|
||||
कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात ! २. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात ! पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन विश्वाच्या उत्पत्तीचा विचारहल्ली शोधलेले विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्तातील सिद्धान्तांशी जुळतात ! खगोलशास्त्रावर प्रभुत्वअसंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे ! कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्हास करणारे आधुनिक विज्ञानसनातनची सात्त्विक उत्पादने१. ग्रंथ - पूजासाहित्याचे महत्त्व काय?२. ग्रंथ - सोळा संस्कार३. ग्रंथ - देवघर व पूजेतील उपकरणेवितरणासाठी संपर्क |
|
|||
अनुक्रमणिका |
अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.

१. अर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्त करून
देणार्या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या
उपासनेमुळे आपल्यावर होणार्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत
नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला
कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.
२. मृतिका पूजन : सदोदित कृपादृष्टि ठेवणार्या मृतिकेमुळेच आपल्याला
धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ति होते. अक्षयतृतिया
हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मृतिकेची उपासना करण्याचा दिवस.
३. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया
येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट
संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी
असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे
अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे
नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर
करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृतिकेचे कृतज्ञ
भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालावीत व
त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे
पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही
बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्त होते. (बियाणे म्हणजे
मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला
व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
(पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात
झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून
बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत
केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या
शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण
केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे
पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे
प्रमाणही कमी झाले आहे.)
४. वृक्षरोपण : अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या
फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी
वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत
नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. - ब्रह्मतत्त्व
(८.५.२००५, सायंकाळी ४.४४)
५. अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे
पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या
पालनपोषणाची जबाबदारी असणार्यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक
पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा
भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते.
लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची
शक्ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा
त्याच्यात असणारी त्याची शक्ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून
कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन
करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला
लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता
विक्रमसिंह पाटील यांच्या माध्यमातून, ८.५.२००५, सायंकाळी ४.४५)

२ अ. तीलतर्पण म्हणजे देवता व पूर्वज यांना तीळ आणि जल
अर्पण करणे. तीळ हे सात्त्विकतेचे प्रतीक आहे, तर जल हे शुद्ध भावाचे
प्रतीक आहे.
२ आ. तीलतर्पण करणे म्हणजे देवतेला तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा व शरणागतीचा
भाव अर्पण करणे
देवाजवळ सर्वकाही आहे. त्यामुळे आपण त्याला काय अर्पण करणार ? तसेच `मी
देवाला काहीतरी अर्पण करतो', हा अहंही नको. यासाठी तीळ अर्पण करतांना `देवच
माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहे', असा भाव ठेवावा. यामुळे तीलतर्पण
करतांना साधकाचा अहं न वाढता त्याचा भाव वाढण्यास मदत होते. तीलतर्पण करणे
म्हणजे देवतेला तीळांच्या रूपाने कृतज्ञतेचा व शरणागतीचा भाव अर्पण करणे
होय. - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.५.२००५, सकाळी
११.२९)

३ अ. देवता
३ अ १. पद्धत : प्रथम देवांचे आवाहन करावे. तांब्याचे किंवा कोणत्याही
सात्त्विक धातूचे तबक किंवा ताट हातात घ्यावे. ब्रह्मा किंवा श्रीविष्णु
यांचे किंवा त्यांच्या एकत्रित रूपाचे, म्हणजे दत्ताचे स्मरण करून त्यांना
ताटात येणाचे आवाहन करावे. त्यानंतर `देवता सूक्ष्मातून तेथे आलेल्या आहेत', असा भाव ठेवावा. तीळांमध्ये श्रीविष्णु व ब्रह्मा यांची तत्त्वे आलेली आहेत', असा भाव ठेवून तीळ हातात घ्यावेत. त्यानंतर `त्यांच्या चरणांवर तीळ अर्पण
करीत आहोत', असा भाव ठेवावा.
३ अ २. परिणाम : प्रथम (सूक्ष्मातून आलेल्या देवतांच्या चरणांवर) तीळ अर्पण
केल्यामुळे तिळांत देवतांकडून प्रक्षेपित होणारी सात्त्विकता जास्त
प्रमाणावर ग्रहण होते आणि जल अर्पण केल्यावर अर्पण करणार्याचा भाव जागृत
होतो. भाव जागृत झाल्यामुळे देवतांकडून तिळांत ग्रहण झालेली सात्त्विकता
तीलतर्पण करणार्याला अधिक प्रमाणावर ग्रहण करता येते. यावरून `देव भावाचा
भुकेला असतो', हे लक्षात येते. देवाला भाव व अहं अर्पण केल्यानंतर तो
भरभरून देतो.
३ आ. पूर्वज
३ आ १. महत्त्व : अक्षय तृतीयेला उच्च लोकांतून सात्त्विकता येत असते. ती
सात्त्विकता ग्रहण करण्यासाठी भुवलोकातील अनेक जीव या दिवशी पृथ्वीच्या जवळ
येतात. भुवलोकातील बहुतांश जीव हे मानवाचे पूर्वज असतात. पूर्वज पृथ्वीजवळ
आल्यामुळे अक्षय तृतीयेला मानवाला जास्त त्रास होण्याची शक्यता असते.
मानवावर पूर्वजांचे ऋणही खूप आहे. हे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे
ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय तृतीयेला पूर्वजांना गति मिळण्यासाठी
तीलतर्पण करायचे असते.
३ आ २. पद्धत (पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत व त्यांच्या चरणांवर
देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ व जल अर्पण करीत आहोत, असा भाव
ठेवावा : दुसर्या ताटलीमध्ये आपल्याला पूर्वजांना आवाहन करायचे असते.
पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु व ब्रह्मा यांची
तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर `पूर्वज
सूक्ष्मातून आलेले आहेत व आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करीत
आहोत', असा भाव ठेवावा. त्यानंतर दोन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी
भारीत झालेले तीळ व अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले
तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्या वेळी दत्त
किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना पूर्वजांना गति देण्यासाठी प्रार्थना
करावी.
३ आ ३. परिणाम :
तीलतर्पणामुळे पूर्वजांच्या सूक्ष्म-देहांतील सात्त्विकता
वाढून त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक उर्जा मिळणे व मानवाला
होणारा पूर्वजांचा त्रास ५ ते
१० टक्क्यांनी कमी होणे : तिळांमध्ये सात्त्विकता ग्रहण करून रज-तम नष्ट
करण्याची क्षमता जास्त आहे. साधकाच्या भावानुसार तीलतर्पण करतांना
सूक्ष्मातून ताटामध्ये आलेल्या पूर्वजांच्या प्रतिकात्मक सूक्ष्म-देहावरील
काळे आवरण दूर होऊन त्यांच्या सूक्ष्म-देहांतील सात्त्विकता वाढते व त्यांना
पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक अशी उर्जा मिळते. प्रथम देवतांना तीळ
अर्पण केल्यामुळे साधकाला सात्त्विकता मिळालेली असते व त्याचा भाव ४०
टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्याच्या भोवती ईश्वर सूक्ष्मातून
संरक्षककवच निर्माण करतो. यामुळे पूर्वजांना तीलतर्पण करतांना साधकाला
त्रास होत नाही. तीलतर्पणाच्या कृतीमुळे मानवाला होणारा पूर्वजांचा त्रास ५
ते १० टक्के इतका कमी होतो. - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या
माध्यमातून, ११.५.२००५, सकाळी ११.२९)

अक्षय तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले
वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास
होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. त्यामुळे अक्षय तृतीयेला देवता
व पूर्वज यांना केलेल्या तीलतर्पणामुळे साधकावरील देवऋण आणि पितरऋणही काही
प्रमाणात कमी होण्यास मदत होते. साधकाने प्रामाणिकपणे, मनापासून व
भावपूर्णरीत्या तीलतर्पण केल्यास देवता आणि पूर्वज त्याच्यावर प्रसन्न
होतात व त्याला साधना चांगली होण्यासाठी आणि व्यवहारातील अडचणी दूर
होण्यासाठी आशीर्वाद देतात. - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून,
१०.५.२००५, रात्री ७.५० ते रात्री ९.१५)
अक्षय तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व
सत्पात्रे दान केल्यामुळे पुण्य मिळून स्वर्गात जाण्याऐवजी आध्यात्मिक
उन्नति होऊन उच्च लोकात स्थान मिळणे : दान केल्यामुळे पुण्य मिळते. अक्षय
तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. त्यामुळे या दिवशी केलेल्या
दानातून खूप पुण्य मिळते.
खूप पुण्य मिळाल्यामुळे जिवाने पूर्वी केलेले पाप कमी होते व त्याचा
पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जिवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा
पुण्यसाठा वाढतो. यामुळे जिवाला स्वर्गप्राप्ति होऊ शकते; परंतु साधकांना
पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ति करायची नसते, तर त्यांना ईश्वरप्राप्ति
करायची असते. यामुळे साधकांनी सत्पात्रे दान करायचे असते. येथे सत्पात्रे
दान, म्हणजे जेथे अध्यात्माच्या प्रसाराबरोबरच राष्ट्र व धर्म यांसाठी
कार्य केले जाते, अशा सत्च्या कार्यात दान करणे. सत्पात्रे दान केल्यामुळे
दान करणार्याला पुण्य मिळणार नाही, तर दानाचे कर्म हे अकर्म कर्म होईल.
त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नति होईल. आध्यात्मिक उन्नति झाल्यामुळे
साधक स्वर्गलोकात न जाता उच्च लोकांत जाईल. - ईश्वर (कु. मधुरा भोसले
यांच्या माध्यमातून, ११.५.२००५, सकाळी ११.२९)

त्रेतायुगाला सुरुवात झालेला दिवस, म्हणजे अक्षय्य तृतीया.
ज्या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसर्या युगाला सुरुवात होते, त्या दिवसाला
हिंदु धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवसाने एका कलहकालाचा
अंत व दुसर्या युगाच्या सत्ययुगाची सुरुवात, अशी संधी साधलेली असल्यामुळे
त्या संपूर्ण दिवसाला `मुहूर्त' म्हणतात. मुहूर्त फक्त एका क्षणाने
साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ तासापर्यंत कार्यरत
असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच अक्षय्य तृतीया या
दिवसाला `साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त' मानले जाते. अक्षय्य तृतीया या
तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण व परशुराम अवतार झाला. यावरून
अक्षय्य तृतीया तिथीचे महत्त्व लक्षात येते. - ब्रह्मतत्त्व (२७.४.२००६, सायं. ४.४५)


| संपर्क ।
दैनिक मुख्य पान । मराठी मुख्य पान
Copyright © 2002-2008 - दैनिक सनातन प्रभात |