दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

२. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


खगोलशास्त्रावर प्रभुत्व

असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


सनातनची सात्त्विक उत्पादने

१.  ग्रंथ - देवीपूजनाशी संबंधित शास्त्र

२.  ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?

३.  ग्रंथ - सण, धार्मिक उत्सव व व्रते

  • ४.  ग्रंथ - सोळा संस्कार

५.  ग्रंथ - देवघर व पूजेतील उपकरणे

६.  ध्वनीचित्रतबकडी - धार्मिक कृती कशा कराव्यात

७.  ध्वनीचित्रतबकडी - सनातन धर्मसत्संग

वितरणासाठी संपर्क

  • मुंबईः ३२४३५६९९

  • ठाणेः ९३२२६५२५८०

  • रायगडः २७४५०३३८

  • पुणेः ९४२२४३७१३४

  • जळगावः ९४२३०५६४०३

  • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

  • नाशिकः ९४२२४४१७८२

  • इ-मेलः dainik@sanatan.org

मकरसंक्रांत

अनुक्रमणिका


मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळते व तिळाचा उपयोग केल्याने पापक्षालन होते !

प.पू. डॉ. काटेस्वामीजी

मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नान केल्याने महापुण्य मिळणे व तिळाचा उपयोग केल्याने पापक्षालन होणे

मकरसंक्रांत `सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत. मकरसंक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाचे सहा महिने
उत्तम असतात. मकरसंक्रांत ते रथसप्‍तमीपर्यंतचा काळ पर्वकाळ असतो. या पर्वकाळी दान व पुण्यकर्मे विशेष फलद्रुप होतात.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. मकरसंक्रांतीच्या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा व कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते. मकरसंक्रांतीला तीर्थक्षेत्री लक्षावधी लोकांची गर्दी असते.

पुण्यकाळातील विधी - ध्वनिचित्रपट

संक्रांतीदेवी ज्याचा स्वीकार करते, त्यांचा नाश होतो. या दिवशी तिळाचे तेल व उटणे अंगाला लावणे, तीळमिश्रित जलाने स्नान करणे, तीळमिश्रित पाणी पिणे, तीळहोम करणे, तिळाचे दान करणे, या सहा पद्धतीने तिळाचा उपयोग करणार्‍यांची सर्व पापे नष्ट होतात. संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष व गवत तोडणे आणि कामविषय सेवन करणे ही कृत्ये कटाक्षाने वर्ज्य करावीत. नवे भांडे, वस्त्र, अन्न, तीळ, तीळपात्र, गूळ, गाय, घोडा, सोने व भूमि यांचे यथाशक्‍ति दान द्यावे. या दिवशी सुवासिनी दान देतात. काही पदार्थ सुवासिनी कुमारिकांकडून लुटतात व त्यांना तीळगुळ देतात.

सुगडी : या सणाला सुगडी लागतात. सुगडे म्हणजे मातीचे मडके. कुंभाराकडून सुगडी आणतात. त्यांना हळदकुंकवाची बोटे लावून दोर्‍याने सुतवतात. रांगोळी घालून पाट मांडून त्याच्यावर पाच सुगडी ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगडी सवाष्णींना देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वत:करिता ठेवतात. त्या सुगडांमध्ये गाजरे, बोरे, उसाची पेरे (कांडी), शेंगा, कापूस, हरबरे, तिळगुळ, हळदकुंकू इत्यादी भरतात. त्यांचे दान करायचे असते.'
(प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी वाड्मय पत्रिका `घनगर्जित', वर्ष दुसरे, अंक १०)


मकरसंक्रांत साधनेसाठी पोषक काळ

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याच्या उत्तरायणामुळे ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असल्याने, हा काळ साधना करणार्‍यांना जास्त पोषक असणे

कर्कसंक्रांतीपासून मकरसंक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात. सूर्याचे दक्षिणायन सुरू होणे, यालाच ब्रह्मांडाची सूर्यनाडी कार्यरत होणे असे म्हणतात. ब्रह्मांडाची सूर्यनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या दक्षिणायनामध्ये ब्रह्मांडात रज-तमात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. सूर्याचे उत्तरायण सुरू होणे, यालाच ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत होणे असे म्हणतात. ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो. ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असल्याने या काळात वातावरणही नेहमीपेक्षा अधिक शीतल असते. या काळात तीळभक्षण करणे अधिक लाभदायक असते. तिळाच्या तेलात सत्त्वलहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते, शिवाय तीळभक्षण केल्याने शरीरातील चंद्रनाडी कार्यरत होते. त्यामुळे जीव वातावरणाशी पटकन जुळवून घेऊ शकतो; कारण त्या वेळी ब्रह्मांडाचीही चंद्रनाडीच कार्यरत असते. जिवाच्या शरीरातील वातावरण व ब्रह्मांडाचे वातावरण एक झाल्याने साधना करतांना जिवाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. - श्री गुरुतत्त्व (१४.१.२००४, दुपारी ३.३३)
 




मकरसंक्रांतीला हळदी-कुंकू करण्याचे व तेव्हा देण्यात येणार्‍या वाणाचे महत्त्व

हळदी-कुंकू - ध्वनिचित्रपट

मकरसंक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाची सुरुवात
मकरसंक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो.

हळदी-कुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व
अशा पोषक काळामध्ये हळदी-कुंकू करणे हे जिवाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्‍तीचीच पूजा करत असतो. हळद व कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते व श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्‍या जीवासाठी कार्य करते. हळदी-कुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्‍त आदिशक्‍तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्‍या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी-कुंकू व वाण देणे आदि विधीतून जिवावर सगुण भक्‍तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्‍वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास मदत होते.

हळदी-कुंकवातील पंचोपचार

हळदी-कुंकवातील पंचोपचार - ध्वनिचित्रपट

हळद-कुंकू लावणे : हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्‍ती जागृत करणे व तिला भक्‍तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय.

अत्तर लावणे : अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन जिवासाठी कमी कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट झाल्याने ते जिवासाठी व्यापक रूपात म्हणजेच आवश्यक त्या उपरूपांत कार्य करते.

गुलाबपाणी शिंपडणे : गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे जिवाच्या सभोवताली असलेल्या वायूमंडलातील देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यरत होण्यास मदत झाल्याने आपोआपच वातावरणाची शुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे जिवाला कार्यरत देवतेच्या सगुण तत्त्वाचा फायदा अधिक मिळतो.

ओटी भरणे : ओटी भरणे, म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या इच्छाशक्‍तीला आवाहन करणे. श्री दुर्गादेवीची इच्छाशक्‍ती ही तिच्या ओटीपोटात संपुटित झालेली असल्याने, ओटी भरणे म्हणजे तिच्यातील संपुटित इच्छाशक्‍तीला आवाहन करून शरण जाणे होय. ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गादेवीची इच्छाशक्‍ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणार्‍या जिवाच्या देहातून बाहेर पडणार्‍या इच्छालहरींचे घनीकरण होऊन जिवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्‍तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. इच्छाशक्‍तीतूनच जिवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. त्यानंतर साधनेतील पुढच्या टप्प्यात जिवाला देवतेच्या कार्यरत क्रियाशक्‍तीतून साधना म्हणून प्रत्येक कर्म करण्याची शक्‍ती प्राप्‍त होते व त्यानंतर कार्यरत ज्ञानशक्‍तीतून जिवाला वैराग्य प्राप्‍त होते. ओटी भरणे म्हणजेच श्री दुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय.

वाण देणे : वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन व धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्‍तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्‍ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.१.२००५, सायं. ७.०१)




सनातन धर्मात काळया रंगाला अशुभ रंग मानलेले असले, तरी मकरसंक्रांतीच्या दिवशी काळा रंग वापरण्याची परवानगी सनातन धर्माने दिलेली असणे

मकरसंक्रांतीच्या दिवशी काळा रंग वापरण्याची परवानगी का आहे? - ध्वनिचित्रपट

सनातन धर्मात काळया रंगाला अशुभ रंग मानले आहे; कारण या रंगामध्ये वातावरणातील तमोकण ग्रहण करण्याची क्षमता सर्वांत जास्त असते; परंतु मकरसंक्रांतीच्या दिवशी काळया रंगाचे वस्त्र घातले, तरी त्या वस्त्राचा आपल्याला त्रास होत नाही; कारण या दिवशी वातावरणात रज-सत्त्वकणांचे प्राबल्य असते. त्यामुळे याच दिवशी काळा रंग वापरण्याची परवानगी आपल्याला सनातन धर्माने दिली आहे. यावरून सनातन धर्माने ठरवलेली प्रत्येक गोष्ट ही अध्यात्मशास्त्राला किती धरून आहे, याची साक्ष पटते. - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून १४.१.२००४, दुपारी ३.३३)




संक्रांतीच्या दिवशी केल्या जाणार्‍या बोरन्हाणामागील शास्त्र

मकरसंक्रांत ते रथसप्‍तमी या काळात सुनेचे तिळवण, जावयाचे प्रथम वाण, बाळाचे बोरवण करतात. सुनेला, जावयाला व बाळाला हलव्याचे दागिने करतात.

बोरन्हाण

संक्रांतीच्या दिवशी केल्या जाणार्‍या बोरन्हाणामागील शास्त्र काय ?

बोरन्हाणामागील शास्त्र - ध्वनिचित्रपट

१. कृति : `मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्‍तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला काळे झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.
प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदीकुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.' (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, खंड ६, पृष्ठ २४८)

२. शास्त्र : `संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्‍या ईश्‍वरी क्रियालहरींचे प्रमाण जास्त असते. बोरन्हाणा या विधीतून लहान मुलांच्या डोक्यावर चुरमुरे, बोरे, उसाचे तुकडे, गाजराचे तुकडे व ओला हरबरा, तिळाचा हलवा हे घटक टाकले जातात. चुरमुरे हे तांदूळाचे, तसेच हलके व सात्त्विक, सर्वसमावेशक, म्हणजेच आकाशतत्त्वाचे प्रतीक म्हणून वापरले जातात, तर बाकी पंचघटकांतील मधुर रसांच्या माध्यमातून ब्रह्मांडातील आपतत्त्वाशी संबंधित त्या त्या देवतेच्या लहरी कार्यरत झाल्याने, या विधीतून लहान मुलाला देवतांच्या पंचतत्त्वांचा फायदा होण्यास मदत होते. लहान मुलांमध्ये प्रौढ वयातील व्यक्‍तीपेक्षा आपतत्त्वाच्या कणांचे प्रमाण जास्त असल्याने या मधुर रसांच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या तत्त्वांचा लहान मुलांना जास्त प्रमाणात फायदा मिळण्यास मदत होते. यामुळे लहान वयातच देवतांची कृपादृष्टि झाल्याने मुलावर चांगले संस्कार होण्यास मदत होते. या काळात एखाद्या गोष्टीची लूट करून लहान मुलासाठी मोठ्या व्यक्‍तींकडून शुभाशीर्वाद घेणे व या माध्यमातून आपल्या उपास्य देवतेला प्रार्थना करून मुलाच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करणे, हा उद्देश असतो. शुभकालात केलेल्या दानामुळे पुण्यसंचय होण्यास मदत होते. - एक विद्वान (२२.२.२००५, सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून रात्री १०.०७)

३. बोरन्हाणीमध्ये वापरण्यात येणार्‍या विविध वस्तूंतील मधुरतेचे प्रमाण व त्यांच्याकडे आकृष्ट होणारे देवतेचे तत्त्व


- एक विद्वान (२२.२.२००५, रात्री १०.०७)

२. भोगीच्या दिवशी सुपात वाण दिले जाते. त्यामागील शास्त्र काय ?
`सुपाचा आकार हा रजोगुण वर्धक समजला जातो. या आकाराच्या दोन कोनांत रजोगुणी लहरी घनीभूत होण्याचे प्रमाण जास्त असते. भोगीच्या दिवशी वायूमंडलातही रजोगुणी लहरींचे अधिक्य असल्याने या रजोगुणी लहरींच्या स्पर्शाने जिवाची सूर्यनाडी जागृत होेते. ही जागृती तेजाला पुष्टी देणारी असल्याने या तेजाच्या साहाय्याने रजोगुणी लहरी वायूमंडलात संक्रमित करणार्‍या सुपातून वाण दिल्याने `वाण देणे\', ही कृती तेजाच्या साहाय्याने पूर्ण दानरूपी फलप्राप्‍ती करून देणारी ठरते. तसेच तेजाच्या अधिक्याने वाण देण्याच्या कृतीत वाईट शक्‍तींचा अडथळा येण्याची शक्यताही कमी असल्याने भोगीच्या दिवशी रजोगुणी लहरींचा जास्तीतजास्त घनीभूत, तसेच प्रक्षेपित स्तरावर फायदा मिळवण्यासाठी दोन सुपांच्या माध्यमातून दिले जाते. सुप हे तेजरूपी रजोगुणी लहरींना धरून ठेवण्यात अग्रेसर असते. यामुळे जिवाला दानरूपी कृतीची पूर्ण फलप्राप्‍ती होते.\' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११.०५)

३. वाण देतांना १३ प्रकारच्या वस्तू का देतात ?
`वाणाच्या रूपाने दाही दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शकरूपी सर्व प्रकारची आसक्‍ती त्यागणे, तसेच या दिशामंडलाला कार्यरत करणार्‍या मूळ ब्रह्मांडातील तीन शक्‍तींच्या (इच्छा, क्रिया व ज्ञान) माध्यमातून आसक्‍तीविषयक मूळ काळदर्शक संस्कारही त्यागणे, असा १३ या वाणातील संख्येमागचा मूळ उद्देश आहे. १३ आकडा हा दाही दिशा व त्यांना कार्यरत करणार्‍या तीन ब्रह्मांडातील मूळ शक्‍ती यांचे दर्शक मानला गेलेला असल्याने या सर्वांच्या माध्यमातून १३ संख्यादर्शक वाणे देऊन कृती (स्थळ) व कर्म (काळ) यांच्या स्तरावर आसक्‍ती त्यागण्याचे हे द्योतक आहे. म्हणून १३ या आकड्याला विशेष महत्त्व आहे.\' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.१.२००८, रा. )

४. संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू त्या वर्षी महाग का होतात ?
`वस्तू महाग होणे, याला कोणत्याही तर्‍हेचे आध्यात्मिक कारण नाही. हे निवळ व्यावहारिकतेच्या स्तरावर आचरलेले एक रुढीदर्शक माध्यम आहे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११.०५)

५. संक्रांत ज्या दिशेने येते, त्या भूभागात सूख येते व ती ज्या दिशेकडे बघते, तेथे संकटे येतात, असे मानले जाते. यामागील शास्त्र काय ?
अ. दिशेने येणे :
`भूभाग हा स्थळाचे, तर बघणे हे काळाचे दर्शक आहे. संक्रांतीचा काळ हा रज-सत्त्व लहरींना पुष्टी देणारा असल्याने या काळात ब्रह्मांडमंडलात रजोगुण हा स्थळदर्शक, तर सत्त्वगुण हा काळाचे माध्यम म्हणून कार्य करतो. स्थळचक्राप्रमाणे ज्या दिशेतील लहरी संक्रातीतील सूर्याच्या गतीच्या रूपांतरणात्मक काळात निर्माण होणार्‍या तेजाच्या साहाय्याने भारीत होतात, त्या दिशेकडे सुख येते, म्हणजेच या दिशेला स्पर्श करून तेजोलहरी भूमंडलात अवतरत असल्याने त्या वायूमंडलातील वाईट शक्‍तींचे निर्दालन करतच येतात, म्हणून या दिशेकडून येणार्‍या लहरींच्या प्रवाहाच्या संपर्कात येणार्‍या भूभागात केली जाणारी कृती वाईट शक्‍तींच्या त्रासापासून मुक्‍त रहाते. म्हणून त्या त्या भागात सुख येते, असे म्हटले जाते.
आ. दिशेकडे बघणे : ती ज्या दिशेकडे बघते, म्हणजेच या तेजाच्या प्राबल्यावर होणार्‍या युद्धाचा सूक्ष्म परिणाम आजूबाजूच्या संपर्कित दिशांना भोगावा लागल्याने तेथे संकटे येतात, असे म्हटले जाते. तेजाच्या घर्षणातून निर्माण होणार्‍या वाईट शक्‍तींच्या निर्दलनात्मक विघटनरूपी सूक्ष्म परिणाम आजूबाजूच्या दिशांना भोगावा लागल्याने त्याला काळाच्या स्तरावर फक्‍त `बघणे', म्हणजेच `स्थूल स्तरावर स्थळाच्या माध्यमाच्याही पलीकडे नेणे', असे संबोधले जाते. हा परिणाम संकटजन्य, म्हणजेच वाईट शक्‍तींच्या रागाला सामोरा जाणारा समजला जातो.'
- एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११.१५)




मकरसंक्रांतीविषयी ईश्वराकडून प्राप्त झालेले ज्ञान

पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज का मानला जातो ?

`पौष महिन्यात दक्षिण दिशा ही विशेषत: प्राबल्यासहित कार्य करत असते. ज्या वेळी ब्रह्मांडात यमलहरींचे प्राबल्य अधिक असते, त्या वेळी यमलहरी घनीभूत करून ठेवण्याचे कार्य दक्षिण दिशा करत असते. या यमलहरींना धरून अनेक अतृप्‍त आत्मे भूमंडलात वास करून आपल्या प्रभावी रज-तमात्मक दर्शक हालचालींनी वायूमंडल भारीत करत असतात. अशा भारीत वायूमंडलामुळे शुभदर्शक कृतींमध्ये वाईट शक्‍तींचा अडथळा येण्याचीच शक्यता अधिक असल्याने पौष महिना शुभदर्शक कृतींसाठी वर्ज्य मानला जातो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११ )

करिदिन वाईट का मानला जातो ?

`करिदिनादिवशी ब्रह्मांडात तमोगुणी लहरींचे अधिक्य वाढण्यास सुरुवात होते. हे अधिक्य तत्त्वस्वरूपी वाढत असतांना या भारीत वायूमंडलात केल्या जाणार्‍या कृती रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीला पुष्टी देणार्‍या असतात. संक्रातीच्या दिवशी रज-सत्त्वातील सत्त्वलहरींचे प्रमाण करिदिनादिवशी कमी होण्यास सुरुवात झाल्याने तमोगुणाचे प्राबल्य सूक्ष्म रूपात वाढण्यास प्रारंभ होऊ लागतो. हा काळ वाईट शक्‍तींच्या निर्मितीजन्य हालचालीसही पोषक असल्याने तो वाईट समजला जातो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.१.२००८, रात्री ११.१५)

संक्रांतीनिमित्तचे हळदीकुंकू रथसप्‍तमीपर्यंतच का करतात ?

`रथसप्‍तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदीकुंकू केले जाते. त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य कमी होऊ लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्‍तींचे अडथळा येण्याचे प्रमाण वाढते व त्यामुळे विधीतून मिळणार्‍या पुण्यदर्शक फलप्राप्‍तीचे प्रमाणही कमी होते. म्हणून तेजाच्या मारक तत्त्वास पुष्टी देणार्‍या व आदिशक्‍तीरूपी तेजाला आवाहन करणार्‍या हळदीकुंकूरूपी धार्मिक उपासनात्मक कृती रथसप्‍तमीपर्यंतच केल्या जातात.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ९.१.२००८, रात्री ११.२५)

सोन्याच्या हिरेजडित रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजेच `रथसप्‍तमी'

रथसप्‍तमीविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत. सूर्यदेवाला साधना करतांना स्थिर उभे रहायला लागल्याने उभे राहून त्याला त्याची गती सांभाळता येईना. त्याचे पाय दुखू लागले व त्यामुळे त्याची साधना नीट होईना. तेव्हा त्याने परमेश्वराजवळ त्याबद्दल तक्रार केली व बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितले. `मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार\', अशी त्याने परमेश्वराजवळ विचारणा केली. तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी सात अश्व (घोडे) असलेला सोन्याचा हिरेजडित रथ तयार करून दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसला, तो दिवस म्हणजे `रथसप्‍तमी'. याचा अर्थ `सात घोड्यांचा रथ'. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, ९.१.२००४ सायं. ७.४५)

सूर्यदेवाने तहानलेल्या अश्‍वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा सण म्हणजे संक्रांत

सूर्यदेवाने जास्तीतजास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळवण्यासाठी साधना (तपश्चर्या) सुरू केली. त्या वेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना खूप तहान लागली. तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून (विहिरीतून घड्याने पाणी काढतात तसे) घोड्यांना प्यायला दिले. म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी मातीची मडकी पूजण्याची प्रथा सुरू झाली. रथसप्‍तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदी-कुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात. याला काळच साक्षी आहे. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता पाटील यांच्या माध्यमातून, ९.१.२००४ सायं. ७.४५ वा.)




मकरसंक्रांतीनिमित्त सनातनचे साधक दत्तात्रय पटवर्धन यांनी लिहिलेले गीत

तीळगुळापरी प्रत्येक क्षण गोड अनुभवावा ।
मकरसंक्राती दिनाचा संदेश एकमेकाला ।
``तीळगूळ घ्या आणि गोडगोड बोला''।। १ ।।

गोड याचा भावार्थ आहे कटूसत्य पण हिताचे ।
ज्याने होईल निर्मूलन स्वभावदोषांचे ।। २ ।।

तीळगुळाची गोडी ईशनामात अनुभवावी ।
तीळगुळापरी एकरूप अशी चित्तात साठवावी।। ३।।

नाम, सत्संग, सत्सेवा या मिश्रणाचा तीळगूळ।
देऊन एकमेकां, उद्धरू आपापले कूळ ।। ४ ।।

सनातनरूपी तिळाचा गोड गोड हलवा ।
क्षात्रधर्माचे काटे त्याला, परी फणसासम गोडवा।।५।।

साधनेचा अट्टाहास, याचसाठी असावा ।
तीळगुळापरी प्रत्येक क्षण गोड अनुभवावा।। ६ ।।

- श्री. दत्तात्रय र. पटवर्धन, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.


सनातनची सात्त्विक उत्पादने - ध्वनिचित्रपट (हिंदी)


रांगोळीचे आध्यात्मिक महत्त्व - ध्वनिचित्रपट (हिंदी)


दाराला तोरण लावण्यामागील आध्यात्मिक शास्त्र - ध्वनिचित्रपट (हिंदी)


संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात