दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

    चतुर्थी

    गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा व चतुर्थीचा संबंध जोडला गेला.


    चिंचवडचे मोरया गोसावी

    अष्टविनायकाच्या आठही क्षेत्रांत चिंचवड नाही; पण १४ व्या शतकात पुण्याजवळील गणेशभक्‍त मोरया गोसावी हे खूप प्रसिद्ध आहेत. श्री गणेशभक्‍त मोरया गोसावी यांच्या अखंड वास्तव्याने लाखो गणेशभक्‍त चिंचवडला येतात. मोरया गोसावींनी श्री गणेशाची तपश्चर्या केली. श्री गणेशांनी त्यांना वाघाच्या रूपात दर्शन दिले. त्या जागी वाघांची मुखे असलेल्या दोन शिळा दिसू लागल्या. या जागी श्री गणेशाचे शिळास्वरूप वास्तव्य आजही पहावयास मिळते. या क्षेत्राचे व्यवस्थापन येथील मोरया गोसावी संस्थानकडे आहे. मोरया गोसावी यांच्या नावावरूनच `मोरया' हा शब्द रूढ झाला.


    कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

    १. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

    २. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


    पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

    १८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


    विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

    हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


    खगोलशास्त्रावर प्रभुत्व

    असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

    कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


    सनातनची सात्त्विक उत्पादने

    वितरणासाठी संपर्क

    • मुंबईः ३२४३५६९९

    • ठाणेः ९३२२६५२५८०

    • रायगडः २७४५०३३८

    • पुणेः ९४२२४३७१३४

    • जळगावः ९४२३०५६४०३

    • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

    • नाशिकः ९४२२४४१७८२

    • इ-मेलः dainik@sanatan.org

गणपतीविषयक - आध्यात्मिक माहिती

अनुक्रमणिका

 


गणेश जयंतीविषयी ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान

ईश्‍वराने सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांच्या माध्यामातून गणेश जयंतीविषयी दिलेले माहिती येथे देत आहोत.

ब्रह्माहांडाच्या निर्मितीच्या वेळी गणेशतत्त्व निर्गुणात असणे

ब्रह्माहांडाच्या निर्मितीच्या वेळी गणेशतत्त्व निर्गुणात होते व ते अक्रियाशील होते. त्या वेळी प्रजापति, ब्रम्हा, विष्णु, महेश व मिनाक्षी ही पंचतत्त्वे कार्यरत होती.

गणेशतत्त्वाची उत्पति व गणेश जयंती
गणेश जयंतीच्या दिवशी प्रथम शिवातील निर्गुणतत्त्वातील १० टक्के निर्गुण-सगुण तत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. यामध्ये मीनाक्षीतील(श्री दुर्गादेवी) २० टक्के तत्त्व जागृत होऊन सगुण-निर्गुण तत्त्वात क्रियाशील झाले. शिवाच्या निर्गुण-सगुण तत्त्वाचे व मीनाक्षी सगुण-निर्गुण तत्त्वाचे मीलन झाले. या तत्त्वांच्या मीलनामुळे नवीन तत्त्वाची उत्पत्ति झाली. हे नवे तत्त्व म्हणजे `गणेशतत्त्व.' या दिवशी गणेशतत्त्व सगुणातून अस्तित्वात आल्यामुळे या दिवसाला `गणेश जयंती', असे म्हणतात.

गणेशपुराणात याला अनुसरून एक प्रसंग आहे. यामध्ये पार्वतीने तिच्या मळापासून गणपतीची निर्मिति केल्याचा उल्लेख आहे. `गणपति हा पार्वतीचा (मातेचा) पुत्र आहे', असे जरी म्हणत असले, तरीही त्याच्यात ७० (६०*) टक्के शिवतत्त्व आहे; कारण पार्वतीमध्ये ७० (५०*) टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात शिवतत्त्व आहे.

* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

गणेश जयंतीच्या दिवशी

अ. ब्रह्मांडात होणारा परिणाम

गणेश जयंतीच्या दिवशी संपूर्ण वायुमंडल व ब्रह्मांड गणेशतत्त्वाने भारीत होते. सकाळी ११.५७ वाजेपर्यंत ब्रह्मांडाची ७० (६०*) टक्के सुषुम्ना नाडी व ३० (४०*) टक्के सूर्यनाडी सुरू असते. त्यामुळे सर्व लोकांत गणेशतत्त्वाबरोबरच सात्त्विकता व चैतन्य खूप मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपित होत असते.  अनेक गणेशभक्‍तांनी याच दिवशी पृथ्वीवर जन्म घेतला आहे.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

आ. गणेशलोकातील वातावरण
या दिवशी गणेशलोकात उत्साहाचे वातावरण असते. पार्वती, शिवगण, इतर देवता व ऋषीमुनी गणेशलोकात जातात. या दिवशी कार्तिकेयही गणेशलोकात आलेला असतो. गणपति रिद्धि-सिद्धि यांच्यासमवेत सिंहासनावर विराजमान झालेला असतो. (या माहितीचे टंकलेखन करतांना मला गणेशलोक व सिंहासनावर बसलेला गणपति यांचे दर्शन
झाले. - कु. मधुरा) पार्वती गणपतीचे औक्षण करते. सर्व देवता गणपतीवर पुष्पवृष्टि करतात. गणपतीसह सर्वजण मोदकाचा नैवेद्य ग्रहण करतात.

इ. चैतन्य, आनंद व शांति यांचे नेहमीपेक्षा जास्त प्रक्षेपण होणे
सर्वांच्या उपस्थितीमुळे गणेशलोकातील वातावरण अतिशय आनंदमय होते. गणेशलोक
लालसर-पिवळया रंगाचा दिसतो. या दिवशी चैतन्य व आनंद यांचे नेहमीपेक्षा ५० (४०*) टक्के जास्त प्रक्षेपण होत असते, तर शांतीचे ३० (२०*) टक्के जास्त प्रक्षेपण होत असते.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

ई. गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या वस्तूंवर होणारा परिणाम
या दिवशी मोदक, जास्वंद, दुर्वा या गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या वस्तू ५० (२०*) टक्के जास्त गणेशतत्त्व आकृष्ट करतात. इतर दिवसांच्या तुलनेत त्यांच्याकडून ३० (१०*) टक्के चैतन्य व ३० (२०*) टक्के गणेशतत्त्व जास्त प्रक्षेपित होत असते.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

उ. शिवाने गणपतीचा शिरच्छेद करणे, म्हणजे अजागृत गणेशतत्त्वाचे कार्य थांबवून गणेशतत्त्व जागृत करणे
गणेश जयंतीनंतर गणेशतत्त्व ब्रह्मांडात सगुण-निर्गुण तत्त्वाच्या रूपाने कार्यरत झाले, तरीही ते केवळ १० (५*) टक्के इतकेच जागृत होऊन कार्य करत होते. गणेशपुराणात `शिवाने बालगणपतीचा शिरच्छेद केला व त्याला हत्तीचे मस्तक लावले', असा उल्लेख आढळतो. याचा भावार्थ पुढीलप्रमाणे आहे. बालगणपति हे अजागृत व अक्रियाशील गणेशतत्त्वाचे निदर्शक आहे. शिवाने त्रिशूळाने गणपतीचा शिरच्छेद करणे, म्हणजे अजागृत गणेशतत्त्वाचे कार्य थांबवून गणेशतत्त्व जागृत करणे. गणपतीला नवीन (हत्तीचे) मुख लावणे व त्याच्या मूळ स्वरूपात बदल होणे, म्हणजे गणपतीच्या निर्गुणरूपाचे जागृत-कार्यरत सगुण-निर्गुण रूपात परिवर्तन होणे. त्यानंतर गणेशतत्त्व पूर्णपणे जागृत झाले व संपूर्ण ब्रह्मांडात कार्यरत झाले. गणेशतत्त्व जागृत झाल्यामुळेच तारकासुर, सिंधुरासुर व दुर्वासुर यांसारख्या असुरांचा नाश झाला.
* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

गणेशजयंतीला गणेशतत्त्वाचा फायदा होण्यासाठी करावयाची उपासना

या दिवशी गणपतीचा भावपूर्ण तारक किंवा मारक किंवा संयुक्‍त नामजप ३ ते ९ माळा करण्याचा प्रयत्‍न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्‍ति व चैतन्य यांचा जास्त फायदा होतो. गणपति अथर्वशीर्ष म्हटल्यासही फायदा होतो.

अ. गणेशजयंतीला नामजप करणे, पूजन व आरती करणे व अथर्वशीर्ष म्हणणे यांचा होणारा तुलनात्मक फायदा

* - वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती

गणेश जयंतीच्या दिवशी वरील तिन्ही प्रकारे साधना केल्यास साधकाला गणेशतत्त्वाचा १०० टक्के लाभ होतो. - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी १२.०७)

गणेशलोक

अ. वैशिष्ट्य :
गणेशलोकामध्ये लालसर रंगाचा प्रकाश असतो. तसेच तेथील वातावरण उत्साही व मनाला आनंद देणारे असते.

मृत्यूनंतर गणेशलोकात स्थान मिळण्यासाठी गणेशभक्‍तात आवश्यक असलेले गुण

अ. मुमुक्षुत्व : गणेशभक्‍ताला ईश्‍वरप्राप्‍तीची तीका तळमळ असणे आवश्यक आहे. तरच तो गणेशलोकात गणपतीला अपेक्षित अशी साधना करू शकेल.
आ. सात्त्विकता व चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता असलेला : गणेशलोकातील सात्त्विक व पवित्र वातावरणाचा आणि गणपतीच्या अस्तित्वाचा जास्तीतजास्त लाभ करून घेण्यासाठी गणेश भक्‍ताची सात्त्विकता आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता चांगली असणे आवश्यक आहे.
इ. जिज्ञासा : ज्या भक्‍तांमध्ये `साधना चांगली होण्यासाठी काय करावे', अशी तळमळ असते व साधना आणि अध्यात्म यांबाबत जिज्ञासा असते, त्यांना गणपति वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो.
ई. तळमळ : गणपति प्रकाश व नाद या भाषांद्वारे वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन करतो आणि ज्ञानही देतो. हे ज्ञान ग्रहण करण्यासाठी भक्‍ताची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता चांगली असायला हवी. भक्‍तात तळमळ असेल, तरच त्याला हे ज्ञान मिळते.
- ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी १२.०७)

 

 

गणेश मंत्रांचे महत्त्व

साधनामंत्र

अ. `श्री गणेशाय नम: ।' यातील श्री हा श्रीं आहे व तो बीजमंत्र आहे. गणेशाय ही मूळ बीजाची संकल्पना आहे, तर
नम: हे पल्लव आहे.

आ. `ॐ गँ गणपतये नम: ।'
अर्थ : ॐ म्हणजे प्रणव, गँ म्हणजे मूळ बीजमंत्र, गणपतये म्हणजे आकृतिबंधाला व नम: म्हणजे नमस्कार करतो.

बीजमंत्र
`गँ' हा गणपतीचा मूळ बीजमंत्र आहे. गणपतीची, म्हणजे पंचमहाभूतांतील तेजप्रवाहांची, उत्पत्ति ज्या तेजसमूहापासून झाली, तो तेजसमूह `गँ' या बीजमंत्रात अंतर्भूत आहे. `गँ'चा उच्चार *, ञ, ण, न, म, या पाच अनुनासिकांना एकत्र करून जो उच्चार होईल, त्याप्रमाणे असतो. मंदाराच्या, म्हणजे पांढर्‍या रुईच्या झाडापुढे `गँ' ची आवर्तने केल्यास त्या झाडाची एक मुळी वर येते. तिला गणेशाचा आकार असतो. त्याचे कारण याप्रमाणे आहे - `गँ' च्या उच्चाराने त्याची स्पंदने (शक्‍ति) वातावरणात निर्माण होतात. त्यांचा झाडाच्या मुळावर परिणाम होतो आणि `शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व त्यांच्याशी संबंधित शक्‍ति एकत्र असतात', या नियमानुसार शक्‍तीबरोबर गणेशाच्या रूपाची मुळी वर येते. सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या पांढर्‍या रुईच्या वृक्षाला जमिनीतून मुळासकट बाहेर काढले असता त्याच्या मुळाचा आकार गणपतीप्रमाणे दिसतो.

अंगारकयोग (मंगळवारी संकष्टी चतुर्थी) किंवा रविवारी पुष्य नक्षत्र असेल तेव्हा सात-आठ वर्षांहून जास्त वयाच्या वृक्षाची षोडशोपचारे पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ करावा. साधारणत: चतुर्थीपासून सुरू करून दुसर्‍या चतुर्थीपर्यंत एक हजार पाठ करावे. नंतर हवन करून प्रत्येकी शंभर मोदक, लाह्या व दूर्वाकुरांची आहुति द्यावी. शेवटी कुणाशी न बोलता व कुणालाही स्पर्श न करता ते झाड मुळापासून उपटून काढावे. त्याचा आकार गणपतीसारखाच असतो. ही संस्कारित मूर्ति घरी स्थापन करावी. ह्या मूर्तीच्या पूजनाने अनेक प्रकारच्या सिद्धी तसेच ऐश्वर्य प्राप्‍त होते. मूर्तीची दररोज धूप, दीप व नैवेद्य यांसह पूजा करून अथर्वशीर्षाचा पाठ म्हणावा. शक्‍ति संक्रमित होऊन नाहीशी होऊ नये म्हणून बहुधा अशी मूर्ति झाकून ठेवतात.

खार्‍या पाण्यातील गारगोटीवर `गँ' मंत्राचा कमीतकमी वर्षभर उच्चार केल्यास गारगोटीचा आकार गणपतीसारखा होतो. मोरया गोसावींनी असे बरेच गणपती बनविले होते.

 


 कार्याच्या अनुषंगाने गणपतीची विविध रूपे

कु. मधुरा भोसले

ईश्‍वराने कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून गणपतीच्या विविध रूपांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

अ. तारक रूपाचे कार्य करतांना
तारकतत्त्वाचे कार्य करतांना गणपति पाटावर बसलेला दिसतो. तेव्हा त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातामधून ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात क्रियाशील तारक (गणेश) शक्‍ति प्रक्षेपित होत असते.

आ. मारक रूपाचे कार्य करतांना
मारक रूपाचे कार्य करतांना गणपति कधी उंदरावर आरूढ असतो, तर कधी वाघ, सिंह व अश्व या वाहनांवर आरूढ असतो. पाश व अंकुश यांच्या बरोबरच त्रिशूळ, भाला यांसारख्या आयुधांचा व विविध अस्त्रांचाही वापर करतो. त्या वेळी गणपति त्वेषाने लढत असतो व त्याच्याकडून संपूर्ण ब्रह्मांडात खूप प्रमाणात मारक शक्‍ति प्रक्षेपित होत असते.

इ. तारक-मारक संयुक्‍त कार्य करतांना
गणपतीला एकाच वेळी आवश्यकतेनुसार तारक व मारक अशा दोन्ही स्वरूपांचे कार्य करावे लागते. तेव्हा त्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातातून तारक शक्‍ति प्रक्षेपित होत असते व शस्त्र धारण केलेल्या हातातून खूप प्रमाणात मारक शक्‍ति प्रक्षेपित होतांना जाणवते. शस्त्रांमधील शक्‍ति ३० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत होते. त्या वेळी गणपतीकडून पाश व अंकुश यांचा प्रामुख्याने वापर होतो.

ई. मुनी वेशातील गणपति
शिव व पार्वती यांची उपासना करतांना गणपति मुनीच्या (तपस्वीच्या) वेशात दिसतो.

उ. सिंहासनावर रिद्धि-सिद्धि यांच्याबरोबर बसलेला गणपति
गणेशलोकातील महालात काही वेळा गणपति रिद्धि-सिद्धि यांच्याबरोबर सिंहासनावर विराजमान झालेला दिसतो. त्या वेळी तो वरील सर्व कार्ये एकाच वेळी सूक्ष्मातून आवश्यकतेप्रमाणे करत असतो. याबरोबरच गणेशभक्‍तांना मार्गदर्शन करण्याचे, त्यांना ज्ञान व सिद्धि प्रदान करण्याचे कार्य प्रामुख्याने करत असतो.

जेव्हा रिद्धि गणपतीच्या डाव्या व सिद्धि उजव्या बाजूला असते, तेव्हा गणपतीची सूर्यनाडी सुरू असते. जेव्हा रिद्धि उजव्या बाजूला व सिद्धि डाव्या बाजूला असते, तेव्हा त्याची चंद्रनाडी जागृत असते. पाटावर बसलेल्या गणपतीची जास्त प्रमाणात सुषुम्नानाडी जागृत असते. मारक रूपाचे कार्य करतांना आवश्यकतेप्रमाणे सूर्यनाडी सुरू होते. - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ५.२.२००५, दुपारी १२.०७)

 


गणपतीचे वाहन

वृ-वह म्हणजे वहाणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत.

आवाहन म्हणजे आवाहन. आवाहन केल्याशिवाय, म्हणजे निमंत्रणाशिवाय, देवही येत नाहीत. (मात्र भक्‍त संकटात असला, तर आवाहनाशिवायही देव लगेच धावून येतो.) आवाहन केले असता ज्या कार्यासाठी जायचे त्यासाठी पूरक वाहन आवश्यक असते, उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्वराचे वाहन मोर आहे. खालील कोष्टकात युगानुसार गणपतीचे वाहन व गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य यांची माहिती दिली आहे.

 

शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?

गणपति हा दिशांचा अधिपति आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळया करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते.

गणपति (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो, त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवांना कळतात. गणपति विघ्नहर्ता आहे. (संदर्भ : सनातन संस्थेचे प्रकाशन `गणपति')

 विविध देवतांविषयीची (उदा. कृष्णाचे मोरपीस, भूमिकन्या सीता इत्यादींचा भावार्थ, शनि व मारुति यांचा संबंध), अध्यात्माच्या विविध अंगांनी व साधना कोणती करावी याची माहिती सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या अध्यात्मशास्त्रविषयक ग्रंथेंमध्ये व ध्वनिफीतींमध्ये दिली आहे. तसेच देवतांची सात्त्विक चित्रेही उपलब्ध आहेत.


सनातनने प्रकाशित केलेले गणपतीचे सात्त्विक चित्र

 

श्रीगणेशाशी संबंधित साधकांना आलेल्या अनुभूती

श्रीगणेशाच्या चित्राकडे पहात नामजप केल्याने त्याच्या वरदहस्तातून शक्‍ति, चैतन्य व तेज बाहेर पडत असल्याचे जाणवणे
मी नामजप करतांना नेहमी श्रीगणेशाचे चित्र माझ्या डोळयांसमोर ठेवते. नामजप करतांना माझे लक्ष नामजपावर केंद्रित होण्यासाठी मी श्रीगणेशाच्या वेगवेगळया अवयवांकडे व शस्त्रांकडे पाहून नामजप करते. त्या वेळी `श्रीगणेशाच्या आशीर्वाद देणार्‍या हातातून प्रचंड शक्‍ति, चैतन्य व तेज बाहेर पडत आहे', असे मला जाणवते. त्या तेज:पुंज हाताकडे पाहून माझा श्‍वास एका लयीत सुरू होऊन मला खूप हलके वाटते. काही वेळा चित्राकडे पहात असतांना माझे ध्यान लागते. - कु. सुवर्णा कुंभार, देवद आश्रम (२८.९.२००४)

प्राणप्रतिष्ठेपूर्वी चांगली न दिसणारी मूर्ति प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर चैतन्यमय व सुंदर दिसणे
गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आमच्या जवळच असलेले एक मूर्तिकार श्री. रसाळ यांनी साधकांसाठी शास्त्रानुसार २५ मूर्ती बनवल्या होत्या. मी ज्या वेळी त्यांच्याकडे मूर्ति आणण्यासाठी गेले, त्या वेळी बर्‍याच साधकांनी आपापली मूर्ति नेली होती. त्यामुळे मी गेले तेव्हा फक्‍त दोनच मूर्ती शिल्लक होत्या. त्या मूर्ती सफाईदारपणे बनवलेल्या दिसत नव्हत्या. त्यामुळे `त्या दोन मूर्तीपैंकी मूर्ति घेऊ नये', असे मला व माझ्या घरातील व्यक्‍तींना वाटत होते; परंतु आम्हाला शास्त्रानुसारच मूर्ति हवी असल्याने आम्ही त्यातील एक मूर्ति घेतली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत आम्ही ती झाकून ठेवली होती. गणेशचतुर्थीच्या दिवशी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर आम्हाला त्या मूर्तीमध्ये खूपच चैतन्य जाणवले व ती खूप सुंदर दिसत होती. - सौ. निलीमा कुलकर्णी, निफाड, नाशिक.

गणेशोत्सवात आयोजित केलेल्या प्रवचनात विविध अडथळे येणे व सर्व साधकांनी श्रीगणेशाच्या नामजपाने त्यावर मात करणे
२१.९.२००४ रोजी येरागड्डा, हैद्राबाद येथे लक्ष्मीनिवास गणेशोत्सव मंडळातर्फे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. `श्रीगणेशाच्या पूजनाचे शास्त्र', या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. त्या वेळी प्रवचनाच्या पूर्वी दोन तास प्रवचन घेणार्‍या साधकाची प्रकृति अचानक बिघडली. प्रवचनाच्या सुरुवातीला संस्थेची माहिती सांगतांना वीज गेली. त्या वेळी उपस्थित सर्व साधकांनी ``ॐ गँ गणपतये नम: ।' हा नामजप केल्यानंतर काही क्षणांतच वीज आली. त्यानंतर प्रवचनात कोणतेही अडथळे आले नाहीत. - श्री. प्रवीण रेडकर, हैद्राबाद

 


गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेशतत्त्व आकर्षित करणार्‍या काही रांगोळया

पाटावर किंवा चौरंगाच्या खाली रांगोळी काढण्याचे व तिच्यावर हळदकुंकू वाहण्याचे महत्त्व
कुठलाही पूजाविधि करतांना प्रथम पाटावर किंवा चौरंगाच्या खाली सात्त्विक आकाराची रांगोळी काढल्याने या आकारातून प्रक्षेपित होणार्‍या गतिमान लहरींचे पाटाभोवती व चौरंगाभोवती कवच बनण्यास मदत होते. रांगोळीतून प्रक्षेपित होणार्‍या गतिमान लहरींकडे व रांगोळीच्या आकृतीमध्ये भूमिलहरी आकृष्ट होऊन त्याही तिथे बांधल्या जातात. यामुळे रांगोळीच्या रेखाटनातून आवश्यकतेप्रमाणे सात्त्विक लहरींचे जीवाकडे प्रक्षेपण होते, तसेच या लहरींचे भूमीवर सूक्ष्म-आच्छादन तयार होण्यास मदत झाल्याने पाताळातून किंवा वास्तूतील वाईट शक्‍तींकडून प्रक्षेपित होणार्‍या काळया लहरींपासून जीवाचे रक्षण होण्यास मदत होते. रांगोळीच्या वेगवेगळया आकृतीप्रमाणे त्या त्या आकृतीत साठवल्या गेलेल्या विशिष्ट देवतांच्या लहरींमुळे वाईट शक्‍तीही रांगोळीला बघून घाबरतात. म्हणून कोणत्याही शुभविधीत वाईट शक्‍तींचा अडथळा येऊ नये, यासाठी दारासमोर किंवा पूजाविधीसमोर किंवा पाटाच्या खाली रांगोळी काढतात. रांगोळी काढल्यानंतर रांगोळीच्या केंद्रबिंदूवर हळदकुंकू वाहतात. यामुळे हळद-कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वाशी संबंधित रंगकणांकडे ब्रह्मांडातील उच्च देवतांच्या लहरी पटकन आकर्षिल्या जातात.
त्यामुळे रांगोळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींची कार्यक्षमता, गतिमानता व परिणामकारकताही वाढते. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून २१.११.२००४, सायं. ६.३७)

प.पू. डॉक्टर : सात्त्विकता वाढवणार्‍या काही रांगोळया हव्यात.
एक विद्वान : कमीतकमी रेषांनी बनणार्‍या, तसेच सरळ व गोलाईयुक्‍त रेषांनी बनणार्‍या रांगोळया या सात्त्विक असतात; कारण गोलाईयुक्‍त आकारांतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमध्ये निर्गुणाचे प्रमाण जास्त असते व या रेषेंमध्ये प्रवाहीपणाही जास्त असल्याने यांची कार्यक्षमताही व वातावरणात टिकणारा सात्त्विकतेचा परिणामही जास्त असतो.

गणेशाच्या तारक रूपाशी संबंधित रांगोळया


   

प.पू. डॉक्टर : वाईट शक्‍तींना रोखणार्‍या काही रांगोळया हव्यात.
एक विद्वान : देवतांच्या आयुधांची रेखाटने, तसेच तिरक्या रेषांचा व चौकोनांचा, त्रिकोणांचा उपयोग करून काढलेल्या आकृतीबंधातून मारक तिर्यक लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमता जास्त असल्याने या लहरींमुळे वातावरणातील रज-तम कणांचे घर्षण होऊन या रज-तमकणांसहित असलेल्या काळया शक्‍तीचे विघटन होते.

गणेशाच्या मारक रूपाशी संबंधित रांगोळया

  
  
 

 


कलाकारांनो, गणपतीचे विडंबन म्हणजे कलात्मकता नव्हे!

संकलन : सौ. रूपाली वर्तक, पनवेल

``ओ मार्व्हलस ! पेंटिंग्ज''
``सो ब्युटिफूल वे लॉर्ड गणेश दे हॅव शोन !''
``हाऊ स्वीट दे बेबी गणेश आर !''
हे संवाद कानावर पडले एका प्रसिद्ध सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एका राज्यातील काही कलाकरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन येथे भरवण्यात आले होते. बाहेर झुंबड उडाली होती. काहीशा गडबड गोंधळात आणि उडत्या संगीताच्या सुरावर आम्ही त्या सभागृहात प्रवेश केला. जिकडे नजर जाईल तिकडे असंख्य रंगीबेरंगी, विविध आकाराच्या आणि प्रकाराच्या वस्तूंनी तेथील प्रत्येक छोटे दुकान ओसंडून वहात होते. पहिल्याच स्टॉलकडे गेलो. तेथे गणपतीच्या आकाराच्या छोट्या-मोठ्या पिशव्या अडकवल्या होत्या. त्यांच्यापैकी काहींना सोंड होती, तर काहींना भले मोठे कान ! ते पाहून कसेसेच वाटले. पुढे गेलो तर एका प्रसिद्ध चित्रकाराची किमती चित्र तेथे लटकवलेली होती. त्यात श्री गणेशासारखा चेहरा असणारी विविध व्यवसायातील माणसे चितारली होती. म्हणे ती आपल्या घरी लावून आम्ही कलाप्रेम सिद्ध करू शकणार होतो ! काहीशा विषण्ण मन:स्थितीत पुढच्या स्टॉलला गेलो. तिथे असंख्य घड्याळे आणि विविध आकाराचे दिवे ठेवलेले होते. प्रत्येक घड्याळात श्री गणेशाला बंदिस्त केले होते आणि दिव्यावरील काचेच्या आकाराप्रमाणे त्यावर चित्रविचित्र आकारातील गणपति कोरलेले होते ! असंख्य टी-शर्ट, वॉलपीस, छोट्या मोठ्या आकाराच्या विविध धातूंच्या मूर्ती, गणपतीच्या आकाराच्या शोच्या वस्तू, भरीसभर म्हणून फूलदाण्या, पेले अशा अनेक वस्तूंत बसवलेल्या मूर्ती आणि कहर म्हणजे वेगवेगळया इतर देवतांच्या आकारातील गणेशमूर्ती !........... हे सगळं पहाता पहाता मात्र आमच्या सहनशक्‍तीचा अंत झाला. आपल्या आराध्य देवतेची अशा प्रकारे चाललेली घोर विटंबना बघून चीड आली आणि मनात तीव्र प्रतिक्रिया आली, ``हे विकणारे आणि विकत घेणारे श्री गणेशाची अवकृपा ओढावून घेतल्याशिवाय रहातील काय ?''

हे सगळं पाहून आम्ही त्या विक्रेत्यांशी आणि सभागृहाच्या व्यवस्थापकाशी बोलायचे ठरवले. आम्ही त्यांना सांगितले,
``श्री गणेशाला अशा प्रकारे त्याचा मूळ आकार बदलून चित्रविचित्र आकारात वस्तू बनवण्यासाठी वापरणे म्हणजे त्याचे विडंबन आहे. असे प्रदर्शन तुम्ही ऐन गणेशोत्सवाच्या वेळी भरवले आहे.'' त्या `व्यावसायिकां'ना हा मुद्दा नवीनच होता. गणपति ही `देवता' आहे, याचा साक्षात्कार त्यांना झाल्याप्रमाणे ते काहीसे गोंधळले आणि सारवासारव करत त्यांनी आपणही गणपतीचे कसे भक्‍त आहोत, हे पटवून द्यायला सुरुवात केली. काही वेळ हुज्जत घातल्यावर ते म्हणाले, ``तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आमचा धंदा आहे, पोटाचा प्रश्‍न आहे !''

आमचे बोलणे सुरू असतांना एक झब्बा घातलेली, खांद्याला झोळी अडकवलेली व्यक्‍ति तेथे आली. तिथे विक्रीसाठी ठेवलेली चित्र त्या चित्रकाराची होती. आम्ही त्यांच्याकडे वळलो. आम्ही सरळ मुद्यालाच हात घातल्यावर काहीसा त्रासिक चेहरा करून ते म्हणाले, ``कला ही कला असते. त्यात हे धर्मबिर्म आणू नका. आमचा तसा काहीच उद्देश नाही'', आणि तरातरा निघूनही गेले.

इथून पुढचे सारे प्रश्‍न मनात आले. कित्येक जाहिरातींत, वस्तूंमध्ये सर्रासपणे श्री गणेशाचा वापर होतो, असे का ? कित्येक ठिकाणी गणपति वेगवेगळया आकारात दाखवला जातो, असे का ? चित्रकारांचा कुंचला सहजपणे फिरतांनाही चटकन गणपतीची रेखाकृति काढतो, असे का ? मोठमोठ्या कलाकारांना गणपतीच्या आकारात कलात्मकतेची बीजे दिसतात; पण म्हणून कलेच्या नावाखाली देवतेचा कसाही, कुठेही वापर करणे योग्य आहे का ? गणपतीचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे केवळ काही सूचक चिन्हांतूनही तो प्रतीत होतो. काही प्रतिकात्मक रचनेतून त्याचा आकार दर्शवता येतो आणि अनेक प्रतींकांच्या माध्यमातून तो दाखवता येतो; पण म्हणून कुठल्याही आकारातून तो दाखवणे योग्य होईल का ? असे केल्याने देवतेच्या अस्तित्वाचा जो आध्यात्मिक फायदा व्हायला हवा, त्यापासून आपण वंचित रहातो. चित्रविचित्र आकारामुळे मूर्तीतून सात्त्विक स्पंदने येण्याऐवजी रज-तमात्मक स्पंदने येतात. अशा मूर्तीकडे बघून प्रसन्न वाटण्याऐवजी ओंगळवाणेच वाटते.

काही कलाकारांच्या मनात खरोखरच गणपतीविषयी प्रेम असते; मात्र श्री गणेशाचे मूळ रूप माहीत नसल्याने त्यांच्या मनाला येईल त्या रूपात ते त्याला दर्शवतात; परंतु इथे दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. एकतर वर म्हटल्याप्रमाणे यामुळे तो कलाकार त्या देवतेपासून मिळणार्‍या गणेशतत्त्वाच्या सात्त्विक स्पंदनांपासून वंचित रहातो. शिवाय दुसरे म्हणजे तो समाजाला देवतेच्या मूळ रूपापासून दूर नेऊन त्याची अप्रत्यक्षरीत्या दिशाभूल करत असतो. कला ही बोधप्रद, ज्ञानप्रद, समाजोपयोगी असेल तर तिला अर्थ आहे. `कलेसाठी कला' ही कुठल्याच कलाकाराला पूर्ण समाधान व आनंद देऊ शकत नाही. ती अपूर्ण तर रहातेच शिवाय समाजविघातकही ठरू शकते व समाजाचे नुकसान करू शकते ! आणि म्हणूनच कलाकारांनी केवळ सौंदर्याचे माध्यम म्हणून श्री गणेशाचा वापर करायला नको.

गणपति ही बुद्धीची देवता आहे. गणपति दाही दिशांचा स्वामी आहे. गणपति देवतांशी संवाद साधायचे माध्यम आहे. म्हणून कुठल्याही कार्यात प्रथम गणपतीचे पूजन झाल्याशिवाय कार्याला सुरुवात होत नाही. गणपति प्राणशक्‍ति देणारी देवता आहे. गणपति त्याच्या पाशाने वाईट शक्‍तींना बांधून ठेवून त्यांच्यापासून आपले संरक्षण करतो. गणपति आपल्याभोवती संरक्षणकवच निर्माण करून आपले संरक्षण करतो. जिथे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असते तिथे त्या गोष्टीचे अस्तित्वही असते; या शास्त्रवचनानुसार जिथे देवतेचे अशा प्रकारचे रूप असते तिथे तिचे अस्तित्वही असते.
गणपति ही `देवता' आहे, हे कलाकार विसरतात. गणपति असलेल्या कुठल्याही ठिकाणी गणेशतत्त्व कार्यरत असते. गणेशतत्त्व हे सूक्ष्म होय. कुठल्याही कलाकार हा त्याच्या स्थूल बुद्धीने कलाकृति साकार करत असतो. सूक्ष्मातील समजण्यासाठी सूक्ष्मातील बुद्धि आवश्यक असते. साधना करणार्‍याची सूक्ष्म बुद्धि जागृत होऊ शकते. कलाकारांनी साधना केली तर प्रत्यक्ष गणेशतत्त्वाचे रूप कसे काढायचे, हेही त्याच्याच कृपेने त्यांना समजायला मदत होईल !
काही व्यावसायिक म्हणतात की, गणपति खूप लोकप्रिय देवता आहे, लहानापासून थोरापर्यंत सर्वांनाच तो भावतो. अगदी इतर पंथीयांतही गणपति सर्वांना माहीत आहे; कारण गणपतीचा सार्वजनिक उत्सव होतो. आपले आई-वडीलही आपल्याला खूप प्रिय असतात. त्यांना आपण अशा चित्रविचित्र रूपांत, पोशाखांत, वस्तूंवर दाखवू का ?

श्री गणेशाला त्याच्या मूळ रूपाऐवजी हे असेच सरधोपटपणे मनाला येईल त्या रूपात दाखवणे सुरू राहिले, तर एक दिवस असा येईल की, पुढच्या पिढीला श्री गणेशाच्या `मंगल'मूर्तीचे रूप कसे होते, हे कदाचित् माहीतच नसेल ! त्यांना वाटेल कदाचित् गणपति म्हणजे नाटकातून टिंगलटवाळी होणारी देवता, गणपति म्हणजे जिच्या नावाने उत्सव करून कर्णकर्कश आवाजात प्रचंड धागंडधिंगा करायचा आणि गोंधळ घालायचा, गणपति म्हणजे नांदीच्या सुरुवातीला असणारे एखादे पात्र किंवा निमंत्रणत्रिकेवर छापायचे चित्र !

ही अतिशयोक्‍ति नाही. आपल्यापैकी प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की, ही स्थिति येऊ नये, यासाठी आपण प्रयत्‍न केले पाहिजेत. मोठमोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या जाहिरांतीमधून झळकणार्‍या गणपतीच्या विडंबनाचा निषेध म्हणून आपण किती जण त्यांना दूरध्वनि करतो ? शाळा, महाविद्यालये, गणेशोत्सव यांमध्ये होणारी देवतांवर विनोद असणारी नाटके थांबवण्याची हिंमत किती जण दाखवतो ? नाटकातील देवतांचे विडंबन थांबण्यासाठी किती जण त्यावर बहिष्कार घालतो ? रस्त्यावर भीक मागणार्‍या बहुरूप्यांना किती जण अडवतो ? आपल्या देवतांच्या संदर्भातील विनोद सांगणार्‍या किती जणांना आपण थांबवतो ?

आपणच आपल्या देवतेच्या केलेल्या अशा विडंबनामुळे इतर धर्मातील लोकांना आयते फावते. एकंदरच समाजातील धर्मविषयक अनास्थेमुळेच देवतांचे विडंबन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी मुळाशी जायचे झाल्यास आपले देव, धर्म यांविषयीचे शिक्षण घेणे व त्याचे शास्त्र समजून घेऊन कृति करणे अपरिहार्य ठरते.

सनातन संस्थेच्या साधकांनी ध्यानातून उत्तरे काढून देवतांची अशी सूक्ष्म-चित्रे व सात्त्विक गणेशमूर्ति तयार केली आहे. सनातनच्या काही साधकांना देवतांकडून ज्ञान प्राप्‍त होत आहे. त्यांपैकी एका साधकाला गणेशतत्त्वाने सांगितले आहे -
`माझे विडंबन करणार्‍यांना देहदंडाची शिक्षा होते !'

 

 


विभक्त कुटुंबामध्ये गणपतीपूजन कसे करावे? - ध्वनीचित्रपट





श्री गणपती मध्यपूजाविधी - ध्वनीचित्रपट





श्री गणपती उत्तरपूजाविधी - ध्वनीचित्रपट





गणपतीपूजन व तिथी - ध्वनीचित्रपट





गणेशपूजनासाठी स्वतंत्र मूर्ती का आणावी? - ध्वनीचित्रपट





विविध रूपातील गणेशमूर्ती पूजावी का? - ध्वनीचित्रपट





गणेशमूर्तीच्या पाटाखाली तांदूळ का ठेवावेत? - ध्वनीचित्रपट





गणेशमूर्ती किती दिवस पूजावी? - ध्वनीचित्रपट





सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकार - ध्वनीचित्रपट

संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात