दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान

धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे.
म्हणून धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल !

देव मस्तकी धरावा ।
अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा की बुडवावा ।
धर्मरक्षणासाठी ।। - समर्थ रामदास स्वामी

वरील दोन्ही उक्‍ती राष्ट्र व धर्म यांप्रती आपले कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत. आज आपला हिंदु धर्म व भारत देश यांची केविलवाणी स्थिती पाहता प्रत्येकाने `राष्ट्ररक्षण व धर्मजागृती' हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. आपणही `राष्ट्र व धर्म' यांप्रती आपले कर्तव्य खालील प्रकारे यथाशक्‍ती पार पाडू शकता.


आपणही या धर्मकार्यात
सहभागी होऊ इच्छिता काय ?

व्हॅलेंटाईन डे : ही आपली संस्कृती नव्हे


अनुक्रमणिका


व्हॅलेंटाईन डे : हिंदु युवा पिढीचे वैचारिक प्रबोधन आवश्यक

पाश्चिमात्यांचे अंधानुकरण नको; मात्र त्यांच्या काही चांगल्या गोष्टींचे आचरण केल्यास त्यात गैर काय, असा प्रश्‍न भारतातील काही तथाकथित सुधारणावादी लोकांकडून केला जात आहे. हाच युक्‍तीवाद करत `व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात गैर काही नाही, असा विचारप्रवाह आज समाजामध्ये वाढत चालला आहे. हिंदुत्ववादी संघटना `व्हॅलेंटाईन डे' हा भारतीय संस्कृतीवर घाला आहे, असे सांगत त्याला विरोध करत आहेत. हा `डे' उत्साहाने साजरा करणे म्हणजे देशातील हिंदु युवा पिढी पाश्चात्त्य संस्कृतीच्या छायेखाली वावरत आहे, याचे द्योतक आहे. याची दखल घेत बलाढ्य हिंदुत्ववादी संघटना गेली अनेक वर्षे `व्हॅलेंटाईन डे'च्या विरोधात धडक मोहीम राबवत आहेत; मात्र या मोहिमांचा आढावा घेता दुर्दैवाने त्या अपयशी ठरल्याचेच स्पष्टपणे समोर येते. दुसरी एक खेदजनक बाब म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांच्या `तोडफोडी'च्या कृत्यामुळे `समाजामध्ये दहशत निर्माण करणारे' व `हिंसक', अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या अपयशाचे व समाजात त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या प्रतिमेचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. कोणत्याही मोहिमेच्या मागे असलेल्या वैचारिक बैठकीवर तिचे यश व अपयश अवलंबून असते. `व्हॅलेंटाईन डे'ची वावटळ रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांमध्ये या वैचारिक बैठकीची खोली कमी पडली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एखादी गोष्ट `नको' म्हटल्यावर ती का नको व नेमके काय हवे, हे संबंधितांना सांगणे आवश्यक असते. त्यामुळे तरुणांच्या मानगुटीवर बसलेले `व्हॅलेंटाईन डेचे भूत' उतरवण्यासाठी त्यांचे वैचारिक प्रबोधन करणे आवश्यक आहे. भारताची गौरवशाली परंपरा धुळीला मिळवल्याशिवाय तेथे राज्य करणे कठीण आहे, हे कावेबाज इंग्रजांना माहीत होते. ही परंपरा धुळीस मिळवण्यासाठी प्रथम त्यांनी हिंदूंना वैचारिक स्तरावर हरवले. त्यांनी हिंदूंची शिक्षणसंस्था नष्ट केली. यामुळे हिंदूंच्या पुढील पिढ्यांना स्वत:ची उज्ज्वल संस्कृती, परंपरा यांचा विसर पडला. ख्रिस्तीमिशनर्‍यांच्या शाळांमार्फत देण्यात येणारी शिकवण त्यांना खरी वाटू लागली. यातूनच त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल जिव्हाळा वाटू लागला. यामुळे ही पिढी स्वत्व विसरलेली व अस्मिताहीन बनली. आजची तरुण पिढी ही शरीराने हिंदू आहे; मात्र तिचे मन पाश्चात्त्य संस्कृतीचे बनले आहे ! अशा धर्मभ्रष्ट पिढीला व्हॅलेंटाईन डे, टाय डे, रोझ डे यांचे अप्रूप वाटले, तर त्यात नवल ते काय ? हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व ! राष्ट्र संपन्न व्हायचे असेल, तर हिंदु तरुणांनी प्रखर हिंदुत्ववादी बनणे आवश्यक आहे. असे हिंदू तयार करणे हे हिंदुत्ववादी संघटनांसमोर खरे आव्हान आहे. दुसरी बाब म्हणजे हिंदु युवकांना आदर्श नेतृत्व देणे होय ! स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाच्या काळात तरुणांमध्ये राष्ट्राभिमान जागृत करण्याचे काम त्याकाळच्या नेत्यांनी केले. त्यामुळेच देशप्रेमासाठी १८-२० वर्षांचे युवक हसत हसत फासावर चढले. सद्यस्थिती पहाता देशाची सर्व क्षेत्रांत दिवाळखोरी उडाली आहे. अशा स्थितीत असे `डे' साजरे करणे, म्हणजे `रोम जळत असतांना निरो फिडल वाजवत होता' यासारखे आहे; मात्र हिंदु तरुणांना ही जाणीव कोण करून देणार ? ही जबाबदारी हिंदु संघटनांनी उचलणे आवश्यक आहे. यासाठी `तोडफोडी'च्या कृत्यांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी वेळ वाया न घालवता अशा धोरणात्मक कामांमध्ये त्यांची शक्‍ती वापरणे सयुक्‍तीक ठरेल. राष्ट्राला योग्य दिशा देण्याचे कार्य वृत्तपत्रे व प्रसिद्धीमाध्यमे यांचे आहे. `व्हॅलेंटाईन डे'च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीवर आक्रमण करणारा भला मोठा शत्रू दारात उभा असतांना त्याबाबत तरुण पिढीला योग्य दिशा दाखवण्याऐवजी भारतातील प्रसिद्धीमाध्यमे मात्र हा एक राष्ट्रीय उत्सव आहे, अशा थाटात `व्हॅलेंटाईन डे' ला प्रसिद्धी देत आहेत. या `डे'च्या निमित्ताने विविध ठिकाणी साजरे केले जाणारे कार्यक्रम, बाजारात येणार्‍या नवीन भेटवस्तू, या विषयांवर रकाने भरले जात आहेत. काही वेळा या बातम्यांना दिलेले महत्त्व पहाता राष्ट्रीय स्तरावर काही समस्याच उरलेली नाही, असा भास वाचकांना व्हावा. आपले कर्तव्य विसरलेल्या प्रसिद्धीमाध्यमांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी एका विदेशी कंपनीने `बार्बी' नावाची बाहुली जागतिक बाजारपेठेत आणली. या बाहुलीने अख्ख्या जगाला वेडे केले. या बाहुलीमुळे पाश्चिमात्यांचे लोण इस्लामी राष्ट्रांमध्ये येऊ नये, म्हणून तेथील मुसलमान राज्यकर्त्यांनी एक नामी युक्‍ती वापरली. `बार्बी'ला शह देण्यासाठी त्यांनी `सारा' नावाची इस्लामी वेष परिधान केलेली बाहुली बाजारपेठेत आणली व त्यांच्या संस्कृतीवरील आक्रमण थांबवले. आपल्या संस्कृतीवर होणारे आक्रमण रोखण्यासाठी मुसलमान राज्यकर्त्यांसारखे धर्माभिमानी राज्यकर्ते भारताला मिळण्यासाठी आता वैचारिक क्रांतीला पर्याय नाही !


व्हॅलेंटाईन कि पॅलेस्टाईन ?

१४ फेब्रुवारी रोजी येणारा `व्हॅलेंटाईन डे' जगभर साजरा करण्यात येतो. पाश्चात्त्यांच्या या `डे'चे तरुण-तरुणींमध्ये देशात व देशाची राजधानी मुंबई येथे मोठ्या प्रमाणावर अंधानुकरण केले जाते. `मन व्यापून टाकणारी एखादी कल्पना मनात आल्यावर तिचा अतिरेक झाल्यास मनोविकार जडू शकतो', असे फ्रॉईड या प्रसिद्ध मनोवैज्ञानिकाने सांगितले आहे. याचाच परिपाक या `डे'च्या निमित्ताने देशात दिसून येत आहे. `व्हॅलेंटाईन डे'मुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे तरुण पिढीचे अध:पतन होत असून, ही देशापुढील एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे.


`पॅलेस्टाईन' हे नगर जगातील अराजकता, निरंतर अशांतता आणि अस्थिरता यांचे प्रतीक बनले आहे. याच नावाशी साधर्म्य असलेला व त्याच्याप्रमाणेच अराजकता, निरंतर अशांतता आणि अस्थिरता निर्माण करणारा `व्हॅलेंटाईन डे' आहे. या दिवशी भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेऊन आपले भवितव्य उद्ध्वस्त करून कशा प्रकारे जीवनाचे `पॅलेस्टाईन' झाले आहे, याचे अनेक दाखले आजकाल व्यवहारात पहायला मिळतात. `व्हॅलेंटाईन डे'च्या नावखाली आज आपल्याकडे पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात आहे. त्याला बळी पडून शाळा, महाविद्यालये यांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी शुभेच्छा भेटकार्ड देण्याच्या निमित्ताने आपले प्रेम व्यक्‍त करतात. वस्तुत: ते प्रेम नसते, तर कोवळया, अपरिपक्व वयातील ते भिन्नलिंगी आकर्षण असते. माझ्या १५ वर्षांच्या वैद्यकीय सेवेमध्ये मी अनेक असे मनोरुग्ण पाहिले आहेत की, त्यांनी `व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी आपल्या प्रियकराला `प्रपोज' करून ते मानसिक आजराला कवटाळून बसले आहेत. त्यांतील काही जिवंत दाखले येथे देत आहे -
१. एक महिला (वय ३८) मानसोपचारासाठी `प्रवरा मेडिकल कॉलेज'च्या आयुर्वेद विभागात आली होती. तिला जीवनाविषयी प्रचंड औदासिन्य आले होते. मी तिच्याशी `कौन्सिलिंग'च्या रूपाने संवाद साधला. तिच्या जीवनाचे एकेक पदर उलगडत गेले. त्या मराठी तरुणीने घरचा विरोध पत्करून आपल्याच महाविद्यालयातील उत्तरप्रदेशच्या परप्रांतीय विद्यार्थ्याशी `व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी लग्न केले होते. उत्तरप्रदेशमध्ये सासरी गेल्यावर तेथील संस्कृति, राहणीमान, आचारविचार आणि तेथील लोकांच्या स्वभावामधील तफावत तिच्या लक्षात आली. त्यामुळे ती तरुणी घोर नैराश्याने मनोरुग्ण झाली.
२. `येरळा आयुर्वेद महाविद्यालया'च्या पंचकर्म विभागात एक दिवस एक जोडपे पंचकर्म चिकित्सा आणि आरोग्यविषयक सल्ला घेण्यासाठी आले. त्यामधील स्त्री मराठी आणि पुरुष पंजाबी होता. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. महाराष्ट्रातील एका खाजगी महाविद्यालयात ते दोघे शिकत होते. ते वर्गमित्र होते. महाविद्यालयातील `व्हॅलेंटाईन डे'च्या समारंभात एक-दुसर्‍याशी भेटकार्डाच्या रूपाने प्रेम व्यक्‍त करून त्यांनी `प्रपोज' केले. घरच्यांचा विरोध असतांना लग्न केले. लग्नानंतर त्या पंजाबी पुरुषाचं खरं रूप बाहेर यायला लागलं. तो `सॅडिस्ट' निघाला. भिन्न स्वभाव आणि वातावरण यांमुळे त्या तरुणीची भावनिक, मानसिक आणि आत्मिक कुचंबणा होऊन तिला गंभीर मानसिक आजार जडला.
३. तिसर्‍या `केस'मध्ये पनवेल येथील `केरळीय आयुर्वेद सेंटर'मध्ये एक जोडपे मानसोेपचारासाठी आले होते. त्यात पुरुष मल्याळी व महिला मराठी होती. कार्यालयामध्ये कामाच्या ठिकाणी दोघांची ओळख झाली. `व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी त्या दोघांनी चर्चमध्ये जाऊन लग्न केलं. लग्नानंतर दोन भिन्न संस्कृति, भाषा, आचारविचार तसेच वैचारिक पातळीवरील प्रचंड तफावत बघून त्या संवेदनशील आणि भावूक तरुणीच्या आरोग्याची वाताहत झाली. मी पहिल्यांदाच आंध्रप्रदेशहून महाराष्ट्रात आलो होतो. मुस्लिमबहुल असलेल्या हैद्राबाद शहरातदेखील मी तेथील हिंदु-तेलगु तरुणींची अशी दूरवस्था बघितली नव्हती; कारण तेव्हा तेथे `व्हॅलेंटाईन डे' नावाचा प्रकार नव्हता ना !

तरुण पिढीचे अध:पतन

तेथील हिंदु-तेलगु मुली प्रांतीय अस्मितेच्या बळावर सुरक्षित होत्या; परंतु तथाकथित अग्रेसर आणि पुरोगामी राज्य असे म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्र राज्यामध्ये पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे जरा जास्तच वहात असल्यामुळे येथील खाजगी महाविद्यालयात साजर्‍या होणार्‍या `व्हॅलेंटाईन डे'च्या मोहाला बळी पडून येथील मुली परप्रांतीयांच्या भुलभुलय्यामध्ये अडकतात. या राज्यातील तरुण पिढीच्या होणार्‍या या अध:पतनाचे गांभीर्य कुणाला खरोखर का, असा प्रश्‍न निर्माण होतो. या `प्रेम प्रकरणां'मुळे व `आंतरजातीय विवाहा'मुळे तरुण मुलांचे पर्यायाने देशाच्या भावी पिढीच्या आयुष्याचे नुकसान होणे हा देशापुढील मोठा सामाजिक प्रश्‍न होतो आणि त्याला हा `डे' हातभार लावतो.

संस्कृतिहीनता

क्षणिक आकर्षणाच्या मोहाला बळी पडून आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, याची जाणीव या मुलांना नसते. चित्रपटातल्याप्रमाणे काही वेळ प्रेम करणे म्हणजे संपू्र्ण आयुष्य नसते, उभ्या आयुष्याचा प्रश्‍न असतो आणि आयुष्य सोपे नसते. रीतीरिवाज, पद्धती, संस्कार, वैचारिक आणि आर्थिक स्तर यांपैकी कशातही जरी तफावत असेल, तरी एकमेकांशी जुळवून घेणे कसे अवघड जाते, हे आयुष्याचा अनुभव घेतलेले पालक मुलांच्या मनावर बिंबवण्यास कमी पडतात. शाळा, महाविद्यालयातून नैतिकतेचे आणि धर्माचे कुठल्याच प्रकारचे शिक्षण दिले जात नाही; त्यामुळे आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतांना काय पहावे व काय पाहू नये हे तरुण मुलांना कळत नाही. त्यात भरीसभर म्हणून पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रचंड पगडा तरुण पिढीवर आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतो आहे आणि दुसरीकडे पारंपरिक सांस्कृतिक नियम न पाळणे म्हणजे आपण पुढारलेले असणे, असा सार्वत्रिक समजही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे तरुण-तरुणी भावनेच्या भरात येऊन ऐकमेकांमध्ये सांस्कृतिक तफावत असतांना लग्न करतात आणि त्या गोष्टीसाठी हा `डे' प्रोत्साहन देणारा ठरतो. `व्हॅलेंटाईन डे'चे भयावह घातक दुष्परिणाम जनतेला समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी नैतिकतेचे पाठ देणे म्हणजेच जीवनाचे नीतिनियम व बंधने पाळावयास भाग पाडणारे धार्मिक शिक्षण देणे किती अपरिहार्य आहे, हे यावरून आपल्या लक्षात येईल !


पाद्री व्हॅलेंटाइन खरेच `पॉवरबाज' आहे काय ?

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात `टाइन डे' म्हणून साजरा केला जातो. भारतातही हा दिवस तरुण-तरुणी मोङ्ग्या प्रमाणात साजरा करतात. प्रेमाच्या नावाखाली पाश्चात्त्यांनी मांडलेला हा बाजार आहे. या `व्हॅलेंटाईन'वर `दैनिक सामना'च्या १३ फेब्रुवारी रोजीच्या अंकात अग्रलेखातून कोरडे ओडले आहेत. या लेखाचा काही भाग आम्ही आमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रसिद्ध करत आहोत. रोममधील `पाद्री व्हॅलेंटाइन' कि काय याचा जन्मदिन कि मरणदिन हा सध्या आपल्याकडील लोकांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न बनून राहिला आहे. १४ फेब्रुवारीला रोममधील पाद्र्याच्या नावाने प्रेम दिवस साजरा केले जातो व हे `फॅड' अलीकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. १४ फेब्रुवारीस आपल्याकडील नवजवान पोरापोरींना प्रेमाचे जे आचके-गचके लागतात ते वर्षभरातील इतर दिवशी कोठे आटतात ? जणू काही १४ फेब्रुवारीस व्हॅलेंटाइनच्या प्रेमाचा गुलाबी फुगा फुगवला नाही व फोडला नाही, तर त्या पाद्र्याचा आत्मा अतृप्‍त राहून हिंदुस्थानच्या भूमीवर भटकत राहील व आपल्या देशातील प्रेमाचे नामोनिशाण नष्ट होईल. शिवसेनेने प्रेमाला कधीच विरोध केलेला नाही. प्रेम हा एक संुदर शब्द आहे. प्रेमाने जग जिंकता येते, असे म्हणतात; मग त्याच प्रेमाने आम्हाला आतापर्यंत कश्मीर का जिंकता आले नाही ? म्हणजे काश्मीर हे कागदोपत्री हिंदुस्थानच्या नकाशावर असेलही; पण तेथे गेली कित्येक वर्षे ज्या फुटीरवादी प्रवृत्ती हिंसेचा आगडोंब उसळवीत आहेत, त्या नराधमांना हा रोमचा `व्हॅलेंटाइन' सुबुद्धी का बरे देत नाही ? त्याच्या प्रेमात इतकी जादू असेल, तर त्याने काश्मीरसह हिंदुस्थानातील अतिरेक्यांना सुबुद्धी द्यायला नको काय ? पण निदान हिंदुस्थानात तरी पाद्र्याचे प्रेम फक्‍त तरुण-तरुणींच्या थिल्लरपणापुरतेच मर्यादित राहिले आहे व या एक दिवसाच्या प्रेमाला इतके महत्त्व देण्याचे कारण म्हणजे पाश्चिमात्य देशातील काही कंपन्यांचे उखळ या निमित्ताने पांढरे व्हावे हेच आहे ना ? बरे त्या पाद्र्याचे नक्की म्हणणे तरी काय होते, हे तरी आपल्याकडील येडचापांना माहीत आहे का ? तर तेदेखील नाही. त्या पाद्र्याने म्हणे प्रेम केले म्हणून रोमच्या राजाने त्याला जेलमध्ये टाकले व मारले. प्रेमासाङ्गी तो हुतात्मा झाला. मग त्याचे हे हौतात्म्य गेल्या पाच-दहा वर्र्षांपूर्वीच थडग्यातून बाहेर पडले काय ? इतकी वर्षे हे प्रेमवीर त्याच्या थडग्यात प्रेमाची चिरनिद्रा घेत पहुडले होते ! त्याला थडग्यातून उकरून काढणारे व थडग्यातील मढ्यावरचे प्रेमाचे लोणी खाणारे हे सर्व पश्चिमी देशातील उद्योगपतीच होते. त्यांनी लोणी खाल्ले हो; पण तुम्हाला काय मिळाले ते सांगा ? पाद्री गेला जिवानिशी, तुम्ही कशाला तुमच्या दिलाचे लचके तोडता ? एका दिवसासाठी तुमचा हा का आटापिटा चालला आहे ? प्रेम ही एक उचंबळून येणारी उत्स्फूर्त भावना आहे. प्रेम काही ठरवून, मुहूर्त व दिवस काढून करता येत नाही. व्हॅलेंटाइनच्या नावाने छापलेली कार्ड, बदामाच्या आकाराचे गुलाबी फुगे वगैरे विकत घेऊन प्रेमाचा झेंडा रोवता येत नाही. प्रेमाने दिल जिंकता येते. अनेकदा प्रेम हे नि:शब्द असते. प्रेमाला वयाचे आणि नात्याचे बांध नसतात. प्रेम हे फक्‍त प्रेमीयुगुलांतच व्हायला हवे, असे बंधन कोठे आहे ? प्रेम गुरु-शिष्याचे असते, माता-पित्याचे, भावा-बहिणींचे असते आणि प्रेम हे मातृभूमीवरील असते. विशेषत: याच देशात रहाणारे अनेक लोक त्यांच्या धर्मावर प्रेम करतात; पण देशप्रेमाचा विषय आला की, अल्लाकडे बोट दाखवून `वन्दे मातरम्' म्हणण्यास नकार देतात. प्रेमवीरांचा व्हॅलेंटाइन पाद्री आमच्या देशातील मुस्लिम बांधवांना मातृभूमीवर प्रेम करण्याची अक्कल देईल काय ? तीन-चारशे वर्षे थडग्यात असलेल्या रोममधील व्हॅलेंटाइनने आमच्या देशातील तरुणांना प्रेमाचा संदेश दिला. जरा बहकलेल्या धर्मांध मुसलमानांनाही राष्ट्रप्रेमाची जाग त्याने आणली, तर पाद्री व्हॅलेंटाइन हा खरोखरच `पॉवरबाज' आहे हे आम्ही मान्य करू. नाही तर प्रेमाचा बाजार मांडणार्‍यांना बाप दाखव नाहीतर श्राद्ध करण्याचे आव्हान देऊ. बोला, तुम्हाला काय हवे आहे ?


संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात