दीपावली विशेषांक मुख्य पान  |  दैनिक मुख्य पान  |  मराठी मुख्य पान


कुठे महान हिंदुसंस्कृती, तर कुठे संस्कृतीहीन पाश्चात्त्य !

१. सायंकाळी लक्ष्मी घरात येते, या भावाने हिंदु देवासमोर दिवा लावून आरती, प्रार्थना व श्लोक म्हणतात, तर पाश्चात्त्य संध्याकाळी दूरचित्रवाणीवर कार्यक्रम पहात बसतात !

२. हिंदु अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करत असल्याने ताटात अन्न टाकत नाहीत, तर पाश्चात्त्य अन्न ताटात टाकण्याला शिष्टाचार (मॅनर्स) समजतात !


पवित्र गंगाजलामुळे पाश्चात्त्यांनाही हिंदु संस्कृतीचे महत्त्व पटले !

१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले. आम्ही रानटी अवस्थेतून नुकतेच बाहेर पडत होतो.त्या काळाच्याही फार पूर्वी हिंदूंची उच्च संस्कृती होती. - सुप्रसिद्ध अमेरिकन नट मार्क ट्वेन


विश्‍वाच्या उत्पत्तीचा विचार

हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात !


खगोलशास्त्रावर प्रभुत्व

असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे !

कोठे हजारो वर्षे पर्यावरणाचा समतोल राखणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कोठे गेल्या शंभर वर्षातच पर्यावरणारा र्‍हास करणारे आधुनिक विज्ञान


सनातनची सात्त्विक उत्पादने

१.  ग्रंथ - अध्यात्मशास्त्रीय माहिती

२.  ध्वनिचित्रतबकडी

३.  सात्त्विक नामपट्टी

वितरणासाठी संपर्क

  • मुंबईः ३२४३५६९९

  • ठाणेः ९३२२६५२५८०

  • रायगडः २७४५०३३८

  • पुणेः ९४२२४३७१३४

  • जळगावः ९४२३०५६४०३

  • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

  • नाशिकः ९४२२४४१७८२

  • इ-मेलः dainik@sanatan.org

दिवाळी (दीपावली)

अनुक्रमणिका


 

 

१. अर्थ

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. आश्‍विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्‍विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: ते सण वेगवेगळे आहेत.


 

२. दिवाळी साजरी करण्यामागील शास्त्र



दिवाळी म्हणजे तेजतत्त्वाच्या अभावी प्रबल होत असलेल्या त्रासदायक घटकांचे तेजाच्या माध्यमातून विघटन करणे


चातुर्मासाच्या काळात तेजतत्त्वाचा अभाव असल्यामुळे तेजोमय शक्‍तीतून विघटित होत असलेले घटक जास्त प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते. दिवाळीच्या काळापर्यंत या घटकांची विपुल प्रमाणात वृद्धी झालेली असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राक्षसांचे साम्राज्य या काळात वाढायचे. या सर्व घटकांचे सूक्ष्म स्तरावर क्षमन व्हावे; म्हणून दिवाळी केली जाते, म्हणजेच तेजतत्त्वावर आधारित उपासना केली जाते. या प्रकारच्या उपासनेमुळे तेजाच्या अभावी वाढलेल्या त्रासदायक घटकांचा तेजाच्या बलावर नाश होतो.
- श्री गुरुतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १.११.२००५, रात्री ८.०६)


 

३. दीपावलीच्या दिवसांचे महत्त्व !


प.पू. परशराम माधव पांडे
महाराज

`आश्‍विन कृष्णपक्षात द्वादशीला गोवत्सपूजन, त्रयोदशीला धनत्रयोदशी, चतुर्दशीला नरकचतुर्दशी आणि अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. पुढे कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा, द्वितीयेला यमद्वितीया आणि भाऊबीज असते. याची सांगता करण्यासाठी पंचमीला पूजन करतात. असे पाच दिवस मिळून दीपावलीचा सण असतो.' - प.पू. परशराम माधव पांडे महाराज






अ. गोवत्स द्वादशी
भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावयाचा आहे.
गोवत्सबारस : `सत्त्वगुणी, आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे, अशी योग्यता असलेल्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण-संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस येते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.'


आ. धनत्रयोदशी
ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची पूजा करतात. येथे `धन' म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्‍तात वसू, जल, वायू, अग्नि, सूर्य, यांना धनच म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे (पैशामुळे) अनर्थ घडतो.
धनत्रयोदशी : लक्ष्मीपूजनाच्या वेळी आम्हाला वर्षभराचा जमाखर्च द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेल्या संपत्तीचा प्रभूकार्यासाठी खर्च केल्यास, `सत्कार्यात धन खर्च झाल्यामुळे ती धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते.' धन म्हणजे पैसा. `हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला, जो आम्ही वर्षभरात पै पै करून जमा केलेला, त्यांपैकी कमीतकमी १/६ भाग हा प्रभुकार्यासाठी खर्च करावा', असे शास्त्र सांगते. पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता व राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देई. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबल वाढते.


इ. नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन
नरकचतुर्दशीच्या दिवशी या अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. `हिरण्यमयी, तेजस्वी, जीवनपोषक व चैतन्यमयी अशा लक्ष्मीला समोरच्या दाराने वाजत-गाजत आणून तिचे गृहात वास्तव्य करणे व अशा लक्ष्मीचे पूजन करणे म्हणजे लक्ष्मीपूजन.


ई. बलिप्रतिप्रदा
बलिप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीकार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याचे हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते.


उ. भाऊबीज
हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे.' आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील, तो दिवस, म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस.

ए. पंचमी पूजन
दिपावलीची सांगता : शेवटी अशा रीतीने मनातील मालिन्य निघून चित्त शुद्ध झाले, म्हणजे पंचमीला या दिपावलीची सांगता करण्यासाठी पंचमी पूजन आहे. असा हा दिपावली उत्सव !

 

४. उत्सवाचे स्वरूप


 

अ. दिव्यांची आरास :

दीपावलीच्या सायंकाळी घरात व घराबाहेर दिव्यांची ओळ लावावी. दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ. यामुळे घराला अप्रतिम शोभा निर्माण होऊन उत्साह येतो व आनंद होतो. विजेच्या दिव्यांची माळ लावण्यापेक्षा तेल व वातीच्या पणत्या लावण्यात शोभा व शांतपणा जास्त आहे. दीप या शब्दाचा खरा अर्थ तेल व वात यांची ज्योत. `अंधाराकडून ज्योतीकडे म्हणजे प्रकाशाकडे जा', अशी श्रुतीची आज्ञा आहे - `तमसो मा ज्योतिर्गमय'. या तीन दिवसांत ज्यांच्या घरी दिवे लागत नाहीत त्यांच्या घरी नेहमीच अंधकार रहातो. ते प्रकाशाकडे म्हणजे ज्ञानाकडे जाऊ शकत नाहीत. दीपदानाने लक्ष्मी स्थिर होते. आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास व ज्ञानाचा प्रकाश असावा यासाठी प्रत्येकाने आनंदाने दीपावली उत्सव साजरा करावा. याने घरात सुखसमृद्धि रहाते.


आ. आकाशकंदिल :
`हा दिव्यांच्या आराशीचाच एक भाग आहे. आश्‍विन शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत घराच्या बाहेर एक उंच खांब पुरून त्यावर दोरीच्या साहाय्याने जो दिवा टांगतात, त्याला आकाशदिवा असे म्हणतात. त्याचा विधि पुढीलप्रमाणे असतो. घरापासून जवळच थोडी जमीन गोमयाने सारवावी. तीवर चंदनयुक्‍त जलाने प्रोक्षण करून अष्टदल कमळ काढावे. मध्यभागी वीस हात, नऊ हात किंवा पाच हात लांबीचा खांब पुरावा. तो वस्त्र, पताका, अष्टघंटा, कलश यांनी सुशोभित करावा. त्यावर अष्टदलाकृति दीप (कंदिल) करून अडकवावा. त्या दीपात (कंदिलात) मोठा दिवा लावावा. त्याभोवती कमळाच्या प्रत्येक पाकळीत एक असे आठ दिवे धर्म, हर, भूति, दामोदर, धर्मराज, प्रजापति, पितर (तम:स्थित) व प्रेत यांना उद्देशून लावावे. दिव्यात तिळाचे तेल घालावे. नंतर दीपाची पंचोपचार पूजा करून तो पुढील मंत्राने वर चढवावा.
दामोदराय नभसि तुलायां लोलया सह ।
प्रदीपं ते प्रयच्छामि नमोऽनन्ताय वेधसे ।।
अर्थ : श्रेष्ठ असा परमेश्‍वर जो दामोदर, त्याला हा ज्योतीसह दीप अर्पण करतो. त्याने माझे कल्याण करावे. याचे फल लक्ष्मीप्राप्‍ति हे आहे.'


इ. रांगोळी :
`मूळ संस्कृत शब्द रंगवल्ली. विशिष्ट शुभ्र चूर्ण चिमटीतून जमिनीवर सोडून रेखाटलेल्या आकृतीला रांगोळी असे म्हणतात. रांगोळी ही मूर्तिकला आणि चित्रकला यांच्याही आधीची आहे. कुठल्याही धार्मिक किंवा मांगलिक कृत्यात रांगोळी आवश्यक आणि प्राथमिक गोष्ट आहे. कोणत्याही सण, उत्सव, मंगल समारंभ, पूजा, व्रत इत्यादि शुभप्रसंगी प्रथम धर्मकृत्याच्या जागी रांगोळी काढण्याची प्रथा आहे. एखाद्याला किंवा एखादीला ओवाळतांना ती व्यक्‍ति बसलेल्या पाटाभोवती आणि पुढेही रांगोळी काढतात. समारंभाच्या भोजनप्रसंगीही पाटाभोवती व पानाभोवती रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळया काढून त्या विविध रंगांनी भरतात. जुन्या काळी प्रत्येक घरी रोज दारापुढे सडासंमार्जन करून रांगोळी काढण्याची प्रथा होती.
रांगोळी शिरगोळयाच्या चूर्णाने काढतात. कोकणात भाताची फोलपटे जाळून त्यांची पांढरी राखही रांगोळी म्हणून वापरतात. रांगोळीचे पीठ सामान्यपणे जाडेभरडे असते. त्यामुळे चिमटीतून ते सहजपणे सुटते. जमीन सारवल्यावर तिच्यावर रांगोळीच्या चार रेषा न विसरता ओढल्या जातात. रांगोळी न घातलेली सारवलेली जमीन अशुभ समजतात.
सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धि हे रांगोळीचे दोन उद्देश होत. रांगोळीत ज्या आकृत्या काढतात, त्या प्रतीकात्मक असतात. सरळ रेषेपेक्षा वक्र रेषा ही सौंदर्याची विशेष अनुभूति घडविते. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही आणखी प्रतीके होत. रांगोळीच्या दोन समांतर रेषांच्या मध्यभागी दोन वक्र रेषा एकमेकींवर चढवून एक साखळी आकाराला आणतात. ही साखळी म्हणजे नागयुग्माचे प्रतीक असते. अष्टदल हे अष्टदिशात्मक विश्‍वाचे, तसेच सूर्य व विष्णु यांचे प्रतीक असते. कमळ हे लक्ष्मीचे व प्रजननशक्‍तीचे प्रतीक असून, वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळया धर्मकृत्यांत काढल्या जातात. यात मोठ्या चौकोनातले बारीक चौकोन विशिष्ट पद्धतीने, कुंकवाने भरून त्यांतून शिवलिंगाची आकृति निर्माण करायची असते. या रांगोळया शैव धर्माशी संबंधित आहेत. याशिवाय ठिपक्यांची रांगोळी या नावाचा आणखी एक रांगोळीप्रकार रूढ आहे. प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देऊन ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यांतून मोर, कासव, कमळ, वेल इत्यादि आकृत्या निर्माण करतात. ठिपक्यांची रांगोळी जटिल पण आकर्षक असते. रांगोळी मुख्यत्वे स्त्रियाच काढतात. ती काढण्यासाठी त्यांना फूटपट्टी, दोरा, कुंचला इत्यादि कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नसते. त्यांची बोटे मुक्‍तपणे फिरून विविध आकृत्या सहजपणे निर्माण करतात. रांगोळीतल्या प्रत्येक आकृतीचा प्रारंभ तिच्या केंद्रातून होत असतो.
रांगोळीचे आकृतिप्रधान व वल्लरीप्रधान असे मुख्य दोन भेद आहेत. आकृतिप्रधान रांगोळी राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर प्रदेश या प्रदेशांत आढळते. तिच्यात रेखा, कोन आणि वर्तुळे ही प्रमाणबद्ध दिसतात. वल्लरीप्रधान रांगोळी भारताच्या पूर्व भागात आढळते. तिच्यात फूलपत्री, वृक्षवल्ली व पशु-पक्षी यांना प्राधान्य असते. अशी रांगोळी काढण्यात बंगाली स्त्रिया सिद्धहस्त आहेत. ही रांगोळी आकृतिप्रधान रांगोळीपेक्षा अधिक मोहक वाटते. श्री. आनंदघनराम रांगोळीचे तात्त्विक रहस्य विशद करतांना लिहितात की, `जमिनीवर केरसुणी फिरवतांना किंवा सारवतांना जमिनीवर सूक्ष्म रेषा निर्माण होतात, त्यांत एकप्रकारचे कंपन असते. या रेखा अनियमित असल्याकारणाने त्यांचे कंपनही अनियमित असते; म्हणून ते शरीराला, नेत्रांना व मनाला हानिकारक असते. हे अनिष्ट कंपन टाळण्यासाठी सारवलेल्या जमिनीवर कोन आणि शुभ चिन्हे व्यवस्थित रूपाने रांगोळीच्या माध्यमाने काढली की झाडल्याचे व सारवल्याचे अशुभ परिणाम दूर होऊन शुभ परिणामांची प्राप्‍ति होते.'

ई. फटाके :
दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी लहान-मोठे सर्वच जण रात्री फटाके वाजवतात व आतषबाजी करतात.


उ. अभ्यंगस्नान :
नरक चतुर्दशी ते बलिप्रतिपदा हे दीपावलीचे तीनही दिवस रोज अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) : या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे व नंतर ऊनपाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. स्नानामुळे रज-तम गुण एक लक्षांश इतके कमी होऊन सत्त्वगुण त्याच प्रमाणात वाढतात आणि त्यांचा प्रभाव नेहमीच्या स्नानामुळे सुमारे तीन तास टिकतो तर अभ्यंगस्नानामुळे चार ते पाच तास टिकतो. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते म्हणून तेल लावायचे. ऊनपाणी हे मंगल व शरीराला सुखदायक आहे म्हणून ऊनपाण्याने स्नान सांगितले आहे. तेल लावून नंतर स्नान करण्याने त्वचेला व केसांना आवश्यक तेवढाच ओशटपणा रहातो; म्हणून स्नानापूर्वी तेल लावणे आवश्यक आहे. स्नानानंतर तेल लावणे उचित नाही.
`अभ्यंगस्नान करतांना देशकाळकथन करावे लागते. देशकाळकथनाची भारतीयांची पद्धति वैशिष्ट्यपूर्ण आहे. ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यापासून आतापर्यंत ब्रह्मदेवाची किती वर्षे झाली, कोणत्या वर्षातील कोणते व कितवे मन्वंतर चालू आहे, या मन्वंतरातील कितवे महायुग व त्या महायुगातील कोणते उपयुग चालू आहे, या सर्वांचा त्यात उल्लेख असतो. याप्रमाणे देशकाळकथन करावयाचे असते. यावरून यापूर्वी केवढा मोठा काळ गेला आहे व राहिलेला काळही केवढा मोठा आहे याची कल्पना येते. आपण फार मोठे आहोत असे प्रत्येकाला वाटत असते; पण आपण किती लहान व सूक्ष्म आहोत याची कल्पना या विश्‍वाच्या अफाट काळावरून येते. यामुळे माणसाचा गर्व नाहीसा होतो. हा मोठा फायदा आहे.'
वर्षातून पुढील पाच दिवस असे अभ्यंगस्नान करण्यास शास्त्रात सांगितले आहे :
१. संवत्सरारंभ,
२. वसंतोत्सवाचा प्रारंभ दिवस म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा व
३. दिवाळीचे तीन दिवस म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा.


 

५. दीपावलीचा गुह्यार्थ समजून घ्या !


प.पू. परशराम माधव पांडे
महाराज

दीपावली शुभचिंतन !
`श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार व दुष्टप्रवृत्ती यांपासून मुक्‍त केले व प्रभुविचार (दैवी विचार) देऊन सुखी केले. तीच ही `दीपावली' आपण वर्षांनुवर्षे केवळ एक रूढी म्हणून दीपावली साजरी करत आहोत. आज त्यातील गुह्यार्थ लोप पावला आहे. हा गुह्यार्थ लक्षात घेऊन त्यातून अस्मिता जागृत झाल्यास अज्ञानरूपी अंध:काराचे, तसेच भोगवृत्ती व अनाचारी आसुरी वृत्ती असलेल्या लोकांचे प्राबल्य कमी होऊन त्यांचे सज्जनशक्‍तीवरील वर्चस्व कमी होईल.
आसक्‍तीरहित कर्म करून तेजस्वी आत्मज्योत पेटवणे, म्हणजेच खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी करणे होय !

`सज्जनशक्‍तीचा प्रभाव वाढल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळून ते सुखी होतील. भोगरूपी आसक्‍तीला त्यागाची जोड दिल्यावर ते शक्य होईल. `त्याग' म्हणजे आसक्‍तीरहित कर्म. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, `उदर भरण नोहे । जाणिजे यज्ञ कर्म ।' `तेन त्यक्‍तेन भुंजीथा: ।', म्हणजेच `भोगाचा त्यागपूर्वक उपभोग घ्या', असा उल्लेख उपनिषदात आहे. दीपावलीनिमित्त आसक्‍तीरहित कर्म करण्याची तेजस्वी आत्मज्योत आमच्यातही पेटू दे ! हे भगवंता, आम्ही तुला समर्पित झालो आहोत. तुझे हे विचार घरोघरी देण्यासाठी आम्हाला सद्बुद्धी व शक्‍ती दे ! जेणेकरून आम्ही या दीपोत्सवातील एखादी पणती होऊ व अनेक पणत्या पेटवू शकू. यातूनच आम्हाला खर्‍या अर्थाने दिवाळी साजरी करण्याचे सद्‌भाग्य लाभेल !' आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची जावो! - प.पू. परशराम माधव पांडे महाराज, अकोला


 

६. सण हे वाण झाले पाहिजेत !

(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात, ९.११.२००७)


संकलक : ज्येष्ठ पत्रकार,
श्री. अरविंद कुलकर्णी

स्वातंत्र्यानंतरची ही पहिली दिवाळी आहे, की जी साजरी करणारे लोक जगण्यास पात्र आहेत कि नाही, हे ठरणार आहे. हिंदु ज्याला प्रभू रामचंद्र म्हणून कित्येक शतके पूजित आले तो अस्तित्वातच नव्हता, ते काल्पनिक पात्र होते, असे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथेवर सांगितले. त्यानंतर ही दिवाळी आली आहे. रामाचे अस्तित्व नाकारणे म्हणजे हिंदूंच्या श्रद्धांवर प्राणांतिक आघात करणे होय !

उत्सव अंत:करणपूर्वक साजरा करतात त्यांना अपमृत्यू येत नाही अशी समजूत आहे. दिव्यांचा उत्सव म्हणजे प्रकाशाचा उत्सव आणि प्रकाशाचा उत्सव म्हणजे ज्ञानाचा उत्सव. `मुळात जाऊन सुसंगतीचा शोध घेणे' हा ज्ञानप्राप्‍तीचा एक मार्ग होय. परमेश्‍वराचा आणि आपला नेमका संबंध काय, याचा शोध घेण्याची इच्छा प्रबळ होते आणि त्या दृष्टीने मन आणि बुद्धी कामाला लागते, तेव्हा आयुष्य मार्गी लागले, असे म्हटले जाते. सर्व अबालवृद्ध हिंदु स्त्री-पुरुष ज्यात उत्साहाने सहभागी होतात, असा बरेच दिवस चालणारा दिवाळी हा एक सण आहे. फार प्राचीन काळापासून हिंदु हा सण साजरा करीत असल्याचे उल्लेख आढळतात. एखाद्याचे चांगले झाले, तर त्याचे अभिनंदन करतांना `मग आता काय दिवाळीच दिवाळी' असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. `साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा' हे वचन आपल्या मोठेपणाच्या कल्पना कोणत्या सणाशी निगडित आहे, ते दाखवते. जीवनेच्छा वर्धिष्णू करणार्‍या प्रेरणा निश्चितपणे या सणापासून मिळत असाव्यात. या दृष्टीने नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या तीन दिवसांचा विचार माझ्या अल्पमतीनुसार येथे केला आहे.

नरकासुरावर विजय


प्राचीन काळी प्राग्ज्योतिषपूर म्हणजे सध्याच्या ईशान्य भारत म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रदेशात नरकासुर नावाचा राजा राज्य करत होता. तो अतीपराक्रमी; पण दुष्ट प्रवृत्तीचा होता. त्याने इंद्रास सळो की पळो करून सोडले होते. अन्य देवदेवतांची कवचकुंडले हिरावून घेतली होती. अनेक ठिकाणच्या राजकन्या, सुंदर स्त्रिया मिळून सोळा सहदा स्त्रियांना पकडून त्याने आपल्या बंदीगृहात डांबले होते. त्याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षांच्या ज्वाळांनी सारा भारत होरपळून निघत होता. पण त्याला नमवावे कसे, हा प्रश्‍न सुटत नव्हता. कारण त्याने उंचच्या उंच भरभक्कम भिंतीची अभेद्य अशी तटबंदी आपल्या राज्याभोवती उभी केली होती. खंदक खणले होते. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणे हे युद्धनीती आणि शौर्याविष्काराला आव्हान होते. हे आव्हान भगवान श्रीकृष्णाने स्वीकारले. तटबंदी भेदून नरकासुराच्या अंत:पुरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने काय युक्‍त्या केल्या, याचे वर्णन पुराणात आहे आणि आधुनिक युद्धशास्त्राच्या दृष्टीने त्याचा आज अभ्यास होणे आवश्यक आहे. नरकासुराकडे फार मोठा शस्त्रसाठा होता. तो विफल करणारी अस्त्रे श्रीकृष्णाने काढली. तो नरकासुरापर्यंत पोहोचला. त्याने त्याची मान पकडून त्याला खाली पाडले आणि त्याचा वध केला. सोळा सहस्त्र स्त्रियांना श्रीकृष्णाने मुक्‍त केले. त्यांना पुनर्जन्म देऊन प्रतिष्ठित केले. देवादिकांना बंदीगृहातून त्याने सोडविले. नरकासुराच्या रक्‍तात अंगठा बुडवून तो टिळा श्रीकृष्णाने आपल्या माथी लावला. तेव्हापासून ज्या दिवशी नरकासुराला मारला त्या दिवशी म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशीला अभ्यंगस्नान करण्याची प्रथा पडली आहे. स्नानोत्तर आपण टिळा लावतो. तो दुष्ट शक्‍तींवर सुष्ट शक्‍तींनी मात केल्याचे निदर्शक आहे. आपला भालप्रदेश आपले भवितव्य श्रीकृष्णाच्या परमपावन स्मृतीशी निगडित आहे. अशी इच्छा आपण व्यक्‍त करीत असतो.

क्षात्रवृत्ती जागृत ठेवायला हवी !


नरक चतुर्दशी हा आतंकवाद विरोधीदिन म्हणून भारताने पाळायला हवा. जगण्यासाठी नुसते चांगले असून चालत नाही, तर पराक्रमी असावे लागते. आणि शत्रूच्या रक्‍ताचा टिळा लावण्याचे सामर्थ्य तरुणांच्या अंगी असावे लागते. नरकासुराचे पारिपत्य करण्यासाठी श्रीकृष्ण चालून गेला तेव्हा त्या मोहिमेत सत्यभामा सामील झाली होती. तेव्हा प्राचीन काळी स्त्रिया केवळ `शॉपिंग' किंवा `पार्टी'साठी नवर्‍याबरोबर बाहेर पडत नसत, तर रणभूमीवर पराक्रम गाजवण्यासाठी त्या उंबरठा ओलांडीत, हे लक्षात येते. तेव्हा प्राचीन काळी स्त्रिया केवळ `शॉपिंग' किंवा `पार्टी'साठी नवर्‍याबरोबर बाहेर पडत नसत, तर रणभूमीवर पराक्रम गाजवण्यासाठी त्या उंबरठा ओलांडीत, हे लक्षात येते. आज `सनातन प्रभात'च्या आश्रमातून स्त्रियांमधील क्षात्रवृत्ती जागवण्याचे उपक्रम राबवले जात. यावरून ती परंपरा तुटलेली नाही, हे पाहून खूप बरे वाटले. सोळा सहस्त्र स्त्रियांची मुक्‍तता नरकासुरासमवेतच्या युद्धात झाली. श्रीकृष्णाच्या चरित्रात स्त्रियांच्या प्रतिष्ठेला सर्वोच्च स्थान आहे. धृतराष्ट्राच्या सभेत कौरवांकहून साध्वी द्रोैपदीची जी विटंबना झाली. तो घाव श्रीकृष्णाच्या हृदयात शेवटपर्यंत ठसठसत राहिला आहे. दु:शासनाच्या रक्‍तात हात भिजवून मग `द्रौपदीच्या मोकळया केसांची वेणी घालीन' ही भीमाची प्रतिज्ञा वारंवार फुंकर मारून त्याने प्रज्वलित ठेवली आहे. आपल्या अपमानित स्त्रियांचे आर्त चित्कार ज्यांना ऐकू येत नाहीत, ते राज्य करण्यास आणि पुरुष म्हणवून घेण्यास अपात्र असतात. श्रीकृष्णाचे स्मरण केवळ गोविंदा आणि दहीहंडी खेळण्यापुरते नव्हे, तर नरकासुरच्या तटबंदीपेक्षा उंच थर उभारून त्याचा वध करण्यासाठी आहे, हे हिंदूंनी ओखळले असते, तर आपण स्वतंत्र होतांना आपल्या स्त्रियांवर मुसलमानांनी जे अत्याचार केले, ते झाले नसते.

बलीप्रतिपदा अशी साजरी करा !

लिंगपिसाट लांडग्याच्या वासनांचा उपशम करण्यासाठी गांधी-नेहरूंनी हिंदु स्त्रियांना विवस्त्र केले. स्त्रियांची लाज त्यांनी राखली नाही, एवढ्या एका कारणासाठी नरकचतुर्दशीला पायाच्या अंगठ्याने आपण कारीट फोडतो, तसा गांधी-नेहरू घराण्याविषयीच्या ममत्त्वाचा त्याग हिंदूंनी करायला हवा. पुण्यामध्ये दिवाळीच्या दिवसांत चौकाचौकातून आणि जुन्या वाड्यावाड्यातून किल्ले किंवा गडकोट यांच्या प्रतिकृती करून आरास करण्याची प्रथा आहे. `नरकासुराची तटबंदीयुक्‍त राजधानी आणि ती भेदून १६ सहस्त्र स्त्रियांना श्रीकृष्णाने दिलेले स्वातंत्र्य' अशी आरास केली, तर तरुणांना आपल्या वीर परंपरेची जाणीव होईल आणि मग दाऊद इब्राहिमच्या तालावर नाचणार्‍या आपल्या नट्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा, असा विचार त्यांच्या मनात येईल. बलिप्रतिपदा साजरी करतांना हिंदूंना स्वत:साठी व जगासाठी योग्य तो बोध देता घेता येईल. बळीराजा आपलाच आहे, पण माजला आहे. तीन पावलांत विष्णूने त्याला नमवला आहे. १५ कोटी मुसलमान हिंदूंचे सहोदर आहेत; पण माजले आहेत. त्यांना नमवण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे हिंदूंनी कुराणाची चिकित्सा केली पाहिजे. म्हणजे त्यांना मुसलमानांची मानसिकता कळेल. ती भारतानुकूल करण्यासाठी त्यांना उपाय सापडतील. दुसरे पाऊल म्हणजे हिंदूंनी स्वत:ला ओळखावे. त्यांची अध्यात्माची परंपरा इतकी खोल, व्यापक आणि सर्वश्रेष्ठ आहे की, त्यांना कुणापुढेही वाकण्याची आणि राष्ट्रीयत्वाचा त्याग करण्याची आवश्यकता नाही. तिसरे पाऊल भौतिक उत्कर्षाचे आहे. वेदांच्या परंपरा जशा अध्यात्माच्या आहेत, तशा भौतिक समृद्धीच्या आहेत. हिंदु विचार प्रवृत्तीपर आहे. त्याला जागून हिंदूंनी अपार कष्ट करावे आणि आर्थिक नि सामाजिक दृष्ट्या जगातील पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र हे स्थान मिळवून द्यावे. केवळ भारतातील, पाकिस्तानातील आणि बांगलादेशातील नव्हे, तर जगातील सर्व मुसलमानांची जिहादी वृत्ती नष्ट करून त्यांना सुसंस्कृत बनविण्याचे सामर्थ्य हिंदु विचारात आणि पराक्रमात आहे, असा आत्मविश्‍वास हिंदूंनी बाळगावा. जगातील सर्व भारतीय राजदूतावासांनी बलिप्रतिपदेचा सण महान राष्ट्रीय सण म्हणून धुमधडाक्याने साजरा करावा. त्यातून हे साधले गेले पाहिजे की, शत्रूला सुसंस्कंृत करण्यासाठी आणि पुन्हा जगण्याची संधी देण्यासाठी त्याच्याशी लढण्याची हिंदूंची परंपरा आहे, हे जगाला कळावे. अशा परंपरांवर आधारित जगाच्या राजकारणाची फेरमांडणी झाली तर शांतता, समानता, बंधूता आणि समृद्धी अवतीर्ण होईल.

 
भाऊबीज अशी साजरी करा !

भाऊबीजेच्या सणामागची यम आणि यमी या भावाबहिणीची कथा समजून घेतली, तर स्त्रीविषयक नैसर्गिक वासनांचे रूपांतर विविध प्रकारच्या उत्कट आणि पवित्र प्रेमात होईल आणि `स्त्रियांच्या प्रतिष्ठेचे रक्षण' हा राष्ट्रीय जीवनाचा अविभाज्य अंश झाला की, पुन्हा फाळणीचे अत्याचार होणार नाहीत. असे धाडस कोणी करणार नाही. या भाऊबीजेला हिंदूंनी दोन संकल्प सोडले पाहिजेत. पहिला संकल्प हा की, प्रत्येक हिंदूने एकातरी भारतीय मुस्लिम स्त्रीला आपली बहीण मानून तिला हिंदु विचारांचे महत्त्व पटवून देण्यासाठी आपला फावला वेळ, खर्च करावा. दुसरा संकल्प हा की प्रत्येक हिंदूने एकतरी काश्मिरी हिंदू स्त्रीला आपली बहीण मानून तिला मोठ्या भावाच्या नात्याने सर्व प्रकारचा आधार द्यावा. `इस्लामी आतंकवादाचे तिच्या मनावरील भय घालवण्यासाठी जोपर्यंत आपण ठोस पाऊल उचलत नाही. तोपर्यंत मिष्टान्न खाणार नाही', असे हिंदूंनी ठरवावे आपण दिवाळी साजरी करतो, तेव्हा तिच्या प्रकाशात जे दुबळे आहेत, ते न्हाऊन निघाले पाहिजेत आणि भविष्याविषयी त्यांना विश्‍वास वाटला पाहिजे. पुढच्या एक दोन पिढ्या तरी सतीचे दिव्य दाहक वाण म्हणून आपण आपले सण साजरे केले पाहिजेत.


 

७. दीपावली : अधर्मी असुरांचा नाश करण्याची शिकवण देणारा उत्सव



कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हापासून नरकचतुर्दशी साजरी करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचा नाश व्हावा, यासाठी धार्मिक कृती करतात. बलीप्रतिपदा बली राजाचा नाश झाल्याचे प्रतीक आहे. तर भाऊबीज ही शकटासुर या असुराचा नाश करून असंख्य भगिनींना त्यांचा बंधू कृष्ण याने सोडवल्याचा आनंद म्हणून साजरी करतात. अशा तर्‍हेने दीपावलीचा प्रत्येक दिवस हा असुरांचा संहार केल्याच्या, धर्माने अधर्मावर विजय मिळवल्याच्या दिवसाची आठवण म्हणून मंगलमय दीपांनी उजळवायचा, असं आपली संस्कृती सांगते. आज मात्र दिवाळी साजरी करतांना आपल्या या महान परंपरेची आठवण विस्मृतीत गेली आहे किंवा फक्‍त सांगण्यापुरती उरली आहे, असंच दिसतं. `उत्सव हे केवळ मौजमजा करण्यासाठी आहेत', या वृत्तीच्या पाश्चात्त्यांच्या अनुकरणामुळे आपल्या धर्मात सांगितलेल्या सण, उत्सवांच्या निमित्ताने मिळणार्‍या ईश्‍वरी चैतन्याचा लाभ घेण्याची संधी मात्र आपण आज दुर्दैवाने दवडत आहोत. हिंदूंमध्ये धर्माचरणाचा अभाव आहे, कारण धर्मशिक्षणाचा अभाव आहे. अर्थातच याच्या मुळाशी धर्माधिष्ठित राज्यकर्त्यांचा अभाव, हे कारण आहे. या दीपावलीच्या निमित्ताने धर्मशिक्षित होण्याचा निश्चय करून व्यष्टी व समष्टी स्तरावरील छोट्या छोट्या कृतींद्वारे धर्माचरणासाठी प्रयत्‍न करण्याचा निश्चय करूया !


 

८. दिवाळीविषयी सुचलेले विचार



`नामाचे उटणे सर्वांगाला लावा. सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंगस्नान करा व त्यात आपले स्वभावदोष आणि अहं धुवून काढा. त्यागाने सर्व अंग कोरडे करा. आनंदाची नवीन वस्त्रे परिधान करा. प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ व सात्त्विक बनवा. अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून प.पू. डॉक्टरांच्या चरणी रहा !'
- श्रीमती अंजली भोसले, सनातन संकुल, देवद, पनवेल.


 

९. दिवाळीच्या दिवसांतील काही कृती



१. धनत्रयोदशीच्या दिवशी कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावतात.
२. आकाशदीप वास्तूच्या प्रवेशद्वारावर उजव्या हाताला (कार्यरत शक्‍तीचे प्रतीक) टांगतात. आकाशदीपामुळे वायूमंडलाची शुद्धी होते.
३. लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात.
४. नरक चतुर्दशी ते बलिप्रतिपदा या दिवाळीच्या तीनही दिवशी रोज अभ्यंगस्नान करतात.
५. भाऊबिजेच्या दिवशी एखाद्या स्त्रीला भाऊ नसल्यास तिने चंद्राला भाऊ मानून ओवाळावे.


 

१०. हिंदूंनो, दिवाळीच्या सणातील पाश्चात्त्यांचे अंधानुकरण टाळा !



सध्या दिवाळीत विद्युत् सजावट, अनाठायी रोषणाई, नको तेवढा फटाक्यांवरील खर्च, आतषबाजी इत्यादी गोष्टींना अवास्तव महत्त्व दिले जात आहे. या सर्व बाह्य दिखाऊपणाने आता हळूहळू आमच्या धार्मिक कृती व प्रतीके यांवरही हल्ला चढवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय आता हळूहळू पाश्चात्त्यांचे अनुकरण करू लागले आहेत; परंतु भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक विचार, परंपरा व तिची प्रतीके यांमागे एक शास्त्रसंमत अशी बैठक आहे, हे धर्मशिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. पुढच्या पिढीला तर हे माहीतही होणार नाही, अशी स्थिती आहे. हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या खालील कुप्रथा टाळण्याचा प्रयत्‍न करा व धर्माचरणाचे पालन करून ईश्‍वरी चैतन्याचा लाभ घ्या !

दिवाळीच्या दिवशी करावयाचे अभ्यंगस्नान : यासारख्या प्रथा आता मागे पडत चालल्या आहेत. याउलट आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत दूरदर्शन बघणे व मग सुटीचा दिवस म्हणून उशिरा उठणे, असे चित्र दिसते.
अत्तर : अत्तराऐवजी पाश्चिमात्त्य पद्धतीचा परफ्यूम, स्प्रेचा वापर केला जातो.
फराळ : घरी तयार केलेल्या दिवाळीच्या फराळाऐवजी बाजारातील मिठाईवर अधिक भर असतो.
आकाशकंदिल : डोळयांना त्रासदायक होणारे, विविध रंगी प्रकाश देणारे आकाशकंदिल वापरले जातात. त्यातही तेलाच्या दिव्याऐवजी विजेच्या दिव्याचा उपयोग केला जातो.
कपडे : आधुनिक पाश्चात्त्य पद्धतीच्या तोकड्या कपड्यांची बेसुमार खरेदी होते.
दीपप्रज्वलन : मातीच्या सात्त्विक पणत्यांऐवजी चिनीमातीच्या असात्त्विक पणत्या, मेणाचे दिवे, मेणबत्त्या इत्यादींचा वापर केला जातो. तेलाच्या दिव्याच्या सात्त्विक ज्योतीचा प्रकाश; जो वातावरणातील सात्त्विक लहरी खेचून आणून सात्त्विकता निर्माण करतो, त्याचा कुठे मागमूसही नसतो. हे सारे पाहिले की, `केवळ सुटीचा आनंद लुटण्याकरताच असे वागत असतांना आमच्या जीवनातून आनंदालाच तर सुटी नाही ना मिळणार ?' या विचारासरशी जीवाचा थरकाप होतो. हे सारे आपणच थांबवले पाहिजे, अन्यथा आपल्या अध:पतनाला आपणच सर्वस्वी जबाबदार असू.
सुगंधी उटणे लावून स्नान करणे : हल्ली सुगंधी उटण्याऐवजी बाजारातून सुगंधी साबण आणला जातो.

हिंदूंनो, आपल्या संस्कृतीत शिरलेल्या कुप्रथा टाळून धर्मचरणाचे पालन करा !


 

११. हिंदूंनो, सणासुदीच्या मंगलसमयी तुमच्याकडून अमंगल तर घडत नाही ना



१. देवता व राष्ट्रपुरुष यांची नावे वा चित्रे असलेले फटाके वाजवले जातात. त्यामुळे देवता व राष्ट्रपुरुष यांच्या नावांच्या/चित्रांच्या अक्षरश: चिंधड्या उडतात.
२. भेट म्हणून दिल्या जाणार्‍या मिठाईच्या खोक्यांच्या वेष्टनांवर देवतांची चित्रे वा नावे असतात. बहुतेक वेळा हे खोके रिकामे झाल्यावर कचर्‍यात टाकले जातात.
३. देवतांची चित्रे वा नावे असलेली लॉटरीची तिकिटे विकत घेतली जातात. उपयोग झाल्यानंतर ती चुरगळून फेकून दिली जातात.

अध्यात्मशास्त्रानुसार देवतेचे नाव वा रूप असणे, म्हणजेच तेथे देवतेचे तत्त्व, म्हणजेच देवतेचे सूक्ष्मातून अस्तित्व असणे. म्हणून वरील प्रकार म्हणजे देवतांची विटंबना होय. यामुळे देवतांची अवकृपा होते. अशाच प्रकारे राष्ट्रपुरुषांचीही विटंबना होत असते. यासाठी,
१. अशा प्रकारचे अधर्माचरण स्वत: टाळा !
२. याविषयी इतरांचेही प्रबोधन करा !
३. हेतूपुरस्सर विटंबना करणार्‍यांचा निषेध करा व त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाका !
४. धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून पोलिसांत तक्रार करा !


सनातनची सात्त्विक शुभेच्छापत्रे!
 





संपर्कदैनिक मुख्य पानमराठी मुख्य पान
Copyright © 2008 - दैनिक सनातन प्रभात