मराठी भाषा विशेषांक - दैनिक सनातन प्रभात

दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

माझि म-हाटिचिये बोलु कवतुके । अमृताते पैजा जिंके।।


कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

२. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


खगोलशास्त्रावर प्रभुत्व

असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


सनातनची सात्त्विक उत्पादने

वितरणासाठी संपर्क

  • मुंबईः ३२४३५६९९

  • ठाणेः ९३२२६५२५८०

  • रायगडः २७४५०३३८

  • पुणेः ९४२२४३७१३४

  • जळगावः ९४२३०५६४०३

  • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

  • नाशिकः ९४२२४४१७८२

  • इ-मेलः dainik@sanatan.org

मराठी भाषा विशेषांक

अनुक्रमणिका

अ. `मराठी' लेख :

 

मराठी खर्‍या अर्थाने `राजभाषा' होण्यासाठी... !

संकलक : श्री. संजय मुळये, रत्‍नागिरी

श्री. संजय मुळये

१ मे १९६० रोजी भाषिक एकात्मतेच्या भावनेने महाराष्ट्र राज्य स्थापन झाले आणि कागदोपत्री मराठी भाषा `राजभाषे'च्या सिंहासनावर विराजमान झाली. असे असले तरी महाराष्ट्रातील अनेक नोकरशहांच्या, प्राध्यापकांच्या, कुलगुरूंच्या, राजकारण्यांच्या आणि सुशिक्षितांच्याही अंत:करणात घर करून बसलेल्या इंग्रजी भाषेच्या मानसिक गुलामगिरीमुळे मराठीला तिचे योग्य स्थान व वैभव अजून प्राप्‍त झालेले नाही. २७ फेबु्रवारी हा कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हा दिवस `मराठी राजभाषादिन' म्हणून महाराष्ट्रात पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मराठी भाषा खर्‍या अर्थाने `राजभाषा' होण्यासाठी काय करायला हवे, हे सांगणारा हा लेख !

१८३५ नंतर मराठी दुय्यम स्थानावर !
इ.स. १८१८ पासून महाराष्ट्रावर इंग्रजांचे राज्य सुरू झाले. मुंबई प्रांताचा पहिला गोरा प्रशासक असलेल्या एल्फीन्स्टनच्या कारकीर्दीत महाराष्ट्रात ( तत्कालीन मुंबई इलाखा ) सर्व विषयांचे शिक्षण मराठीतूनच सुरू झाले होते. विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयांची शालेय पुस्तकेही मराठीत लिहून घेण्यात आली होती. ज्ञान-विज्ञानातील अन्य इंग्रजी ग्रंथांचे भाषांतरही मराठीत करवून घेतले गेले. पुढे १८३५ मध्ये मेकॉलेने केलेल्या शिफारसीनुसार हिंदुस्थानचा महाराज्यपाल बेंटींगने एक आदेश काढला. त्यानुसार सर्वच क्षेत्रांतील कारभार व शिक्षण इंग्रजीतून होऊ लागले. उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले, न्यायालये व कचेर्‍या यांची भाषा इंग्रजी झाली, त्यांचे न्याय-निर्णयही इंग्रजीतून होऊ लागले. त्यामुळे इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढले आणि महाराष्ट्रात मराठीची गळचेपी होऊ लागली. संस्कृत व मराठी पंडितांना इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. इंग्रजी शिकणार्‍यांना नोकर्‍या मिळू लागल्या. सरकार दरबारी संबंध ठेवण्यासाठी जनतेलाच इंग्रजीची आवश्यकता वाटू लागली. इंग्रजी बोलणे व लिहिणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाऊ लागले. इंग्रजीशिवाय आपला अभ्युदय होऊच शकणार नाही, ही भावना दृढमूल होत गेली आणि मराठीला गौणत्व आले; म्हणजे एका अर्थाने इंग्रजीची मानसिक गुलामगिरीच आपण स्वीकारली !

परक्या भाषेत शिक्षण देणे म्हणजे राष्ट्राचे खच्चीकरण !
२७ फेब्रुवारी १९०८ रोजी सोलापूर येथील व्याख्यानात लोकमान्य टिळकांनी इंग्रजांनी केलेल्या मराठी भाषेच्या गळचेपीचे दुष्परिणाम सांगितले. ते म्हणाले, ``इंग्रजी भाषा फार द्वाड आहे, ती लवकर येत नाही. ती सोपी नाही. केवळ राज्यकर्त्यांची म्हणून आम्हास ती शिकावी लागते, आमच्यावर ते निवळ ओझे आहे. आमचे शिक्षण मराठीत मिळत नसल्यामुळे फार नुकसान आहे. आपणास इंग्रजीत दोन-दोन तास बोलण्याची काय म्हणून आवश्यकता वाटावी ? मराठी बोलणारा साहेब एक तरी निघाला आहे काय ? पण आमच्यापैकी शेकडो लोक इंग्रजी बोलतात. आम्ही इंग्रजी भाषेचे ज्ञान शिकण्यात अनेक वर्षे फुकट घालविली.
मला मिळालेले ज्ञान मराठी भाषेत मिळाले असते, तर हे सर्व ५२ वर्षांचे ज्ञान पंचविसाव्या किंवा तिसाव्या वर्षीच मला मिळाले असते. या इंग्रजी भाषेमुळे वर्षे फुकट जातात. राष्ट्रास परक्या भाषेत शिक्षण देणे म्हणजे त्याची खच्ची करण्यासारखे आहे. याचकरिता देशी भाषेत ज्ञान दिले पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य वाचणार आहे. धर्माचे शिक्षण मिळणार आहे. आम्ही बॅरिस्टर झालो तरी धर्मासंबंधी भोपळयाएवढे पूज्यच आहोत !'' इंग्रजी भाषा शिकण्यापायी वर्षेच्या वर्षे फुकट जातात आणि धर्मासंबंधाचे ज्ञान `शून्य' मिळते, हे लोकमान्यांचे दोन्ही विचार कोणाही राष्ट्रवाद्याला अंतर्मुख करतील !

इंग्रजी माध्यमाची मगरमिठी
महाराष्ट्रातील विद्यापिठांनी मराठी माध्यम स्वीकारण्याचा जाणीवपूर्वक कधी प्रयत्‍नच केला नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाची मगरमिठी सैल होणे तर दूरच, उलट ती अधिकाधिक आवळलीच जाऊ लागली आहे. विज्ञानासारख्या विषयांत इंग्रजी माध्यमाशिवाय आमचे भागूच शकत नाही, अशी एक दुबळी मनोवृत्ती यातून जन्माला आली आहे. ही दुबळी मनोवृत्तीच राष्ट्राच्या ऊन्नतीला मारक ठरते. डॉ. रघुनाथ माशेलकरांसारखे ज्येष्ठ शास्त्रज्ञ सांगतात की, त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे.
कसलाही विचार न करता `प्रवाह पतित' होऊन मराठी पालक जेव्हा आपल्या मुलाला `फाड फाड' इंग्रजी यावे म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतात, तेव्हा त्यांनी हे लक्षात ठेवावे की, `फाड फाड' इंग्रजी म्हणजे `फाड फाड' काळी शक्‍ती ! `फाड फाड' तमोगुण ! `फाड फाड' वाईट स्पंदने !

महाराष्ट्रातील विद्यापिठांनीही मराठी माध्यम स्वीकारले पाहिजे !
आता त्वरित उचलण्याचे पहिले व महत्त्वाचे पाऊल म्हणजे शिक्षण क्षेत्रात मातृभाषेच्या माध्यमाचा स्वीकार केला पाहिजे. विद्यापिठांनी वा*्मय व समाजविज्ञान शाखांतच नव्हे तर विज्ञान, गृहविज्ञान, अभियांत्रिकी, तांत्रिकीय व वैद्यकीय विद्याशाखांतही मराठी माध्यम ताबडतोब सुरू केले पाहिजे आणि त्याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे. `या शाखांत मराठी माध्यमातून अध्ययन-अध्यापन करता येणे शक्य नाही', या हितसंबंधियांच्या कांगाव्यासमोर झुकता कामा नये!

मुंबईसह लहान-मोठ्या नगरांतील मराठी माध्यमाच्या शाळा विद्यार्थी मिळावेत, म्हणून धडपडत आहेत. विद्यार्थ्यांच्या अपुर्‍या संख्येमुळे त्यातील काही शाळा बंद पडतील कि काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालकही मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवायच्या प्रयत्‍नात असतात. यामागे काही पालकांचा विचार असतो की, १० वी १२ वी नंतर मुलाला जे शिक्षण घ्यायचे असते ते इंग्रजी भाषेत असते. त्या वेळी त्याला तो अभ्यास नीट समजणार नाही. एवीतेवी पुढे इंग्रजीशीच गाठ आहे तर मुलाला पहिलीपासूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवूया. महाराष्ट्रातील विद्यापिठांतील शिक्षणाचे माध्यमही मराठी ठेवले, तर असा विचार पालकांच्या मनात येणार नाही!

सध्याच्या विद्यापिठांतून बहुतांशी शिक्षण हे इंग्रजीतून दिले जाते. हे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक जण मग प्रशासनात जातात. साहजिकच मग त्यांच्याकडून मराठीला सापत्‍नभावाची वागणूक मिळते. हे दुष्टचक्र थांबवायला हवे!

इंग्रजी शब्दांना घराघरात चघळत रहाणारी मराठी माणसे !
हे झाले प्रशासन व शिक्षण क्षेत्र यांतील मराठीचा वापर आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्‍तींविषयी. पण मराठीचा वापर, प्रसार व संवर्धन या विषयी मराठी माणसाचेही काही उत्तरदायित्व आहे कि नाही ? बहुतांश मराठी माणसे घरातही इंग्रजी शब्द चघळत रहातात. ज्येष्ठ लेखक श्री. वि.आ. बुवा यांनी मे २००६ च्या `धर्मभास्कर' मासिकात अशा इंग्रजी शब्दांची जंत्रीच दिली आहे. ते म्हणतात,``संपूर्ण घर इंग्लिशाळलेलं. स्टेअर केस, लॉक, हॉल, बेडरूम, किचन, बाथरूम, टॉयलेट, सिलिंग, सिलिंग फॅन, गॅस, कूकर, फ्रीज, टीव्ही, रेडिओ, ब्रश, सँडल, बूट पॉलिश, फॅन, ट्यूब, स्कूटर, रेझर, ब्लेड, शेव्हिंग क्रीम, टूथब्रश, नॅपकीन, टॉवेल, बल्ब, टेबल, रॅक, शेल्फ, लायटर, पेन, पेन्सिल, स्टेपलर, पेन्सिल-शार्पनर, बॉलपेन, पेपर्स, कार्बन पेपर, बास्केट, स्टेनलेस स्टीलची भांडी, फेस पावडर, बकेट, वॉशिंग पावडर, वॉशिंग मशीन, वॉश बेसिन, सिंक, गॅस-सिलिंडर, टीपॉय, बारसोप, कॉक, पाईप, कॉट, पासबुक, चेकबुक, टॉर्च, बॅग, पर्स, कप, प्लेट, स्वीच, फोन, शर्ट, पँट, बुशशर्ट, स्वेटर, ब्लाअुज, पेटीकोट, स्टूल, पंचिंग मशीन, सेफ्टी पिन, टेबल क्लॉथ, बेल, नेल कटर, हँगर, ग्लास, गॅलरी, फाईल, फोटो, अल्बम, ट्रे, ब्रेड, केक, बिस्किट, बटर (लोणी) इतके इंग्लिश शब्द तुमच्या-आमच्या मालकीच्या `सॉरी ओनरशीपच्या फ्लॅट'मध्ये रुबाबात रहातात !
मराठी वर्तमानपत्रांत इंग्लिश शब्दांचा धुडगूस, रहातं घर तर इंग्लिश शब्दांच्याच मालकीचं. औषधांची नावं इंग्लिश, आकडे इंग्लिश, दुसरी गोष्ट नाही. बैठकीची खोली, स्वयंपाकघर, न्हाणीघर, झोपायची खोली, छत, गच्ची, जिना वगैरे अनेक मराठी शब्दांना इंग्लिश शब्दांनी `अरब आणि उंट' या कथेतील उंटाप्रमाणे आपल्याच घराबाहेर हाकललं आहे.''
संस्कृतनंतर मराठी ही जगातील दुसर्‍या क्रमांकाची सात्त्विक भाषा आहे, हे मराठी भाषिकांना कोणी सांगायला हवे का ? हे माहीत असेल, तर मराठी बोलतांना इंग्रजी शब्द वापरायची सवय त्वरित सोडून द्यायला हवी !

प्रत्येक मराठी भाषिकाने ही खिंड लढवायलाच हवी !
कधीकधी असे वाटते की, मातृभाषा म्हणून, माध्यम म्हणून, व्यवहार भाषा म्हणून आणि महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणूनही `मराठी'च्या कार्यक्षमतेविषयी आम्हा मराठी भाषिकांतच पाहिजे तसा विश्‍वास नाही, श्रद्धा नाही, पोटतिडीक नाही. आमच्या भाषेचे मारेकरी आम्हीच आहोत ! महाराष्ट्रावरील मुसलमानी आक्रमणापाठोपाठ मराठी भाषेवर उर्दू-अरबी-फारसीचे आक्रमण झाले. छ. शिवाजी महाराज, विष्णुशास्त्री चिपळूणकर, स्वा. सावरकर, माधवराव पटवर्धन (कवी ज्युलियन) अशा अनेकांच्या प्रयत्‍नांमुळे हे आक्रमण मराठीने परतवले. तरीही इंग्रजीच्या आक्रमणापुढे ती हतबल झाली कि काय, असे वाटू लागणारी परिस्थिती आज उत्पन्न झाली आहे. मात्र इंग्रजीचे हे आक्रमण परतवून लावणारे
दुसरे छ. शिवाजी महाराज जन्म घेईपर्यंत प्रत्येक मराठी भाषिकाने ही खिंड लढवायलाच हवी! त्यासाठी हवा फक्‍त मनाचा निर्धार !!

 

 


असुरांची तामसिक इंग्रजी भाषा, मानवांची सात्त्विक मराठी (संस्कृतोद्‌भव) भाषा व देवांची संस्कृत भाषा

साधकांतील वाईट शक्‍ती प्रकट होतात, तेव्हा त्यांच्याशी इंग्रजी भाषेत बोलल्यास त्यांना बरे वाटते, मराठी भाषेत बोलल्यास त्रास होतो, तर संस्कृत भाषेत बोलल्यास जास्त त्रास होतो. संस्कृत मंत्रांनी तर त्यांना असह्य त्रास होतो. या अनुभवामागचे शास्त्र येथे सांगितले आहे. सनातनने देशविदेशांतील साधकांवर केलेल्या या प्रयोगांचे ध्वनीचित्रीकरणही केले आहे.

इंग्रजी व मराठी भाषांतील अक्षरांच्या प्रकारांनुसार त्यांच्यातील प्रधान गुण अक्षरे, अक्षरसंख्या व संख्येचे प्रमाण ऋ ऋृ लृ व लृृ ही चार अक्षरे मराठी भाषेत आहेत; पण त्यांपासून होणारे शब्द नाहीत; म्हणून पुढील तक्‍त्यात ५२ ऐवजी फक्‍त ४८ अक्षरांचा उल्लेख केला आहे.

 

 

 

 

वरील तक्‍त्यावरून इंग्रजीत तमप्रधान अक्षरे ५८ टक्के, तर मराठीत तमप्रधान अक्षरे फक्‍त ११ टक्के आहेत, हे लक्षात येते. या गुणवैशिष्ट्यांमुळे इंग्रजी अक्षरे व शब्द यांनी मांत्रिकांना काळी शक्‍ती मिळते, तर मराठी अक्षरे व शब्द यांनी मांत्रिकांना त्रास होतो.

असुरांच्या तामसिक इंग्रजी भाषेत आपल्या मुलांना न शिकवता व व्यवहारात तिचा वापर न करता मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड इत्यादी भारतीय भाषांत मुलांना शिकवा व त्यांचा वापर करा ! - डॉ. जयंत आठवले (१९.१.२००७)

 

 

 


मराठीचे माहिती-मूल्य इंग्रजीहून अधिक

प्रत्येकाला आपली मायबोली ही अमूल्यच वाटत असते. पण आजच्या माहिती युगात इकडून तिकडे माहिती पाठवण्याच्या दृष्टीने प्रत्येक भाषेचे माहिती-मूल्य (इन्फॉर्मेशन कंटेट किंवा अँव्हरेज लँग्वेज इन्फॉरर्मेशन व्हॅल्यू)
निश्चित करणे महत्त्वाचे ठरते. संगणकाच्या मदतीने मराठी भाषेचे माहिती-मूल्य निश्चित केल्यावर ते इंग्रजीपेक्षा जास्त आहे असे आढळते आहे.

इंटरनेटमुळे जगभरातले संगणक आज एकमेकांना जोडले जात आहेत. त्यांनी पाठवलेली माहिती टेलिफोनच्या तारांमधून फार सावकाशपणे जाते म्हणून हल्ली प्रकाशीय तंतूंचा माहिती पाठवण्यासाठी वापर केला जातो. हे
प्रकाशतंतू तारांच्या लाखोपट जास्त माहिती वाहून नेऊ शकतात.

तरीही माहितीचा महापूर एवढा झाला की माहिती-मू्ल्य जास्त असणे
महत्वाचे ठरते आहे. प्रतिसृष्टी या नावाने एकत्र आलेल्या एका गटाने मराठी इंटरनेटचे लोण अवघ्या महाराष्ट्रात पसरवण्यासांठी, एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. इंग्रजीत सव्वीस अक्षरे आणि दोन शब्दांत सोडायची मोकळी जागा अशी किमान २७ चिन्हे असतील तर आपण कोणताही मजकूर लिहू शकतो. मराठीत मात्र १६ स्वर आणि ३६ व्यंजने व मोकळी जागा अशी ५३ चिन्हे वापरली जातात. पण कोणत्याही भाषेत सर्व चिन्हे सारख्याच प्रमाणात वापरली जात नाहीत, उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये `ई' हे अक्षर आणि मराठीत `काना' सर्वात जास्त वापरला जातो. या उलट इंग्रजीत `झेड' हे अक्षर आणि मराठीत `त्र' हे अक्षर सर्वात कमी वापरले जाते. तसेच अनेक शब्दांमध्ये तेच ते अक्षरसंच येत राहतात. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये-शन-फिकेशन-आयझेशन यासारखे अक्षरसंच खूप वेळा येतात. त्यांच्या वारंवार येण्यामुळे असे अक्षर समुह वाचतांनादेखील आपण त्यांच्यातली सर्व अक्षरे वेगवेगळी वाचत नाहीत. तो अक्षरसमूह एकच चिन्हे असल्याप्रमाणे आपण वाचतो.

असे पुन्हा पुन्हा येणारे अक्षर संच वापरल्याने, एका संगणाकाने दुसर्‍याकडे पाठवायचा मजकूर उगीचच मोठा होतो. मग पुन्हा पुन्हा येणार्‍या अक्षरसमुहाऐवजी एकच चिन्ह वापरून एकूण चिन्हांची संख्या कमी होण्यासाठी प्रयत्‍न करावे लागतात. उदा. `सावळा बाळ शाळा सुटल्यावर बोला घेऊन काळा फळा सोळा वेळा पुसतो' या वाक्यात ळ, काना आणि मोकळी जागा मिळून एक नवे चिन्ह दिले तर संगणकाला हे वाक्य एका ठिकाणहून दुसरीकडे पाठविताना १६ अक्षरे कमी पाठवावी लागतील.

एखद्या भाषेत अनावश्यक अक्षरांची किती गर्दी आहे याचे मोजमाप त्या भाषेच्या माहितीमूल्यारून करता येते. अनावश्यक अक्षरांची गर्दी जेवढी कमी तेवढे त्या भाषेचे माहिती-मूल्य अधिक. इंग्रजीसह सर्व युरोपीय भाषांची
माहिती-मूल्य यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहेत. माहितीशास्त्रातील त्याच सूत्रांचा वापर करून संगणकासाठी एक आज्ञावली बनवून त्यावर मराठीच्या माहिती-मूल्याचे मोजमाप केले तेव्हा असे आढळले की, मराठीचे माहिती-मूल्य दर अक्षरी २.८५ बिट्स एवढे आहे. असल्यामुळे मराठीचे माहिती-मूल्य इंग्रजीपेक्षा सुमारे २० टक्के अधिक येते.
या माहिती-मूल्याचा व्यावहारिक अर्थ काय ? समजा, मराठीत आपण `कमळ' हा शब्द एका संगणकाकडून दुसर्‍याकडे पाठवला तर आपल्याला ३ अक्षरे पाठवावी लागतील. इंग्रजीत `कमळ' किंवा त्याचा प्रतिशब्द `लोटस्'
पाठवण्यासाठी ५ अक्षरे पाठवावी लागतील. म्हणजे मराठीत जवळजवळ ६६ टक्के बचत होऊ शकेल.

 


मराठीचे महत्त्व जाणा !

गोव्याची राजधानी पणजी येथे ४ ते ६ जानेवारी २००८ या कालावधीत जागतिक मराठी संमेलन संपन्न झाले. त्या निमित्ताने मराठी भाषेची सद्यस्थिती कशी आहे व त्यांवरील उपाय काय, हे लेखमालेच्या स्वरूपात येथे मांडत आहोत. जागतिक मराठी संमेलनाचे सूत्र `शोध मराठी मनाचा' हे आहे, ते योग्यच आहे; कारण इंग्रजी शिक्षणपद्धतीत मराठी मन हरवले आहे. मराठी माणसांना मराठीत शिक्षण घ्यायला, कचेर्‍यांमध्ये मराठी भाषा बोलायला, इतकेच नव्हे, तर आई-वडिलांना `आई-बाबा' म्हणून हाक मारायलाही लाज वाटते. त्यामुळे शुद्ध मराठी बोलणारे आता अगदी नावालाच सापडतील. सध्या आपल्यावर इंग्रजी भाषेचा एवढा पगडा आहे की, मराठी बोलतांना एका वाक्यात एक तरी इंग्रजी शब्द येतोच. त्यामुळे अशा संमेलनांमधून मराठी भाषेचा अभिमान मिळवून देण्याची चळवळ सुरू करायला हवी, तरच पुढील काळात मराठी वाड्मय टिकेल व नवीन दर्जेदार काहीतरी तयार होऊ शकेल. नाहीतर संस्कृतप्रमाणे मराठी भाषाही मातीमोल होण्याची भीती दूर नाही. म्हणून संमेलनकर्त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून द्यायला, तिचा अभिमान बाळगायला व ती जोपासायला मराठी मनाला शिकवावे.

१. मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे महत्त्व
१ अ. मराठी ही सर्व भाषांत सात्त्विक भाषा

मराठी भाषेचे मूळ संस्कृत भाषेत दडलेले असल्याने मराठी ही सर्व भाषांत सात्त्विक भाषा आहे. साहजिकच तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याचे प्रमाण इतर भाषांपेक्षा अधिक आहे. इंग्रजी आकड्यांपेक्षाही मराठी आकडे अधिक सात्त्विक आहेत. सध्या सनातनच्या साधकांना ईश्‍वराकडून मिळणारे ज्ञानही मराठीतूनच मिळत आहे.
- श्री. संजय दिगंबर मुळये, रत्‍नागिरी

१ आ. `संस्कृतभाषा देवे केली । मराठी काय चोरापासून झाली ?' - संत एकनाथ

१ इ. शासनाचे कोणतेही प्रोत्साहन नसतांना संतांनी मराठी भाषा समृद्ध करणे :
संतांनी मुसलमानी अंमलात मराठीत ग्रंथ लिहिले. त्या मराठीचे स्वरूप अत्यंत सोज्वळ व संस्कृतनिष्ठ आहे. मराठी संतांनी महाराष्ट्रीय समाजासाठी किंबहुना अखिल समाजासाठी नानाविध उपक्रम केले. त्यातून मराठीचे सोज्वळ स्वरूप कायम राहिले. त्या काळी शासनाचे कोणतेही प्रोत्साहन नसतांना, उलट विरोध असतांना या महापुरुषांनी मराठी भाषा
ग्रंथरचनेत समृद्ध व वैभवशाली केली. हे आम्ही कधीही विसरता कामा नये. म्हणूनच मराठी माणसांत आपली मातृभाषा व संस्कृती यांसंबधी ज्वलंत अस्मिता कायम राहिली. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

२. मराठीचे महत्त्व व वैशिष्ट्य

२ अ. संस्कृत व मराठी भाषा चैतन्यमय असल्याचे प्रत्यक्षातील उदाहरण : देश-विदेशांतील साधकांतील वाईट शक्‍ती प्रकट झाल्यावर त्यांना निरनिराळया भाषांतील शब्द व गाणी ऐकवली. तेव्हा संस्कृतनंतर मराठी
भाषेचाच वाईट शक्‍तींना सगळयात जास्त त्रास झाला व इंग्रजी भाषेमुळे त्यांना आनंद झाला. यावरून हे सिद्ध होते की, इंग्रजी भाषा ही असुरांची भाषा आहे.

२ आ. मराठी लिपी : स्वा. सावरकरांनी मराठी लिपीत काही बदल केले, उदा. `पूर्व' हा शब्द `पूऱ्व' अशा तर्‍हेने, `उर्दू' हा शब्द `अुऱ्दू' अशा तर्‍हेने लिहिण्यास सुरुवात केली. हा त्यांचा लिपीशुद्धीचा प्रयत्‍न होता. त्यांनी लिपीत केलेले बदल मराठी भाषिकांनी स्वीकारले नाहीत, ते एका अर्थी बरेच झाले; कारण ते अध्यात्मशास्त्राला धरून नव्हते. अध्यात्मातील एक सिद्धांत आहे, `शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्‍ती एकत्र असतात.' `पूर्व' शब्दाचा उच्चार केला की, त्याचे `रूप' तयार होते. ते `पूऱ्व' असे नसून `पूर्व' असे असते. जेव्हा उच्चार व रूप यांची स्पंदने एकसारखी असतात, तेव्हाच त्या भाषेला चैतन्य येते. इंग्रजीतील `A' अक्षर असे लिहिले जाते; पण त्याचा उच्चार केल्यावर `ए' अशी आकृती तयार होती. येथे रूप व उच्चार यांची स्पंदने एकसारखी नसल्याने त्यात चैतन्य नसते, उलट वाईट स्पंदने अनुभवायला येतात.' - डॉ. जयंत आठवले (७.१०.२००७)

२ इ. भारतियांचे खच्चीकरण करण्यासाठी इंग्रजांनी त्यांची भाषा आमच्यावर लादली. मला मिळालेले ज्ञान मराठी भाषेत मिळाले असते, तर हे ५२ वर्षांत मिळालेले ज्ञान पंचविसाव्या अगर तिसाव्या वर्षीच मला मिळाले असते. - लोकमान्य टिळक

२ ई. व्याकरणाचे महत्त्व

गुरुदेव डॉ. काटेस्वामी :
महाराष्ट्रात मराठी व्याकरण व व्याकरणशास्त्राचा अभ्यास करणारे किती आहेत ?
राजे : एकही नाही.
गुरुदेव डॉ. काटेस्वामी : व्याकरणाविना वाणी शुद्ध व पवित्र कशी होईल ? मग भाषेचा उपयोग काय ? ओंगळ, बिभत्स भाषा माणसाला ओंगळच करील.

२ उ. आता दलित भाषेला महत्त्व आहे ! :
दलित भाषा आली. बोली भाषा आली. त्यांनी जी पुस्तके लिहिली, जे ललित साहित्य प्रकाशित केले, तेच विद्यापिठातील उच्च मराठी विषयाकरता लावण्यात आले. - गुरुदेव डॉ. काटेस्वामी (साप्‍ताहिक सनातन चिंतन)

२ ऊ. `आई'चा अर्थ : `आ' म्हणजे `आदि' आणि `ई' म्हणजे `ईश्‍वर', म्हणजे `आदि ईश्‍वर' म्हणूनच `मातृदेवो भव ।' असे प्रथम म्हणतात. - सौ. मनीषा गजानन चार्य, दहिसर, मुंबई.

२ ए. मराठी भाषेचे वैशिष्ट्य - शून्य म्हणजे `पूज्य' : शून्य म्हणजेच ब्रह्म, म्हणूनच मराठी भाषेने आम्हाला शून्याला `पूज्य' म्हणावयास शिकवले. पाढे म्हणतांना आम्हाला शाळेत `एकावर शून्य दहा' ऐवजी `एकावर पूज्य दहा', असे म्हणायला शिकवले. - सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी आश्रम, गोवा.

३. मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल, तर तिच्याबद्दल अभिमान हवा असणे

३ अ. राष्ट्राभिमानाचा एक पैलू :
स्वभाषाभिमान मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, त्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी २५ जानेवारी १८७४ रोजी त्यांच्या निबंधमालेच्या पहिल्या अंकात `मराठी भाषा क्षयाच्या पंथास दिवसेंदिवस लागत चालली आहे', असे म्हटले होते. आजही त्या परिस्थितीत फारसा बदल दिसत नाही.

औरंगजेबाने सिंहगड घेतला, तेव्हा त्याचे नाव `बख्शिंदाबख्श'(ईश्‍वरदत्त) ठेवले. मराठ्यांनी तो गडच तेवढा परत जिंकला नाही, तर त्याचे मुसलमानी नावही पुसून टाकले. मोगलांनी कागदोपत्री नाशिकला गुलशनाबाद नाव दिले; पण हिंदूंनी मानले नाही. हिंदुत्वाच्या निशाण्या पुसण्याच्या औरंगजेबाच्या उद्देशाबद्दल त्या वेळच्या मराठ्यांना यत्किंचितही संदेह नव्हता, मग आजच्या महाराष्ट्राला काय झाले आहे ? अजूनही दौलताबादचे देवगिरी, इस्लामपूरचे ईश्‍वरपूर, उस्मानाबादचे धाराशिव का होत नाही ? महाराष्ट्राच्या अंगावरील हे काण (जखमा) महाराष्ट्रदिनी भळभळ वाहातांना दिसतात. भाषाभिमानाचा थेट संबंध राष्ट्राभिमानाशी आहे, हे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या महाराष्ट्राने विसरू नये, हीच मायमराठीच्या सुपुत्रांचरणी प्रार्थना ! - श्री. संजय मुळये, रत्‍नागिरी

३ आ. मराठी अमुचा बाणा

नको `मम्मी पप्पा', `आई-बाबा' म्हणा ।
मराठीचा बाणा दिसत असे ।।
नको `हॅलो हॅलो', म्हणा `नमस्कार' ।
मराठीत आदर दिसत असे ।।
बोला मराठीत सर्वांना सांगू ।
थोडे थोडे रांगू मराठीत ।।
दारावर पाटी मराठीत लावा रे ।
स्वाक्षरी करा रे मराठीत ।।
लाघवी मराठी म्हणती ज्ञानेश्वर ।
देशाभिमान अंतरी वसत असे ।।
(संस्कृती दर्शन : वैद्य सुविनय दामले, अथर्व प्लाझा, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.)

मातृभूमी, मातृदेवी (सरस्वती) व मातृभाषा यांचे महत्त्व
या तिन्ही देवता सुख देणार्‍या आहेत. त्यांची महती फार असल्यामुळे त्यांनी समृद्धतेने आमच्या ठिकाणी वास्तव्य करावे. भूमी, सभ्यता व वाणी यांच्याद्वारे मानवाची संस्कृती व मानवता दिसून येते.  `त्यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने शेवटपर्यंत कार्य करत रहावे', असे सांगितले आहे; म्हणूनच क्षात्रधर्माचे यशोगान केले आहे. भूमी ही आपले भरण-पोषण करून आपल्याला समृद्ध करते. मातृभाषेद्वारे मिळालेल्या ज्ञानाद्वारे माणसाला जगाचे, समाजाचे व राष्ट्राचे ज्ञान मिळते. ऋषीमुनींनी दिलेल्या अमृतमय ज्ञानाला घेऊन `मी कोण, कशा रीतीने दीर्घायुष्य घालवले पाहिजे व त्याचा उपयोग कसा समर्थतेने करून घ्यावयास पाहिजे', हे समजून घ्यावे. यामुळे तो स्वत: समृद्ध होऊन समाजाला व राष्ट्राला समर्थ होण्यास हातभार लावू शकतो व आपले जीवन आनंदात घालवू शकतो; परंतु हे समजून घेण्यासाठी व तिकडे लक्ष लागण्यासाठी सरस्वतीदेवीची कृपा पाहिजे; म्हणून तिची आराधना केली पाहिजे. ती आपल्याला या जगताचे गूढत्व सहजरीतीने सांगते व आपली बुद्धी निर्मल करून मेधाशक्‍ती जागृत करते. आपली मातृभूमी नेहमी स्वतंत्र पाहिजे.
 
त्यामुळेच मानव आपला विकास साधू शकतो. आपली मातृभूमी मिळवून आज इस्रायल राष्ट्र थोड्याच काळात आपल्या बुद्धीकौशल्याने व प्रयत्‍नाने प्रगत झाले आहे. मातृभाषा माणसाला आईकडून सहज मिळालेली असते. तो आपले विचार व मनन मातृभाषेत चांगल्या रीतीने करू शकतो व आपली प्रगती करू शकतो. भाषा एकात्मभाव व जवळीकता साधण्यास मदत करते. - प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ३७-३८)

म्हणे पहिलीपासून इंग्रजी शिका !
आज `पहिलीपासून इंग्रजी शिकवावे', असे शासनाचे धोरण आहे. म्हणजे इतर विषयापेक्षा इंग्रजी सर्वाधिक महत्त्वाची. `इतर विषय बाद झाले, तरी चालतील; परंतु इंग्रजी पहिल्यापासून शिकवलेच पाहिजे', असे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. हा हटवाद असून शिक्षणाचा खेळखंडोबा आहे. तो विद्यार्थ्यांत न्यूनगंड जोपासणारा आहे. शासन सांगते की, पहिल्या वर्गापासून इंग्रजी न शिकवले, तर बहुजन समाजाला इंग्रजीच येणार नाही. अशी जी शासनाची भूमिका आहे, ती इंग्रजीची दहशत आहे, प्रभाव आहे; म्हणून न्यूनगंड आहे. मातृभाषा मराठीच येत नाही. तिथे इंग्रजी कशी येईल ? शासनाचे पहिलीपासूनचे इंग्रजीचे धोरण हे अत्यंत अविवेकी व आत्मघातकी आहे.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, ८ नोव्हेंबर २००७, अंक ३९)

आज महाराष्ट्रात मराठीची अवस्था
रस्त्यावरून जातांना ठेच लागली, तर `आई गं' असे कळवळणारा मराठी माणूस आज कुठे आहे ? तो `ओ-द-हेल' असे किंचाळतो. जरा कुठे आश्चर्य वाटले तर `माय गॉड' म्हणतो. कंडक्टर `वन हाफ टू फुल' सांगतो. फळे विकणारा भाजीवाला म्हणतो, ``साहेब आता `बिझनेस' उरला नाही.'' आमच्या लग्नात, समारंभात महाशिवरात्रीलादेखील टेबल डिनर, तंदुरी डिनर, कँडल डिनर, डेझर्ट डिनर यांना प्राधान्य आले. 
आमचे सण, महाशिवरात्रीसारखे उपवासदेखील इंग्रजी पद्धतीने साजरे होतात. महाशिवरात्रीचा उपवास ! कुठे गेले ते श्रीखंड, राजगिर्‍याची पुरी, बटाटा पुरी, साबुदाणा वडा ? आम्ही आता महाशिवरात्रही विसरलो. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्‍ताहिक सनातन चिंतन, ८ नोव्हेंबर २००७, अंक ३९)

आता गणित व विज्ञान विषयही पहिलीपासून इंग्रजीत शिकवून महाराष्ट्रात मराठीचा गळा घोटू पहाणारी मराठीद्रोही काँग्रेस !
महाराष्ट्रातील बिगर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या वर्गांमध्ये गणित व विज्ञान, हे विषय ऐच्छिक स्वरूपात इंग्रजी भाषेतून शिकवण्याची शासनाने परवानगी दिली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार बिगर इंग्रजी माध्यमातील मुलांमध्ये इंग्रजी विषयाबाबत भविष्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये; म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २००८-२००९ या शैक्षणिक वर्षांपासून होईल.

स्वातंत्र्यानंतरही राष्ट्रीय भाषांच्या वापराकडे गांभीर्याने न पहाणारे भाषाद्रोही सर्वपक्षीय सरकारे !
राज्यघटनेच्या कलम १२० नुसार `संसदेचे कामकाज हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमध्ये चालवले जाईल; परंतु १५ वर्षांनंतर (१९६५ पासून) इंग्रजीचा वापर थांबवण्यात येईल.' आजपर्यंत या तरतुदीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. इंग्रजीचा वापर आजही पूर्वीपेक्षा जास्त केला जातो. ज्या इंग्रजीचा उपयोग राष्ट्रीय पातळीवरही फारसा नाही, त्या इंग्रजीत शालान्त परीक्षेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुलेही आज नापास होत आहेत व त्यांना महाविद्यालयीन शिक्षणाची दारे बंद होत आहेत. - श्री. संजय मुळये, रत्‍नागिरी

`मराठी भाषा जिवंत ठेवायची असेल....'
संस्कृतीची वाटचाल भाषेतूनच होत असते. महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असतांना मराठी राज्यात इंग्रजी भाषा `राणी' झाली आहे, असे कुसुमाग्रजांनी म्हटले आहे. गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघाल्या आहेत. आता मराठी शाळांचे काय होणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आपल्या बोलण्यात शुद्ध मराठी वापरली पाहिजे.
(संदर्भ : सनातनचे आगामी प्रकाशन)

 


असंख्य पाहुणे पोसते मराठी..... ।

संकलक : डॉ. राजीव भोसरकर, हैदराबाद

`या भाषेच्या मस्तकावर राजमुकुट आहे, पण तिच्या अंगावरची वस्त्रे मात्र जीर्ण आहेत' कविवर्य कुसुमाग्रजांनी मराठी भाषेविषयी केलेले हे विधान चिंतनीय आहे. या त्यांच्या विधानातील सत्य विदारक आहे. महाराष्ट्र राज्यात `मराठी' अजूनही अंग चोरून वावरते. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आज ४३ वर्षे उलटून गेली, तरी पण खर्‍या अर्थाने मराठीला राजभाषेचा दर्जा मिळालेला नाही. इतर कोणत्याही अन्य राज्यात मातृभाषेविषयी इतके
नकारात्मक धोरण राबवलेले नाही.

मराठी राज्यभाषा म्हणून टिकणार का ?
महाराष्ट्राच्या बाहेर रहाणारी परप्रांतीय मराठी मंडळीही पिढ्यानपिढ्या अमराठी प्रांतात राहूनही मराठी भाषा, संस्कृति, अस्मिता आणि बाणा जोपासतात; परंतु खेद वाटतो की, मुंबई व महाराष्ट्रात मराठीची स्थिति दयनीय आहे. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून प्रत्येक राज्याने आपापल्या राजभाषेला राजसिंहासनावर बसवलेले परप्रांतीय मराठी माणसांनी बघितलं आहे; परंतु महाराष्ट्रात मात्र नेमके विपरित घडत आहे. ग्यानबा-तुकारामांनी वाढवलेली मराठी त्यांच्या वंशजांना टिकवता आली नाही, असा दुर्लौकिक येणार्‍या पिढीद्वारे होऊ नये, एवढेच कळकळीने वाटते.
मायबोली उपरी ठरली आहे !

`वेडेवाकुडे परि तुझाच म्हणवीन' हे माझ्या मराठी मायेला सांगता आले पाहिजे. भगवान महावीर व गौतमबुद्ध या दोन महापुरुषांनी लोकप्रबोधनासाठी कटाक्षाने मातृभाषेचाच उपयोग केला. आपल्या प्रिय मातृभाषेतून धर्माचा आणि
जीवनाचा विचार आपण प्रथमच ऐकत आहोत, या जाणिवेने लोकमत तृप्‍त होते. ते उच्चभू्र लोकांच्या संस्कृत भाषेतून लोकांशी बोलले नाहीत. आणि आता इंग्रजी सोडून मराठीत बोलणे ही जीवनशैली झाली आहे. `अमृतातेही
पैजा जिंके' असे यथार्थ वर्णन असलेली आपली मायबोली महाराष्ट्राच्या राजधानीत उपरी ठरली आहे. मराठी भाषा महाराष्ट्राच्या मंत्रालयात नाही, न्यायमंदिरात नाही, कोणाच्या ओठात नाही, पोटात नाही कि हृदयातही नाही.
आपल्या मातृभाषेतील प्रत्येक शब्द आपल्या भावनेला जेवढा कंपित करतो तितका परभाषेतला शब्द; मग तो कितीही स्वच्छ, सुंदर असला तरी हृदयाला हालवत नाही. बुद्धीला झुलवणार्‍या भाषेपेक्षा हृदयाला हेलावणारी
भाषा माणसालाच काय पण प्राण्यांनाही आवडते.

मतांसाठी राजकारण्यांचे अमराठींना प्राधान्य
मुंबई शहरात सर्वात जास्त लोकसंख्या ही अमराठी लोकांचीच आहे, ही आता आकडेवारीनिशी सिद्ध झालेली गोष्ट असल्याने व त्यांत हिंदी भाषिकांचाच भरणा अधिक असल्याने, मुंबईतील निवडणुका जिंकण्यासाठी मराठी मातृभाषिकांचा विचार सोडून देणे हे सर्वच राजकीय पक्षांना अपरिहार्य झाले आहे.

हिंदी, इंग्रजीच्या मार्‍याखाली दबलेली मराठी
मराठी भाषिक पालकांना सुद्धा इंग्रजीची ओढ अधिक. हिंदीत जास्त गुण मिळतात म्हणून हिंदीचा पर्याय पसंत. मराठी भाषा मरणाकडे जात आहे आणि तिची खरी मारेकरी हिंदी भाषा आहे. ज्ञान, माहितीच्या तसेच मनोरंजनाच्या अखंड महापुरामुळे व उत्तर भारतातून प्रंचड संख्येने येणार्‍या लोकांच्या लोंढ्यामुळे आज इंग्रजी व हिंदी, मराठीच्या अंगावर येत आहे. परिणामी घराघरातून गंमत म्हणून हिंदी, इंग्रजीत बोलणे सुरू झाले आहे. आतून स्वभाषेच्या व्याकरणाची दुर्दशा आणि दुसरीकडे हिंदी व इंग्रजीचा अखंड मारा, हे दोन गंभीर प्रश्‍न आज मराठीसमोर आहेत, ही वस्तुस्थिति आहे. त्यामुळे आताची मराठी धेडगुजरी झाली आहे.

कॉनव्हेंट शाळांचे पद्धतशीर आक्रमण
जुहूच्या एका शाळेत `प्रवेश हवा असेल तर मराठी सोडा' असे शाळा व्यवस्थापनाने सरळ सांगितले. आतापर्यंत कॉन्व्हेंट शाळेने पद्धतशीरपणे मराठीचे उच्चटन केले आहे. गोकाक अहवालानुसार या राज्याची भाषा निदान
५० गुणांनी सर्व शाळेत शालांत परीक्षेपर्यंत असायलाच हवी. सध्या मराठी भाषेवर इंग्रजी व हिंदीचे नको तितके आक्रमण होत आहे. आणि आम्ही ते शांतपणे खपवून घेत आहोत.

ग्रामीण महाराष्ट्रातही इंग्रजी शाळांचे लोण
मुंबईकडे पाहून उर्वरित महाराष्ट्र चालतो हे मान्य केले, तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा जितक्या वेगाने ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या १०-१५ वर्षांत निघाल्या, त्यावरून येत्या २५ वर्षांत उभा महाराष्ट्र मराठीपासून दूर गेल्या तर
आश्चर्य वाटायला नको.

महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागात कानडी सक्‍तीची
विशेष म्हणजे मुंबईत मराठीचे उच्चाटन जितक्या वेगाने चालू आहे, तितकी परिस्थिति उर्वरित महाराष्ट्रात नाही. श्री. गोकाक यांचा राजभाषेसंबंधीचा अहवाल प्रसिद्ध होऊन काही वर्षे झाली. ज्ञानपीठविजेते गोकाक हे मुंबईतच रहात होते. त्यांची मातृभाषा कानडी. त्यांनी दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी कर्नाटक राज्याने ताबडतोब केली. त्यामुळे
बेळगावसह अन्य सीमा भाग अडचणीत आला. तेथे कानडी सक्‍तीची झाली.

दक्षिणी लोकांकडून भाषाभिमान शिका !
दक्षिणेच्या राज्यातील लोकांची त्यांच्या मातृभाषेविषयी जागरूकता व आस्था बघून कौतुक व आश्चर्य वाटते. परकी भाषा बोलायला ते नकार देतात. त्याच्या राज्यात आलेल्या परप्रांतीयांशी संवाद साधण्यासाठी ते मुद्दाहमून इंग्रजी किंवा हिंदीचा वापर करण्याचा प्रयत्‍न करत नाहीत.

मराठीचा फुका अभिमान बाळगणारे ढोंगी साहित्यिक व प्रतिष्ठित
सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या लक्षात एक गोष्ट आली आहे की, सार्वजनिक वा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठीचा उदो उदो करणार्‍या बहुसंख्य ज्येष्ठ साहित्यिकांची भावी पिढी मात्र चुपके-चुपके सर्रास
इंग्रजी माध्यमात शिकू लागली आहे. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व्हावयास हवे, असे आजवर सर्व शिक्षणतज्ञ उच्चरवाने सांगत आले आहेत, पण कोणीही मनावर घेत नाही. या शिक्षणतज्ञांच्या कुटुंबात काय दृष्य दिसते ? काही
ज्येष्ठ-श्रेष्ठ मराठी सारस्वतांनी जनांत मराठीला नमस्कार आणि खाजगीत मराठीचा झिडकार व इंग्रजीचा पुरस्कार अशी दुटप्पी नीति अवलंबून, आपल्या कुटुंबातील तरुण पिढीला अमेरिकेसारख्या परक्या देशात निर्यात करण्यास
सुरुवात केली. मग `महाजनो येन गत: स पन्था: ।' या न्यायानुसार तमाम सुशिक्षित व उच्च मध्यमवर्गाने या महाजनांचे अनुकरण केले. यात काहीच नवल नाही. मावळतीला आलेल्या बहुसंख्य मराठी साहित्यिकांच्या घरातही
मराठी ही फक्‍त पुरस्कारापुरती उरलेली दिसते. माझी नातवंडं माझ्या कविता वाचत नाहीत अशी खंत व्यक्‍त करणार्‍या कै. वसंत बापटांना त्यांची कविता वाचण्यासाठी इतर मराठी माणसांनी मराठी टिकवून ठेवावी, हे अभिप्रेत होते काय ?

नोकरीसाठी `फाड फाड इंग्रजी' हे समीकरण
आज महाराष्ट्रात मराठीला स्वत:चे अस्तित्व राहिले नाही. फाड फाड इंग्रजी बोलता येणे म्हणजे हमखास नोकरी असे समीकरण झाले आहे. मराठी माध्यमात शिकलेली मुले अमेरिकेत गेली नाहीत का ? त्यांनी नावलौकिक, पैसा मिळवला नाही का ? या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर `हो' असेल तरी त्यांना ते पटण्यासारखं नाही. सुशिक्षित मराठी कुटुंबातदेखील हिंदी-इंग्रजी बोलणारे लोक आढळतात. हे दृष्य पाहिले की फार वाईट वाटते.

मराठीचे व्याकरण बदलण्याची घोडचूक करणारे राजकारणी
१९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून मराठी ही राजभाषा झाली व संपूर्ण राज्यकारभार मराठीतून सुरू करण्याचा निर्णय झाला. त्या काळी टंकलेखन यंत्र हे राज्य कारभाराचे मुख्य साधन होते. त्याचा वेग वाढवण्याच्या हव्यासापोटी शुद्ध मराठी लेखनप्रणाली सोपी करावी, असा सत्ताधार्‍यांकडून रेटा आला आणि जुन्या व्याकरणशुद्ध लेखनप्रणालीऐवजी व्यवहारवादी लेखन प्रणालीचा अंगीकार करण्यात आला. याचा दुष्परिणाम असा झाला की, १९७० सालानंतर जन्मलेल्या पिढीला व्याकरण, शुद्धलेखन यांची ओळखच झाली नाही व एकंदरीत मराठी भाषा शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला. त्या काळी मराठी भाषा सोपी करण्याच्या निमित्ताने ज्या विषवल्लीचे बीजारोपण झाले त्याची कटु फळे आज आपणास प्रचारमाध्यमातील मराठीच्या रूपाने चाखावयास मिळत आहेत.

न्यायमंदिरातही मराठीची उपेक्षा
न्यायमंदिरातही मराठीची अत्यंत उपेक्षा होत आहे. न्यायालयाचे कामकाज मराठीत चालत नाही ही वस्तुस्थिति आहे. लोकशाहीमध्ये लोकाभिमुखतेसाठी लोकांना समजेल अशा भाषेत कारभार चालणे अभिप्रेत असते. शासनालाच इंग्रजी भाषेचे प्रभुत्व डावलण्यासाठी अद्याप इच्छाच नाही हे स्पष्ट दिसते. बृहन्मुंबईसाठी तर मराठी भाषा ही ऐच्छिक मांडणारी तरतूद आहे. म्हणजेच बृहन्मुंबईसाठी वेगळी आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळी तरतूद असा सगळा खेळ चालतोय. या सर्व विसंगत तरतुदी असतांना न्यायालयीन कामकाजाची भाषा मराठी व्हावी, अशी शासनाची खरीच इच्छा आहे काय, याबद्दल शंका येते. महाराष्ट्रात उच्च न्यायालय वगळता, अन्य न्यायालयांचे कामकाज मराठी भाषेत व्हावे, हे धोरण सर्वच पक्षांच्या सरकारांनी मान्य केले; मात्र त्याची ठोस अंमलबजावणी होण्यासाठी राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव अढळून येतो. विधि शिक्षण मराठी माध्यमातून व्हावे यासाठी सर्व कायदे मराठीतून भाषांतरित होण्याची गरज आहे. सध्या मराठी भाषेत साक्षी-पुरावा नोंदवल्यास त्याच्या नोट्स इंग्रजी भाषेत बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत. तसेच कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयेवर एखाद्याने मराठी भाषेत अपिल दाखल केले तर ग्राह्य मानण्यात येत नाही. मराठी भाषेतील अपिलाबरोबर इंग्रजी भाषेतील अपिल, मेमो असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमात मराठी अनिवार्य करण्यासाठी पालकांनी रस्त्यावर यावे !
काही दिवसांपूर्वी इंग्रजी शाळेचे अनुदान महाराष्ट्र शासनाने ५० टक्के कमी केले, तर तेथील विद्यार्थी पालक आंदोलनासाठी रस्त्यावर आले, परंतु मराठी भाषेला पर्यायी विषय ठेवले. आय.टी. आणले तेव्हा एकही मराठी
पालक रस्त्यावर आला नाही. `मराठी भाषा ही शिक्षणात अनिवार्य करा' म्हणून एकानेही आंदोलनाला दिशा दिली नाही. आज शैक्षणिक अभ्यासक्रमात मराठी विषय अनिवार्य करायला पाहिजेच. कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील माहिती तंत्रज्ञान विषयाचा पाया घालतांना शासनाने द्वितीय भाषेचा जो पर्याय दिला आहे तो या भाषेच्या मरणाचा घोष आहे. कनिष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा टिकली नाही, तर विद्यापीठ स्तरापर्यंत ती कशी टिकणार ?

इंग्रजी स्पर्धेत टिकू न शकणारे मराठी
आता २१ व्या शतकात संगणकयुग अवतरले. २१ व्या शतकाकडे धाव घ्यायची तर सर्वांनीच इंग्रजीच्या भन्नाट वेगाने धावले पाहिजे, अशा भावनेने चुरस सुरू झाली, पण या जीवघेण्या शर्यतीत मुक्कामावर सर्वांनाच सारख्या वेगाने धावता आले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी कौटुंबिक पाश्वभूमि.

मातृभाषेची उपेक्षा हे दारिद्र्याचे लक्षण
आपली मातृभाषा बोलण्याचा कमीपणा वाटण्याचा न्यूनगंड का उत्पन्न व्हावा, ते कळत नाही मातृभाषेची उपेक्षा करणे हे सांस्कृतिक दारिद्र्याचे लक्षण आहे. उत्तरोत्तर आमची ही मराठी आम्हीच केविलवाणी करीत आहोत हे
लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रात मराठी माणसांनीच मराठीची दयनीय अवस्था केली आहे.

मराठी प्रमाणभाषा शिकणे आवश्यक प्रमाण
मराठीतील वृत्तपत्र बेळगावपासून नागपूरपर्यंत कोठेही वाचतायेते. बोललेली प्रमाण मराठीही सर्वत्र समजते म्हणजेच प्रमाणभाषा ही अपरिहार्य आहे, तशीच सार्वत्रिक सोयही आहे. त्यामुळेच आपली मातृभाषा असली तरीसुद्धा ही प्रमाण भाषा पद्धतशीरपणे शिकावी लागते. शिकल्यानंतरही जाणीपूर्वक जोपासावी लागते. शुद्धलेखनाची दुर्दशा मराठीच्या जणू मुळावरच येऊ पाहत आहे. दुकाने कार्यालयातील तसेच रस्तोरस्तीच्या जाहिरातीनंतर मराठी वाहिन्यांवरील बातम्या, वृत्तपत्रे नियतकालिकांपासून पुस्तकांच्याही पानापानापर्यंत ही दुर्दशा पोहोचली आहे.

ही तर प्रतिकारहीन शरणागति !
दोष सर्वस्वी आपलाच आहे. खरे पाहता हे आक्रमण नव्हेच, ही प्रतिकारहीन शरणागति आहे. याचे कारण म्हणजे कित्येक वर्षांपासून संपूर्ण मराठी समाजाला अगम्य न्यूनगंड व अपराधीपणाच्या भावनेने पछाडलेले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून विशिष्ट वृत्तपत्रे व एफ्.एम्. रेडियो वाहिन्या यांसारख्यांनी जाणून-बुजून चालवलेला दुष्टाचार. यामागे काही दूरगामी राजकारणी असू शकते ते म्हणजे उद्या विदर्भ वेगळा झालाच, तर परवा मुंबईचेही वेगळे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश मागणे होईल. मग विदर्भाची भाषा ही हिंदी आणि मुंबईची इंग्रजी; परंतु मराठी कदापी नाही. शेवटी महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या ४३ वर्षांनंतर ही महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी उपरीच आहे, याची दखल आपले राजनेते घेतील का ?

 


इंग्रजीच्या मानसिक गुलामगिरीतून केव्हा मुक्‍त होणार ?

संकलक : डॉ. मंगलकुमार कुलकर्णी, पुणे.

डॉ. कुलकर्णी

 प्रस्तावना
हल्ली इंग्रजी बोलणे, वाचणे, चित्रपट पहाणे व इंग्रजी सभ्यतेनुसार वागणे याचे पेव जिकडे-तिकडे फुटलेले आहे. माझा मुलगा किंवा मुलगी इंग्रजीतून फाडफाड बोलली पाहिजे, चारचौघात रूबाबदार दिसली पाहिजे, अशा भंपक कल्पनेतून इंग्रजी माध्यमांच्या पंचतारांकीत शाळांमधून आपल्या
पाल्याला शिकवण्यात धन्य मानीत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या पाश्चात्त्यांच्या धर्तीवरील तारांकीत शाळांचे जिकडे-तिकडे पेवच फुटलेले आहे. स्पर्धेच्या या युगात मराठी शाळाही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करत आहे. राज्यकर्तेही यात मागे नाहीत. एकंदरच इंग्रजी भाषेच्या या अतिरेकी व भ्रामक प्रेमामुळे मराठी भाषा नाहीशी होईल किंवा तिचे महत्त्व नष्ट होईल कि काय अशी भीती
निर्माण झाली आहे. मराठी भाषेची वैशिष्ट्ये, इंग्रजी भाषेतील त्रुटी, इंग्रजी भाषेमुळे होणारी संस्कृतीची हानी व यावरील उपाय याविषयीचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.

भाषाशास्त्रानुसार संस्कृत भाषेला देवभाषा असे संबोधले जाते. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतूनच झाला आहे, असे इतिहास सांगतो. संस्कृतखालोखाल मराठी भाषेचे महत्त्व आहे. तिच्या तुलनेत इंग्रजी भाषेत काही त्रुटी आढळतात.

शब्दरचनेला कोणताही नियमच नसल्यामुळे शब्दरचना पाठच करावी लागणे
इंग्रजी भाषेला कोणताही नियम नसल्यामुळे ती शिकण्यासाठी पाठच करावी, लागते. यात अक्षरांचे उच्चार ठरलेले नाहीत. याची सर्वश्रुत उदाहरणे म्हणज, `Do' चा उच्चार `डू' तर `Go' चा उच्चार `गो ' तसेच `Put' चा उच्चार `पुट' तर `But' चा उच्चार `बट' हे सर्व तर्कविसंगत आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. याचप्रमाणे कोणत्या शब्दाचा उच्चार केव्हा कसा करावा, याचेही कोणते शास्त्र नाही, उदा. - `C' या शब्दाचा उच्चार कधी `स' असा होतो, तर कधी `क' असा होतो. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास `Action' या शब्दात `स' व `Cat' या शब्दात `क' असा होतो. अशा प्रकारची कितीतरी उदाहरणे देता येतील. कधी कोणत्या शब्दाचा उच्चार स्पष्ट करायचा, तर कधी अस्पष्ट याचेही काही शास्त्र नाही. उदा. Watchman या शब्दात `' चा उच्चार करायचा नाही, Action या शब्दात `टी' चा उच्चार `श' असा करायचा आणि Cat या शब्दात मात्र `ट' असा करायचा. ज्या अशा शास्त्रविसंगत व तर्कविसंगत भाषेविषयी अभिमान का धरावा, हेच बुद्धीअगम्य आहे.

आदरार्थी वचन नसणे
कोणत्याही व्यक्‍तीला ती कितीही आदरणीय असली, तरी एकेरी वचनानेच संबोधले जाते. आपल्यापेक्षा वयाने कितीही मोठी व्यक्‍ती असली, तरी `प' व आपल्या वयाची व्यक्‍ती असली तरी `प'. भाषेत लवचिकता न आल्यामुळे भाषा ठोकळेबाज होते.

क्रियापदाचे लिंग कर्त्याप्रमाणे बदलले न जाणे
यामुळे कर्त्याविषयीचा भाव व्यक्‍त होऊ शकत नाही. तसेच कर्त्याचे लिंग कोणते आहे, याविषयीचा नवीन व्यक्‍तीला बोध होऊ शकत नाही, उदा. मराठीत `सीता चालते' व `राम चालतो' पण इंग्रजीत मात्र Ram walks आणि Sita also walks त्यामुळे नवीन व्यक्‍तीला राम हा पुरुष आहे कि स्त्री याचे ज्ञान होऊ शकत नाही.

जोडाक्षरांचे कोणतेही नियम नसणे
मराठी भाषेच्या नियमाप्रमाणे जोडाक्षर म्हणजे एक अक्षर पूर्ण व एक अक्षर अर्धे असते. इंग्रजीत मात्र तसे नाही. इंग्रजीत जोडाक्षरातील दोन्हीही अक्षरे पूर्ण असतात, उदा. वरील शब्दांप्रमाणेच Deccan , Friction अशा प्रकारे कितीतरी त्रुटी दाखवता येतील. विस्तारभयास्तव येथे देऊ शकत नाही.
याउलट मराठी भाषेत एक प्रकारची लवचिकता आहे, आदर व्यक्‍त करण्याची क्षमता आहे, शास्त्रशुद्धता आहे, कमी शब्दात आशय व्यक्‍त करण्याची क्षमता आहे. म्हणूनच मराठी भाषेत इंग्रजी भाषेपेक्षा जास्त चैतन्य आहे.

इंग्रजी भाषेबद्दल समाजात असलेले गैरसमज व अज्ञान
`इंग्रजीत बोलता येणे म्हणजे रूबाबदारपणाचे लक्षण व इंग्रजी न येणे म्हणजे मागासलेपणा' असे इंग्रजाळलेल्या लोकांना वाटते. इंग्रजी वर्तमानपत्र, मासिके व कादंबर्‍या वाचणे म्हणजे एक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. इंग्रजी भाषा शिकली नाही, तर प्रगती नाही, असाही बर्‍याच जणांचा गैरसमज असतो.

विक्री व्यवस्थापनाच्या काळात इंग्रजीचे अवास्तव महत्त्व
इंग्रजी भाषा बोलता आली नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापारक्षेत्रात मागे पडू, अशी भीती अनेक जणाच्या मनात असते. वास्तविक पहाता व्यापारक्षेत्रात प्राधान्य फक्‍त गुणवत्तेलाच असते; परंतु आजकालच्या बेगडी विक्रीव्यवस्थापनाच्या (मार्केटिंग) काळात मात्र ज्याला इंग्रजी, येते तो आपला सुमार दर्जाचा माल केवळ इंग्रजीच्या जोरावर खपवू शकतो, हे कटू सत्य आहे. याला कारण म्हणजे इंग्रजी फाडफाड बोलणारा म्हणजे कोणीतरी महान अशी गुलामगिरीची मानसिकता आपल्या समाजात आहे. या न्यूनगंडामुळे आज मराठी माणूस अशा विक्री प्रतिनिधींना बळी पडतो. या अशाच वस्तुस्थितीमुळे बुद्धी सुमार असली, तरी केवळ इंग्रजी येते म्हणून नोकरी मिळण्याची खात्री असल्यामुळे समाज इंग्रजीकडे वळला आहे. कित्येकदा गुणवत्ता असूनही केवळ इंग्रजी येत नाही, म्हणून संधी मिळत नाही. आजकाल अशाच विक्रीप्रतिनिधींचे सगळीकडे पेव फुटलेले दिसत आहे. अशा वेळेस इंग्रजी भाषा येणे आवश्यक वाटत असले, तरी त्यावर अवलंबून रहाणे व तिचा अनावश्यक वापर करणे, ही मानसिक गुलामगिरी नाही काय ?

इंग्रजी भाषेमुळे होणारी सांस्कृतिक हानी
इंग्रजी भाषेत शिक्षण घेतांना जे वाड्मय संदर्भासाठी वापरले जाते, ते पाश्चात्त्य संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे साहजिकच आपल्याकडील मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख होत नाही. आजकाल विभक्‍त कुटुंबपद्धतीमुळे घरातही भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारे कोणी नसते. प्रसारमाध्यमांकडून व समाजाकडूनही अशाच वाड्मयाचा प्रचार होत असल्यामुळे त्याविषयीचे आकर्षण विद्यार्थ्यांत वाढते. (उदा. हॅरी पॉटर, दूरचित्रवाहिन्यांवरील व्यंगचित्रमालिका इ.) यामुळेही भारतीय इतिहासातील राष्ट्रपुरुष, संत, धर्मग्रंथ इत्यादींपासून युवा पिढी दूर रहाते. स्वधर्म व स्वभाषेविषयी प्रेम निर्माण न झाल्याने हिंदु संस्कृतीवरील श्रद्धा व अभिमान वाढीस लागत नाही. इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेल्या हिंसक व विकृत लैंगिकता असणार्‍या कादंबर्‍या वाचल्याने युवा पिढीवर दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांचा युवा पिढीवर तसेच संपूर्ण समाजाच्या आचार व विचारांवर झालेला परिणाम आज आपण पहातोच. केवळ इंग्रजी चांगले बोलता यावे, म्हणून जर पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत असतील, तर ते असमर्थनीय आहे. इंग्रजीत चांगले बोलता येणे या फायद्याच्या तुलनेत सततच्या इंग्रजी बोलण्याने व इंग्रजीत शालेय शिक्षण घेतल्याने होणार्‍या सांस्कृतिक हानीचाही विचार व्हायला हवा.

भाषा शिकण्यात शक्‍ती खर्च झाल्याने वैचारिकता कमी
मातृभाषेतील शिक्षणाने विद्यार्थीदशेतच चिंतनशीलता व पर्यायाने प्रगल्भता वाढते. इंग्रजीत शिक्षण घेत असतांना भाषा शिकण्यातच बहुसंख्य वेळ जातो, त्यातील वाड्मय वाचणे प्रत्येकाला शक्य नसते. भाषा समृद्ध तर होत नाहीच शिवाय भाषा शिकण्यात बराच वेळ गेल्याने अशा मुलांमध्ये बहुतेकदा वैचारिकता प्रगल्भता कमी दिसते.

इंग्रजीच्या अतिरेकी प्रेमामुळे समाजाची विभागणी
भाषा हेच समाजाला एकसंध ठेवण्याचे प्रभावी माध्यम आहे. भाषेमुळेच आत्मीयता वाढायला मदत होते. इंग्रजी बोलणारा उच्चभ्रू वर्ग व इतर मध्यमवर्गीय आणि गरीब अशी विभागणी झाल्यामुळे समाजातील दरी वाढते. एकाच वर्गाची आर्थिक प्रगती होते व इतर समाज मागासलेल्या अवस्थेत रहातो व न्यूनगंडाची भावना निर्माण होते.

इच्छा नसूनही समाजातील दुसरा वर्ग यात ओढला जाणे
पहिल्या समाजाकडून दुसर्‍या वर्गातील लोकांना तुच्छ लेखले जाते. याचा परिणाम म्हणून केवळ स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी नाईलाजास्तव व आकर्षण म्हणून हा दुसरा वर्गही या स्पर्धेत ओढला जाऊन पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जात आहे. समाजात आज अशा लोकांची संख्याच दिवसेंदिवस वाढत आहे. समाजातील संपूर्ण मध्यमवर्ग व उच्च मध्यमवर्ग आज याला बळी पडत आहे. आज कितीतरी चांगल्या हुद्द्यावरील अधिकारी हे मराठी माध्यमातून शिकलेलेच आहेत. परदेशात नाव कमावलेले कितीतरी मातृभाषेत शिक्षण घेऊनच पुढे गेले आहेत.

बहुजन समाजाला दैनंदिन जीवनात येणार्‍या अडचणी
जो हे सर्व करू शकत नाही, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होतो, कारण `इंग्रजी येणे' हा प्रगतीचा मापदंड झाला आहे. आज समाजाच्या सर्वच क्षेत्रांत (सरकारी कार्यालये, न्यायालये, शैक्षणिक क्षेत्र, खाजगी व्यवसायाची क्षेत्रे इ.) इंग्रजीचा सर्रास वापर होतांना आढळतो. यामुळे या वर्गातील लोकांना रोजच्या जीवनात समाजात वावरतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

इंग्रजीच्या आहारी न जाताही भौतिक व सांस्कृतिक प्रगती साध्य करणारी राष्ट्रे
या बाबतीत जपानचे उदाहरण खूपच बोलके आहे. जपानचे राज्यकर्ते कधीही इंग्रजी भाषेवर अवलंबून राहिले नाहीत. उलट त्यांनी पाश्चात्त्य देशातील सर्व ज्ञान जपानी भाषेत भाषांतरीत केले. देशातील सर्व शिक्षण मातृभाषेत चालू ठेवले. असे असूनही आज जपान हे सर्वच क्षेत्रांत जगातील एक प्रगत राष्ट्र आहे. या व्यतिरिक्‍त जगातील सर्वच स्वतंत्र राष्ट्रे आपले सर्व लोकव्यवहार मातृभाषेतूनच करतात. त्यांच्या प्रगतीत कोठेही अडथळा आल्याचे दिसत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रातही कोणाची पीछेहाट झालेली पहायला मिळत नाही. उलट जपान, कोरिया, जर्मन यांसारख्या राष्ट्रांचा व्यापार वाढतच आहे.

राज्यकर्ते व प्रशासन यांची उदासीन भूमिका

छ. शिवाजी महाराज

मातृभाषेतून व्यवहार करणे हे राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्‍तीवरच अवलंबून आहे. प्रा. रामकृष्ण मोरे शिक्षणमंत्री असतांना त्यांनी इ. पहिलीपासून इंग्रजीचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केला. याची किती आवश्यकता आहे, हे तपासून पहायला हवे. राज्यकर्त्यांच्या नावानेही आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळा निघत आहेत, यावरून राज्यकर्ते स्वत:च याविषयी किती उदासीन आहेत, हे लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृत भाषेला (स्वकीय) राजाश्रय दिला होता व उर्दू भाषेचे (परकीय) महत्त्व कमी केले होते.
२१ जुलै १९९८ रोजी महाराष्ट्र शासनाने न्यायालयीन कामकाज मराठीत चालावावे यासाठी अधिसूचना जारी केली होती; परंतु या प्रकरणात कर्मचारीवर्ग, वकील, न्यायाधीश इत्यादींचा सहभाग कमी पडला. राष्ट्रीय पातळीवरील नेतेसुद्धा सर्रास संसदेत, पत्रकारपरिषदेत, बैठकांतूनइंग्रजीतून बोलतांना दिसतात.
एक आशेचा किरण म्हणजे पुणे महानगरपालिकेने दुकानांवरील पाट्या फक्‍त मराठी भाषेतच असण्याचे बंधनकारक केले आहे व नुसतेच कागदोपत्री बंधनकारक न करता असे न करणार्‍या दुकानदारांविरुद्ध कृतीही करून दाखवली आहे, हे निश्चितच प्रशंसनीय आहे.

स्वायत्त शिक्षण संस्था
विद्यापीठ कायदा १९९४, प्रकरण दुसरे क्र. `३' (५५) मधील तरतुदींप्रमाणे मराठीचा अभ्यास करणे, मराठीचा वापर संशोधन व परीक्षापद्धती यांसाठी जास्तीतजास्त करणे करणे अपेक्षित असतानाही पुणे विद्यापीठाने १९९४ मध्ये `कायदा' या विषयाचा अभ्यासक्रम मराठी भाषेतून बंद करून इंग्रजी भाषेत ठेवला. अशाने मराठीला प्रोत्साहन मिळण्याऐवजी इंग्रजीलाच मिळते.

समाजाने काय करायला हवे ?
इतरांना न समजणार्‍या भाषेत बोलणे विदेशात अशिष्टपणाचे लक्षण मानले जाते. यासाठी जेथे आवश्यक असेल तेथेच नाईलाजास्तव इंग्रजीचा वापर करणे योग्य होईल. केवळ आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी इंग्रजीत बोलणे टाळावे.
` इंग्रजी बोलणे' ही कला इतर प्रकारेही साध्य करू शकतो, हा भाग लक्षात घ्यायला हवा. इतर भाषा शिकत असातनांही (उदा. जर्मन, फ्रेंच इ.) आपण हाच दृष्टीकोन ठेवत असतो. आपला पाल्य जर आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असेल, तर त्याच्यावर आपल्या संस्कृतीचे संस्कार अन्य माध्यमांतून कसे होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. स्वत:च्या भाषेविषयी अभिमान बाळगणे म्हणजेच स्वत:च्या राष्ट्राविषयी व स्वत:चा धर्म व संस्कृती यांविषयी अभिमान असणे होय!

 


हवा म...म.... मराठीचा !

संकलक : सौ. रूपाली वर्तक

`ध' चा `म' करणार्‍या आनंदीबाईपेक्षा कुटील कारस्थान रचून महाराष्ट्र सरकार शासकीय परिपत्रके काढून `एम्' चा `इ' करत आहे. तिच्यासाठी काही करणे तर सोडाच पण एक एक वार करून माय मराठीला खरोखरच धायमोकलून रडायची वेळ शासनाने आणली आहे. केवळ तिचे मानगुट आवळायचेच शासनाने बाकी ठेवले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्‍ति ठरू नये. हळूहळू चाल करत शासनाने चालवलेली मराठीची आणि पर्यायाने मराठीजनांची मुस्कटदाबी आता पराकोटीला जात आहे.

म्हणे, दर्जासाठी मराठी माध्यमातील मुलांना प्रवेश नाही !
यापूर्वी मराठीला पर्याय म्हणून संगणक विषय ठेवणे, कमी विद्यार्थीसंख्येच्या अभावी मराठी शाळा बंद करणे यांसारख्या गोष्टी शासनाने केल्या आहेत. आता त्यात भर म्हणून बी.एड्.च्या इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमासाठी मराठी  भाषेतून शिक्षण घेणार्‍यांना प्रवेश नाकारावा, असे परिपत्रक