित असतोच. सर्व हिंदुस्थानभर केव्हाही, कुठेही रामकथेला प्रारंभ
होण्याआधी `रामकथा-प्रिय' हनुमंतरायाकरता तिथे
स्वतंत्र आसन, रांगोळी घातलेला पाट मांडण्याची प्रथा सहस्रश: वर्षांपासून
सर्वत्र आहे.
रामकथा श्रवणाकरता, मारुतीराय हा वृद्ध ब्राह्मणरूपाने तिथे उपस्थित रहातो.
कथेच्या प्रारंभापूर्वी तो येतो आणि कथा संपल्यावर सर्वात शेवटी तो तेथून
जातो. यासंबंधीचे अनेक प्रसंग, अनेक उदाहरणे, अनेक कथा उपलब्ध आहेत.' (ऋषिस्मृती
- १, हनुमंताचे अतुलनीय माहात्म्य, पृ. १६. प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(नारायणानंदनाथ))
ऐ. रामाने वालीपत्नी तारा हिला केलेला उपदेश
`एकाच रामबाणाने वालीचा वध होतो. श्रीराम वालीपत्नी तारा यांचे
सांत्वन करतांना म्हणतो, ``तू जर वालीच्या देहाकरिता शोक करत असशील, तर हा
वालीचा देह तुझ्यासमोर आहे. वालीच्या आत्म्याकरिता शोक करत असशील, तर आत्मा
अमर आहे. त्याला मृत्यू नाही; म्हणून शोक करणे उचित नाही.'' वालीचा
अंत्येष्टी संस्कार होतो. श्रीराम सुग्रीवाला राज्याभिषेक करतो. वालीपुत्र
अंगद युवराज होतो.'
ओ. ब्रह्मचारी हनुमानाने सीतादेवी व रामप्रभू
यांचे मीलन घडविणे
`सीतादेवी व रामप्रभु यांचे मीलन घडविण्याकरिता ब्रह्मचारी हनुमानाचा
जीव तगमगतो, व्याकुळतो. हनुमंत जितेंद्रिय असतो.' - गुरुदेव डॉ.
काटेस्वामीजी

  
७. हनुमानाचे अद्वितीय गुण व सामर्थ्य
अ. हनुमानाचे सामर्थ्य
`ज्ञान-विज्ञान, कलासंपन्न व प्रगत अशा जातीचा प्रमुख नेता हनुमान उच्च
विद्याविभूषित, ज्योतिषशास्त्र व अनेक कला यांचा ज्ञाता होता. बल, बुद्धी,
विद्या, शौर्य व पराक्रम या अद्वितीय गुणांचा तो धनी होता. `हनुमान हा
भाषाकोविद असून वेद व व्याकरण त्याने अभ्यासिले असावेत', असे मत स्वत:
श्रीरामाने प्रकट केले आहे. अत्यंत बलशाली असलेल्या हनुमानाने सीतेच्या
शोधासाठी ३२ किलोमीटर समुद्री अंतर पोहून पार केले. याबाबत वाल्मीकी
रामायणात स्पष्ट उल्लेख आहे.
यं यं देशं समुद्रस्य जागाम स महाकपि: ।
तस्य तस्योरुवेगेन सोन्माद इव लक्ष्यते ।।
अर्थ : महाकपि (हनुमान) समुद्राच्या ज्या भागातून जात होता, तो भाग
त्याच्या मांड्यांच्या वेगामुळे उन्मत्त झाल्यासारखा वाटत होता. यावरून
हनुमानाच्या सामर्थ्याची आपण कल्पना करू शकतो. - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण
झालेले सत्य)
आ. हनुमान हा भक्ती, शक्ती व युक्ती यांचा अपूर्व संगम असलेला
श्रेष्ठ व्याकरणकार आणि शास्त्रीय संगीतातील एक प्रमुख संगीताचार्य असणे
`वीणावादक असलेल्या हनुमानाची शास्त्रीय संगीतातील तीन प्रमुख
संगीताचार्यांत गणना केली जाते. (अन्य दोन संगीताचार्य शार्दुल व कहाल होत.)
`संगीत परिजात' हा महत्त्वपूर्ण ग्रंथ हनुमानाच्या संगीत सिद्धांतावर
आधारित आहे. त्याने प्रतिपादलेल्या `हनुमत् संगीत पद्धती'ला भारतीय
शास्त्रीय संगीतात विशिष्ट स्थान आहे.
त्याचे व्यक्तीमत्त्व म्हणजे भक्ती, शक्ती व युक्ती यांचा अपूर्व संगम
होय. या श्रेष्ठ व्याकरणकाराचे व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, वार्तिक, भाष्य
व संग्रह इत्यादींवर असामान्य प्रभुत्व होते.' - श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण
झालेले सत्य, पृष्ठ २१)
इ. समर्थ व दूरदृष्टी असलेला धूर्त राजकारणी पुरुष हनुमान
`राम व रावण युद्धाच्या वेळी रावणपुत्र इंद्रजीत याने अलौकिक अस्त्राने राम,
लक्ष्मण आणि वानर सैन्य यांना मूर्च्छित केले, त्या वेळी हनुमानाच्या
कुशलतेबाबत चिंतित झालेल्या बिभीषणाला जांबवान सांगतो,
हनुमान जीवित असल्यास, सारे सैन्य मेले, तरी जिवंत असल्यासारखे आहे; परंतु
हनुमान जर जीवित नसेल, तर आपण सारे जिवंत असूनही मेल्यासारखे आहोत. -
वाल्मीकी रामायण, युद्धकांड ७४.२२
स्पष्टीकरण : हनुमानाच्या पराक्रमाबद्दल केवढा हा दृढ विश्वास ! तो समर्थ
व दूरदृष्टी असलेला धूर्त राजकारणी पुरुष होता. लंकेसारख्या अनोळखी
प्रदेशात एकट्याने शिरून रावणाची शक्ती, त्याचे सामर्थ्य व सैन्यबल यांची
माहिती त्याने श्रीरामाला दिली. अशोक वनातील कडेकोट पहार्यात असलेल्या
सीतेची भेट घेऊन व श्रीरामाचे कुशल वर्तमान सांगून त्याने तिला धीर दिला.
लंकादहन करून त्याने रावणाच्या मनोधैर्याला धक्का दिला. आपल्या चातुर्याने
बिभीषणाला रावणाकडून फोडून श्रीरामाच्या पक्षाला आणले.'
- श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य, पृष्ठ २१)
ई. अष्टसिद्धी असलेला, मनोजीवी व बुद्धीमंतांत श्रेष्ठ हनुमान
`भारतीय योगशास्त्रातील १. अणिमा, २. महिमा, ३. लघिमा, ४. गरिमा, ५. ईशित्व,
६. वशित्व, ७. प्राकाम्य व ८. प्राप्ती या अष्टसिद्धी होत. या
सिद्धींद्वारे साधक आपले शरीर हवे तेवढे लहान, मोठे, जड, हलके, सूक्ष्म व
विशाल करू शकतो. उपासना करून हनुमानाने या सर्व सिद्धी प्राप्त केल्या
होत्या व त्यांचा उपयोग सीतेचा शोध घेण्याच्या प्रयत्नात कुशलतापूर्वक
केलेला आपणास दिसतो. हनुमान हा मनोजीवी (मनाच्या वेगाने जाणारा) व
बुद्धीमंतांत श्रेष्ठ होता. ज्या स्त्रीला पूर्वी कधीही पाहिलेले नाही, तिचा
शोध परक्या, अनोळखी राज्यात व तेही बलाढ्य सत्ताधिशाच्या प्रदेशात जाऊन
एकट्याने घेण्याचे अतिशय कठीण आव्हान त्याने स्वीकारले होते. यावरून
त्याच्या बुद्धीचे श्रेष्ठत्व व आत्मविश्वास यांची कल्पना आपणास येते.' -
श्री. अरुण पांढरीपांडे (विस्मरण झालेले सत्य, पृष्ठ २२)

  
८. मारुतीच्या मंदिरात दृष्ट काढून फोडलेला नारळ व
तिठ्यावर ठेवलेला उतारा यांची तुलना

प.पू. डॉक्टर : दोन्हींमध्ये एवढा फरक असतांना तिठ्यावर उतारा का
ठेवतात ?
विद्वान मांत्रिक : तिठ्यावर उतारा ठेवल्याने वाईट शक्तीची वासना
थोड्याफार प्रमाणात तृप्त होते. तिठ्यावर उतारा ठेवल्याने भूक कमी लागणे,
जेवायला बसल्यावर जेवण नकोसे होणे किंवा खूप खाणे, मळमळणे यांसारखे त्रास
थोड्याफार प्रमाणात व तात्पुरते कमी होण्यास मदत होते. म्हणून सर्वसाधारणपणे
अन्नावरून वासना उडालेल्या व्यक्तीला फायदा होण्यासाठी शक्यतो उतार्याचा
उपाय करतात. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००४, दुपारी
३.०७) (क्रमश:)
प.पू. डॉक्टर : मारुतीचे मंदिर किती जागृत आहे व तिठ्यावर वाईट शक्तींची
रहदारी आहे कि नाही यांचा किती परिणाम होतो ?
विद्वान मांत्रिक : मारुतीचे मंदिर जागृत असेल व तिठ्यावर वाईट शक्तींची
रहदारी असेल, तर ३० टक्के एवढा परिणाम होतो, नाहीतर १० टक्के एवढा परिणाम
होतो. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००४, दुपारी ३.१०)
प.पू. डॉक्टर : वाईट शक्ती नारळाच्या माध्यमातून आल्याने ती
मारुतीच्या मंदिरात नष्ट झाली, हे समजू शकते; पण तिठ्यावर उतारा ठेवल्याने
तिने तृप्त होऊन परत त्रास देऊ नये, हे समजत नाही.
विद्वान मांत्रिक : उतार्याच्या माध्यमातून फक्त वासनाशक्ती
प्रबळ असणार्या वाईट शक्तींचा त्रास १० ते १५ टक्के एवढाच व तात्पुरता कमी
होतो. त्रास कायमचा दूर करण्यासाठी नामजपाचीच आवश्यकता असते. (सौ. अंजली
गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००४, दुपारी ३.५०)
तुरटी : तुरटीमुळे करणी करणार्या किंवा त्रास देणार्या वाईट शक्तीचे
रूप कळते. तुरटी ओवाळून टाकून ती जाळल्यामुळे त्यातून बाहेर पडणार्या
रज-तमात्मक लहरींचे घनीकरण होते व त्यातून निर्माण होणार्या आकारावरून
वाईट शक्तीच्या त्रासाचे प्रमाण कळते.
अ. तुरटी कोणताही आकार धारण न करता बराच वेळ फसफसत राहिली असता,
हल्ला करणारी शक्ती मोठ्या ताकदीची आहे, असे समजावे.
आ. तुरटी जाळली असता, बर्याच वेळा ती प्राण्यासारखा किंवा
पक्ष्यासारखा आकार धारण करते, यावरून वाईट शक्ती कोणत्यातरी प्राण्याच्या
किंवा पक्ष्याच्या माध्यमातून आपल्याला त्रास देत असल्याचे समजावे.
इ. कधीकधी तुरटीला बाहुलीसारखा आकार प्राप्त होतो, यावरून
मांत्रिकाने आपली प्रतिकृती बनवून त्यावर करणी केली आहे, असे समजावे.
ई. कधी कधी तुरटीला कवटीचा आकार प्राप्त होतो, यावरून कमी पातळीच्या;
परंतु वासनाशक्ती प्रबळ असणार्या वाईट शक्ती त्रास देत असल्याचे समजावे.
- विद्वान मांत्रिक (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १०.८.२००४, सायं.
६.४०)

  
९. श्री हनुमानाविषयी उद्बोधक माहिती
 श्री. माने
सनातनचे मिरज येथील साधक श्री.कुमार माने यांना ईश्वराकडून मिळालेली श्री
हनुमानाविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत.
हनुमंतात असलेले गुण
अ. नामावर दृढ श्रद्धा असणारा : हनुमंताची `नामच सर्वकाही करते', अशी
दृढश्रद्धा होती. विश्वामित्रांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी श्रीरामाने
हनुमंताशी युद्ध केले. श्रीरामाने त्याच्यावर अनेक बाण सोडले; पण
रामनामाच्या भक्तीमुळे त्याला एकही बाण लागला नाही. नामावरील श्रद्धेमुळेच
तो समुद्र ओलांडून लंकेला गेला.
आ. सगुणात न अडकणारा : हनुमंतात सगुण भावापेक्षा निर्गुण भाव अधिक
आहे. तो व्यक्तीनिष्ठ नव्हे, तर तत्त्वनिष्ठ आहे, म्हणूनच श्रीकृष्णाने
दिलेल्या सेवाही हनुमंताने तितक्याच श्रद्धेने पूर्ण केल्या.
इ. ब्रह्मचर्याचे कडक पालन करणारा
ई. निष्काम प्रार्थना करणारा : श्रीरामाने अंगद यास `युवराज' पद दिले,
सुग्रीवास व बिभीषणास राज्य दिले, तसेच इतरांनाही
मौल्यवान बक्षिसे दिली. हनुमंतास मात्र काहीच दिले नाही. श्रीरामाने वर
मागण्यास सांगितल्यावर हनुमंताने प्रार्थना केली, ``हे प्रभो, मला सदैव
आपल्या चरणी स्थान मिळू दे. माझ्या हृदयात सतत आपला वास असू दे. मला आपली
सेवा करता येऊ दे.'' यावरून हनुमंत किती निष्काम आहे, हे लक्षात येते.
उ. आसक्ती नसणारा व वैराग्य असणारा : हनुमंताने धन, मान, देहसुख,
स्त्री, राज्य व पद यांचा त्याग केला आहे. त्याला केवळ भगवंत हवा होता.
जेव्हा सीतामाईने हनुमंताला सोन्याची माळ दिली, तेव्हा त्या माळेत `राम नाही'
म्हणून त्याने ती माळ तोडली होती. रामाशिवाय त्याला काहीच नको होते.
ऊ. नाम घेत लढणारा
ए. विकल्प न येणारा
ऐ. दास्यभक्ती करणारा
ओ. ज्ञानोत्तर कार्य करणारा
औ. ज्ञानोत्तर भक्ती करणारा
ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचा आवश्यकतेप्रमाणे वापर
हनुमंताच्या गळयातील जानवे हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहे. हनुमंत हा
शिवाचा अवतार असल्याने त्याच्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे. रामभक्ती
करतांना त्याच्यात विष्णुतत्त्व आले. त्यामुळे त्याच्यात स्थितीचे (तारक)
सामर्थ्यही आले. हनुमंतामध्ये ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही असल्याने
युद्धाच्या वेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करतो. कौरव-पांडव
यांच्यातील युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले
होते. तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे
हवेतच नष्ट केली होती.
हनुमंताच्या जीवनातील प्रसंग व त्यांचा उद्देश


  
१०. हनुमानाची अवतारी कार्ये व त्यांचे विवेचन
 श्री. देशमुख
मध्यप्रदेशातील भोपाळमधील साधक श्री. निषाद देशमुख यांना हनुमानाविषयी ज्ञानाद्वारे
मिळालेली माहिती पुढे देत आहोत.
१ अ. ईश्वरी राज्यासाठी धर्माला पाठबळ पुरवणे : हनुमानाच्या उत्पत्तीचा मूळ हेतू
ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठी आवश्यक प्रकट शक्तीचा उपयोग करून प्रकट
स्वरूपात असलेल्या बाधांना दूर करून त्यांच्यापासून ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी
आवश्यक अशा जिवांचे रक्षण करणे होय. यासाठी हनुमान हा प्रत्येक काळात विविध
स्वरूपात प्रगट होऊन त्याचे कार्य करतो. हनुमानाचे निर्गुणातील-सगुण स्वरूपाचे
कार्य कधीही थांबत नाही. हनुमानात दास्यभाव १०० टक्के असल्यामुळे तो सतत कार्य करत
असतो.
 १ अ १. विविध युगांत हनुमानाने ईश्वरी राज्यासाठी केलेले कार्य आणि त्याचे स्वरूप
(हा तक्ता शेवटी दिला आहे.)
२ अ. जिवांना साधनेसाठी मदत करणे : हनुमानाने साधना करणार्या जिवांना अनेक युगांत
वेळोवेळी साधनेसाठी मदत केली आहे. त्रेतायुगात साधना करणार्या वानरांना हनुमानाने
साधना करण्याची योग्य पद्धत शिकवून त्यांच्याकडून साधना करून घेतली.
३ अ. अनेक जिवांना मुक्ती देणे : साधना करण्याची तळमळ असलेल्या जिवांना हनुमानाने
स्वत:च्या शक्तीचा वापर करून मोक्ष दिला. अनेक शापित देहांनापण स्वत:च्या गदेचा
वापर करून त्यांना त्यांच्या योनीतून मुक्ती दिली.

४ अ. सेवकाचा आदर्श ठेवणे : हनुमानाने स्वत:चे उदाहरण सर्वांसमोर आदर्श सेवकाचे
ठेवले आहे. त्यामुळे अनेक जिवांनी हनुमानाच्या दास्यत्वाचे पालन करून मोक्षप्राप्ती
केली.
हनुमानात १०० टक्के दास्यत्व असल्यामुळे तो अविरत आणि अखंडपणे सेवा करू शकतो.
हनुमानाच्या दास्यत्वामुळेच त्याला रावणासमोरही श्रीरामाच्या गुणांचे वर्णन करता आले
आणि रावणाद्वारे श्रीरामाची विटंबना केल्यावर पूर्ण लंकेला आग लावून निघता आले.
- धर्मतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ३०.३.२००६, रात्री ९.२०)
विविध युगांत हनुमानाने ईश्वरी राज्यासाठी केलेले कार्य आणि त्याचे स्वरूप


  
११. हनुमानाच्या संदर्भातील अनुभूती
मारुतीविषयीच्या साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
अ. स्वप्नात एक केसाळ प्राणी सूर्याचे सोनेरी चित्र कोरलेल्या लाकडी
पादुका स्वच्छ करत असल्याचे दिसणे, त्या प्राण्याभोवती डोळे दिपवणारा
प्रकाश पसरलेला असणे, त्यानंतर जाग आल्यावर खोलीत सोनेरी रंग पसरलेला असणे
व भावजागृती होणे आणि नंतर डोके ठणकणे
२०.४.२००५ रोजी रात्री स्वप्नात मी एका जंगलात रस्ता चुकल्यामुळे भटकत होते;
पण मला जराही भीती वाटत नव्हती. काही वेळाने मी एका मोकळया जागेत आले. तिथे
एक केसाळ प्राणी काहीतरी स्वच्छ करत होता. त्याची माझ्याकडे पाठ होती.
त्याच्याभोवती डोळे दिपवून टाकणारा प्रकाश पसरला होता. त्यामुळे मी त्याला
नीट पाहू शकत नव्हते. डोळयांवर हात घेऊन प्रकाशाला अडवत मी त्याच्याकडे नीट
पाहिले. तेव्हा तो सूर्याचे सोनेरी चित्र कोरलेल्या लाकडी पादुका स्वच्छ
करत असल्याचे मला दिसले. त्या वेळी मी `श्रीराम, हनुमान', असे म्हणायचा
प्रयत्न केला; परंतु माझ्या मुखातून शब्दच फुटत नव्हते. माझी वाचा बंद झाली.
मी अगदी स्तंभित होऊन तिथेच थिजलेल्या, डोळे दिपलेल्या अवस्थेत उभी राहिले
होते. माझ्या नसनसात गरमी जाणवत होती. मला जाग आली. त्या वेळी मला हलके
वाटत होते व माझ्या खोलीत सोनेरी रंग पसरल्यामुळे मला काही दिसत नव्हते.
भाव दाटून आल्यामुळे मी सद्गदित झाले . - सौ. वंदना वैद्य, दुबई
आ. मारुतीची आरती सुरू असतांना प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे व
मारुतिस्तोत्र म्हणतांना मारुतीने मारकरूपात येऊन साधकांभोवती संरक्षककवच
निर्माण केल्याचे जाणवणे
`२४.४.२००५ रोजी मारुतीची आरती सुरू असतांना प.पू. डॉक्टर जिना चढून वर
आल्याचे जाणवले. त्यानंतर `ते आम्हा साधकांच्या पाठीमागे उभे राहून मारुतीला
प्रार्थना करत आहेत', असे जाणवले. मारुतिस्तोत्र म्हणतांना `मारुति मारक
रूपात आश्रमात आहे व आम्हा साधकांभोवती संरक्षककवच तयार करत आहे', असे
जाणवले. `आम्हाला युक्ती, शक्ती व भक्ती प्रदान करावी', अशी आतून
प्रार्थना झाली.'- कु. योगिता सुधीर आपटे, फोंडा, गोवा.
इ. हनुमानाने उपस्थित असलेल्या सर्व साधकांच्या भोवती मंडल काढणे व
त्यानंतर आपल्या आशीर्वादात्मक हाताने संपूर्ण आश्रमात शक्ती सोडून वर
जाऊन बसणे
`२४.४.२००५ रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपोआप मारुतीचा
नामजप व्हायला लागला. आरतीच्या वेळी संपूर्ण शरीरात चैतन्यलहरी वरून
खालपर्यंत जात असल्याचे जाणवले. त्या वेळी हनुमान उपस्थित असलेल्या सर्व
साधकांच्या भोवती गोल फिरून मंडल काढत होता. त्यानंतर आश्रमाच्या समोर उभा
राहून त्याने आपल्या आशीर्वादात्मक हाताने संपूर्ण आश्रमात शक्ती सोडली व
आश्रमाच्या वर जाऊन बसला.' - कु. रेश्मा नाईक, फोंडा, गोवा.
ई. आरतीच्या ग्रंथातील हनुमानाची आरती व तिचा इंग्रजी अनुवाद वाचल्यावर
हनुमानाच्या बालरूपाप्रती मातृभाव जागृत होणे
२२.४.२००५ रोजी मला अधिकाधिक नामजप करावासा वाटत होता; परंतु नामजप
एकाग्रतेने होत नसल्याने मी आरतीच्या ग्रंथातील हनुमानाची आरती व तिचा
इंग्रजी अनुवाद वाचला. त्या वेळी हनुमानाप्रती माझा प्रीतीभाव जागृत झाला.
आरतीत नमूद केल्याप्रमाणे त्याचे `बालरूप हुंकार भरत सूर्याकडे झेपावत आहे',
असे माझ्या मनात आले. त्यानंतर `त्या बालरूपाप्रती माझा मातृभाव जागृत होऊन
त्याला काही खाऊ व फुले अर्पण करावी', असे मला वाटले. - सौ. वंदना वैद्य,
दुबई

  
१२. हनुमानाने वाईट शक्ती नष्ट केल्याच्या साधकांना आलेल्या अनुभूती
अ. पंचमुखी मारुतीच्या चित्रातील मारुति जलदगतीने
हालचाली करतांना जाणवणे, नंतर एका मोठ्या पर्वतावर उभे राहून त्याने
पर्वतावरील मोठमोठ्या शिळा उचलून अवकाशात टाकल्यामुळे वातावरणातील वाईट
शक्ती घाबरून पळून जाणे व हनुमान जयंतीपूर्वीच सनातनच्या सेवाकेंद्रात
आल्याचे मारुतीने सांगणे
कुडाळ येथील सेवाकेंद्रामध्ये हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी ४.४.२००४
रोजी रात्री १० वाजता नामजप करत असतांना नामजपाच्या शेवटी खूप तळमळीने
माझ्याकडून प्रार्थना झाली. त्यानंतर काही क्षणांतच माझ्या समोरील
देवघरातील सप्तदेवतांच्या चित्रांपैकी पंचमुखी मारुतीच्या चित्रातील
मारुति जलदगतीने हालचाली करत असल्याचे मला जाणवले. मी प्रार्थना
थांबवून त्या प्रतिमेकडे पाहिले. त्या वेळी मारुतीने उग्र रूप धारण केले
होते. एका मोठ्या पर्वतावर उभा राहून पर्वतावरील मोठमोठ्या शिळा (दगड)
अगदी सहजतेने उचलून तो अवकाशात टाकत होता. त्यामुळे वातावरणातील वाईट
शक्ती घाबरून पळून जात होत्या, तर काही वाईट शक्ती नष्ट होत होत्या.
त्या वेळी माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला, `आज येथे प्रत्यक्ष
मारुतीच अवतरला आहे कि काय ?' त्या वेळी मारुतीने अगदी नम्रपणे `होय.
मी हनुमानजयंती पूर्वीच एक दिवस आधीच येथे आलो आहे.' त्या वेळी माझे
पूर्ण शरीर शहारून गेले आणि माझ्याकडून आणखी तळमळीने कृतज्ञता व्यक्त
झाली. - श्री. धनंजय पाटील, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
आ. दृष्ट काढतांना मारुतिराया सर्वत्र गदेने प्रहार करून काळया शक्तींना
नारळात जाण्यास भाग पाडत असल्याचे जाणवणे
श्री. प्रदीप जोशी नारळाने दृष्ट काढत असतांना `मारुतिराया सर्वत्र
गदेने प्रहार करून काळया शक्तींना नारळामध्ये जाण्यास भाग पाडत आहे',
असे मला जाणवले. त्यानंतर माझी क्षात्रवृत्ती जागृत झाली. - श्री.
हेमंत कुलकर्णी, सनातन आश्रम, मिरज
(१५.५.२००५ रोजी `दैनिक सनातन प्रभात'च्या मिरज येथील कार्यालयातील
साधकांना सकाळी अचानकपणे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रास होऊ लागले.
साधकांना होत असलेल्या त्रासांवर उपाय म्हणून सूक्ष्म-विभागातील साधिका
सौ. श्रध्दा पवार (पूर्वाश्रमीच्या कु. वीणा आडकर) यांनी सर्व साधकांना
एकत्रित बसून ५ मिनिटे हनुमानाचा नामजप करण्यास सांगितला व त्यानंतर
नारळाने दृष्ट काढण्यास सांगितले.)
इ. मंत्रजप करतांना साधकाला हनुमानाच्या आश्रमातील अस्तित्वाची सूचना
मिळणे
५.४.२००४ रोजी सकाळी ६.३० वाजता श्री दुर्गादेवीने सांगितल्याप्रमाणे
श्री दुर्गादेवी व हनुमान यांचा `एक-आड-एक' असा मारक रूपाचा नामजप
करतांना मला खूप शक्ती मिळत होती. सकाळी १०.१० वाजता मंत्रजप करतांना
अचानक `खोली क्रमांक १०३ मध्ये जाऊन बघ', असे कोणीतरी मला म्हटले. (श्री
दुर्गादेवी व हनुमान यांनी देवद आश्रमास सूक्ष्म-रूपाने भेट दिली. त्या
वेळी ते याच खोलीत थांबले होते.) त्याच क्षणी मी उठलो व खोली क्रमांक
१०३ मध्ये गेलो. खोलीमध्ये जाऊन पाहिले, तर हनुमानाला बसण्यासाठी
ठेवलेल्या चौरंगावर हनुमान बसला असल्याच्या खुणा स्थूलातूनही उमटलेल्या
दिसत होत्या. त्या चौरंगावरील चादर चुरगळली होती. - श्री. रवींद्र
साळोखे, सूक्ष्म-विभाग, सनातन आश्रम, देवद
ई. नामजप करतांना ग्लानी येणे, एका वाईट शक्तीने मारण्यासाठी
पाठलाग करणे व हनुमानाचे मंदिर दिसल्यानंतर वाईट शक्ती नाहीशी होणे
१२.८.२००४ रोजी मी श्री दत्ताचा नामजप करत होतो. त्या वेळी मला थोडी
ग्लानी आली. तेव्हा `एक वाईट शक्ती मला मारण्यासाठी माझा पाठलाग करत
आहे', असे मला जाणवले. माझा नामजपही व्यवस्थित होत नव्हता. वाईट शक्ती
माझ्या मागून येत असतांनाच मला एक हनुमानाचे मंदिर दिसले. त्या क्षणी `मला
मारण्यासाठी येणारी वाईट शक्ती नाहीशी झाली', असे मला जाणवले. - श्री.
पुनीत मिश्रा, मथुरा
उ. हनुमान हातात डोंगर घेऊन उडतांना दिसणे व येत्या काळात सनातनच्या
साधकांना होणार्या शारीरिक त्रासांवर उपचार करण्यासाठी औषधी तयार
करण्याच्या कामगिरीवर निघाल्याचे त्याने सांगणे
२१.५.२००५ रोजी सायंकाळी ७.०५ वाजता श्रीरामाची आरती करत असतांना
हनुमान हातात डोंगर घेऊन उडतांना दिसला. त्या वेळी मी मारुतिरायाला
विचारले, `हा डोंगर घेऊन कोठे निघालात ?' त्या वेळी तो म्हणाला, `प्रभू
श्रीरामचंद्रांनी मला येत्या काळात सनातनच्या साधकांना होणार्या
शारीरिक त्रासांवर उपचार करण्यासाठी औषधी तयार करण्याची सेवा दिली आहे.
मी त्या कामगिरीवर निघालो आहे.' - श्रीमती स्मिता बोळाज, मिरज
सेवाकेंद्र

  
१३. साधकाची ईश्वरप्राप्तीची तळमळ म्हणजे साधकामधील सूक्ष्मरूपातील मारुतीच !
अ. प्रत्येकाच्या हृदयात मारुति सूक्ष्म-रूपाने वास करीतच असणे
मारुतीला श्रीरामप्राप्तीचा, त्याच्या चरणांकडे जाण्याचा ध्यास सतत असे.
हाच ध्यास साधकाच्या बाबतीत ईश्वरप्राप्तीच्या तळमळीच्या रूपाने कार्यरत
असतो. ईश्वरप्राप्तीची तळमळ, म्हणजेच ईश्वराकडे जाण्याची ओढ जेव्हा सगुण
रूप धारण क |