'दत्त'विषयक - आध्यात्मिक माहिती

दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान


कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

२. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


खगोलशास्त्रावर प्रभुत्व

असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


सनातनची सात्त्विक उत्पादने

१.  ग्रंथ - अध्यात्मशास्त्रीय माहिती

२.  ध्वनितबकडी - नामजपाची योग्य पध्दत व उपासनाशास्त्र

३.  सात्त्विक नामपट्टी

४.  ग्रंथ - श्रीविष्णु व त्याची रुपे

५.  ग्रंथ - दत्त भाग ३

६.  ग्रंथ - दत्त भाग ४

७.  ग्रंथ - श्राध्दातील कृतींमागील शास्त्रे

८.  ग्रंथ - श्राध्द भाग-१

९.  ध्वनीचित्रतबकडी - पितृपक्ष व महालय श्राध्दे

वितरणासाठी संपर्क

  • मुंबईः ३२४३५६९९

  • ठाणेः ९३२२६५२५८०

  • रायगडः २७४५०३३८

  • पुणेः ९४२२४३७१३४

  • जळगावः ९४२३०५६४०३

  • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

  • नाशिकः ९४२२४४१७८२

  • इ-मेलः dainik@sanatan.org

दत्त

अनुक्रमणिका


`श्री गुरुदेव दत्त' नामजपाचे महत्त्व

`श्री गुरुदेव दत्त' नामजप

पूर्वजांच्या त्रास असल्यास दैनंदिन जीवनात उद्‌भवणार्‍या समस्यांची काही उदाहरणे खाली दिली आहेत. उदा. परिक्षेच्या वेळी आजारी पडणे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही अपेक्षित यश न मिळणे, नोकरी न मिळणे, घरात भांडण-तंटे, लग्न न होणे, लग्न झाले तर पती-पत्‍नीचे न पटणे, पटले तर स्वत:मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसतांना मूल न होणे, मूल झाले तर मतिमंद किंवा विकलांग होणे, अपमृत्यु, धंदा न चालणे, दारिद्र्य, शारीरिक आजार अशा समस्या उद्‌भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप किमान १०८ वेळा लिहावा. तसेच मोठ्यांना हा त्रास असल्यास रोज किमान १ तास तरी `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा. त्रासाच्या तीकातेनुसार हा नामजपाचा कालावधी वाढवावा.


१. अर्थ

अ. दत्त म्हणजे (निर्गुणाची अनुभूती) दिलेला : दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत', अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते. यावरून दत्ताचे महत्त्व लक्षात येईल.

आ. दत्त म्हणजे `चैतन्यदायी लहरींचा दाता' :
`उच्च किंवा कनिष्ठ देव-देवतांच्या सगुण, तसेच निर्गुण लहरी कमी कालावधीत जिवाला प्रदान करणारे व उत्कृष्ट दातृत्वाचे दर्शक असे तत्त्व म्हणजे दत्त. दत्त याचा अर्थच असा आहे, `चैतन्यदायी लहरींचा दाता.\' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.६.२००५, दुपारी २.५४)
 




२.  दत्ताच्या काही नावांचा भावार्थ

२ अ. दत्तगुरु (जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटणारा) : `दत्त हे तत्त्व जिवाकडून कोणत्याच सगुण-निर्गुण भावाची अपेक्षा न ठेवता जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी झटत असते; म्हणूनच ते सर्व लोकांत `दत्तगुरु' या नावाने ओळखले जाते.

२ आ. अवधूत (दत्त म्हणजे सगुण व दत्तात्रेय म्हणजे निर्गुण, या दोन रूपांना जोडणारा) : `अवधूत' म्हणजे जिवाच्या देहातील अष्ट अवधाने नियंत्रित करून त्याला सगुणातून निर्गुणाची दिशा दाखवणारा. अवधूत हे दत्त व दत्तात्रेय या दोन रूपांना जोडणारे माध्यम आहे. दत्त (ब्रह्मा, विष्णु व महेश यांचा मूर्त-स्वरूप आविष्कार) हा सगुण, तर दत्तात्रेय (ब्रह्मा, विष्णु व महेश या तत्त्वरूपी त्रयींचा प्रकाशरूपी आविष्कार) हा निर्गुणाशी संबंधित आहे. `अवधूत' हे दत्ताच्या तेजाची प्रभावळ घेऊन जन्माला येणारे तत्त्व आहे.

२ इ. दिगंबर (मोक्षात विलीन होईपर्यंत साथ देणारा) : `दिगंबर' म्हणजे अंबररूपी व्याप्‍त प्रकाशात, म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत, म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्त्व.

२ ई. श्रीपाद (`श्री' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारा) : `श्री' म्हणजे ईश्‍वराचे अविनाशी तत्त्व. अशा ईश्‍वररूपी अविनाशी तत्त्वाच्या, म्हणजेच `श्री\' तत्त्वाच्या चरणांपर्यंत नेणारे तत्त्व, म्हणजे श्रीपादरूपी दत्ततत्त्व.

२ उ. वल्लभ (अभय देणारा) : भय निर्माण करणार्‍या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जिवांना अभय देणारे तत्त्व, म्हणजे वल्लभरूपी दत्ततत्त्व.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.६.२००५, दुपारी २.५४)




३. जन्माचा इतिहास

दत्ताचा जन्म चालू मन्वंतराच्या आरंभी प्रथम पर्यायातील त्रेतायुगात झाला, असे वर्णन पुराणांत आढळते.
पुराणांनुसार : अत्रीऋषींची पत्‍नी अनसूया ही पतीकाता होती. पातिकात्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु व महेश यांकडे जाऊन म्हणाले, ``तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल किंवा कोणीही देवांना मारू शकेल; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.'' हे ऐकून त्रिमूर्ती रागावले व म्हणाले, ``एवढी काय मोठी पतीकाता, सती आहे, ते आपण पाहू.''

एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले व अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ``ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.'' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ``ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता', असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.'' मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले व जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ``तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.'' त्यावर `अतिथीला विन्मुख पाठविणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ``मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.'' मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, `अतिथी माझी मुले आहेत' व विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे ! त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करविले व बाळांचे रडणे थांबले.
इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ``स्वामिन् देवेन दत्तं ।'' याचा अर्थ असा आहे - `हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).' यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण `दत्त' असे केले. त्यानंतर अत्रीऋषींनी अंतर्ज्ञानाने बाळांचे खरे रूप ओळखून त्यांना नमस्कार केला. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु व महेश त्यांच्यासमोर उभे राहिले व प्रसन्न होऊन `वर मागा', असे म्हणाले. अत्री व अनसूयेने `बालके आमच्या घरी रहावी', असा वर मागितला. तो वर देऊन देव आपापल्या लोकात गेले. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त व शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र व दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी परवानगी घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी व तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. हेच गुरूंचे मूळपीठ.




४. परिवाराचा भावार्थ

अ. गाय (पाठीमागे असलेली) : पृथ्वी व कामधेनू (इच्छिलेले देणारी)
आ. चार कुत्रे
१. चार वेद
२. गाय व कुत्रे ही एकप्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून व कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात.
इ. औदुंबर वृक्ष : दत्ताचे पूजनीय रूप; कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.




५. मूर्तीविज्ञान

इ.स. १००० च्या सुमारास दत्ताची मूर्ती त्रिमुखी झाली, त्यापूर्वी ती एकमुखी होती. दत्ताच्या त्रिमुखी मूर्तीच्या प्रत्येक हातातील वस्तू ही कोणत्या देवतेचे प्रतीक आहे, हे पुढील तक्‍त्यात दिले आहे.

टीप १ : `कमंडलू हे त्यागाचे प्रतीक - कमंडलू व दंड या वस्तू संन्याशाच्या बरोबर असतात. संन्यासी विरक्‍त असतो. कमंडलू हे एकप्रकारे त्यागाचे प्रतीक आहे; कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय.'

टीप २ : `त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ व भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ - त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ व भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यांत एक वैशिष्ट्यपूर्ण फरक आढळतो. त्रिमूर्तीरूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग व वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही. त्रिशूळावरील वस्त्र हे ध्वजाचे प्रतीक आहे.'

झोळी ही अहं नष्ट झाल्याचे प्रतीक : दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे - झोळी हे मधुमक्षिकेचे (मधमाशीचे) प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात व तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतो. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहं लवकर कमी होतो; म्हणून झोळी ही अहं नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे.

दत्ताच्या कुटुंबवत्सल चित्ररूपाचा भावार्थ : `त्रिमूर्ती (ब्रह्माचे सगुण रूप) (३), गाय-कुत्रे हे प्राणीमात्र (ब्रह्मरूपी मायेचे साकार रूप) (१) व या सर्वांना सामावून घेणारे आकाशरूपी ईश्‍वराचे व्याप्‍त रूप म्हणजे निसर्ग (शुद्ध ब्रह्म) (१), या ५ घटकांनी मिळून दत्ताचे चित्ररूप साकार होते. यावरूनच जिवाच्या डोळयांपुढे कुटुंबवत्सल दत्ताची मूर्ती उभी रहाते.
गाय ही सर्व प्रकारच्या उच्च व कनिष्ठ अशा ३३ कोटी देवतांच्या एकत्रित लहरींचे प्रतिनिधित्व करते. या सर्व देवतांकडून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरी जिवापर्यंत पोहोचवणारे उत्तम प्रक्षेपक तत्त्व म्हणून गायीच्या पुढे दत्त उभा असल्याचे दाखवतात. दत्ताच्या मागे पंचतत्त्वांच्या माध्यमातून साकार झालेले निसर्गाचे आकाशासहित नयन मनोहर दृश्य हे ईश्‍वराच्या निर्गुणरूपी व्यापकत्वाचे प्रतिनिधित्व करते. या निर्गुण लहरींनाही आपल्यात सामावून घेण्याची व प्रक्षेपित करण्याची उत्तम क्षमता दत्ततत्त्वात आहे, याचेच हे द्योतक आहे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.६.२००५, दुपारी ३.२५)

अ. देवता असूनही ऋषींचा वेश : `देवता असूनही दत्ताने ऋषींचा वेश धारण केला आहे. अखंड साधना, ब्रह्मचर्य, तपाचे बळ, तीक्ष्ण बुद्धीमत्ता, सात्त्विकता व पावित्र्य यांचे भांडार म्हणजे ऋषी.

आ. सत्ययुगात एकमुखी व त्रेतायुगापासून त्रिमुखी दत्ताची उपासना आवश्यक : सत्ययुगापर्यंत सर्व जिवांची आध्यात्मिक पातळी उच्च असल्यामुळे ते स्वत:च्या साधनेच्या बळावर ज्ञान मिळवत होते. ते `सोऽहम्' भावात होते. त्यामुळे दत्तात्रेयाला विनाशाचे व ज्ञानदानाचे कार्य कमी प्रमाणात करावे लागत होते. त्या वेळी दत्तातील केवळ विष्णुतत्त्वच प्रकट असायचे. त्याचे प्रतीक म्हणून सत्ययुगात दत्ताची मूर्ती एकमुखी होती. त्यानंतर त्रेतायुगामध्ये जिवांची पातळी घसरली व त्यांना स्वबळावर स्वत:चे रक्षण करणे आणि ज्ञान मिळवणे कठीण झाले. त्यांना सूक्ष्मातून ज्ञान अधिक प्रमाणात देण्यासाठी व त्यांचे रक्षण करण्यासाठी दत्तात्रेयाला त्याच्यातील ब्रह्मा आणि शिव ही तत्त्वे प्रकट करावी लागली. याचे प्रतीक म्हणून त्याची त्रिमुखी मूर्ती सर्वत्र विख्यात झाली.

इ. रुद्राक्षांच्या माळांतून ब्राह्मतेज व क्षात्रतेज यांचे प्रक्षेपण : ऋषींच्या वेशातील दत्ताने रुद्राक्षांच्या माळा धारण केल्या आहेत. त्यांतून ब्राह्मतेज व क्षात्रतेज प्रक्षेपित होते. बरेच ऋषीही रुद्राक्षांच्या माळा धारण करतांना आढळतात.

ई. दत्ताच्या हातातील जपमाळ ही अखंड साधनेचे दर्शक :

त्रिमुखी दत्तात्रेयातील ब्रह्माच्या हातात जपमाळ असते. त्यामुळे दत्ताचा नामजप सतत सुरू असतो. अखंड साधना करणे, हा शिवाचाही गुण आहे. दोन्ही देवतांमधील `अखंड साधना करणे', हे वैशिष्ट्य दत्तामध्ये आढळते. अखंड साधना करणे याचा अर्थ वर्तमानस्थितीत आवश्यकतेप्रमाणे तारक तसेच मारक रूपी कार्य करणे.' - एक दत्तभक्‍त (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.५.२००५, दुपारी १२)
 

 

 

 

उ. कमंडलू (त्रैलोक्याला मंडल काढण्याची क्षमता असलेले जल ज्याच्यात सामावलेले आहे, असे कुंड म्हणजे दत्ताच्या हातातील कमंडलू)

१. अर्थ : `ईश्‍वराच्या निर्गुण लहरींना सामावून घेणारे, तसेच वाईट शक्‍तींच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी संपूर्ण त्रैलोक्याला एकाच वेळी एका क्षणात मंडल काढण्याची क्षमता असलेले जल ज्या कुंडात सामावलेले आहे, ते कुंड म्हणजे कमंडलू.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ८.५.२००५, सकाळी ११.३९)

२. वैशिष्ट्य : `दत्ताच्या हातातील कमंडलूतील जल हे सर्वांत पवित्र असते.' - एक दत्तभक्‍त (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.५.२००५, दुपारी १२)

३. कशाचे प्रतीक ? : `दत्ताच्या हातात असलेले कमंडलू हे निर्गुणरूपी सुप्‍त मारक चैतन्याचे
प्रतीक आहे.

मूर्तीविज्ञान याबाबतची अधिक माहिती `दत्त (भाग ३ व ४)' या ग्रंथात दिली आहे.




६. दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत काही नेहमीच्या कृतींविषयी साक्षात ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. अशा कृतीमुळेच त्या देवतेचा तत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होण्यास मदत होते. दत्ताच्या उपासनेच्या अंतर्गत नेहमीच्या काही कृती नेमक्या कशा कराव्यात, याविषयी सनातनच्या साधकांना साक्षात ईश्‍वराकडून मिळालेले ज्ञान पुढे तक्‍त्यात दिले आहे.

 




७. दत्तजयंती

श्री दत्तजयंती : एक सांप्रदायिक जन्मोत्सव. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात. - श्रीगणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, २.११.२००५, रात्री ८.३०)

१. दत्तजयंतीचे महत्त्व : दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

२. जन्मोत्सव साजरा करणे : दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्‍त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्‍ताह असे म्हणतात. भजन, पूजन व विशेषकरून कीर्तन वगैरे भक्‍तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्तजयंतीची प्रथा आहे. काही ब्राह्मण कुटुंबांत या उत्सवानिमित्त दत्तनवरात्र पाळले जाते व त्याचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो.




८. दत्ततत्त्वाच्या तारक रूपाचे कार्य

अ. पितरांना गती देणे व जिवाला पितृऋणातून मुक्‍त होण्याची संधी देणे : `मानवाच्या पूर्वजांना गती देऊन व मानवाला होणारा पूर्वजांचा त्रास कमी करून दत्तात्रेय मानवावर कृपा करत आहे. पूर्वजांना गती देण्यासाठी केलेल्या विधींमुळे व दत्तात्रेयाच्या नामजपामुळे मानवाला पितृऋणातून मुक्‍त होण्याची संधी ईश्‍वर देत असतो.
स्वबळाने, पितरांची आठवण काढून, घरात पितरांची छायाचित्रे लावून किंवा वर्तमानपत्रात पितरांची छायाचित्रे छापून पितरांच्या ऋणातून मुक्‍त होता येत नसते. दत्तात्रेयाचा नामजप केल्यावर खर्‍या अर्थाने पितरांना गती मिळते व आपण पितृऋणातून काही प्रमाणात मुक्‍त होऊ शकतो. यावरून असे लक्षात येते की, पितृऋणातून मुक्‍त होण्यासाठी देवतांची उपासना करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्यावर असलेले देवऋणही कमी होण्यास मदत होते.' - एक दत्तभक्‍त (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.५.२००५, दुपारी २.३६)

आ. `भुवलोकाची प्रमुख देवता म्हणजे दत्त व दत्ताचे वैशिष्ट्य म्हणजे भुवलोकातील लिंगदेहांना पुढच्या लोकात गती देणे.' - गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.३.२००४, दुपारी २.५५)
दत्ततत्त्वाच्या मारक रूपाचे कार्य `दत्त (भाग ३)' या ग्रंथात दिले आहे.




९. दत्ताच्या नामजपामुळे होणारे फायदे

अ. दत्त या देवतेकडून जिवाला जास्त प्रमाणात सात्त्विक शक्‍ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्‍तींशी लढू शकतो.
आ. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्‍ती मिळते.
इ. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्‍तींचा त्रास कमी होतो.
ई. पूर्वजांना गती मिळते व त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास मदत होते.




१०. पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना

पूर्वजांचा त्रास होण्याचे कारण व त्रासाचे स्वरूप : हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्ध-पक्ष वगैरे, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे - विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्‍नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे किंवा सर्व मुली होणे, अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.

दत्ताच्या नामजपाने पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?

अ. संरक्षक-कवच निर्माण होणे :
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्‍तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

आ. पूर्वजांना गती मिळणे : बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत खूप गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्‍त रहातो. असे अतृप्‍त लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. (मृत्युलोक हा भूलोक व भुवलोक यांच्या मध्ये आहे.) दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्‍तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते.

पूर्वजांच्या त्रासावर उपाययोजना :
१. कोणत्याही तर्‍हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीतकमी १५ मिनिटे किंवा तीन माळा `श्री गुरुदेव दत्त ।' हा जप नेहमीच करावा. एरव्ही प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.

२. मध्यम तर्‍हेचा त्रास असल्यास कुलदेवतेच्या जपाबरोबरच `श्री गुरुदेव दत्त ।' हा जप कमीतकमी सहा माळा तरी करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात व बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.

३. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी नऊ माळा जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशासारखे विधी करावे. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.

एखादी व्यक्‍ती जेव्हा `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करते, तेव्हा तो तिच्या पूर्वजांपैकी कोणाला सर्वाधिक फायदेशीर ठरतो ?
एखादी व्यक्‍ती `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला पुढील गती मिळावी', अशी तीका तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक फायदा होतो.
`असे जर आहे, तर बहुतांश पूर्वज नामजप करणार्‍या वारसदारालाच लक्ष्य का करतील', असा प्रश्‍न कुणालाही पडू शकेल. याचे उत्तर असे आहे - `स्वत:ची आध्यात्मिक प्रगती व्हावी', अशी इच्छा असणारे पूर्वज साधना करणार्‍या वारसदारांकडून मदत घेतात आणि ज्या पूर्वजांच्या अतृप्‍त इच्छा भौतिक विषयांशी निगडित असतात (खाणे-पिणे आदी), ते पूर्वज त्याच प्रकारच्या वासना असणार्‍या वारसदारांकडून मदत घेतात.




११. व्यक्‍ती मृत झाल्यानंतर दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व

११ अ. वाईट शक्‍तींनी लिंगदेहाला पुढे जाण्यात अडथळे आणण्याची प्रक्रिया व मृतदेह घरात असतांना दत्ताचा नामजप करण्याचे फायदे

१. वाईट शक्‍तींनी लिंगदेहाला पुढे जाण्यात अडथळे आणण्याची प्रक्रिया :
`मृतदेहातून प्रक्षेपित होणार्‍या टाकाऊ वायूंच्या उत्सर्जनातून सातत्याने वास्तूत त्रासदायक लहरी प्रक्षेपित होत असतात. या त्रासदायक लहरींकडे वाईट शक्‍ती आकृष्ट होऊन मृतदेह ठेवलेल्या वायूमंडलात प्रवेश करून मृतदेहावर हल्ला करून त्याच्या देहात शिल्लक राहिलेले उपप्राण तसेच पंचप्राण यांवर ताबा मिळवून त्याच्या लिंगदेहाला आपल्या काळया आकर्षणयुक्‍त लहरींनी बद्ध करून त्याला पुढे जाण्यात अडथळे आणू शकतात.

आकृतीतील क्रमांकांचे विवरण
१. मृतदेह, २. टाकाऊ वायूंचे उत्सर्जन, ३. त्रासदायक लहरींनी भारित क्षेत्र, ४. दूषित वायूमंडल, ५. त्रासदायक लिंगदेह, ६. काळया शक्‍तीने सोडलेला धूर, ७. वाईट शक्‍तींनी पंचप्राण व पंचउपप्राण यांचा ताबा घेणे
मृतदेहाभोवतीच्या वायूमंडलाकडे त्रासदायक लहरींच्या प्रभावामुळे अनेक त्रासदायक लिंगदेह (वाईट शक्‍ती) आकृष्ट होतात आणि काही वाईट शक्‍ती आपल्या तोंडातून काळया शक्‍तीचा धूर सोडून मृतदेहावर काळे आवरण आणतात. मृदेहावर ताबा मिळवण्यासाठी अनेक वाईट शक्‍तींचे पंजे मृतदेहाला विळखा घालून त्याला आपल्या कब्ज्यात ठेवण्याचा प्रयत्‍न करतात.
ज्या वेळी वाईट शक्‍ती मृतदेहाचे पंचप्राण व पंचउपप्राण (पंचप्राण व पंचउपप्राण यांविषयीची माहिती सनातनचा ग्रंथ `हठयोग' यात दिली आहे.) यांवर ताबा मिळवते, त्या वेळी ती काळी आकर्षणशक्‍तीयुक्‍त वलये प्रक्षेपित करून लिंगदेहाला आपल्या हल्ला करण्याच्या कक्षेत ओढून घेते. वाईट शक्‍तींच्या हल्ल्यांमुळे मृतदेहाच्या शरीरात काळया लहरींचे संक्रमण सुरू होऊन मृतदेह काळया लहरींनी भारित होऊ लागतो.

काही वेळाने मृतदेहाच्या लिंगदेहाभोवती काळया लहरींचा भोवरा तयार होतो. त्या वेळी अनेक वाईट शक्‍तींचे पंजे मृतदेहाच्या लिंगदेहावर हल्ले करून लिंगदेहाला पूर्णत: आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्‍न करतात.

२. दत्ताच्या नामजपाने होणारे फायदे
अ. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्‍या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीकाता कमी होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने
त्याचे जडत्व कमी होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.

आकृतीतील क्रमांकांचे विवरण
१. तेजोमय आघातजन्य लहरी,
२. वायूमंडलातील चैतन्यकणांची निर्मिती (वायूमंडल शुद्धी), ३. संरक्षककवच निर्माण होणे, ४. लिंगदेह,
५. वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीकाता कमी होऊन रज-तम नष्ट होणे, ६. संरक्षककवच,
७. लिंगदेहाला मिळणारी गती
(टीप - लघुग्रंथातील सूक्ष्म-चित्रांच्या भोवती नामजपाचे मंडल घालण्याचे कारण : साधकांना ईश्‍वरी कृपेमुळे मिळणार्‍या ज्ञानात वाईट शक्‍ती हस्तक्षेप करून त्यात काळी शक्‍ती घालण्याची शक्यता असते. सूक्ष्म-चित्र हाही ईश्‍वरी ज्ञानाचाच एक भाग आहे. ज्ञानातील माहितीपेक्षा सूक्ष्म-चित्रात काळी शक्‍ती घालणे वाईट शक्‍तींना अधिक सोपे असते. या काळया शक्‍तीचा वाचकांना त्रास होऊ नये, यासाठी सूक्ष्मातून आवश्यक नामजप शोधून त्या नामजपाचे मंडल सूक्ष्म-चित्रांच्या भोवती केले आहे. - संकलक)

आ. लिंगदेह व त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्‍तींच्या हल्ल्यांपासून रक्षण होते.

इ. लिंगदेहाची पृथ्वीवरील वासनात्मक आसक्‍तीही कमी होण्यास मदत झाल्याने त्याला कमी वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.

ई. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य-कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.

उ. नामजप करणार्‍या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते.'
- एक विद्वान (३०.९.२००६, दुपारी २.०७)

११ आ. मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी दत्ताचा नामजप का करावा ? (मृतदेह स्मशानात नेतांना दत्ताचा नामजप केल्याने लिंगदेहाला व पूर्वजांना गती मिळणे) : `मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करावा. `पूर्वजांना गती देणे', हे दत्ततत्त्वाचे कार्यच असल्याने दत्ताच्या नामजपाने कमी कालावधीत लिंगदेहाला, तसेच वातावरणकक्षेत अडकलेल्या त्याच्या इतर पूर्वजांना गती मिळते.

११ इ. मृतदेह स्मशानात नेतांना नामजप मनात म्हणावा कि मोठ्याने करावा ? (मृतदेह स्मशानात नेतांना नामजप मोठ्याने केल्याने वाईट शक्‍तींचा त्रास कमी होणे, लिंगदेहावर संस्कार होणे व इतरांचे दु:ख कमी होणे) : नामजप पुढील कारणांसाठी मोठ्याने करावा.

१. वाईट शक्‍तींचा त्रास कमी होणे : मृतदेहातून प्रक्षेपित होणार्‍या लहरी या त्याच्या स्थूलदेहाशी संबंधित वासनात्मक संस्कारांशी निगडित असल्याने मोठ्याने नामजप केल्याने या स्थूल लहरींचे उच्चाटन जास्त प्रभावीपणे होते. मोठ्याने नामजप केल्यामुळे नामजपातील ध्वनीची स्थूल कंपने वायूमंडलात आघात निर्माण करतात. या आघातातून निर्माण झालेल्या स्थूल ऊर्जेमुळे वायूमंडलात आलेल्या इतर कनिष्ठ वाईट शक्‍ती दूर जातात, तसेच त्या मृतदेहाशी संबंधित इतर पूर्वजांनाही दत्ताच्या ध्वनीचे बाह्यात्मक बळ मिळून त्यांनाही फायदा होतो. साधारणत: वासनात्मक लिंगदेहांना त्रास देण्यासाठी कनिष्ठ, म्हणजेच पृथ्वी व आप या तत्त्वांशी संबंधित वाईट शक्‍तीच जास्त प्रमाणात आल्याने त्यांच्यावर मनात म्हटलेल्या नामापेक्षा जोरात आघातदर्शक उच्चारलेल्या नामजपाचा कमी कालावधीत जास्तीतजास्त परिणाम होतो.

२. लिंगदेहावर संस्कार होणे : मोठ्याने नामजप केल्याने लिंगदेहावर नामजपाचा संस्कार होण्यास मदत होते; कारण लिंगदेह साधना करणारा नसल्यास तो मनात केलेल्या नामजपाची स्पंदने ओळखू शकत नाही.
३. इतरांचे दु:ख कमी होणे : मोठ्याने नामजप केल्याने इतर जिवांचे मन बाह्य गोष्टीकडे न धावता नामजपाच्या ध्वनीवर एकाग्र झाल्याने त्यांच्या दु:खाचे प्रमाण कमी होते, तसेच त्यांना दु:ख सहन करण्याचे मानसिक बळ प्राप्‍त होते.

११ ई. मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी आपापल्या साधनेनुसार नामजप मनात करावा कि दत्ताचा नामजप सामूहिकरीत्या मोठ्याने करावा ? (मृतदेह स्मशानात नेतांना सर्वांनी दत्ताचा नामजप सामूहिकरीत्या मोठ्याने केल्याने समष्टी साधना होणे व वातावरणावर चांगला परिणाम होणे) : सर्वांनी मोठ्याने `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप केल्याने सर्वांच्या मनात व्यापक भाव निर्माण होण्यास मदत होऊन वातावरणावर पटकन परिणाम होतो, शिवाय समष्टी साधनेचे फळ मिळण्यास मदत होते व सर्वांना एकत्रितपणे आलेल्या दु:खद प्रसंगाला धैर्याने तोंड देता येते. तसेच इतरही जीव यांतून स्फूर्ती घेऊन नामसाधनेला लागतात. याउलट स्वत:च्या साधनेनुसार मनात नामजप केल्याने अध्यात्माचा प्रसार न झाल्याने इतरांना समष्टी साधनेचे महत्त्व कळत नाही. मनात नामजप केल्याने संकुचितपणाची वृत्ती वाढीस लागून `फक्‍त मी नाम घेतो', असा अहं जोपासला जातो; म्हणून कोणतेही कर्म करतांना सर्वांना साधनेचा दृष्टीकोन देऊन त्यांना प्रेमाने आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्‍न करावा.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २४.६.२००५, सायं. ७.१३)
 




१२. अनुभूती

अ. नरसोबाची वाडी येथील पादुकांच्या संदर्भातील अनुभूती :  

नृसिंहवाडीला जातांना वाटेतील २-३ झाडांकडे बघून डोके जड होऊन दुखणे, दत्तमंदिरात `ॐ श्री गुरुदेव दत्त ।' हा सामूहिक नामजप करतांना पिवळसर-लालसर प्रकाश दिसल्यावर डोकेदुखी थोडी कमी होणे व पादुकांचे दर्शन घेतल्यावर डोकेदुखी नाहीशी होऊन आनंद जाणवणे : २९.५.२००५ रोजी नृसिंहवाडीला जात असतांना वाटेतील २-३ झाडांकडे पाहिल्यावर माझे डोके खूप जड झाले व दुखू लागले. दत्तमंदिरात गेल्यावर डोकेदुखी वाढली. नंतर आम्ही काही साधक मिळून `ॐ श्री गुरुदेव दत्त ।' हा सामूहिक नामजप करत असतांना, मी डोळे बंद केल्यावर मला डोळयासमोर लालसर प्रकाश दिसला. थोड्या वेळाने प्रकाश गडद लाल झाला व त्यानंतर पिवळसर-लाल झाला. त्या वेळी प्रकाशाच्या रूपात दत्तगुरूंकडून शक्‍ती मिळत होती. `त्यांचे वाईट शक्‍तींशी युद्ध सुरू आहे', असे जाणवले. युद्ध सुरू असतांना गडद लाल व वाईट शक्‍ती नष्ट झाल्यावर पिवळसर-लाल प्रकाश दिसला. त्यानंतर माझी डोकेदुखी खूपच कमी झाली. जेव्हा पादुकांचे दर्शन झाले, तेव्हा डोकेदुखी नाहीशी होऊन आनंद जाणवला. - श्रीमती सुजाता अशोक सावंत, अंधेरी, मुंबई.
(सकृद्दर्शनी काहीही कारण नसतांना डोके जड होणे, दुखणे ही वाईट शक्‍तींच्या त्रासाची लक्षणे आहेत. वाईट शक्‍तीचा त्रास असलेली व्यक्‍ती सात्त्विक ङि्गकाणी गेल्यावर वाईट शक्‍तीला तेथील सात्त्विकता सहन होत नाही व त्यामुळे वाईट शक्‍तीच्या त्रासाचे प्रमाण वाढते. साधिकेची डोकेदुखी वाढणे, हे याचे प्रतीक आहे. युद्ध सुरू असतांना साधिकेला गडद लाल प्रकाश दिसला; कारण लाल रंग हा देवतेच्या मारक शक्‍तीचे प्रतीक आहे. वाईट शक्‍ती नष्ट झाल्यावर साधिकेला पिवळसर-लाल प्रकाश दिसला; कारण वाईट शक्‍ती नष्ट झाल्यावर वातावरणात चैतन्य वाढले व चैतन्याचा रंग पिवळा आहे. दत्ताने साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्‍तींचा नाश केल्यामुळे वाईट शक्‍तींमुळे साधिकेला होणारे त्रास दूर झाले. - संकलक)

आ. पूर्वजांचा त्रास दूर होण्याच्या संदर्भातील काही अनुभूती

१. साधिकेने दत्ताचा नामजप सुरू केल्यावर पूर्वजांनी तिला विरोध करणे व `मला साधना करू दिलीत, तर तुम्हाला गती मिळेल', असे साधिकेने त्यांना समजावल्यावर त्यांनी साधिकेला विरोध न करणे : ८.४.२००२ रोजी सकाळी ६.३० वाजता मला घराच्या आतल्या खोलीत नागासारख्या काळया आकृत्या दिसल्या. तेव्हा मी दत्ताचा नामजप करत होते. नामजप करतांना मला असा आवाज ऐकू आला, `तू जप करू नकोस. आम्हाला त्रास होतो.' मी त्यांना विचारले, `तुम्हाला काय हवे ?' त्यावर ते म्हणाले, `आम्हाला मुक्‍ती हवी आहे.' त्या वेळी माझ्या घशात दाब जाणवत होता. मी त्यांना म्हटले, `मला साधना करू दिलीत, तर तुम्हाला गती मिळेल. मला त्रास देऊ नका.' त्यांनी ते मान्य केले व मग माझ्या घशातील दाब कमी झाला. - कु. मधुरा भिकाजी भोसले, रामनाथी आश्रम, गोवा.

२. बरेच प्रयत्‍न करूनही न जमणारे लग्न दत्ताच्या नामजपामुळे १० दिवसांत जमणे : मुलीचे लग्न बरेच प्रयत्‍न करूनही जमत नाही, म्हणून माझी मालकीण काळजीत होती. तिच्याकडून `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप होत नव्हता. एके दिवशी आम्ही तिच्याकडून `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करवून घेतला. त्यानंतर दहा दिवसांच्या आत तिच्या मुलीचा साखरपुडा झाला. - सौ. मिनु खैतान, धनबाद, झारखंड.

३. घरामध्ये सर्पाची प्रतीकृती व मृत वडील दिसणे आणि दत्ताच्या नामजपाने पूर्वजांचा त्रास दूर होणे : फरीदाबादमध्ये विधवांच्या पुनर्वसनासाठी बनविलेल्या विभागातच आमचे घर आहे. सदर परिसरातील बहुतेक व्यक्‍तींना काही ना काही त्रास आहेत. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्या घरातील त्रास आणखीनच वाढले. मला व माझ्या मुलांना घरामध्ये कधी भिंतीवर, तर कधी पूजाघरात तेवत असणार्‍या दिव्यावर बर्‍याचदा सर्पाची प्रतीकृती दिसत असे. तसेच स्वप्नामध्ये माझे स्वर्गवासी वडील जणूकाही साखळीने जखडून ठेवल्यागत दिसत असत. काही महिन्यांपासून आम्ही सर्वजण कुलदेवीचा नामजप करीत होतो. ज्या वेळी मी वरील गोष्टींबद्दल सनातन संस्थेच्या साधकांना सांगितले, त्या वेळी त्यांनी आम्हाला `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप ९ माळा करण्यास सांगितले. हा नामजप करायला लागल्यापासून मात्र आमचे त्रास हळूहळू कमी होत असून आम्ही सर्व जण आनंदित आहोत. - सौ. सुशील सचदेवा, फरीदाबाद, हरियाणा.)


इ. दत्ताच्या नामजपाने वाईट शक्‍तींचा त्रास दूर होण्याच्या संदर्भातील काही अनुभूती

झोपेत शरीर दाबल्यासारखे जाणवल्यावर आपोआप दत्ताचा नामजप सुरू होणे, दत्ताने रक्षण केल्याचे जाणवल्यावर दाब नाहीसा झाल्यावर प्रार्थनेनुसार क्षणभर दत्ताची सावली दिसणे : ऑक्टोबर २००४ मध्ये एकदा रात्री झोपलेले असतांना पहाटे चारच्या सुमारास माझे पूर्ण शरीर कोणीतरी दाबल्याप्रमाणे जाणवत होते. मी खूप प्रयत्‍न केले, तरी हालचाल करता आली नाही. त्या वेळी माझा `ॐ श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप आपोआप सुरू झाला. मला नामजपही मोठ्याने करता येत नव्हता. आतूनच जप व प्रार्थना सुरू होती. नंतर दत्तगुरु स्वत:चे हात माझ्याभोवती ठेवून माझे रक्षण करत असल्याचे जाणवले व माझ्या शरीरावरचा दाब नाहीसा झाला. त्याच वेळी `तुम्ही माझे रक्षण केले म्हणजे तुम्ही इथेच आहात, मला तुमचे दर्शन झाले तर ....', अशी माझी दत्तगुरूंना प्रार्थना झाली आणि मी दुसर्‍या कुशीवर वळले, तेव्हा मधल्या दरवाज्याजवळ मला दत्तगुरूंची सावली क्षणभर दिसली. - श्रीमती सुजाता अशोक सावंत, अंधेरी, मुंबई.

(संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ - दत्त (भाग १, ३ व ४)





दत्तविषयक आध्यात्मिक ध्वनिचित्रपट

संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात